Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on गुरुवार, 02/20/2014 - 15:28
तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? फेस्बुकावर तर स्वतंत्र विदर्भ मागणीस समर्थन चालू आहे। शिवसेना आणि मनसेने निव्वळ आपली राजकीय गोची होईल म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करू नये...मुंबईत बसून गडचिरोलीची समस्या सोडविता येत नाही...असे एक मत आहे तर पूर्वी नेहरूंनी बेरारात घातले, मग अत्रे, डांगे यांनी महाराष्ट्रात घातले परंतु विदर्भातील शेतकर्याची उपेक्षा मात्र थांबली नाही...धरणे झालीत परंतु कालवे, नाही...कापूस विदर्भात आणि सुतगिरण्या मात्र पश्चिम महाराष्ट्रात...नामशेष होत चाललेल्या कापूस आणि संत्रा लागवड क्षेत्राकडे कोणत्या जाणत्या राजाने आजवर लक्ष दिले?? संत्राप्रक्रिया कारखाना येणार होता, त्याचा अजस्त्र सोफिया कसा झाला?? मिहानचा वेग का मंदावला?? गोसेखुर्द करिता निधी नाही परंतु कृष्णा-कोयना खोर्यात गरज नसताना अब्जोवधी रुपये खर्च होतात...देशाच्या मध्यभागी व चहूबाजूंनी सुरक्षित असलेल्या नागपूरचे महत्व आपण कधी जाणणार?? अडचणी आहेत… पण काहि लोकाना अखंड महाराष्ट्र हवा आहे... शिवरायांचे VISION आणि पेशव्यांचा पराक्रम यांचे जर आपण मनापासून कौतुक करत असलो, तर कमीतकमी महाराष्ट्राचे तुकडे पडणार नाहीत याची काळजी तरी आपण नक्कीच घेऊ शकतो, नाही का? इतर राज्यांचे जाऊ द्या. इतर राज्यांना नुसताच 'भूगोल' आहे, आणि महाराष्ट्राला भूगोलाबरोबर 'इतिहास' सुद्धा. देखना है आगे आगे क्या होता है......
  • Log in or register to post comments
  • 56746 views

प्रतिक्रिया

Submitted by शिद on गुरुवार, 02/20/2014 - 15:34

Permalink

साहेब मेन बोर्डावर वर तर

साहेब मेन बोर्डावर वर तर आपलेच नाव झळकते आहे... एकामागुन एक असे लेख पडत आहेत की हलवाईच्या दुकानात जिलब्या... @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 02/20/2014 - 16:09

Permalink

स्वतंत्र विदर्भ व्हायलाच

स्वतंत्र विदर्भ व्हायलाच पाहिजे ...
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 02/20/2014 - 16:56

In reply to स्वतंत्र विदर्भ व्हायलाच by प्रसाद गोडबोले

Permalink

चुकतंय प्रसादराव!

चुकतंय प्रसादराव! वेगळा विदर्भ व्हायलाच पाहिजे - बबन
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on गुरुवार, 02/20/2014 - 21:34

In reply to चुकतंय प्रसादराव! by आदूबाळ

Permalink

वेगळा बबन झालाच पाहीजे..

वेगळा बबन झालाच पाहीजे.. - वैतागलेला विदभर्‍. :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 02/20/2014 - 16:38

Permalink

तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे....

कुठल्याही विषयात जिलेबी सोडुन लगेच दुसरी कडची जेवणाची ऑर्डर घेता.इकडे जिलेब्या गोळा करणार कोण? छोटी राज्ये निर्मिती आज पर्यत झाली आहेत,त्या राज्यांचा विकास किती झाला आहे याबाबत माहिती घेवुन इथे ठेवा आधी मग चर्चा करु.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 02/20/2014 - 16:49

Permalink

इतर राज्यांना नुसताच 'भूगोल'

इतर राज्यांना नुसताच 'भूगोल' आहे, आणि महाराष्ट्राला भूगोलाबरोबर 'इतिहास' सुद्धा.
याहून विनोदी वाक्य ऐकले नव्हते. आता भरून पावलो. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 02/20/2014 - 18:01

In reply to इतर राज्यांना नुसताच 'भूगोल' by ऋषिकेश

Permalink

बरं

माझ्या माहीतीनुसार हे वाक्य चिंतामण द्वारकानाथ देशमुख ह्यांचे आहे. आता हसा ...हा हा हा .
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/20/2014 - 18:04

In reply to बरं by प्रसाद गोडबोले

Permalink

मी हे वाक्य शिवसेना स्पेशल

मी हे वाक्य शिवसेना स्पेशल आहे असे समजत होतो. पण सी डी देशमुखांनी असे विधान केले असेल तर तेही या ठिकाणी साफ गंडलेत हे सरळच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 02/20/2014 - 18:15

In reply to मी हे वाक्य शिवसेना स्पेशल by बॅटमॅन

Permalink

माझ्यामते

इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे इतिहासाचाची आणि स्वतःच्या अस्मितेची जाणीव असणे असा आहे ... महाराष्ट्र वगळता बहुतांश सर्वच राज्य कायमच परकीयांपुढे झुकुन वाकुन जगत राहिली महाराष्ट्राच तसं नाही ( नाही म्हणजे सी डींच्या काळापर्यंत तरी नव्हतं ,आता हायकंमांडचे आदेश सुटले की महाराष्ट्राचे धाबे दणाणतात .) नाहीतर तंस म्हणलं तर अंटार्टिकावरच्या बर्फालाही इतिहास आहेच की !!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/20/2014 - 18:38

In reply to माझ्यामते by प्रसाद गोडबोले

Permalink

इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे

इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे इतिहासाचाची आणि स्वतःच्या अस्मितेची जाणीव असणे असा आहे ...
मग त्या निकषावर तमिऴनाडू व बंगाल तोडीसतोड आहेत. तमिऴनाडू तर महाराष्ट्राच्या कैक योजने पुढे असावा.
महाराष्ट्र वगळता बहुतांश सर्वच राज्य कायमच परकीयांपुढे झुकुन वाकुन जगत राहिली महाराष्ट्राच तसं नाही
अहो अख्खी दख्खनच तशी होती. आदिल-निजामादि 'परकीयांनी' महाराष्ट्रावर ठोकून २००-३०० वर्षे राज्य केलेच की. तमिऴनाडूवर तेही नव्हते. किंबहुना विजयनगर असेपर्यंत तुंगभद्रेच्या दक्षिणेकडे स्वातंत्र्यच होते. विजयनगर पडल्यानंतर मराठे वर आले. अन आजवरचा भारताचा इतिहास पाहिला तर मौर्य साम्राज्य हे उत्तरेत उदयास आलेले अन दक्षिणेत घुसलेले एकमेव ब्रिटिशपूर्व साम्राज्य म्हणावे लागेल. मुघलांनी तसे प्रभुत्व मिळवले पण ते अत्यल्पजीवी ठरले. हिंदू असो वा मुसलमान, दक्षिण ही उत्तरेपासून नेहमीच स्वतंत्र राहिलेली आहे-अपवाद अर्थातच ब्रिटिश अन ब्रिटिशोत्तर काळाचा. मुस्लिम काळातही हे आदिल-निजाम मुघलांच्या विरुद्धच होते. पाहिजे तेव्हा युती करायचे पण मुघलांचे स्वामित्व मान्य नव्हते कधीच. किंबहुना मुघल विरुद्ध आदिल-निजाम या संघर्षाचा चलाख वापर करूनच शिवाजीराजे सुरुवातीच्या काळात आपले बस्तान पक्के करते झाले आहेत. उत्तरेचे स्वामित्व न मानणे या निकषावर तर अख्खी दख्खन यात येऊ शकते. 'परकीयांचे' स्वामित्व झुगारणे अभिप्रेत असेल तर विजयनगरचे उदाहरणही आहे. स्वतःची अस्मिता अभिप्रेत असेल तर तमिऴनाडू अन नंतर उरलेली दक्षिणी राज्येही आलीच. उत्तरेत पोलिटिकली स्वतंत्र राहणे जवळपास अशक्यच होते. तरीही वेगळी अस्मिता इ. साठी बंगाल व पंजाब प्रांतही फेमस आहेच. पंजाबचे तर स्वतःचे राज्यही होते. पंजाबातही शिखांचा उदय झालाच. अगोदर धर्म म्हणून तो पसरला आणि अन नंतर मुघलांशीही त्यांनी लै झगडे घेतले. त्यांच्या गुरूंना कैक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या पण शेवटी त्यांच्या मिस्ल एकत्र होऊन रणजितसिंगांचे राज्य तयार झालेच. तीच गोष्ट आसामची. मुघलांना त्यांनी सराईघाटच्या लढाईत निर्णायकपणे हरवले अन शर्थीने राज्य राखले. तस्मात, परकीयांना यशस्वीरीत्या तोंड देणे, त्याची स्मृती राखणे अन ती स्वतःच्या अस्मितेत सामावून घेणे, स्वतःची वेगळी संस्कृती जपणे हे प्रकार महाराष्ट्राखेरीज अन्य ठिकाणीही कैकवेळेस झालेले आहेत. महाराष्ट्राची शिवकाळापासूनची पोलिटिकल अचीव्हमेंट तत्कालीन इतर कुणाही सत्तेपेक्षा या बाबतीत मोठी असली तरी उत्साहाच्या भरात हे नजरेआड होऊ नये असे वाटते. भारतातल्या प्रत्येक भागाला स्वतःचा वेगळा सुवर्णकाळ आहे आणि तो त्या त्या राज्याच्या सांस्कृतिक आत्मभानात तसा कमीअधिक फरकाने तत्रस्थ लेखक-कवींनी जागवलेला आहे. तसेच बोलायचे तर मग बिहारने अख्ख्या भारतावर राज्य केलेले आहे- एकदा नाही तर दोनदा. मौर्य अन गुप्तकाळात ग्रीक-हूणादि आक्रमणेही यूपी-बिहारने परतवली आहेत. निव्वळ आजच्या सांस्कृतिक जाणिवेत तो इतिहास जागवलेला दिसत नाही म्हणून त्यांना तो इतिहास नाही हे म्हणणे फार धार्ष्ट्याचे अन तितकेच अज्ञानमूलक आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घेतले तर शिवपूर्वकालीन महाराष्ट्राला काय इतिहास नव्हता? पण महाराष्ट्राचा इतिहास आज शिवाजीपासून सुरू होतो अन शिवाजीपर्यंत संपतो. सातवाहन, यादव, आदि लोकांची राज्ये शिवकालातील राज्यापेक्षा कितीतरी मोठी अन पॉवरफुल होती. त्या इतिहासाशी लोकांची अ‍ॅटॅचमेंट शिवकालाइतकी नसली म्हणून त्याचे मूल्य कमी होत नाही. नजीकच्या इतिहासात जे झाले त्यावरून असा सार्वकालिक सिद्धांत काढू नये असे वाटते. किती मागे जावे हाही एक प्रश्न आहेच, पण मग अशा ब्लँकेट विधानांना कालातीतपणाचा जो वास येतो तो दूर करण्यासाठी डिस्क्लेमर तरी लावावा. महाराष्ट्राचे विविध क्षेत्रांतील अफाट योगदान कुणाही अन्य प्रांताइतकेच, प्रसंगी अजून भारी आहे. पण त्याच्या स्मरणार्थ अन्य प्रांतांना कमी लेखणे चूक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 02/20/2014 - 19:08

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

+१०००००००००००००००००००००००००००

+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 02/20/2014 - 19:09

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

यावर

एक लेख येउद्या!
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 02/20/2014 - 19:13

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

टाळ्या....

उत्कृष्ट व माहितीपुर्ण प्रतिसाद...
  • Log in or register to post comments

Submitted by चैतन्य ईन्या on गुरुवार, 02/20/2014 - 20:04

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

जबरदस्त

जबरदस्त!! फारच आवडला प्रतिसाद. आपल्याकडे उगाचच आपण छत्रपतींच्या राज्यात जन्माला आलो म्हणजे दर पिढीत एक छत्रपती होता आणि बरेचदा आपण स्वतःच एक छत्रपती आहोत असे बऱ्याच लोकांना वाटते. मग ५६ इंची छाती फुगते बाकी काही नाही. ते गुज्जू आणि मारवाडी सगळे धंदे करतात आणि आपले तुणतुणे घेवून मराठीचे काय होणार असे चर्चासत्र खेळत बसतो
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 02/20/2014 - 20:52

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

व्वा!

तुम्हाला हा सविस्तर, माहितीपूर्ण प्रतिसाद द्यायला लावणार्‍या गोडबोलेंचे आभार!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 02/21/2014 - 00:50

In reply to व्वा! by प्रदीप

Permalink

:)

सविस्तर प्रतिसाद आवडला . पॉईट टेकन :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 02/21/2014 - 01:20

In reply to :) by प्रसाद गोडबोले

Permalink

मुद्दा समजून घेतल्याबद्दल

मुद्दा समजून घेतल्याबद्दल आभार :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Fri, 02/21/2014 - 11:56

In reply to :) by प्रसाद गोडबोले

Permalink

ए हे लय भारी

लोक्स आम्ही तर मीपावर खाते उघडल्या पासुनंच बॅट्याचे पंखा झालो आहोत. बॅट्या तुला पुन्हा एकदा _/\/\_

तु मला प्रत्यक्ष भेट बॅट्या जिथे भेटशील तिथे साष्टांग दंडवत घालीन म्हणतो.

  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 02/21/2014 - 13:54

In reply to ए हे लय भारी by प्रमोद देर्देकर

Permalink

झक्कास....

प्रतीसाद "नीऱक्षीर्"विवेक.. बॅट्(सुंदर नजाकतीने चालवणार्या) मॅन (कायम माणूस पण जपणार्या) व.वा.चा पंखा..
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 02/21/2014 - 00:04

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

प्रचंड सहमत

"भारतातल्या प्रत्येक भागाला स्वतःचा वेगळा सुवर्णकाळ आहे " "पण महाराष्ट्राचा इतिहास आज शिवाजीपासून सुरू होतो अन शिवाजीपर्यंत संपतो. सातवाहन, यादव, आदि लोकांची राज्ये...." अगदी अगदी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 02/21/2014 - 00:07

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

प्रतिसाद नेहमीप्रमाणेच

प्रतिसाद नेहमीप्रमाणेच माहितीने खचाखच भरलेला.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Fri, 02/21/2014 - 00:38

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

अतिशय उत्तम

अतिशय उत्तम प्रतिसाद. अगदी सहमत...
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 02/21/2014 - 11:35

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

आभार रे ब्याट्या! नुसते माझे

आभार रे ब्याट्या! नुसते माझे टंकनश्रम वाचवलेच नाहिस तर माझ्याही माहितीत भरच टाकलीस! :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 02/21/2014 - 12:37

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

+१०००

+१००० जबरदस्त, माहितीपूर्ण आणि समतोल प्रतिसाद !
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 02/21/2014 - 14:15

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

जब्री

सुरेख आणि माहितीपूर्ण प्रतिसाद. खरे म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी हा महाराष्ट्राचा पहिला "शिवाजी"! असो, ज्या वाक्यावरून हा वाद सुरू झाला ते "इतिहास-भूगोल" वाक्य अत्र्यांचे आहे. अत्र्यांच्या इतर (दहा हजार वर्षांत ... इत्यादी) वाक्यांच्या तुलनेतच हे वाक्यदेखिल समजून घ्यायचे!
  • Log in or register to post comments

Submitted by अगम्य on Tue, 12/01/2015 - 06:01

In reply to जब्री by सुनील

Permalink

हो

माझ्याही माहितीप्रमाणे हे "इतिहास, भूगोल.." हे वाक्य आचार्य अत्रे ह्यांचे आहे. ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भात लोकांना चेतवण्यासाठी केले असावे. त्या संदर्भात पहिले असता अगदी शब्दशः घेण्यापेक्षा भावार्थ लक्षात घेणे अधिक सयुक्तिक ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सरल मान on Tue, 12/01/2015 - 15:28

In reply to इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे by बॅटमॅन

Permalink

सरस

सुरेख दाखले आणि चौफेर बॅटing
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 02/20/2014 - 16:56

Permalink

ब ब्ब S Sन

यांना सकाळ मुक्तपीठातला बब्बन चावला वाटते. एS एS एS ब Sब्बSSS न
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on गुरुवार, 02/20/2014 - 17:07

Permalink

हो..

तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? हो येईल की..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/20/2014 - 17:16

Permalink

अनाहितानंतर खास अकुंसाठी

अनाहितानंतर खास अकुंसाठी वेगळ्या दालनाच्या मागणीस जोर येणार का????
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on गुरुवार, 02/20/2014 - 17:57

Permalink

गंभीर प्रतिसाद

नमस्कार, सुरूवात करताना लेखातील लिहीण्याच्या ओघात झालेली एक चुक दुरूस्त करावी म्हणतो... वर नेहरूंनी बेरारात घातले हे जे म्हटले आहे ते चुक आहे. बेरार म्हणजे वर्‍हाड. आणि वर्‍हाड म्हणजे आजचा अमरावती महसुल विभाग किंवा पश्चिम विदर्भ. नागपुर महसुल विभागाला बोलीभाषेवरून 'झाडी' असे म्हणतात. दोन्ही मिळून विदर्भ होतो. १८५३ साली बेरार हा ब्रिटीशांनी हैद्राबादच्या नवाबाकडून महसुली खर्चासाठी काढून घेऊन त्यावर आपला अंमल बसवला. पुर्व विदर्भ आधीपासूनच ब्रिटीशांच्या ताब्यात होता, त्याता मध्य प्रांत असे नाव होते. पुढे ह्या बेरार ला त्या सेंट्रल प्रॉव्हिन्सशी जोडल्या गेला व सिपीएन्डबेरार असा प्रांत अस्तीत्वात आला. तो तसाच पुढे कायम राहीला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली तेव्हा विदर्भ महाराष्ट्रात येण्याबाबत साशंक होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विदर्भ व महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास करून विदर्भाने महाराष्ट्रात सामील होऊ नये. असा सल्ला दिला होता. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली. नागपुर करार व अकोला करार करून विदर्भावर अन्याय होणार नाही व विदर्भाच्या प्रगतीसाठी संसाधनांची समन्यायी वाटणी होईल अश्या लिखीत आश्वासनांवर विश्वास ठेवून विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. विदर्भ वेगळा व्हावा व स्वतंत्र राज्य व्हावे असा मतप्रवाह विदर्भात सुरूवातीपासूनच होता व आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विदर्भातून 'वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' असा जो मत प्रवाह आहे तो दोन पातळ्यांतून येतो व त्या दोहोंची पार्श्वभूमी वेगळी आहे. पहिला प्रवाह आहे राजकारणी लोकांचा - यात सामान्यतः असे राजकारणी आहेत ज्यांना मुंबईत कुणी विचारेणासे झालंय. किंवा राजकीय फायद्यासाठी पक्षांतर केलेले लोक, किंवा विदर्भाच्या ठराविक पट्ट्यात समर्थक असलेले लोक असे दिसतात. सत्तेच्या मुख्यप्रवाहाच्या बाहेर पडलेले लोक, पक्षश्रेष्ठींच्या नजरेत यायला, पेपरात बातमी व्हायला हा मुद्दा वापरतात असे दिसते. मुख्य प्रवाहात असताना, भाजपा हा एकच पक्ष वेगळा विदर्भ व्हावा यासाठी इतर कुणी प्रस्ताव मांडल्यास समर्थन देऊ अशी भूमीका घेऊन आहे, शिवसेना कट्टर विरोधात आहे. कॉग्रेसची भूमिकाच नाही, राष्ट्रवादीला विदर्भाशी सोयर सुतक नाही. या प्रवाहात माजी कॉग्रेस पदेशाध्यक्ष श्री रणजीत देशमुख व आता एवढ्यात नागपुरचे खासदार श्री विलास मुत्तेमवार हे मुख्य धारेत असतानासुध्दा विदर्भाच्या बाजुला बोलणारे नेते म्हणून बघू शकतो. यांच्या शिवाय काही नवीन नेते ज्यांना स्थानिक राजकारणात मुद्दा पाहिजे ते वेगळा विदर्भ घेऊन रॅली काढताहेत. दुसरा प्रवाह आहे तो अभ्यासकांचा - ह्यांचा वेगळा विदर्भ हा विदर्भावर झालेल्या अन्यायातून निर्माण झालेल्या चिडीपायी आहे. विदर्भावर निधीवाटपात तसेच अनेक वेगवेगळ्या शासकीय पातळीवर अन्याय होतो हेच आधी सरकारला मान्य नव्हते. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. पि.सी. अलेक्झेंडर यांनी सर्वप्रथम हे मान्य केले व हा अनुशेष दूर करण्यासाठी कार्यक्रम आखण्याचे निर्देश राज्यशासनाला दिले. त्यानंतर काही प्रमाणात काम झाल्याचं दिसून आलं. ते तेवढ्यापुरतं टिकलं. विदर्भाच्या विषयांवर अभ्यास करणारे पत्रकार, विद्यार्थी, नेते आदींचा यात समावेश होतो. मात्र ह्या दुसर्‍या प्रवाहातील लोकांना एकतर जनमताचा पाठींबा नाही आणि सामान्य लोकांपर्यंत त्यांची पोहोच नाही. त्यामुळे हे लोक विदर्भाच्या मुद्द्यावर मत बनलेले लोक जेथे जमतात तेथे आपले मत मांडतात. अश्या कार्यक्रमाला गेल्यावर मला तरी हा प्रकार 'होकार आल्यावरसुध्दा मुलीला मागणी घालण्याचा प्रकार' वाटतो. त्यामुळे केवळ आधी सहमत असलेले लोक सहमत होत असावेत कदाचीत. वेगळ्या विदर्भाला सामान्य जनतेचा अद्यापही पाठींबा नाही. यावर मागे एका माजी मुख्यमंत्र्याना नागपुरात पत्रकारांनी विचारले की विदर्भातील जनतेचा वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठींबा नाही असे कशावरून म्हणता? त्यावर त्यांचे उत्तर असे होते की विदर्भाबाबत ठाम विरोध केवळ शिवसेनेचा आहे आणि विदर्भातून शिवसेनेचे खासदार व आमदार भरभरून निवडून येतात, यावरून सामान्य लोकांचे मत समजते आणि वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या लोकांची संख्याच नाही. ज्यांचा तेलंगणाच्या आंदोलनाचा अभ्यास असेल ते लोक वेगळ्या विदर्भाच्या तथाकथीत आंदोलनाची तुलना तेलंगणाशी करणार नाहीत. कारण वेगळा व्हावा याशिवाय तेलंगणाच्या आंदोलनाशी वेगळा विदर्भाच्या आंदोलनाचा संबंध, तुलना नाही. वेगळ्या विदर्भाला जनमताचा पाठींबा आहे की नाही यासाठी विदर्भात सध्या एक मस्त प्रकार चालला आहे. तो म्हणजे जनमतचाचणीचा. यात विदर्भवादी कार्यकर्ते आधीच एक तारीख घोषणा करतात, त्यादिवशी त्या शहरात मुख्य चौक, महाविद्यालये आदींसमोर मतपेट्या ठेवल्या जातात. त्यासोबत वेगळा विदर्भ पाहिजे की नाही अशी मत पत्रीका असते. त्यात ज्या लोकांना उत्साह असेल (ज्यात वेगळा पाहिजेचा उत्साहवालेच अधीक असतात) ते लोक मतदान करतात. समजा त्यात जर ७० हजार लोकांनी मतदार केले असेल आणि त्यातील ८०% लोकांचा वेगळ्या विदर्भाला पाठींबा असेल तर मग लागलीच असे जाहीर होते की ८०% लोकांचा विदर्भाला पाठींबा आहे. :) यात हे विसरले जाते की त्या शहराची लोकसंख्या ९ लाखाच्या वर आहे. ;) विदर्भवादी लोक आंदोलन करताना दिसत आहेत. सामान्य जनता शांत आहे. विदर्भात जनमानसातून आलेलं आणि आपला मतदारसंघ सोडून प्रसिध्दी किंवा लोकांवर अधिकार आहे असे नेते कमी आहेत. त्यामुळे जोपर्यंत राजकारणात अश्या विदर्भमान्य नेत्याचा उदय होत नाही किंवा वेगळ्या विदर्भाला जनमानसात वजन असलेल्या अराजकीय व्यक्तीचं नेतृत्व मिळत नाही तो पर्यंत विदर्भ वेगळा होणे शक्य नाही. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by राही on गुरुवार, 02/20/2014 - 19:03

In reply to गंभीर प्रतिसाद by नीलकांत

Permalink

+११११

उत्कृष्ट प्रतिसाद. बेरार आणि नेहरूंविषयी हेच सांगायचे होते. तेव्हढ्यात आपला सर्वंकष प्रतिसाद वाचला. आणि मग वेगळे लिहिण्याजोगे असे काही उरलेच नाही. माझा विदर्भाविषयी फारसा अभ्यास नाही. पण त्या प्रदेशातून फिरताना असे जाणवते की संपूर्ण विदर्भाची एकच अशी अस्मिता नसावी. नागपूर वगैरेची वेगळी, अकोला-अमरावतीची वेगळी,एकट्या यवतमाळचीसुद्धा वेगळी. यवतमाळ बाजूची वेगळी, चांदा-भंडार्‍याची आणखीनच वेगळी. बुलढाणा-वाशिम तर मराठवाड्याचाच भाग वाटतात. वर्धा जिल्हा सेवाग्राममुळे म्हणा किंवा बजाजांमुळे म्हणा वेगळाच वाटतो. नागपूरवरही मध्यप्रदेशची छाप जाणवते. गडचिरोली आणखीनच वेगळा. हे सर्व प्रांत एका समान अस्मितेने पेटून उठू शकतील का असा प्रश्न पडतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/20/2014 - 19:05

In reply to +११११ by राही

Permalink

+१११११११११११११११११११११११११!

अतिशय मार्मिक प्रतिसाद. काहीसे अस्पष्टपणे जे वाटत होते ते अगदी व्यवस्थित मूर्तरूपाने मांडून नीलकांत यांनी धाग्याचे एकदम उन्नयनच केलेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on Fri, 02/21/2014 - 02:33

In reply to +११११ by राही

Permalink

विदर्भाची एक अस्मिता

@राही, तुमच्या निरीक्षणाशी सहमत. संपूर्ण विदर्भाची एक अस्मिता दिसत नाही यावर पूर्वी कधी असा विचार केला नव्हता पण हे वाचून ते काही अंशी पटले. फक्त यामागची जर कारणे पहिली तर भौगोलिक परिस्थिती बरीचशी कारणीभूत आहे असे दिसते. बुलढाणा जिल्हा हा विदर्भात असला तरीही जवळचे मोठे आणि विकसित शहर म्हणून नागपूर पेक्षा औरंगाबाद जवळ आहे. त्यामुळे साहजिकच वैदकीय सेवा, शिक्षण इत्यादी साठी आधी औरंगाबाद चा पर्याय जवळचा वाटतो. आणि विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा या तिन्हीच्या सीमारेषा जवळ असल्यामुळे संमिश्र प्रभाव दिसतो. अंतराच्या दृष्टीने पहिले तर बुलढाण्याहून नागपूर आणि पुणे एकाच अंतरावर आहेत त्यामुळे दोन्ही सारखेच दूर वाटतात. त्यातून गेल्या दहा वर्षात शिक्षणासाठी सगळ्यांचीच ओढ ही पुण्याकडे दिसते. पूर्वी असे अनेक जण होते की ज्यांना अकोला अमरावतीहून पुढील शिक्षणाचा पर्याय म्हणून नागपुरच दिसायचे. हे चित्र गेल्या काही वर्षात बदलले. बुलढाणा आणि चंद्रपूर-गडचिरोली ही विदर्भाची दोन टोके पाहिली तर असे लक्षात येईल की एवढे अंतर बघता इथे सांस्कृतिक, भौगोलिक बाबतीत प्रचंड तफावत असणे बरेच स्वाभाविक आहे. पुणे आणि सातारा किंवा पुणे आणि मुंबई यामध्येही महाराष्ट्राची अस्मिता असली तरीही वेगळेपणा आहेच. तसाच तो विदर्भात देखील आहे. लग्नातल्या पद्धती, खाण्यापिण्याच्या पद्धती, बोलीभाषा यात बरीच समानता आढळते. बाकी नीलकांत यांचा प्रतिसाद खूपच आवडला. शब्दाशब्दाशी सहमत. विशेष करून वेगळ्या विदर्भाला सामान्य जनतेचा अद्यापही पाठींबा नाही हे अगदी खरे. केवळ वेगळा विदर्भ करून विकास होईल हा भाबडा आशावाद वाटतो. त्यासाठी भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरण, राजकारण्यांचा सक्रिय सहभाग आणि तेवढेच महत्वाचे म्हणजे विदर्भातील लोकांचाही या विकासासाठी सहभाग हे आवश्यक वाटतात. मी या बाबतीत कुणी तज्ञ नाही, परंतु लहानपण सगळे विदर्भात गेले. आजही आई बाबा तिथे आहेत शिवाय अनेक नातेवाइक. त्यामुळे आजही जाणे येणे आहे. त्या अनुभवातून जे वाटले ते फक्त लिहिले. विदर्भ आणि महाराष्ट्र दोघांचीही अस्मिता बाळगणारी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 02/20/2014 - 21:07

In reply to गंभीर प्रतिसाद by नीलकांत

Permalink

प्रतिसाद नेहमीप्रमाणेच उत्तम

प्रतिसाद नेहमीप्रमाणेच उत्तम
नागपुर महसुल विभागाला बोलीभाषेवरून 'झाडी' असे म्हणतात.
हा झाडी हा शब्द लै जुना आहे. नागपूर-भंडारा विभागतल्या जंगलझाडीयुक्त भागाला 'झाडीमंडळ' म्हणत. देवगिरीचा अखेरचा स्वतंत्र यादवसम्राट रामचंद्रदेवाच्या ठाणे ओवळे ताम्रपटात हेमाद्रीपंडीताने झाडीमण्डळ जिंकल्याचा उल्लेख आला आहे. समस्त हस्तिपकाध्यक्षो निजगुणसुभगभावुके समस्तकरणाधिपत्यमंगी कुर्वाणेच निर्ज्जित झाडीमंडले मंत्रीचुडामणी गुणरत्नरोहणाद्रौहेमाद्रौ | सर्व हत्तीदळाचा प्रमुख, करणाधिप (अर्थ खात्याचा प्रमुख), मंत्रीचुडामणी अशा सर्व गुणरत्नांनी युक्त अशा हेमाद्रीने झाडीमंडळ जिंकले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/20/2014 - 22:37

In reply to प्रतिसाद नेहमीप्रमाणेच उत्तम by प्रचेतस

Permalink

वरिजिनल शिलालेखासाठी धन्स रे

वरिजिनल शिलालेखासाठी धन्स रे वल्ली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 02/20/2014 - 21:22

In reply to गंभीर प्रतिसाद by नीलकांत

Permalink

प्रश्न

अत्यंत सविस्तर, माहितीपूर्ण प्रतिसाद.
विदर्भावर निधीवाटपात तसेच अनेक वेगवेगळ्या शासकीय पातळीवर अन्याय होतो हेच आधी सरकारला मान्य नव्हते. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. पि.सी. अलेक्झेंडर यांनी सर्वप्रथम हे मान्य केले
माझा ह्या प्रश्नावर काहीही अभ्यास नाही, तरीही विदर्भास शासकीय पातळीवर डावलले गेले आहे, ह्या विधानाविषयी आश्चर्य एव्हढ्यासाठी वाटत आले आहे, की विदर्भाचे श्री. वसंतराव नाईक, तब्बल ११ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते कुशल व्यवस्थापक होते, अत्यंत धूर्त राजकारणीही होते (तेंडुलकरांच्या त्यांच्यावरील लेखामध्ये ह्याची थोडी झलक मिळते. आणि मुंबईमधे पन्नाशी-साठीच्या दशकांत डोईजड होऊ पहाणार्‍या डाव्या पक्षांना त्यांनी कसा व्यवस्थित शह दिला, हे सर्वश्रूतच आहे). तेव्हा इतके तोलामोलाचे वैदर्भीय नेते राज्याच्या जवळजवळ सुरूवातीच्या काळातच राज्याच्या सर्वोच्च पदावर असतांना हे असे का व्हावे?
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on गुरुवार, 02/20/2014 - 19:46

Permalink

@अ.कु.

तुमचा हरवलेला की बोर्ड सापडलेला दिसतोय :) हाबिण्णंदन!!
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 02/20/2014 - 19:56

Permalink

अकुंच्या धाग्यावर इतके सुंदर

अकुंच्या धाग्यावर इतके सुंदर प्रतिसाद अपेक्षित नव्हते.. अकु.. असे प्रतिसाद येणार असतील तर तुमचे ४६१८३७ निरर्थक धागे माफ करु आपण! नीलकांत आणि बॅटमॅन, दोघांचेही प्रतिसाद अत्युत्तम!!
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 02/20/2014 - 20:28

In reply to अकुंच्या धाग्यावर इतके सुंदर by पिलीयन रायडर

Permalink

नीलकांत आणि बॅटमॅन, दोघांचेही

नीलकांत आणि बॅटमॅन, दोघांचेही प्रतिसाद अत्युत्तम!!
+१ हे प्रतिसाद म्हणजे धाग्याचं म्याटर पाहिजे होतं - एक दस्तऐवजीकरण म्हणून.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 02/21/2014 - 00:58

In reply to नीलकांत आणि बॅटमॅन, दोघांचेही by आदूबाळ

Permalink

+२

अनुमोदन !
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 02/20/2014 - 20:34

Permalink

छान प्रतिसाद. बॅटमॅन आणि

छान प्रतिसाद. बॅटमॅन आणि नीलकांतचे. वरवर विचार करता तरी छोटी राज्ये जास्तं चांगला विकास देऊ शकतील असं वाटतं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 02/20/2014 - 21:26

Permalink

या मुद्याकडे आजपर्यंत खरेच कधि गांभिर्यांने बघितले नाही...

हा प्रकार म्हणजे मुळातच पश्चिम महाराष्ट्रातील श्रीमंत संस्थाना समोर तुलनेने गरिब असलेली संस्थाने अर्थातच आवश्यक कमी पैसा चारु शकणार व परिणामी वरुन सत्ताकेंद्रे नेहमीच प.महाराष्ट्रकेंद्रीत वाटली जाणार यातुन निर्माण झालेली कमीपणाची जाणिव इतकेच याचे स्वरुप समजत होतो. प.महाराष्ट्राच्या श्रीमंतीला कर्तुत्वापेक्षाही भौगोलीकतेचा व निसर्गाचा प्रमुख हातभार आहे त्यामुळे त्यामुळेच उद्या वेगळा प्रदेश निर्माण होउनही जर त्यातील जनता गरिब व विषेश कर न देणारीच राहिली (कोणतेही कारण असो कर्तुत्वाभाव वा इतर प्रकोप) तर हा प्रदेश उलट भरघोस नक्षल निर्मीतीचे केंद्र का बनणार नाही अशी शंका मनात येते. अर्थात बॅट्मॅन व निलकांत यांनी बराच चांगला उहापोह केला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by lakhu risbud on Tue, 02/25/2014 - 05:33

In reply to या मुद्याकडे आजपर्यंत खरेच कधि गांभिर्यांने बघितले नाही... by आत्मशून्य

Permalink

भक्तीचा अनुशेष

थोडासा वेगळा मुद्दा नजरेस अनु इच्छितो. विदर्भाच्या आर्थिक अनुषेशाप्रमाणेच मला वाटते भक्तीचा अनुशेष मोठा आहे. ज्ञानोबा-तुकाराम, पंढरीचा विठोबा,अष्टविनायक,जेजुरीचा खंडोबा, शिर्डी साईबाबा हि बर्याच मोठ्या मराठीसमूहाची भक्तीस्थाने प्रामुख्याने पुणे आणि लगतचे जिल्हे यांमध्येच आहेत.आणि या भक्ती स्थानांची लोकप्रियता वाढविण्यात चित्रपट आणि सहयोगी साधनांनी हातभार लावला आहेच. तशाच प्रकारचे branding किवा प्रसिद्धी म्हणा विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील श्रद्धास्थानांची झाली नाही. मग त्या अनुषंगाने येणारे spiritual tourism पण नाही. वर्षातून एकदा तरी वारी किवां यात्रेच्या निमित्ताने विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील जनतेला या ठिकाणी यावे लागते. तसे पुणे आणि लगतच्या जिल्ह्यां मधील जनतेला विदर्भ किवा मराठवाड्यात जावे लागत नाही (काही अपवाद जरूर असणार,पण एकूण संख्या कमीच )त्यामुळेसुद्धा इकडच्या जनतेच्या मनामध्ये आणि पर्यायाने नेतृत्वा मध्ये एक प्रकारच्या श्रेष्ठत्वाची (अहंगंडाची) भावना मनात येत असावी का ? असा एक विचार मनात येतो
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Wed, 02/26/2014 - 16:08

In reply to भक्तीचा अनुशेष by lakhu risbud

Permalink

वारकरी

वारकरी संप्रदायाचा प्रसार विदर्भात बर्‍यापैकी झालेला आहे. त्यामुळे पंढरपुर, देहू, आळंदी, नेवासे ही विदर्भातील लोकांची श्रध्दास्थाने आहेतच. शिर्डी हे सुध्दा विदर्भातील लोकांचे श्रध्देचे ठिकाण आहे. मात्र गेल्या दोन दशकात शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त बर्‍यापैकी वाढत आहेत आणि विदर्भातील सर्व ठिकाणाहून शेगावला लोक येतात. विशेषत: गेल्या आठवड्यात गजानन महाराजांचा प्रगटदिन महोत्सव झाला. त्या दिवशी शेगाव मध्ये खुप मोठ्या संख्येत लोक हजर असतात. मात्र अद्यापही शेगावची मार्केटींग तेवढी झालेली नाही हे खरं आहे. शेगावच्या संस्थानने वारकरी संप्रदायाच्या प्रसाराची मोठी मोहीम हाती घेतली आहे. शेगाव ते पंढरपुर अशी पायी वारी दरवर्षी जाते. माहुरची रेणूका (नांदेड मराठवाडा) हे सुध्दा विदर्भातील लोकांचे श्र॑ध्दास्थान. महाराष्ट्रातील प्राचीण संप्रदायापैकी महानुभावपंथाची जवळपास सर्वच महत्वाची तिर्थक्षेत्रे ही विदर्भात आहेत. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 02/20/2014 - 21:38

Permalink

विदर्भ-पश्चिम महाराष्ट्र

विदर्भ-पश्चिम महाराष्ट्र स्पर्धेचं कारण अजून मागच्या इतिहासात पण सापडू शकेल. नागपूरकर भोसले हे एक सत्ताकेंद्र होतं. "अंताजीची बखर" नावाच्या भारी कादंबरीच्या प्रस्तावनेत असा काहीतरी उल्लेख आहे. कुठेसं वाचल्याचं आठवतंय - नागपूरकर भोसल्यांपैकी एकाला पेशव्यांच्या मदतीने छत्रपती बनवण्याचा प्रयत्नही झाला होता - सातार्‍याच्या गादीवर दत्तक वगैरे देऊन. बॅटमॅन आणि इतर इतिहासप्रेमी अर्थातच जास्त प्रकाश टाकू शकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Fri, 02/21/2014 - 12:23

Permalink

धन्स वल्ली, बॅटमन,नीलाकांत साहेबांना

हो पण महाराष्ट्राचे जे सहा (विदर्भ , मराठवाडा , कोंकण...वगैरे) असे प्रांत आहेत ते कोणत्या निकषावर केले गेलेत म्हणजे भौगोलिक दृष्ट्या की आणखी काही कारणं आहेत. तसेच ते कधीपासुन असे नावाजले गेले. यावर बॅटमन, आणि वल्ली साहेबांनी कृपया प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 02/21/2014 - 12:57

Permalink

वा!

नाकापेक्षा मोती जड!! या धाग्यावर एकापेक्षा एक छान प्रतिसाद आलेत. नीलकांतने आठवड्यात २ दिवस तरी मिपावर जास्त वेळ घालवावा अशी विनंतीवजा आज्ञा देत आहे! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 02/21/2014 - 14:29

Permalink

सुरेख

पहिल्यांदाच अकुंचा धागा पुनर्वाचनीय झालाय! मला वाटते, डॉ श्रीकांत जीचकार यांनी आर्थिक मुद्द्यावर स्वतंत्र विदर्भ हा पर्याय योग्य नसल्याचे दाखवून दिले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Fri, 02/21/2014 - 20:51

Permalink

प्राचीन संस्कृत साहित्यात

प्राचीन संस्कृत साहित्यात राजकुमाराने विदर्भातील सुंदर राजकन्ये बरोबर विवाह करीत असे. असे बरेच उल्लेख आहेत. स्वयं श्री कृष्णाने ही वैदर्भी राजकन्येशी लग्न केले होते. असो. आमची सौ. ही विदर्भातील आहे. (आता ती सुंदर आहे कि नाही या वर मी काहीच बोलणार नाही कारण अन्यथा 'आगे कुआं आणि पिछे खाई वाली गत होईल,तिने वाचले तर). तुमच्या जिभेला काही हाड नाही असं/अस तिचे नेहमीच म्हणणे असते. (तेही खरं/खर आहे म्हणा, विदर्भातले लोक नाकात बोलत नाही) दोन वर्षांपूर्वी चंद्रपूरला गेलो होतो. देशातील सर्वात जास्त वीज चंद्रपूरच्या पंचक्रोशीत होते तरी ही १० तास वीज नव्हती. सर्व वीज मुंबईला जाते. विद्युत केंद्रातील एक अधिकारी म्हणाला, एका युनिट वर २० पैशे ही रायेल्टी मिळाली तरी ही विदर्भ देशातील श्रीमंत राज्य बनेल. असो
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com