✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे

व
विद्युत् बालक यांनी
Tue, 01/07/2014 - 23:15  ·  लेख
लेख
एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे २०१४ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या साहित्यिक व त्यांच्या लेखना ऐवजी एका जेष्ठ संपादकांच्या वादग्रस्त मुलाखती वरूनच जास्त गाजत आहे . ह्या महाशयांनी उधळलेली मुक्ताफळे इथे व इथे पाहायला मिळतील . आणि विशेष म्हणजे ह्याचा महाराष्ट्रातील तथाकथित सामाजिक विचारवंतानी निषेध पण व्यक्त केलेला नाही उलटे ह्यांच्या सुरात सूर मिसळलेला आहे . मोदींचा उदय व दाभोलकर यांची हत्या यांची सांगड घालणाऱ्या ह्या थोर विचारवंतास आमचा साष्टांग नमस्कार . राजकीय मतभेद कितीही असोत पण साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय आखाड्यात रुपांतरीत होताना बरे नाही दिसत. (धाग्याची भाषा हि दोन बाटल्या थंडगार पाणी पिउन गार ठेवलेली आहे )
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10885 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

:(

प्रसाद गोडबोले
Wed, 01/08/2014 - 13:23 नवीन
खरंतर काथ्याकुटायचा नाही हे ठरवलं होतं पण आत्ताच तो व्हिडीयो पाहिला त्यातले एक वाक्य ऐकले अन डोक्यात तिडीकच गेली ...
"देश कॉंग्रेस मुक्त करायचा म्हणजे स्वातंत्र्य चळवल बंद करायला लागेल कारण स्वातंत्र्य चळवळ काँग्रेसने लढलेली आहे "
हे म्हणजे "उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया " ह्या थाटात झाले ... स्वातंत्र्याचे श्रेय एकट्या काँग्रेस आणि गांधींचे .... बाकीचे काय तर इतिहासाच्या पुस्तकातील एका पॅराग्राफचे धनी असं काही वाचलं की आझाद , भगत सिंग ,सुखदेव , राजगुरु , नेताजी ,चाफेकर बंधु , अनंत कान्हेरे , तात्याराव , जीना , पाशा खान , अरविंद घोष , बाबु गेनु वगैरे लोकांची फार कीव वाटते ... तुमचं बलिदान पाण्यात गेलं महाराजा :(

आणखी १०-२० वर्षांनी शाळेतुनच

टवाळ कार्टा
Wed, 01/08/2014 - 14:51 नवीन
आणखी १०-२० वर्षांनी शाळेतुनच हे शिकवले जाणे बंद होउ शकते :(
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

येत्या काही

इरसाल
Wed, 01/08/2014 - 13:30 नवीन
वर्षा़त ह्यांना भारतरत्न, पद्मविभुषण, पद्मभुषण वगैरे जाहीर झाले तर आश्चर्य नको वाटायला.(**काँग्रेसची सत्ता राहिली तर)

काहीही असो केतकर सरांचे लेखन

सचीन
Wed, 01/08/2014 - 14:45 नवीन
काहीही असो केतकर सरांचे लेखन त्यांचे विचार हे रोखठोक आहेत. असे अभ्यासू व्यक्तिमत्वे, त्यांचे विचार हे समाजासाठी आदर्शच ठरतात.

अरेरे

अनिरुद्ध प
Wed, 01/08/2014 - 17:39 नवीन
किती त्रास या दर्यावर्दी आणि मंडळीना सर्व मराठी सन्केतस्थळावर्च्या मतिमंदानी केलेली घाण साफ करण्याचे कन्त्राटच मिळाले आहे यांना.
↩ प्रतिसाद: दर्यावर्दी

बॅटमॅन, हे दोघे इतक्या

मंदार दिलीप जोशी
Wed, 01/08/2014 - 17:39 नवीन
बॅटमॅन, हे दोघे इतक्या खालच्या आणि वैय्यक्तिक पातळीवर उतरल्यावर सुद्धा तुम्हाला यांच्याशी वाद घालण्याची हौस आहे? मुद्द्याला प्रतिवाद करता आला नाही ही असला उकिरडा करणारी जनावरे ही. आपण का यांच्यासारख्या फालतू लोकांकडून अपेक्षा ठवा?

सहमत आहे, गटार-दगड-चिखल

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 17:43 नवीन
सहमत आहे, गटार-दगड-चिखल न्यायाने गप्प बसावयाचे ठरवले आहे.
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

बॅटजी वैयक्तीक शेर्यांबद्दल

दर्यावर्दी
Wed, 01/08/2014 - 17:46 नवीन
बॅटजी वैयक्तीक शेर्यांबद्दल क्षमस्व.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

प्र का टा आ

अनिरुद्ध प
Wed, 01/08/2014 - 17:54 नवीन
नन्तरची पष्चात बुद्धी? आणि परत तेच सं मं आता व्यक्तिगत रोख असलेले प्रतिसाद चालतात का?
↩ प्रतिसाद: दर्यावर्दी

दर्यावर्दी, तुम्हाला उद्देशून

मंदार दिलीप जोशी
Wed, 01/08/2014 - 17:51 नवीन
दर्यावर्दी, तुम्हाला उद्देशून हा या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद. तुमचे नाव, गाव, पत्ता, फोन नंबर कळवता का? तुमचे ज्ञानामृतमय शब्द ऐकून तुम्हाला भेटण्याची फार म्हणजे फार इच्छा लागून र्‍हायली आहे. एकदा कडकडून गळाभेट घेतली की मग माझ्या मनाला शांतता लाभेल. काय म्हणता भेटता का? आणि नसेल भेटायची हिंमत, तर सांगा बुवा तसे. मग अंगात नाही बळ, अन् चिमटी घेऊन पळ असा आयडी घ्या :P

कहर म्हणजे आयबीएन लोकमत वर

वडापाव
Wed, 01/08/2014 - 17:57 नवीन
कहर म्हणजे आयबीएन लोकमत वर आजचा सवाल मध्ये कुमार केतकरांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटले त्याचा 'पत्रकारांवर वाढता हल्ला' असा बागुलबुवा करण्यात आला!! त्यात जरी 'केतकरांबाबतची घटना हे केवळ एक निमित्त' असं म्हटलं गेलं तरी चर्चेत उपस्थित एकूण सगळ्याच पत्रकारांचा रोख देवेंद्र फडणवीस हे आपली पातळी सोडून बोलले असाच होता. खरं तर त्यांनी 'प्राण्याला वेड लागलं की आपण त्याला मारून टाकतो; पण संपादकाला वेड लागलं की त्याच्या बोलण्याकडे फक्त दुर्लक्ष करावं' इतकंच म्हटलं होतं. यात काय चुकीचं म्हटलंय??? तरी सगळ्यांचा सूर त्यांनी याबद्दल माफी मागावी असाच दिसला. म्हणजे पत्रकारांनी लोकांबद्दल कुठेही (म्हणजे एकवेळ न्यूजचॅनल वर, किंवा पेपरात केलं असतं, तर एक वेळ त्यात वादासाठी काहीतरी मुद्दा राहिला असता. इथे प्रसंग काय, सुमार काय बोलतायत??) काहीही गरळ ओकावी, खुशाल भेदभाव पसरवणारी भाषा करावी, आणि त्याबद्दल त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं, असं म्हणणा-याने मात्र 'पातळी सोडली'??? अर्थातच त्या आजचा सवाल वर प्रत्येक ब्रेक नंतर 'पत्रकारांवर हल्ले वाढतायत का?' अशा काहीशा सवालाला आलेला लोकांचा जवाब (तो सवाल सुद्धा कसा विचारतात रे.... रे रे रे... असो) 'नाही' असाच दिसत होता. पूर्णवेळ हसत होतो.
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा