✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तरूण तेजपाल, तेहेलका आणि पत्रकारीतेतील नैतिकता

व
विकास यांनी
गुरुवार, 11/21/2013 - 02:52  ·  लेख
लेख
तेहेलकाचे नाव ऐकल्यावर भारतात "स्टींग ऑपरेशन" कसे प्रचलीत झाले ते लक्षात येते. बंगारू लक्ष्मण यांचे लाच घेताना काढलेल्या चित्रफिती आठवतात. तोच प्रकार इतर राजकारण्यांबरोबर देखील केला. मोदींच्या विरोधात गोध्रादंगलीवरून आवाज करणार्‍यांमधे तेहलकाच पुढे होते. त्याचे संस्थापक - प्रमुख संपादक तरूण तेजपाल हे इंडीया टूडे, आउटलूक आदी कम्युनिस्ट विचारसरणींच्या माध्यमातून वर आलेले असल्याने सगळा तेहेलका हा भाजपा, संघ आणि तत्सम (आणि कधी कधी काँग्रेसच्या) विरोधातच असणे ह्यात काहीच आश्रर्यकारक नव्हते. पण त्यासंदर्भात दाखवली गेलेली नैतिकता ही किती कचकड्याची होती हे आज तेहेलका सोडून इतर प्रसिद्धी माध्यमात आलेल्या बातम्यातून समजते. थोडक्यात खालील प्रकार घडला आहे. (संदर्भ: आउट्लूक आणि एनडीटीव्ही) स्वतःच्या मुलीच्या वयाच्या असलेल्या स्त्री पत्रकाराशी त्यांनी अशोभनीय कृती (sexual misconduct) केल्या, त्या देखील परत परत. त्या स्त्रीपत्रकाराने जेंव्हा तक्रार केली तेंव्हा तिची माफी मागितली आणि स्वतःच प्रायश्चित्त घेत आहे असे म्हणत स्वतःस संपादकपदावरून ६ महीन्यांसाठी बाजूस ठेवले आहे. वर असे देखील म्हणले आहे की त्या स्त्रीची माफी मागितल्यावर आणि हे प्रायश्चित्त घेतल्यावर ती समाधानी आहे. पण त्या स्त्रीच्या पत्रकार सहकार्‍याच्या म्हणण्यानुसार तसे काही झालेले नाही आणि ती काही निव्वळ माफीवरून समाधानी नाही... आता काही प्रश्न निर्माण होतातः
  1. जर त्या स्त्रीने व्यवस्थापनाकडे तक्रार केली असली तर लैंगिक छ्ळ केला म्हणून व्यवस्थापनाने ती केस पोलीसांकडे सुपूर्द का केली नाही?
  2. तरूण तेजपाल स्वत:च मर्यादीत प्रायश्चित्त घेऊन गप्प कसे बसू शकतात? त्या काळात देखील त्यांना पगार मिळणार आहे का नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
  3. त्यांनी स्वतःचा गुन्हा मान्य केला आहे. "The last few days have been most testing, and I squarely take the blame for this. A bad lapse of judgment, an awful misreading of the situation, have led to an unfortunate incident that rails against all we believe in and fight for. I have already unconditionally apologised for my misconduct to the concerned journalist, but I feel impelled to atone further." मग त्यांना कायद्याच्या हातात सुपूर्द का केले गेलेले नाही?
  4. भारतातील राष्ट्रीय महीला समितीचे या संदर्भात काय मत आहे?
  5. तेहेलकासमर्थकांचे या संदर्भात काय मत आहे/असेल?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32978 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

काय संबंध?

निनाद
गुरुवार, 11/21/2013 - 03:27 नवीन
तरूण तेजपाल आणि पत्रकारीतेतील नैतिकता यांचा काय संबंध? हे तर एकमेकांच्या विरोधी शब्द आहेत ना?
  • Log in or register to post comments

म्हणूनतर

विकास
गुरुवार, 11/21/2013 - 08:22 नवीन
ते तुम्ही म्हणता तसे परस्परविरोधी असतीलही. पण जे स्वतःस मोठे समजतात, सगळ्यांची भांडी फोडण्यात पुढे असतात, त्यांना आता गप्प कसे बसवते हा मुद्दा आहे. तसेच जर हा गुन्हा घडला असला तर मग त्याविरोधात कायदा-सुव्यवस्था, महीला वगैरे आवाज का करत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

मेणबत्त्या

निनाद
गुरुवार, 11/21/2013 - 09:18 नवीन
ते महिला हक्कवाले ते बहुदा मेणबत्त्या आणायला गेले असावेत... ;) अहो आता घरातलीच माणसे आहेत ना मिडियाच्या... मग? तू कम्युनिस्ट मी कम्युनिस्ट आपण सारे भाऊ भाऊ. एकमेकांचे कशाला वाकून पाहू? एक चोर दुसरे के घर चोरी नही करता. एक मिडियावाला दुसरेके भांडे नही फोडता! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आणि

रामबाण
गुरुवार, 11/21/2013 - 09:07 नवीन
पत्रकारिता आणि नैतिकता हे तरी कुठं समानार्थी राहिलेयत,:-P वेगान वाटचाल सुरुय विरोधी शब्द होण्याकडे असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

+१

निनाद
गुरुवार, 11/21/2013 - 09:27 नवीन
पत्रकारिता आणि नैतिकता हे तरी कुठं समानार्थी राहिलेयत,:-P वेगान वाटचाल सुरुय विरोधी शब्द होण्याकडे
मान्यच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामबाण

थोडक्यात

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/21/2013 - 09:20 नवीन
थोडक्यात वैयक्तिक आयुष्यात काहीतरी झोल असलेल्या लोकांनी कोणत्याही प्रकारचे सामाजिक काम करु नये असे आपले मत आहे का ??
  • Log in or register to post comments

एनडीटीव्ही, आउटलुक, आयबीएन

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 11/21/2013 - 09:26 नवीन
एनडीटीव्ही, आउटलुक, आयबीएन सगळ्यांच्याच संस्थळावर ही बातमी आहे. पण "टाईम्स ऑफ इंडिया" वर तिचा साधा उल्लेखदेखील नाही. कोणाची धागे कुठे जुळले आहेत हे आपल्याला माहिती आहेच. तेजपालना करेजियस म्हणून गौरवणारे महाभाग आहेतच. जे.पी.
  • Log in or register to post comments

कम्युनिस्ट ना? त्यातच सगळे काही आले

क्लिंटन
गुरुवार, 11/21/2013 - 10:32 नवीन
"कम्युनिस्ट विचारसरणींच्या माध्यमातून वर आलेले असल्याने..." ना? कम्युनिस्ट विचारसरणी यातच सगळे काही आले. मग सगळ्या जगाला नैतिकतेचे डोस पाजण्याचा आपला जन्मसिध्द अधिकार आहे अशाच पध्दतीने ते वागणार. ते स्वतः काय करतात त्याकडे कोण लक्ष देतो? बाय द वे, हाच प्रकार जर एका "बुरसटलेल्या विचारसरणीच्या" संघटनेच्या एका "जातीय विषवल्ली फैलावणार्‍या" पाक्षिकात झाला असता तर इथल्या आणि इतर ठिकाणच्या फेमिनिस्टनी किती आकाशपाताळ एक केले असते! पण काय करणार? असे प्रकार करणारा निघाला एका "पुरोगामी विचारसरणीचा"! आपलेच दात आणि आपलेच ओठ.मग काय करा?तर काहीच बोलू नका :) (संघसमर्थक नसलेला पण कम्युनिस्टांचे नाव ऐकताच तळपायाची आग अस्मानात जाणारा) क्लिंटन
  • Log in or register to post comments

+१

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/21/2013 - 11:55 नवीन
संघसमर्थक नसलेला पण कम्युनिस्टांचे नाव ऐकताच तळपायाची आग अस्मानात जाणारा
कम्युनिस्ट्स सक्क .... कम्युनिस्ट आणि सैतान असे युध्द पेटले तर सैतानाशी युती करावी आणि कम्युनिस्टाला ठेचुन काढावे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

कम्युनिस्ट आणि सैतान असे

ऋषिकेश
गुरुवार, 11/21/2013 - 12:07 नवीन
कम्युनिस्ट आणि सैतान असे युध्द पेटले तर सैतानाशी युती करावी आणि कम्युनिस्टाला ठेचुन काढावे .
हा हा.. अमेरिकेने हेच केले, नंतर सैतानाशी युती करण्याचे परिणामही भोगते आहेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अमेरिकेने हेच केले, नंतर

क्लिंटन
गुरुवार, 11/21/2013 - 12:28 नवीन
अमेरिकेने हेच केले, नंतर सैतानाशी युती करण्याचे परिणामही भोगते आहेच
अमेरिकेची अंमलबजावणीत चूक झाली म्हणून परिणाम भोगावे लागत आहेत. अन्यथा पायात घुसलेला काटा काढायला दुसरा काटा वापरायचा आणि नंतर दोन्ही काटे फेकून द्यायचे यात फारसे काही चूक आहे असे वाटत नाही. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

असो.

ऋषिकेश
गुरुवार, 11/21/2013 - 12:30 नवीन
असो. सरसरकट सगळ्या कम्युनिस्टांबद्दल माझे असे मत नसल्याने इतके घाऊक वाक्य डाचते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

let's agree to disagree

क्लिंटन
गुरुवार, 11/21/2013 - 12:39 नवीन
सरसरकट सगळ्या कम्युनिस्टांबद्दल माझे असे मत नसल्याने इतके घाऊक वाक्य डाचते.
असे मत बनवायचा प्रत्येकाला अधिकार आहे हे मला मान्य आहेच (कारण मी कम्युनिस्ट नाही :) ). तेव्हा let's agree to disagree.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

कम्युनिस्ट म्हन्जे काय?

स्पा
Mon, 12/02/2013 - 14:02 नवीन
कम्युनिस्ट म्हन्जे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

शंका:

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/21/2013 - 12:57 नवीन
हाच प्रकार जर एका "बुरसटलेल्या विचारसरणीच्या" संघटनेच्या एका "जातीय विषवल्ली फैलावणार्‍या" पाक्षिकात झाला असता
कोणती बरे ती संघटना व पाक्षिक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

इथे पत्रकारांची नैतिकता

ऋषिकेश
गुरुवार, 11/21/2013 - 11:38 नवीन
इथे पत्रकारांची नैतिकता वगैरेचा संबंध समजला नाही. सदर घटनेत व्यक्तीची वैयक्तीक नैतिकताच दिसत नाहीये तर त्याच्यात व्यावसायिक नैतिकतेचा प्रश्न येतोच कुठे? सदर व्यक्ती पत्रकार आहे त्यामुळे याला प्रसिद्धी मिळतेय एवढेच त्याचे पत्रकार असण्याचे महत्त्व. त्यावतिरिक्त सदर गोष्ट कोणत्याही प्रोफेशनमध्ये / प्रोफेशनमध्ये नतानाही तितकाच मोठा गुन्हा आहे.
  • Log in or register to post comments

नैतिकता

विकास
गुरुवार, 11/21/2013 - 18:31 नवीन
मला वाटते आपण (म्हणजे तुम्ही-आम्ही सर्वच भारतीय) इतके बधीर झालो आहोत (एखादा कम्युनिस्ट कवी त्याला, "आपण मुर्दाड झालो आहोत" असे देखील म्हणेल. ;) ) की नैतिकता या शब्दाचा व्यावहारीक जगात काही संबंधच नाही असे नुसतेच गृहीत धरत नाही तर असेच असणार/आश्चर्य नाही असे समजतो... याला कोण जबाबदार आहे हा एका वेगळ्याच चर्चेचा मुद्दा आहे. पण तेहेलका स्वतःबद्दल अबाऊट पानावर काय म्हणते?
As a people’s paper geared to take a stand, to follow the hard investigative story. A fearless paper ready to create opinion, and not just remain a passive vehicle of news.
आज काय दिसत आहे तर हे "इन्व्हेस्टीगेशन" / "शोध पत्रकारीता" ही निवडक अथवा सिलेक्टीव्ह आहे. नुसते तेव्हढेच नाही तर त्यासंदर्भात राष्ट्रीय महीला आयोग देखील काही म्हणत नाही. येथे तुम्ही म्हणता तसे निव्वळ प्रसिद्ध पत्रकार असल्याने स्पायडरमॅन मधील शेवटचे वाक्य आठवते... "with great power comes great responsibility" (लेखक स्टॅन ली चे वाक्य). त्याला नैतिकता म्हणतात. कदाचीत मी मथळ्यात पत्रकारीतेतील न म्हणता नुसतेच नैतिकता म्हणू शकलो असतो जेणे करून राष्ट्रीय महीला आयोग पण नक्की काय करत आहे हा मुद्दा ठळक झाला असता... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तेजपाल ची चुक आणि चांगली कामे यात फ़रक आहे.

मारवा
Fri, 11/22/2013 - 11:34 नवीन
एका स्त्रिवर अन्याय झाला मान्य हे चुकच आहे. परंतु ही चुक केली म्हणुन आजपर्यंत जे चांगल काम केल त्याच महत्व अजिबात कमी होत नाही. आणि जे चोर तहलका ने पकडुन दिले ते अचानक साधु बनत नाहीत. एखाद्या पुरुषाने केलेल्या स्त्रि वरील अन्यायाने त्याने त्या अगोदर केलेली इतर क्षेत्रातील चांगली कामे त्याच कर्तुत्व अस खोडरबर वापरुन खोडता येत नाही.ही अतिशय एकांगी विचारसरणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अहो तसं नाही ते. त्यांनी

नितिन थत्ते
Fri, 11/22/2013 - 12:25 नवीन
अहो तसं नाही ते. त्यांनी पूर्वी भाजप अध्यक्षांचे धोतर फेडले होते त्याच्यावर खोडरबर फिरवता येईल असे लोकांना वाटत असावे. किंवा "त्यांचे धोतर फेडलेस काय? आता बरा तावडीत सापडलास" असे काहीसे आहे. पण जो गुन्हा झाला आहे त्याला शिक्षा हवीच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

नितीन भाउ

मारवा
Fri, 11/22/2013 - 12:46 नवीन
मी तुमच्याशी १०० % सहमत आहे तेजपाल ला तर शिक्षा झाली च पाहीजे त्याने केले हे १०० % चुक च आहे. मात्र त्यामुळे त्याने पकडुन दिलेली पुर्वीचे चोर काय साधु होत नाहीत. आणि एका पुरुषाने एका स्त्रिवर अन्याय केला हा एक भाग निंदनीय झाला. परंतु त्या पुर्वी आणि त्या नंतर त्याने जर काही चांगली कामे केली असतील तर ती निव्वळ या एका कृत्याने पुसुन टाकता येत नाही. तेजपाल ने मोठ मोठाली चोर मंडळी जी पकडुन दिली आहेत ती साधु बनत नाहीत . तसे तर मग के पी एस गिल ने ही रुपन देओल बजाज चा असाच विनयभंग केला होता. ते ही चुक च होते पण म्हणुन त्यांनी जो पंजाब मधील दशहतवाद चिरडुन काढला देशाला आणखी एका फ़ाळणी पासुन वाचविले. ते अ‍ॅज अ सुपर कॉप म्हणुन चांगले काम केले त्याचे महत्व तीळ मात्र ही कमी होत नाहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सहमत आहे. आपला जनमानस एकदम

प्रकाश घाटपांडे
Fri, 11/22/2013 - 16:20 नवीन
सहमत आहे. आपला जनमानस एकदम डोक्यावर घेतो किंवा एकदम पायदळी तुडवतो.भावनांच्या लाटांवर तो स्वार होतो. एखाद्याला एकदम हिरो करुन टाकायचे किंवा एकदम झिरो. तरुण तेजपाल हा प्रथम माणुस आहे बाकी गोष्टी नंतर. माणूस म्हणून असणारे गुणदोष त्यात असणारच.जन्मापासून मृत्यूपर्यंत आदर्श व गुणवंत असा माणुस कोण आहे? फार तर त्याच्या नावावर गुन्हा नोंदला नाही असा असेल पण गुन्हा केलाच नाही. असा माणुस सापडणे अशक्य. गुन्हा म्हणजे काय तर बेकायदेशीर कृती. कायदेशीर म्हणजे नैतीक व बेकायदेशीर म्हणजे अनैतिक अशी विभागणी खरोखर करता येईल काय? विश्वामित्र जिथे पाघळला तिथे तरुण तेजपाल किस झाडकी पत्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

विश्वामित्री लोक तपोभंग

ग्रेटथिन्कर
Fri, 11/22/2013 - 16:35 नवीन
विश्वामित्री लोक तपोभंग व्हायची वाटच बघत असतात.. त्यांना माहीत असते कुणीतर मेनका त्यांचा तपोभंग करायला येणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

खुलासा

विकास
Fri, 11/22/2013 - 18:37 नवीन
मथळ्यातील "नैतिकता" ह्या शब्दामुळे गडबड होत आहे का काय ते माहीत नाही... आपला जनमानस एकदम डोक्यावर घेतो किंवा एकदम पायदळी तुडवतो.भावनांच्या लाटांवर तो स्वार होतो. सहमतच आहे. तसेच १००% कोणीच आदर्श नसते हे देखील मान्यच. कायदेशीर म्हणजे नैतीक व बेकायदेशीर म्हणजे अनैतिक अशी विभागणी खरोखर करता येईल काय? इथे गडबड वाटली. तेजपालने बेकायदेशीर केले म्हणून अनैतिक असे मी म्हणलेले नाही. त्यांनी कुणाशी कय संबंध ठेवावेत हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. किंबहूना जर तरूण तेजपालने त्या मुलीने तक्रार केली असताना, त्यातील मुद्दे नाकारले असते तर हा चर्चेचा विषय झालाच नसता. पण येथे काहीतरी वेगळेच झाले... शाब्दीक कसरती करत त्यांनी ते मान्य केले वर स्वतःच प्रायश्चित्त ठरवत सहा महीने संपादकपदापासून लांब रहायचे ठरवले! हे म्हणजे चारा घोटाळा झाला हे मान्य करत लल्लू ने स्वतःच चार दिवस उपवास करून पाचव्या दिवशी मुख्यमंत्री होण्यातला प्रकार आहे. :भाजपा-काँग्रेस-आणि प्रस्थापीत इतर सर्वच राजकीय पक्ष भ्रष्ट आहेत (आणि तसे ते आहेतही)," हे बोंबलत "आम आदमी पार्टी" काढायची आणि सत्तेचा स्पर्श होण्याआधीच ठिसूळ होऊन जावेत इतक्या मातीच्या पायाची माणसे बघायची यातला हा प्रकार आहे. विश्वामित्र जिथे पाघळला तिथे तरुण तेजपाल किस झाडकी पत्ती. पुराणातला संदर्भ बघून अंमळ गंमत वाटली. ;) पण तोच संदर्भ पुढे नेयचा झाला तर काय दिसते? त्या तपोभंगामुळे विश्वामित्राची ब्रम्हर्षी बनण्याच्या ध्येयाची गाडी काही योजने मागे गेली. :( (तो ब्रम्हर्षी कधी झाला हा अजूनच एक वेगळा रोचक भाग आहे, जो देखील येथे लागू करता येईल... पण अवांतर टाळतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

स्वागतार्ह

विकास
गुरुवार, 11/21/2013 - 22:11 नवीन
इतर सर्वांबरोबरच पत्रकारांची नैतिकता सध्या कशी आहे हा जरी एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा असला तरी सध्याच्या सोशल मेडीयाच्या जास्त गप्प रहाणे परवडणारे नाही हे तेहेलका सोडल्यास इतर माध्यमे कशी यास प्रसिद्धी देत आहेत त्यावरून समजत आहे. त्यात भर म्हणून की काय आता Editor’s Guild of India ने अधिकृतपणे निषेध नोंदवला आहे. त्या व्यतिरीक्त दी हिंदूचे कम्युनिस्ट व्यवस्थापकीय संचालक एन राम यांनी देखील निषेध नोंदवला आहे...
Senior journalist N Ram said that the sexual assault cases cannot be treated as an internal affair of Tehelka. "This is not an internal affair. This cannot be dealt with someone rescuing themselves for 6 months and then presumably come back, because the law of the land is very clear and I think Tarun Tejpal is going to have a very hard time," Ram said.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तरुण तेजपाल ने आपल्या मुलीच्या मैत्रिणीलाच

वेताळ
गुरुवार, 11/21/2013 - 12:34 नवीन
हात घातला. ह्यावर तरुणच्या पोरीची प्रतिक्रिया यायला पाहिजे . अजुन एक प्रश्न आहे स्टिंग ऑपरेशन करताना बिंधास्त पोरी पुरवणार तरुण असा कसा तुंबला होता. बहुधा रामु वर्मा व तरुण दोस्त असावेत. स्त्रिया फक्त भोगवस्तु आहेत हेच आपल्या वर्तनातुन दोघे सिध्द करताहेत. ह्यावर कडी म्हणजे तरुण ने स्वःताला ६ महिने बडतर्फ केले आहे. ह्यापेक्षा पोलिस स्टेशन मध्ये हजर राहुन स्वःतावर केस नोंदवुन घेतली पाहिजे होती.
  • Log in or register to post comments

तहलका, गुलैल, कोब्रापोस्ट इ.

श्रीगुरुजी
गुरुवार, 11/21/2013 - 12:53 नवीन
तहलका, गुलैल, कोब्रापोस्ट इ. सर्वजण काँग्रेसची पिल्लावळ आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात फक्त भाजप नेत्यांविरूद्ध स्टिंग ऑपरेशन करून त्यांना बदनाम करणे हेच त्यांचे मुख्य काम आहे. यामागचा त्यांचा करविता धनी कोण आहे हे उघड गुपित आहे.
  • Log in or register to post comments

>>तहलका, गुलैल, कोब्रापोस्ट इ

मिलिंद
गुरुवार, 11/21/2013 - 13:52 नवीन
>>तहलका, गुलैल, कोब्रापोस्ट इ. सर्वजण काँग्रेसची पिल्लावळ आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात फक्त भाजप नेत्यांविरूद्ध स्टिंग ऑपरेशन करून त्यांना बदनाम करणे हेच त्यांचे मुख्य काम आहे.<< मग भाजपाला कोणी रोखले आहे अशी पिलावळ उभी करायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

म्हणजे असली पिलावळ उभी करणे

इष्टुर फाकडा
गुरुवार, 11/21/2013 - 17:40 नवीन
म्हणजे असली पिलावळ उभी करणे समर्थनीय आहे आणि भाजप तसे करत नाही म्हणून निंदनीय आहे असे तुमचे म्हणणे आहे का? असेल तर उपचार घ्या लगेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद

फरक

विकास
Fri, 11/22/2013 - 00:26 नवीन
मग भाजपाला कोणी रोखले आहे अशी पिलावळ उभी करायला? भाजपाने अशी पिलावळ का उभी केली नाही तेच सांगू शकतील, मला कल्पना नाही. पण एकंदरीतच डावे-कम्युनिस्ट ह्यांच्या चळवळी या नकारात्मक कृत्यांवर अवलंबून असतात. तसे भाजपाचे अथवा अगदी कॉंग्रेसचे दिसणार नाही. आता यात हे दोन्ही पक्ष आणि त्यातील राजकारणी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे माझे म्हणणे नाही अथवा सगळे सकारात्मक आहे असे म्हणण्याचे धार्ष्ट्य होणार नाही. पण असले नकारार्थी नक्कीच नाहीत असे वाटते. मात्र आत्ताच्या या घटनेसंदर्भात अर्थातच भाजपाने पक्ष म्हणून आवाज उठवलेला आहेच तसेच मनोहर पर्रीकर यांनी ज्या राज्यात हा कथीत गुन्हा घडला आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुत्रे हालवलेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद

हेच म्हणायचे होते. काँग्रेस

मिलिंद
Fri, 11/22/2013 - 12:37 नवीन
हेच म्हणायचे होते. काँग्रेस काय भाजपा काय सगळे सारखेच... (आता त्यात आप ची ही भर पडतेय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मुद्दा वेगळा आहे

विकास
Fri, 11/22/2013 - 20:02 नवीन
पण माझा मुद्दा काँग्रेस-भाजपा सारखे आहेत का नाहीत हा नव्हता आणि तसे ते सत्तेसाठी सारखे वाटले तरी अनेक अर्थाने वेगळे आहेत असेच म्हणेन. तर साम्यवादी, डावे आणि डाव्याकडे जास्त झुकलेले समाजवादी हे नकारात्मक कृत्यांमधेच गुंतलेले दिसतात. त्यांची जिथे जिथे राज्य आली आहेत अथवा अगदी एखादा निवडून गेलेला आहे, तेथे देखील काही चांगले काम बघायला मिळणार नाही. प. बंगाल हे त्याचे मोठ्ठे उदाहरण आहे. तरी देखील स्वतःस विचारवंत/बुद्धीवादी वगैरे म्हणवणार्‍यांना त्यांचे झापड लावल्यागत कसे आकर्षण वाटते याचे सखेद आश्चर्य वाटते. पण तो वेगळा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद

बाकी सगळं खड्ड्यात जाऊ दे

पैसा
गुरुवार, 11/21/2013 - 14:01 नवीन
A bad lapse of judgment, an awful misreading of the situation
हे टीव्हीवर पाहिले तेव्हाच तळपायाची आग मस्तकात गेली. म्हणजे मैत्रीपूर्ण वागणे असलेल्या मुली कशाही "अव्हेलेबल" असतात असा या हलकटाचा समज आहे का? आणि ते उघड बोलायला याला शरम वाटत नाही? उद्या कोणीतरी "ती मुलगीच तसली असेल" म्हणणारे निघतीलच!
  • Log in or register to post comments

A bad lapse of judgment, an

प्रसाद१९७१
गुरुवार, 11/21/2013 - 16:31 नवीन
A bad lapse of judgment, an awful misreading of the situation
ही वस्तूस्थिती असू शकत नाही का? मी माझ्या ऑफिस मधे काही बायकांचे वागणे / बोलणे असे बघतो की समज / गैरसमज होणे सहज शक्य आहे. उ.दा. लाड लाड बोलणे, घरातले personal problem सांगणे, रडणे. एक ३०-३२ वयाची मराठी बाई तिच्या बॉस ला "माझ्या राजा" असे प्रेमानी म्हणायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एक ३०-३२ वयाची मराठी बाई

बॅटमॅन
गुरुवार, 11/21/2013 - 16:39 नवीन
एक ३०-३२ वयाची मराठी बाई तिच्या बॉस ला "माझ्या राजा" असे प्रेमानी म्हणायची.
इतकं कै असेल तर मग गैरसमज होणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

तेच सांगते आहे

पैसा
गुरुवार, 11/21/2013 - 17:08 नवीन
मी माझ्या ऑफिस मधे काही बायकांचे वागणे / बोलणे असे बघतो की समज / गैरसमज होणे सहज शक्य आहे. उ.दा. लाड लाड बोलणे, घरातले personal problem सांगणे, रडणे. एक ३०-३२ वयाची मराठी बाई तिच्या बॉस ला "माझ्या राजा" असे प्रेमानी म्हणायची.
याचा अर्थ काय झाला? त्या बायका "तसल्याच" असं तुमचं म्हणणं ध्वनित होतं आहे. बरोबर ना? बरं, समजू की त्या बायका तसल्याच आहेत. पण हा लग्न झालेला, तरूण मुलगी असलेला माणूस आहे.. कोणी गळ्यात पडले म्हणून लगेच आमंत्रण स्वीकारलेच पाहिजे का? मग लोकांवर नैतिक पोलीसगिरी कशाला करतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तेजपालचं मी समर्थन करतोय असा

बॅटमॅन
गुरुवार, 11/21/2013 - 17:14 नवीन
तेजपालचं मी समर्थन करतोय असा टोन दिसतोय प्रतिसादातून, तो चुकीचा आहे हे पुन्हा सांगायची वट्ट गरज नाही पण सांगितले. कुणाकडून सर्टिफिकेट नकोय कसलं. माझा मुख्य मुद्दा म्हणजे त्या बाईला अक्कल नको? त्या बाईला म्हणजे तेजपालवाली नव्हे, माझ्या राजावाली. बॉसशी कसं बोलावं ही तिला अक्कल नाही ते गेलं कुठल्याकुठं आणि वर जे घडू शकले असते त्याबद्दलच टिप्पणी!! मजा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तेच सांगतेय रे

पैसा
गुरुवार, 11/21/2013 - 17:22 नवीन
समजा त्या बाईला अक्कल नाही. अगदी "माझ्या राजा" म्हणणारीलासुद्धा. तरी बाकीच्यांनी लगेच तिचा फायदा उठवायचा प्रयत्न करायलाच पाहिजे का? माणसं आणि बैल यात फरक असतोच ना, का आपलं, दिसलं शेत की घाल तोंड असं करावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

म्हणजे बायकांनी कसं वाटेल तसं

बॅटमॅन
गुरुवार, 11/21/2013 - 17:27 नवीन
म्हणजे बायकांनी कसं वाटेल तसं बोलावं अन पुरुषांनी अळीमिळी गुपचिळी करून बसून रहावं अशी अपेक्षा आहे ना? ओक्के. त्या बाईला अक्कल नसल्याचे उत्तरदायित्व पुरुषांवर ढकलणे हाच का तो न्याय? त्याची लागण अशी झाली असेल तर कल्पना नाही. फ्रीलि बोलणे हा एक प्रकार झाला, त्यातली सीमारेषा कळणारे लै लोक आहेत. पण इतकं लाडात यायचं लायसन्स मात्र पाहिजे आणि लाड करून घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर लगेच गाशा गुंडाळणार!!! वाहवा रे लॉजिक. याचा अर्थ, आपल्या वर्तनाबद्दल बाईवर कुठलीच जबाबदारी नसून पुरुषांवरच जबाबदारी आहे. स्वतःच्या वागण्याचा काय परिणाम होईल याबद्दल जराही विचार न करता बाकीच्यांनी मात्र तो विचार करावा हे जर बरोबर वाटत असेल तर तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओ भाऊसाहेब

पैसा
गुरुवार, 11/21/2013 - 17:35 नवीन
फरक आहे. एखादी ३० एक वर्षाची बाई तुझ्या मागे लागलीच अरे राजा म्हणत, तर गैरसमज करून घ्यायचा तुला हक्क आहे, मला लग्न करायचं आहे असं तू सेफली म्हणू शकतोस. पण एखाद्या लग्न झालेल्या काकाच्या गळ्यात अशी बाई पडायला बघत असेल आणि तो तिचे लाड करायला जात असेल तर तो एकाच वेळी ती बाई आणि त्याची बायको अशा २ बायकांचा गैरफायदा घेतो आहे. निदान मॉरल पोलीस असल्याचा आव आणणार्‍यांनी तरी आपले हात स्वच्छ ठेवावेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पैसा ताई - तुम्ही फार सोप्या

प्रसाद१९७१
गुरुवार, 11/21/2013 - 17:46 नवीन
पैसा ताई - तुम्ही फार सोप्या पद्धतीने बघता आहात. हे म्हणजे संघ वाल्यांनी सर्व वाईट गोष्टींसाठी काँग्रेस ला जबाबदार धरावे किंवा साम्यवाद्यांनी जिथे तिथे मुक्त अर्थव्यवस्थेला नावे ठेवण्या सारखे आहे. मला एव्हडेच म्हणायचे होते की "दुसरी बाजू" पण असते. तेजपाल पण तेच म्हणला की situation misread केली. खरे काय आहे ते फक्त त्या मुलीला आणि तेजपाल लाच माहीती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पुन्हा गल्लत. आपल्यातला वाद

बॅटमॅन
गुरुवार, 11/21/2013 - 17:49 नवीन
पुन्हा गल्लत. आपल्यातला वाद अंमळ हुकलेला आहे. तेजपालचा मुद्दा माझ्या डोक्यात नसल्याने
निदान मॉरल पोलीस असल्याचा आव आणणार्‍यांनी तरी आपले हात स्वच्छ ठेवावेत ना?
हे वाक्य इथे गैरलागू आहे. तेजपालचं काय ते सावकाशीने बघूच, तूर्तास आधी प्रस्तुत मुद्दा पहा. बाकी मुद्द्यासंबंधी बोलायचे झाले तर मुळात अशी बाई कुणा लग्नबिग्न झालेल्याच्या गळ्यात पडू पाहत असेल तर त्यात तिची चूक आहे की नाही तेवढे सांगा. पुढचं पुढं. तिला तो म्यारीड आहे वगैरे कळू नये? ती मूर्ख पण त्याला अक्कल नको काय हा प्रश्नच मुळात त्या स्त्रीला लायसेन्स टु किल देतो आहे हे तुम्हाला लक्षात तरी येत नाहीये किंवा लक्षात आणून तरी घ्यायचं नाहीये असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

निराशाजनक आहे रे

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 11/21/2013 - 21:36 नवीन
निराशाजनक आहे रे :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

चूक ती चूकच

पैसा
गुरुवार, 11/21/2013 - 22:34 नवीन
तू माझे सगळे प्रतिसाद संपूर्ण वाचले नाहीस असे दिसते. माझा प्रत्येक प्रतिसाद तेजपाल बद्दल आहेच. शिवाय मधेच प्रसाद१९७१ म्हणले म्हणून "माझा राजा" चा विषय आला. त्याबद्दल माझे म्हणणे इतके की एकीने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारणे कितपत योग्य आहे? शिवाय दोन्ही केसेसमधे पुरुष हा फायदा घेऊ शकेल अशा जागेवर्/पदावर आहे. तर स्त्री ही त्याच्या हाताखालील कर्मचारी. अशा पुरुषावर अधिकच जबाबदारी असायला पाहिजे. त्यात प्रसाद१९७१ संघ आणि काँग्रेस असला काहीतरी गोंधळ वाढवत आहेत तर तू पूर्ण प्रतिसाद न वाचता एक वाक्य/वाक्यांश वाचून कै च्या कै लिहित आहेस. तुला पण इकडे तिकडे फिरून सिलेक्टिव्ह रीडिंगचा आजार झाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

फायदा काय, कोणीही घेऊ शकते.

बॅटमॅन
गुरुवार, 11/21/2013 - 23:24 नवीन
फायदा काय, कोणीही घेऊ शकते. पोझिशनबरोबर डोकंही तितकंच महत्त्वाचं असतं. स्थितीचे एकांगी चित्रण करण्यात अजूनही धन्यता मानत असाल तर अवघड आहे.
एकीने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारणे कितपत योग्य आहे?
वा! पुन्हा एकदा स्त्रीबद्दल कुठलेही भाष्य नाही.
तर तू पूर्ण प्रतिसाद न वाचता एक वाक्य/वाक्यांश वाचून कै च्या कै लिहित आहेस. तुला पण इकडे तिकडे फिरून सिलेक्टिव्ह रीडिंगचा आजार झाला का?
तेजपालबद्दल माझं म्हणणं क्लीअर केलेलंच आहे. सबब सिलेक्टिव्ह रीडिंगचा आजार कुणाला झाला असेल तर तो मी नाही. तेजपाल अन हा विषय वेगळा आहे. स्त्रीच्या जबाबदारीबद्दल अवाक्षर न काढून आरूनफिरून पुरुषाकडेच संशयाची सुई वळवण्याची मखलाशी सकृद्दर्शनी उत्तम असली तरी फसवी अन अतिशय चूक आहे. पुरुषानेच जास्त काळजी घ्यावी हाच मुद्दा पुन्हापुन्हा तुमच्या बोलण्यात येतोय. सांगून तरी टाका, उद्या एखादी बाई लिटरली काहीही करू लागली तरी पुरुषाने शुकासारिखे पूर्ण वैराग्य दाखवावे अन न दाखवले तर त्याला तुरुंगात टाकावे. बाई स्वतंत्र आहे ना शेवटी!!! तिने काहीही करावे तरी चालते असा संदेश तुमच्या प्रतिसादातून दिसतो आहे, तुमच्या लेखी जबाबदार वागणुकीची हीच व्याख्या असली तर स्पष्ट सांगा तरी किमान. म्हणजे कुठे न फिरताही एखाद्या परिस्थितीचे सिलेक्टिव्ह रीडिंग कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठ मिळेल, हाकानाका. रोचक प्रतिसाद आहे बाकी. चुकीचे लॉजिक अन वैयक्तिक शेरे अशा ठिकाणी आल्याशिवाय राहतील तरी कसे म्हणा. चालूदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ऑनेस्तली स्पीकींग

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/21/2013 - 23:55 नवीन
उद्या एखादी बाई लिटरली काहीही करू लागली तरी पुरुषाने शुकासारिखे पूर्ण वैराग्य दाखवावे अन न दाखवले तर त्याला तुरुंगात टाकावे. बाई स्वतंत्र आहे ना शेवटी!!! तिने काहीही करावे तरी चालते असा संदेश तुमच्या प्रतिसादातून दिसतो आहे,
मलाही हाच प्रश्न पडलाय . स्त्रियांनी काहीही केलेतरी चालेल , पुरुषांनी मात्र मनोनिग्रह राखलाच पाहिजे असे मत इन जनरल जालावर इतरत्र पहायला मिळालय... मिपाकरांचा काय स्टॅन्ड काय ते जाणुन घ्यायला आवडलेल . अवांतर : तेजपालचे कोणतेही समर्थन नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मला वाटते.

विकास
Fri, 11/22/2013 - 00:45 नवीन
मला वाटते, पैसाताईंचा या संदर्भातील एक मुद्दा महत्वाचा आहे. भारतात आहे का ते माहीत नाही पण अमेरीकेत कायद्याच्या कचाट्यात अडकवणारा आहे. नैतिकता हा दुसरा मुद्दा झाला... दोन्हीकडे (उदाहरण आणि वास्तवातील घटना) स्त्री ही कर्मचारी आहे तर पुरूष हा वरीष्ठ अधिकारी आहे. त्यामुळे दोन्हीबाबतीत पुरूषाकडूनच लैंगिक अत्याचार (सेक्शुअल हरॅसमेंट) ठरेल. या संदर्भात फनीश मुर्थी चे उदाहरण वाचू शकता. हे झाले कायद्याच्या संदर्भात आणि भारतात देखील बहुतेककरून असेच होईल. आता दुसरा मुद्दा आहे तो नैतिकतेचा. एखादा "यावत जीवेत सुखम जीवेत" असा दृष्टीकोन असलेला पुरूष असेल जो नैतिकतेचे धडे इतरांना शिकवायला जात नाही, त्यांचे अवडंबर करत नाही की काही नाही, फक्त स्वतःचे आयुष्य आनंदात/चैनीत घालवतोय. तर त्याने तुम्ही म्हणता तसे एखाद्या (ऑफिसमधील सहकारी अथवा वरीष्ठ पदावरील) स्त्रीने दिलेल्या इशार्‍यांचा (गैरच पण) फायदा घेतला तर एकवेळ समजू शकते, जरी, तरी देखील ते अनेकांना चुकीचे वाटले आणि काही उदाहरणात अक्षम्य असू शकले तरी. पण जी व्यक्ती इतरांचे भ्रष्ट व्यवहार जगासमोर उघडे करत असते आणि त्या अर्थाने नैतिकतेचाच धडा शिकवायचा प्रयत्न करत असते तेंव्हा समोरची स्त्री काय म्हणाली वगैरेचा प्रश्नच येत नाही... त्या पुरूषाचीच चूक असते. जे असारामबापूंच्या बाबतीत झाले तेच तरूण तेजपाल यांच्या बाबतीत देखील होत आहे. त्यात काही फरक नाही. या संदर्भात असारामबापू हे धर्मश्रद्धावंतांचे तरूण तेजपाल आहेत तर तरूण तेजपाल हे डाव्यांचे असारामबापू! आता स्त्री जर वरीष्ठ असेल तर काय? या संदर्भात "डिसलोजर" हा मायकल डग्लस आणि डेमी मूरचा चित्रपट पहा. (त्याचे भ्रष्ट हिंदीकरण असलेला अक्षय कुमारचा चित्रपट नाही!). रिव्हर्स सेक्शुअल हरॅसमेंट हा विषय आहे आणि त्यातील कायदेशीर वाद बघण्यासारखा आहे, जो एकाच वाक्याच्या भोवती घुटमळत रहातो: "सेक्शुअल हरॅसमेंट इस नॉट अबाऊट सेक्स, इट इज अबाऊट पॉवर"... ही पॉवरच तेजपाल यांनी अनैतिकपणे वापरलेली आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पण जी व्यक्ती इतरांचे भ्रष्ट

बॅटमॅन
Fri, 11/22/2013 - 01:04 नवीन
पण जी व्यक्ती इतरांचे भ्रष्ट व्यवहार जगासमोर उघडे करत असते आणि त्या अर्थाने नैतिकतेचाच धडा शिकवायचा प्रयत्न करत असते तेंव्हा समोरची स्त्री काय म्हणाली वगैरेचा प्रश्नच येत नाही... त्या पुरूषाचीच चूक असते. जे असारामबापूंच्या बाबतीत झाले तेच तरूण तेजपाल यांच्या बाबतीत देखील होत आहे. त्यात काही फरक नाही. या संदर्भात असारामबापू हे धर्मश्रद्धावंतांचे तरूण तेजपाल आहेत तर तरूण तेजपाल हे डाव्यांचे असारामबापू!
प्रचंड सहमत. तेजपाल हे डाव्यांचे आसारामबापू हे बाकी आवडलं. :)
त्यामुळे दोन्हीबाबतीत पुरूषाकडूनच लैंगिक अत्याचार (सेक्शुअल हरॅसमेंट) ठरेल. या संदर्भात फनीश मुर्थी चे उदाहरण वाचू शकता.
समजा वरिष्ठाबरोबर संबंध असतील, सुरुवातीला राजीखुशीचा मामला असेल पण नंतर बेबनाव झाला तर त्या रागात स्त्रीने कंप्लेंट दाखल केली तरीही केवळ वरिष्ठ असल्याकारणाने पुरुषच हरॅस करणारा म्हणून पाहिला जाईल का? तसे असेल तर मग कायदा एकांगी आहे असेच म्हणावा लागेल. अन हीच गोष्ट स्त्री वरिष्ठ असती तरीही लागू होईल माझ्या मते. बाकी डेमी मूरचा पिच्चर अवश्य पाहीन, थँक्स फॉर द पॉइंटर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

'डिसक्लोजर' इज द नेम.

प्यारे१
Fri, 11/22/2013 - 01:25 नवीन
'डिसक्लोजर' इज द नेम. हिंदी भ्रष्ट 'ऐतराज' करीना नि प्रियांका चोप्रा बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ऐतराज माहिती होता,

बॅटमॅन
Fri, 11/22/2013 - 02:16 नवीन
ऐतराज माहिती होता, डिस्क्लोजरच्या डिस्क्लोजरबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मोठ्ठा विनोद (ट्वीट!)

विकास
Fri, 11/22/2013 - 20:21 नवीन
तेजपाल डाव्यांचे असारामबापू आहेत असे नक्कीच वाटते. पण खर्‍याखुर्‍या असारामबापूंच्या अधिकृत ट्वीटर अकाउंट मधून खालील ट्वीट केले गेले आहे... ते वाचून LOL म्हणजे काय ते समजले! =))
Asaram Bapuji Ashram ‏@ashramindia 23h Elements like #Tejpal, Shoma Chaudhury, India News humiliates d Journalism of #India in d world! 4th Pillar ( Sahara )of democracy at stake!
तेजपाल यांना जर मराठी येत असेल आणि मराठी चित्रपट-संगीत माहीत असेल, तर झाल्या प्रसंगापेक्षा ही ट्वीट वाचून "कशी नशिबाने थट्टा आज मांडली" असेच म्हणावेसे वाटेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा