✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज

म
मन यांनी
गुरुवार, 11/14/2013 - 23:37  ·  लेख
लेख
लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद" हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार. (ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत) . . १.मुलगी काळी असली तरी कमावती आहे!! २.तू आयटीत आहेस? मग तिसरं होम लोन कधी घेतोयस? ३.तू आयटीत आहेस? मग भारतात काय करतोयस? ४.भेंचोत महागाई इतकी वाढलिये आजकाल; ग्लेनफिडिच पितानाही हाच विचार सतावतो. ५.मी मुलगा इंजिनिअर असला तरच होकार देणार. ६.तो मुस्लिम/ब्राम्हण्/दलित असला तरी चांगलाय! ७.तो अमुक अमुक मोठा गायक आहे ना, गायक असला तरी निर्व्यसनी आहे! (अरे चौकटीबंद चष्मा काढून जरा त्याच्या गायकीकडे बघा रे) ८.नै, तुम्हाला वाटेल जरा पर्सनल होइल, पण एक विचारु का? काय हो..... (अरे पर्सनल आहे ना, मग गप्प बैस ना.) ९.राहुलचं बाळ गेलं मागच्या महिन्यात. शिवाय मुलगा होता हो! १०.बस मॅम, तुम्ही आम्हाला फक्त अमुक हजार द्या. काssssही कष्ट्/व्यायाम्/आहार नियोजन न करता हे अस्सं वजन कमी होत पहा. ११.तसंही जगून काय करनार भेंचोत. मस्त सुस्साट बेभान हाकायची गाडी. आपल्याला जीवाची फिकिर नाय. बिंदास हे आपन. १२.ई ई ई नाऱळासोबत खडीसाखरेचा तुकडा नको. क्यालरिज असतात त्यात फार. १३. काही गोष्टी अजून विज्ञानालाही उमजलेल्या नाहित.( म्हणून मी वाट्टेल त्या कविकल्पना गळ्यात मारिन; त्या मुकाट्याने ऐक) १४.त्या हिरोइनचं ऐकलं का? ती त्याच्यासोबत अमुक अमुक ठिकाणी फिरत असते म्हणे. १५. अरे आपला तो हा अमुक आणि आपली ती ही तमुक फार सोबत दिसताहेत. ऑफिसनंतरही भटकताना दिसतात बराच वेळ. मी पीछा करताना समजलं की...(आँ? त्यांचं भटकणं चूक, तर साल्या तुझं असं चोरीछुपे गॉसिपिंग आणि पीछे करणं आंबटशौकिनपणा नै का?) १६.आता मी कशाला स्वतःच्या तोंडानं सांगू? पण अमक्याच्या तमकीसोबत काहीतरी चालल्याचं मी ढमक्याकडून ऐकलय. १७. बस आता आम्हाला इतके इतके दिलेत, की महिन्याभरात अंबानीच्या दुप्पट रक्कम तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये येणार! १८.जाउ दे रे. ह्याही वेळी पार्शलिटी झाली; नाही तर आपल्यालाच मिळालं असतं प्राइझ. १९. अहो त्यानं अभ्यास खूप केला होता. पण बोर्डात काय घोळ झाला ठाउक नाही. तसा तो फार हुशार आहे. पण नक्की चेकिंग मध्येच प्रॉब्लेम आला असणार. २०. आपण कोण? किंवा:- आडनाव काय म्हणालात तुमचं? . . तुमच्या कडे असल्यास असे लोकसंवाद इथे शेअर करावेत. --मनोबा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33171 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

आज-काल हे अस्स चाल्लय..

यसवायजी
गुरुवार, 11/14/2013 - 23:46 नवीन
१ मित्र दुसर्‍याला:- तीचं फेसबूक प्रोफाईल बघीतलं आणी लग्नाला नकारच दिला. काय पोरगी म्हणायची का सोंग.. :))
  • Log in or register to post comments

अगागागागागा

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 01:43 नवीन
अगागागागागा =)) बाकी पोराचे स्वतःचे घर असूनही १ बीएचकेचाच फ्लॅट असल्याने नकार देणार्‍या पोरीही पाहिल्या आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आमच्याकडे एकाला आयटीत आहे

खबो जाप
Fri, 11/15/2013 - 09:33 नवीन
आमच्याकडे एकाला आयटीत आहे (जवळपास ७५ च्या वर पगार) पण परदेशी जाण्यचा चान्स नाही म्हणून नकार दिला एका मुलीने. आता बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जरा हळू ओ,

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 12:00 नवीन
जरा हळू ओ, स्त्रीद्वेष्टेपणाचा शिक्का बसेल नैतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

स्त्रीद्वेष्टे? -- आपन तर नाय बुवा

खबो जाप
Mon, 11/18/2013 - 19:04 नवीन
बघितलं ते सागितलं…… मी कशाला पांगे घेवू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अहो तुम्ही काहीही सांगितलं

बॅटमॅन
Mon, 11/18/2013 - 20:40 नवीन
अहो तुम्ही काहीही सांगितलं तरी शिक्का बसवणारे बसवतीलच. तुमचं निरीक्षण खरंखोटं आहे की कसं याचा त्यांना फरक पडत नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

अजुनेक

यसवायजी
Fri, 11/15/2013 - 14:26 नवीन
आमच्या वेळी हे असलं नव्हतं. कलियुग का काय ते हेच.. ;) ----------------- बाकी, 'नकार दिला जाण्याची हल्लीची कारणे' यावर १ धागा उघडता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

+११११११११११११११११११११११११११११

टवाळ कार्टा
Fri, 11/15/2013 - 16:47 नवीन
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ :( #@#@$$%^%$$@#!$^%#%#&%%!@%#$@%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ह्याला काय कट्टा म्हणायच होय?

अग्निकोल्हा
गुरुवार, 11/14/2013 - 23:59 नवीन
खरा कट्टा तर दारुल-अमुक-तमुक वाल्यांचाच.
  • Log in or register to post comments

१)'नाकीडोळी नीटस मुलगी' आणि

रेवती
Fri, 11/15/2013 - 00:06 नवीन
१)'नाकीडोळी नीटस मुलगी' आणि 'कमावता मुलगा' हेही ऐकून ऐकून कंटाळा येतो. डॉक्टर इंजिनियरांना तर इतका भाव असतो की जगातले बाकीचे व्यवसाय हे मोडीतच काढलेले असतात (बरं याबद्दल फार बोलत नाही कारण माझ्या बाबांचच असं मत असल्याने गप्प बसावं लागतं, त्यामुळेच तो ३ इडियट शिनेमा आवडला मला). २)आणखी म्हणजे मुलगी सरळ्/चांगल्या वळणाची/ सोशीक असणं. कशाला हवी सोशीक मुलगी? घरातल्यांनी हवं तसं उधळावं आणि हिनं खस्ता खाव्यात म्हणूनच ना! ३)एकदा घरी कोणतातरी कार्यक्रम होता, साहजिकच जेवणं लांबली. मी खाण्यापिण्याच्या वयातली असल्यानं "कधी संपणार ही पूजा, मला भूक लागलीये" म्हणताच एक शिनियर शिट्टीझन बाई म्हणाल्या "अंहं, असं नाही म्हणायचं, आधी पुरुषांची पंगत होऊ दे, भूक काढायला शिकलं पाहिजे." हे कसं काय बुवा शिकायचं? ते मला अजूनही जमलेलं नाही. भूक लागली की मी जेवते.
  • Log in or register to post comments

आजकाल वेबसाईटवर काही वाचणेबल

पाषाणभेद
Fri, 11/15/2013 - 00:30 नवीन
आजकाल वेबसाईटवर काही वाचणेबल येतच नाही.
  • Log in or register to post comments

१. मी काय म्हणत्ये, मुलगी

सूड
Fri, 11/15/2013 - 00:46 नवीन
१. मी काय म्हणत्ये, मुलगी चांगली आहे रे. घराचं सवडीनं बघ. शिवाय दोघे कमावते असल्यावर सोपं जाईल. २. त्यांनी नकार दिलाच नव्हता तसा, म्हणजे नकार नव्हताच. ज्या ज्योतिषाला पत्रिका दाखवलंनीत त्याने नीट सांगितलं नव्हतं. तुम्ही लोक पहा ना जरा तुमच्याकडे कोणाला तरी पत्रिका दाखवून. ३. आडनांव काय म्हणे?? म्हणजे नक्की कोण? देवरुखला आहे का कोणी? ४. सर, ते फ्याट मसल्स मध्ये कन्व्हर्ट होतं हो !! (कसं शक्य आहे?? :)) ) ५. तू सप्लिमेंट्स घेत नाहीस? कसं होणार मग !! ६. आज खरंच कंटाळा आलाय.
  • Log in or register to post comments

लक्षणं काही ठीक नै दिसत!

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/15/2013 - 06:25 नवीन
लक्षणं काही ठीक नै दिसत! ह्हूं..... =)) असतं ब्वॉ एकेकाचं असं! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

का हो बुवा?

सूड
Fri, 11/15/2013 - 12:05 नवीन
>>लक्षणं काही ठीक नै दिसत! का हो बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

१) इथे कंपुबाजी फारच चालते.

विजुभाऊ
Fri, 11/15/2013 - 01:02 नवीन
१) इथे कंपुबाजी फारच चालते.
  • Log in or register to post comments

घरात कामं असतात.

प्रभाकर पेठकर
Fri, 11/15/2013 - 01:57 नवीन
अखेर आई म्हणालीच, बाबारे! मुलगी कमी शिकलेली असेल तरी चालेल पण फेसबुक, वॉट्सअपवाली नको रे बाबा. आपल्या घरात कामं असतात.
  • Log in or register to post comments

मस्त !! प्रत्येक वाक्यावर एक

खटपट्या
Fri, 11/15/2013 - 02:11 नवीन
मस्त !! प्रत्येक वाक्यावर एक लेख होउ शकतो.
शिवाय मुलगा होता हो!
यावर माझा अनुभव: मला जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा मी आणि बायको खूप आनंदी होतो. आम्हालाही मुलगीच हवी होती. पण शेजारच्या दोघी तिघी जणी हॉस्पिटल मध्ये आल्या आणि एकच वाक्य वारंवार उच्चारू लागल्या. "दुसरी पण मुलगीच झाली? अरेरे मुलगा झाला असता तर बरे झाले असते" च्याआयला आम्हाला काही प्रोब्लेम नाही तर तुम्ही का हळहळताय. एवढा संतापलो होतो कि वाटले होते कि सर्वाना हाकलून द्यावे. त्यात अजून एक मित्र ज्याला दोन मुली आहेत तो मला बायको समोर म्हणाला "आता आपण समदुख्खी" आता मात्र माझी सटकली व त्याच्याकडे रागाने बघत म्हणालो "समदुख्खी ??????" त्यानंतर तो बरेच दिवस मला टाळत होता.
  • Log in or register to post comments

अरे व्वा मज्जा आहे तुमची !

अगोचर
Fri, 11/15/2013 - 03:14 नवीन
अरे व्वा मज्जा आहे तुमची !
  • Log in or register to post comments

नेहमी लिहीत नै तो!........ पण

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/15/2013 - 06:15 नवीन
नेहमी लिहीत नै तो!........ पण धागा काढलन ना,की शंभर चुकत नैत मेल्याचे! =))
  • Log in or register to post comments

+ कनेक्शनच तसे आहेत त्याचे

शैलेन्द्र
Fri, 11/15/2013 - 11:02 नवीन
+ कनेक्शनच तसे आहेत त्याचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काय बे मनोबा, जरा ते

प्रचेतस
Fri, 11/15/2013 - 09:49 नवीन
काय बे मनोबा, जरा ते अब्राहमिक धर्मांवरचं लिखाण पूर्ण कर की रे.
  • Log in or register to post comments

तू आधी 'ते' राष्ट्रीय कार्य

प्यारे१
Fri, 11/15/2013 - 12:35 नवीन
तू आधी 'ते' राष्ट्रीय कार्य पूर्ण कर. विक्रमादित्य पिछा सोडणार नाही नाहीतर वेताळा! ;) सारखा सारखा 'जाहीर' प्रश्न विचारतो हा विक्रमादित्य! हे कुठं नि ते कसं! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कुठलं राष्ट्रीय कार्य?

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 12:45 नवीन
कुठलं राष्ट्रीय कार्य?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्लीझ वल्लीबुवा

मन१
Mon, 11/18/2013 - 23:16 नवीन
कराच राष्ट्रिय कार्य पूर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओ हॅलो

बॅटमॅन
Tue, 11/19/2013 - 15:38 नवीन
कुठलं कार्य??? स्पष्टीकरण करा की जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

हो खरेच बर्यच दिवसापसुन

पुष्कर जोशी
Mon, 11/18/2013 - 00:34 नवीन
हो खरेच बर्यच दिवसापसुन बाकि आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अजून एक

सुहासदवन
Fri, 11/15/2013 - 12:57 नवीन
काय करणार! हे असंच चालणार बाबा!! शेवटी अल्पसंख्यांक आहोत ना आपण!!!
  • Log in or register to post comments

आणी एकः

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 13:03 नवीन
आणी एकः $$$$$$ फार माजलेत अलीकडे.
  • Log in or register to post comments

एक जीवघेणा विनोद

सुहासदवन
Fri, 11/15/2013 - 14:03 नवीन
डॉलर फार माजलेत अलीकडे. साला रुपयाला काही किंमतच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अवांतरः तुमचा आयडी सुहासवदन

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 14:05 नवीन
=)) अवांतरः तुमचा आयडी सुहासवदन असा पाहिजे होता की तुम्ही 'सुहास धवन' आहात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन

तुला एक फार चांभार चौकश्या रे

पियुशा
Fri, 11/15/2013 - 14:15 नवीन
तुला एक फार चांभार चौकश्या रे ब्याट्या ;) हापिसातले काही डायलॉग खुप झेलु आहे हा (ही ) नुसता सरांपुढे हांजी हांजी करत असतो ( ते) बिचारा एक्स वाय झेड घरातली सगळी कामे उर्कुन येतो म्हणून उशिर होतो हापिसला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पिवशे मझ्यशि मय्त्रि कर्न्र

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 14:17 नवीन
पिवशे मझ्यशि मय्त्रि कर्न्र कं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

ब्याट्या.. दोस्तीत कुस्ती?

यसवायजी
Fri, 11/15/2013 - 14:27 नवीन
ब्याट्या.. दोस्तीत कुस्ती? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आँ? कसली हो कुस्ती? तो

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 14:35 नवीन
आँ? कसली हो कुस्ती? तो 'मय्त्रि कर्न्र कं' हाही एक लोकसंवादच आहे, फक्त पियुशाचं नाव घालून लिहिला इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

लोकसंवाद का ? वोक्के..

यसवायजी
Fri, 11/15/2013 - 15:42 नवीन
लोकसंवाद का ? वोक्के.. पन त्यात नाव घालायची काय गरज होती ऑं? (रच्याकने.. ब्याट्या, पियुशा हा ड्यु आयडी आहे - इती प्यारे.) जपुन बरं का भौ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

च्यायला ....

पियुशा
Fri, 11/15/2013 - 15:47 नवीन
च्यायला .... यसवायजी , का पण जळुन राहीले बाप्पा तुम्ही ब्याट्या वर :P कु्. ह. घ्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हाहाहा. अन अहो ते क्षयझ आहे,

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 15:48 नवीन
हाहाहा. अन अहो ते क्षयझ आहे, सयज नै कै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

अहो अहो कुणाला करता आहात हो

पियुशा
Fri, 11/15/2013 - 15:51 नवीन
अहो अहो कुणाला करता आहात हो बॅटमॅन तुम्ही ? अग - तुग चालेल ;) बस्स बुवा ...धाग्याचा मालक यायचा पिटाळायला आप्ल्याला पळते मी ब्ब बाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

'अहो', पण तुम्हाला कुठं

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 16:01 नवीन
'अहो', पण तुम्हाला कुठं अहोजाहो केलं मी ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अग्ग अग्ग पियुशी..

यसवायजी
Fri, 11/15/2013 - 16:10 नवीन
अग्ग अग्ग पियुशी.. ते मला अहो अहो म्हंतायत.. तु टेन्षन नक्को घेउ हां.. :) ------- आणी अहो बॅटमॅन तुम्ही .. मला अरे तुरे म्हणा बघु.. उगाच (आपल्या?) पियुशीला त्रास होतोय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

पिवशे मझ्यशि मय्त्रि कर्न्र

पियुशा
Fri, 11/15/2013 - 15:07 नवीन
पिवशे मझ्यशि मय्त्रि कर्न्र कं? इश्श्श्श........... ;) अजुन भर * आमचे हे नाही हो असले , देवमाणूस आहेत अगदी .... * तिने नवर्याचा घाण्याचा बैल करुन ठेवलाय नुसता.... * डोक्यात भुसा भरलाय का ? * आमची कामवाली बै नै आली आज, सगळ मीच केल हो एक्टीने ... * माझी कड्की चालुये ... * मी कंगाल ब्यांकेचा म्यानेजर आहे .... * मी कशी दिस्त्ये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जल्ला ता इश्श म्हंजी क

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 15:12 नवीन
जल्ला ता इश्श म्हंजी क म्हनाचा, मना त द्येवदासवाला आठवून र्‍हालाय. बाकी अजून आमचीपण भरः * आज कुठली साडी घालू? घाल कुठलीपण. (तसंही कोण बघणारे तेच्यायला, इतकी वर्षं झाली लग्नाला इ.इ. अनुभवी लोकांनी रिकाम्या जागा भराव्यात-अर्थात मनातच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

* आज कुठली साडी घालू? घाल

पियुशा
Fri, 11/15/2013 - 15:25 नवीन
* आज कुठली साडी घालू? घाल कुठलीपण. (तसंही कोण बघणारे तेच्यायला, इतकी वर्षं झाली लग्नाला इ.इ. अनुभवी लोकांनी रिकाम्या जागा भराव्यात-अर्थात मनातच) झालं..... टाकली का काडी बॅटमॅना ;) पॉप कॉर्न घेउन ये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बघू की काय होते, पॉपकॉर्न तर

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 15:30 नवीन
बघू की काय होते, पॉपकॉर्न तर आम्ही सुरुवातीलाच घेऊन बसलो होतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

काही ठरलं की नाही?

प्यारे१
Fri, 11/15/2013 - 15:41 नवीन
काही ठरलं की नाही? तुझ्याएवढा/ढी असताना दोन दोन मुलं झालेली आम्हाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अहो भाषासम्राट, साडी घालत

यशोधरा
Fri, 11/15/2013 - 17:17 नवीन
अहो भाषासम्राट, साडी घालत नाहीत, नेसतात!:P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तेच लिहीणार होतो पण मेल्यान्

सूड
Fri, 11/15/2013 - 17:34 नवीन
तेच लिहीणार होतो पण मेल्यान् शब्दात पकडलंन् तर काय करु म्हणून गप बसलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अरे सुडक्या मी उगीच पकडापकडी

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 18:04 नवीन
अरे सुडक्या मी उगीच पकडापकडी खेळत नै रे ;) (माझा मूड असल्याशिवाय ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हा हा हा, बरोबरे, अंमळ

बॅटमॅन
Fri, 11/15/2013 - 18:02 नवीन
हा हा हा, बरोबरे, अंमळ गुंडाळलं खरं ;) बादवे अलीकडे धोत्रेसुद्धा प्यांटप्रमाणे 'घालायची' निघालीत असे ऐकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

साडी नेसतात.

रेवती
Fri, 11/15/2013 - 18:51 नवीन
साडी नेसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा