लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज
लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद"
हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार.
(ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत)
.
.
१.मुलगी काळी असली तरी कमावती आहे!!
२.तू आयटीत आहेस? मग तिसरं होम लोन कधी घेतोयस?
३.तू आयटीत आहेस? मग भारतात काय करतोयस?
४.भेंचोत महागाई इतकी वाढलिये आजकाल; ग्लेनफिडिच पितानाही हाच विचार सतावतो.
५.मी मुलगा इंजिनिअर असला तरच होकार देणार.
६.तो मुस्लिम/ब्राम्हण्/दलित असला तरी चांगलाय!
७.तो अमुक अमुक मोठा गायक आहे ना, गायक असला तरी निर्व्यसनी आहे! (अरे चौकटीबंद चष्मा काढून जरा त्याच्या गायकीकडे बघा रे)
८.नै, तुम्हाला वाटेल जरा पर्सनल होइल, पण एक विचारु का? काय हो.....
(अरे पर्सनल आहे ना, मग गप्प बैस ना.)
९.राहुलचं बाळ गेलं मागच्या महिन्यात. शिवाय मुलगा होता हो!
१०.बस मॅम, तुम्ही आम्हाला फक्त अमुक हजार द्या. काssssही कष्ट्/व्यायाम्/आहार नियोजन न करता हे अस्सं वजन कमी होत पहा.
११.तसंही जगून काय करनार भेंचोत. मस्त सुस्साट बेभान हाकायची गाडी. आपल्याला जीवाची फिकिर नाय. बिंदास हे आपन.
१२.ई ई ई नाऱळासोबत खडीसाखरेचा तुकडा नको. क्यालरिज असतात त्यात फार.
१३. काही गोष्टी अजून विज्ञानालाही उमजलेल्या नाहित.( म्हणून मी वाट्टेल त्या कविकल्पना गळ्यात मारिन; त्या मुकाट्याने ऐक)
१४.त्या हिरोइनचं ऐकलं का? ती त्याच्यासोबत अमुक अमुक ठिकाणी फिरत असते म्हणे.
१५. अरे आपला तो हा अमुक आणि आपली ती ही तमुक फार सोबत दिसताहेत. ऑफिसनंतरही भटकताना दिसतात बराच वेळ.
मी पीछा करताना समजलं की...(आँ? त्यांचं भटकणं चूक, तर साल्या तुझं असं चोरीछुपे गॉसिपिंग आणि पीछे करणं आंबटशौकिनपणा नै का?)
१६.आता मी कशाला स्वतःच्या तोंडानं सांगू? पण अमक्याच्या तमकीसोबत काहीतरी चालल्याचं मी ढमक्याकडून ऐकलय.
१७. बस आता आम्हाला इतके इतके दिलेत, की महिन्याभरात अंबानीच्या दुप्पट रक्कम तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये येणार!
१८.जाउ दे रे. ह्याही वेळी पार्शलिटी झाली; नाही तर आपल्यालाच मिळालं असतं प्राइझ.
१९. अहो त्यानं अभ्यास खूप केला होता. पण बोर्डात काय घोळ झाला ठाउक नाही.
तसा तो फार हुशार आहे. पण नक्की चेकिंग मध्येच प्रॉब्लेम आला असणार.
२०. आपण कोण?
किंवा:-
आडनाव काय म्हणालात तुमचं?
.
.
तुमच्या कडे असल्यास असे लोकसंवाद इथे शेअर करावेत.
--मनोबा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अशक्य कोटीतला विनोद
वा! हे मस्त आहे, आवडलं.
+१
.
काही (वि)संवाद...
+१
सगळ्या संवादांशी सहमत.
किती मोठा झाला हा? ओळखलच नाही
ठ्ठो
अहो हा शेजारचा रवी आहे. तो
(No subject)
चावट बालिका.
आमच्या कडे असच असत..
ब्याट्या, पियुशा हा ड्यु आयडी
अहो मी सांगितलेलं वाक्यसुद्धा
>>>मिपालोकसंवादाचंच उदाहरण
ओय्य प्यारेकाका कै च्या कै
हा हा हा, अगदी अगदी
त्या
माहितीये ना कै म्हणाल्या नैत,
वस्ताद आहेस हो
लोल्झ ... मेले मेले मेले ...
१० जणांची फ्रेंडशिप आहे. कशी
काका लोकांना प्रवेश बंद आहे.
अरे समाजसेवा रे फक्त. काय गं
अंहं. इथे समाजसेवा वैग्रे कै
आम्ही 'बॅट'मध्ये बसून अख्ख्या
स्वतः रानटी (वाइल्ड म्हटले की
मी कुठे माणसाळवतेय तुला?
हा लै मोठा गैरसमज आहे. आम्ही
थँक्यू थँक्यू भौत धण्यवाद!!!
@ आउर कौन कौन है लाइन मे ? आन
SYG
पळते आता>> ए पलट..
१)साला लाईफच झंड झालीय...
अरे काय चाललंय रे हे तुमचं,
अहो वल्ली हे सगळे "चितपरिचित
अरे काय धागा आहे का
रुक्मिणी.... ये ना....
'मयत्रि कर्नार कं'
घर घर लागलेले डयलॉग
गाडी
चायला लै भारी धागा
मस्त टीपी धागा!
प्रसिद्धिसाठी काढलेला धागा!
कुणाच्या प्रसिद्धीसाठी?
ते वाक्य मिपा लोकसंवाद म्हणून
ओह सॉरी.
आमची भरः
मेलो मेलो....