रॅन्बॅक्सी अपराधी
बीबीसी आणि इतर वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय जेनेरीक औषधकंपनी रॅनबॅक्सीला ५०० मिलियन डॉलर्सचा दंड झाला आहे.
http://www.bbc.co.uk/news/world-asia-india-22520953
हा आजवर कोणत्याही जेनेरीक कंपनीला झालेल्या दंडामध्ये सर्वात जास्त आहे. रॅनबॅक्सीला अनुचित पद्धतीने उत्पादन आणि साठा आणि तिच्या भारतातील दोन फॅक्टरँमध्ये केलेल्या चाचण्यांविषयी खोटी माहिती दिल्याबद्दल हा दंड झालेला आहे.
रॅनबॅक्सीने अशुद्ध औषधं विकल्याचा अपराध मान्य केला आहे. तरी त्यांच्या आर्थिक स्थितीवर याचा फार बोजा पडणार नाही अशी माहिती दिली आहे. तरीसुद्धा या दंडाखेरीज आणखी ५०० मिलियन डॉलर्स भविष्यातील सिव्हिल/ क्रिमिनल दंडासाठी कंपनी बाजूला काढून ठेवत आहे.
हा धागा काढण्याचे कारण की काही दिवसांपूर्वी इथे ग्लीव्हेक्/नोव्हार्टिसच्या निमित्ताने एक्सक्लूजिव्ह/ जेनेरीक औषधे, भारतीय/ विदेशी कंपन्या, न्यायप्रणाली वगैरे गोष्टींवर आपण चर्चा केली होती.
त्याच विषयाचा हा एक निराळा पैलू....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आजच दुपारी टीव्हीवर बातमी
नोव्हार्टिस चा धागा कुठाय?
नोव्हार्टिस
धन्यवाद, आता कुठे लिन्क लागली
मुद्दे
काही उत्तरे
- औषधे (त्यांतील औषधी गुणधर्म) किती कालावधीनंतर नष्ट होतात यासाठी करावयाच्या परीक्षा महिन्यांऐवजी काही आठवड्यांमध्ये उरकल्या गेल्या, आणि या तृटी झाकून नेण्यासाठी नोंदींमध्ये फेरबदल करण्यात आले.
- Quality assurance supervisors जागेवर उपस्थित नसतांना त्यांच्या खोट्या सह्या दाखवून औषधे पुरवली गेली.
- आणि जीवघेणा होऊ शकला असता असा प्रकार म्हणजे पेनिसिलिन ची निर्मिती दुसर्या औषधांच्या पावडरींच्या सान्निध्यात केली जात होती. म्हणजे एफडीएने मान्य केलेल्या औषधांच्यापेक्षा वेगळेच गुणधर्म असलेली औषधे तयार करून रुग्णांपर्यंत पोहोचवली जात असण्याची शक्यता होती.
याच पाओंता साहिबच्या उत्पादनकेंद्रामध्ये मध्ये लिपिटॉरला पर्याय असणारं औषध निर्माण केलं जाणार होतं, हे कळल्यावर एफडीएने ती प्रक्रिया थांबवली. त्यावर तोडगा म्हणून रॅनबॅक्सीने त्यांच्या अमेरिकेतील (वर दिलेल्या) न्यू जर्सीमधल्या उत्पादनकेंद्रात हे उत्पादन करण्याचा पर्याय सादर केला. पण फेब्रुवारी २००९ मध्ये एफडीएने पओंता साहिबमधून अमेरिकेत येणार्या सर्वच औषधांच्या अमेरिकेतील पुरवठ्यावर बंदी घातली, त्यामुळे रॅनबॅक्सीचं धाबं दणाणलं. (एक गंमतीची गोष्ट म्हणजे या घटनेच्या दहाच महिने आधी रॅनबॅक्सीने त्यांचे ६५% भाग जपानच्या दाई इची कंपनीला विकले होते, त्यासाठी ४.५ बिलियन डॉलर्स मोजतांना भविष्यातल्या सहा महिन्यांच्या जेनेरिक लिपिटॉरच्या संभाव्य कमाईवर डोळा ठेवणार्या दाई इची कंपनीला पुढे चांगलाच दणका बसला हे सांगणे नलगे!) गेल्या वर्षीही ९ नोव्हेंबरला रॅनबॅक्सीने अमेरिकेत एका औषधाच्या काही "select batches", त्यात काचांचे बारीक तुकडे असण्याच्या शक्यतेमुळे ("small glass particles approximately less than 1mm in size") दुकानांमधून परत बोलावले (त्यांच्या निवेदनानुसार "recall was being conducted "out of an abundance of caution."). पण ज्या लोकांनी आधीच ती औषधे विकत घेऊन घरी वापरात आणली होती त्यांना काहीच कळवलं नव्हतं. हेही प्रकरण रॅनबॅक्सीच्या अंगावर शेकलं. तर अशा अनेक घोटाळ्यांतून सूटका करून घेत ५०० मिलियन डॉलर्सच्या दंडाला सामोरं जाण्यात रॅनबॅक्सीने धन्यता मानली आहे. http://www.nytimes.com/2013/05/14/business/global/ranbaxy-in-500-million-settlement-of-generic-drug-case.html?_r=0 या प्रकरणाची सुरस चर्चा Fortune पुढचे काही महिने करीत राहील असं त्यांच्या लेखावरून दिसतं आहे. जाता जाता: एफडीएने पओंता साहिबमधून अमेरिकेत येणार्या सर्वच औषधांच्या अमेरिकेतील पुरवठ्यावर बंदी घातली, ती उत्पादित झालेली औषधे कुठे गेली आहेत, आणि भारतातच पुरवली गेली असतील तर त्यांचे दुष्परिणाम कधी कळणार?मस्त
लिखाणाचा काही भाग गाळला गेला होता...
संबंध कळला नाही
मला वाटते
वाचतेय..
फार चांगली माहिती.!
सध्याचा धावफलक
कांपोज रेनबॅक्सीचीच ना हो..?
सारांश आणि समारोप
धन्यवाद
फार छान
+१
उत्तम
पिवळा डांबिस ह्यांचा हा
+१११
मस्त
वाचतो आहे.
सुंदर माहिती