✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी

च
चित्रगुप्त यांनी
Fri, 05/03/2013 - 23:58  ·  लेख
लेख
नेपोलियनच्या इजिप्त आणि अन्य देशांच्या स्वार्‍यांमधून त्याला अगणित सोनेनाणे, जडजवाहिर, अमूल्य कलाकृती आणि दुर्मिळ ग्रंथसंपदा लाभली, हे सर्वविदित आहेच. पॅरीसच्या लूव्र संग्रहात यापैकी बहुतांश वस्तू संग्रहित आहेत. छत्रपती शिवाजी महारांजांचे डच चित्रकाराने रंगवलेले चित्र, हे त्यापैकीच एक. नेपोलियनच्या पाडावानंतर काही कलाकृती व इतर वस्तू अन्य लोकांच्या हाती लागून त्या आजतागायत पॅरिसमधील विविध पुराणवस्तू विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. गल्ल्या-बोळातील लहान लहान दुकानातूनही केंव्हा कोणती अमूल्य वस्तू आढळेल, हे सांगता येत नाही. त्या विकत घेणे शक्य नसले, तरी त्यांचा शोध घेत फिरणे हा माझा आवडता उद्योग. अश्याच एक भटकंतीत एका दुकानात फ्रेम केलेली देवनागरी लिपीतील जुनाट पोथ्यांची काही पृष्ठे नजरेस पडली. जवळ जाउन बघताच मी चाटच पडलो, कारण त्या चक्क मराठीतील ओव्या होत्या. वाचताक्षणीच त्यांचे दासबोधाशी असणारे साम्य उमगले, पण त्यातील शब्द- रचनेमुळे मी बुचकळ्यात पडलो. त्या ओव्या खालील प्रमाणे होत्या: १. असो जाले ते जाले..नेणतेपणे होवोन गेले..स्त्रीनामे वावरले..पाहिजे आता. २. असो ऐसा प्रसंग जाला..जाला तो होवोन गेला..आतातरी आपणाला..स्त्रीनामे भूषवावे. यातील 'स्त्रीनाम' याचा काही केल्या उलगडा होइना. मग मला वाटले, की चुकीने 'श्रीराम' ऐवजी 'स्त्रीनाम' लिहिले गेले असावे. त्या दुकानदाराशी बोलण्याचा प्रयत्न फ्रेंच भाषेच्या माझ्या अज्ञानामुळे विफल झाला, परंतु त्याने त्याच्या रजिस्टरमधील जी नोंद दाखवली, त्यावरून या वस्तू १९२८ पर्यंत पॅरिस मधील 'शातो द होल्कार' मध्ये, अर्थात इंदुरचे संस्थानिक तुकोजीराव होळकर यांच्या भव्य प्रासादात होत्या असे कळले. याखेरीज मात्र तो दुकानदार काहीच सांगू शकला नाही. हा प्रसंग उलटून वर्षभर झाले आणि तो माझ्या विस्मृतीत गेला. परंतु परवा एका पाठोपाठ घडलेल्या तीन घटनांमधून अचानक मला वेगळाच साक्षात्कार झाला आणि त्या ओव्या जर समर्थ लिखित असल्या, तर समर्थांची भविष्यात डोकावण्याची कुवत आणि त्यांचे द्रष्टेपण, यांच्या प्रचीतीने अक्षरश: भारावून गेलो. या तीनही घटना म्हणजे मला माझ्या मित्रांचे आलेले खालील फ़ोन: १. माझ्या 'अगदी सोपी फिटनेस टेस्ट' वर आलेले प्रतिसाद वाचत असता खिशातले चल-दूरध्वनी यंत्र निशब्दपणे थरथरले. बघतो, तो माआखामिझामि क्र.७ (माझ्या आग्रहाखातर मिपाकर झालेला मित्र क्र.७) चा फोन. ..."आय जस्ट डोंट अंडरस्टँड व्हाय दीज मिपाकर्स डोंट अंडरस्टँड"… कशाचाही जाम वैताग आला, की या मित्राला वाघिणीच्या दुधाचा पान्हा फुटतो. "अरे काय, झालं तरी काय? …मी. ...काय म्हणजे? तुझ्या परवाच्या त्या फिटनेसवाल्या धाग्याची दोन दिवसात दोन हजार वाचनं, आणि साठ प्रतिसाद, आणि माझ्या कोणत्याच धाग्याची पन्नासावर वाचनं नाहीत, आणि प्रतिसाद किती, तर सात, बारा, फार तर फार बावीस. त्यातलेही अर्धे माझेच, 'धन्यवाद' वाले!" "अरे वैतागू नकोस, जमेल हळूहळू..." ..."ते काही नाही, मला आता काहीतरी इलाज करावाच लागेल" म्हणून त्यानं फोन ठेवला. संध्याकाळी पुन्हा त्याचाच फोन. ..."अरे, काहीतरी झकास, पॉवरफुल, सहा-सात अक्षरांचं, संस्कृत स्त्री-नाम सुचव ना"... का रे बाबा, काय झालं?" मी. ... अरे सकाळी मी तुला फोन केला, ते ऐकून माझे शेजारी भाटियाजी म्हणाले की तुम्ही थर्मल बाबांना का भेटत नाही? ते सांगतील तुमच्या समस्येवर तोडगा. असं म्हणून ते मला तिथे घेऊनच गेले. माझा नंबर त्यांच्या वशिल्यानं लवकरच लागला, आणि मी बाबांना माझी समस्या सांगितली. "क्या नाम बताया आपने? … बाबाजी. ..."जी बाबाजी, मिसळपाव डॉट कॉम" नही भैय्या, इससे बात नही बनेगी, कोई फाइव्ह स्टार रेसिपी का नाम रखो, फिर किरपा होगी" मग मी त्यांना सांगितले, की मिपाचे नाव बदलणे माझ्या हातात नाही, मी तिथे फक्त एकादा आयडी घेऊन लिहू शकतो, वगैरे.. "अच्छा, फिर आप जिस नाम से लिखते हो, उसमे कितने अल्फाज है? ..."जी बाबाजी, दो अक्षर है " "इसीलिये ऐसा हो रहा है, अब आप कोइ छह-सात अक्षरोंवाला, तगडा, पॉवरफुल संस्क्रित नाम लेकर लिखो, फिर किरपा बरसनी शुरू हो जायेगी... और हां, ये नाम जनानी होना चाहिये, जनानियोंपर ज्यादा किरपा बरसती है" "जी बाबाजी, अब ऐसाइच करुंगा", म्हणून मी बाहेर आलो, आणि लगेच तुला फोन लावलाय... बरं, मग? … मी. ...तर तू मला आता असा एकादा स्त्री-आयडी सुचव... मित्र. अरे सोपे आहे, तू 'मिपासुर-मर्दिनी' 'फुत्कार-सर्पिंणी' किंवा 'विक्षिप्त-विध्वंसिनी' असा काहीतरी सहा-सात अक्षरांचा, पॉवरफुल नवीन आयडी घेउन टाक... मी. छान, छान. आताच लागतो कामाला, म्हणून मित्रानं फोन ठेवला. +++ यातून मोकळा होतो, तो पुन्हा एक फोन, यावेळी माआखामिझामि क्र.११ चा. ..."हॅलो, अरे तू म्हणालास त्याप्रमाणे मी मिपाकर झालो खरा, पण काही मजा नाही राव त्यात. मी ऐकलंय की ज्यांनी स्त्री-आयडी घेतलेला आहे, त्यांना म्हणे "माज्याशी मयतरी करशील का" वगैरे व्यनि येतात... मला तर बुवा असलं काहीतरी रोमँटिक घडावं, असं फार वाटतंय, मला जर असा व्यनि आला ना, तर मी मस्त ऑफिसच्या एसीत बसून त्या व्यनिवाल्याला बाहेर भर उन्हात भेटायला बोलावून ताटकळत ठेवीन, आणि मग सर्व ऑफिसातले मित्र खिडकीतून त्याला बघत खिदळत बसू... आणखी असे काय काय गंमतीदार बेत आहेत माझ्याकडे. तर आता तू मला एखादं छान गुलगुलीत नाव सांग बरं स्त्री-आयडी साठी ... ...खिक्क...मला तर त्या उन्हात घामाघूम झालेल्या व्यनिवाल्याचा चेहरा डोळ्यासमोर येउन हसुच आलं...असले वात्रटपणाचे प्रकार आम्ही पूर्वी फार करत असू. ... "अरे, मग 'प्रेमप्रणयिनी' 'प्रेमविरहिणी' 'कामाक्षी' 'कामबाला' 'कामज्वाला' 'चंचला' 'कमाल मुलगी' 'सजणी' 'तुझीच रे सख्या' असा काहीतरी रोमेंटिक आयडी घे". आणखी सुचव ना काही … ... "मग 'मधुबाला' 'मृदुबाला' 'मुग्धबाला' 'दुग्धबाला'...किंवा 'सिल्कस्मिता' 'मिल्कस्मिता' 'मधुस्मिता' 'चिकनी चमेली' असं एखादं गुलछबु नाव, किंवा 'फूलवाली, भाजीवाली, दूधवाली, असं अगदी डाउन टु अर्थ नाव घे. "मग असं करतो, यातल्या दोन-तीन नावाचे घेतो आयडी. बघुया कुणाला प्रतिसाद मिळतो" म्हणून फोन मूक झाला. +++ मी जरा हुश्श… करतो, तोच पुन्हा फ़ोन. हा माआखामिझामि क्र.४ चा. अरे, वाचलंस का? मिपावर नवीन बंदिस्त महिला-विभाग सुरु झाला आहे, आणि तिथे फक्त स्त्री-आयडीनाच प्रवेश आहे म्हणे. हे म्हणजे भलतंच झालं… .."अरे बरंय की मग ते. 'फ़ाटक्या पायपुसण्यापासुन क्रिएटिव वॉल- हँगिंग' "चला, मंगळागौरीची गाणी आठवूया" वगैरे धागे तिकडल्यातिकडेच रहातील"... मी. "अरे कसलं, हे सगळे धागे जनरल वॉर्ड मधेच येत राहणार, आणि तिकडे स्पेशल बंदिस्त रूम मध्ये काहीतरी अगदी स्पेशल, गरमागरम, जबरदस्त मेतकुट शिजत असणार...तिकडे चंचुप्रवेश मिळवायला आता एकादा स्त्री-आयडी घेतलाच पाहिजे... मित्र. ..."मग घे तसा आयडी आणि मिळव प्रवेश"... मी. अरे देवा, तुम्हीने दर्द दिया है, तुम्ही दवा देना...आता तूच सुचव त्यासाठी आयडी. बरं, बरं, कळवतो मी तुला व्यनितून. पण एक लक्षात ठेव. एकदम महिला विभागात जाऊ नकोस. आधी जनरल वॉर्डमध्ये 'अंदमानच्या स्त्रियांचे प्रश्न' 'स्त्री-सबलीकरणातील संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपाययोजना' 'उपासाच्या कोथिंबिरीच्या वड्या' असले धागे टाक, आणि त्यातही "ह्यांना आणि नातवंडांना फार आवडतात, म्हणून मी ह्या वड्या नेहमी करत असते"...अशी सुरुवात करायला विसरू नकोस. +++ बघितलंत ? मला आलेले हे तीन फोन म्हणजे लवकरच येऊ घातलेल्या स्त्री-आयडीच्या त्सुनामीची नांदीच नाही काय? धन्य धन्य ते समर्थ ज्यांना या गोष्टीचा सुगावा चार शतकांपूर्वीच लागला होता. मिपावरील महिला विभागाची वार्ता वाचून 'हा हंत हंत, कुठून पु-आयडी घेण्याची कुबुद्धी झाली' असे वाटणार्‍यांनो, तुमच्या मदतीसाठी आम्ही इथे आता एक 'स्त्रैण-आयडी कोश' निर्माण करत आहोत: ' +++ अध्यात्मिक वगैरे आयडी: विरागिनी , तत्वमसि, ध्यानधारिणी, तुर्यावस्थिनी, कपालभाति, कपालमोक्षिनी, कुंडलिनी इ.इ. सोज्वळ आयडी: आश्रमहरिणी, ब्रजबाला, लज्जागौरी , नऊवारी, पैठणी इ. चटोर आयडी: बिकिनी, काचोळी, सिल्कस्मिता, वस्त्रविरहिता, चिकणीचमेली, इ.इ. सुवासिक आयडी: पुष्पगंधा, कुसुमगंधा, गुलाबगंधा, केतकीगंधा, मदनगंधा, मत्स्यगंधा, कुक्कुटगंधा, अश्वगंधा, श्वानगंधा, योजनगंधा, फर्लांगगंधा, मीटरगंधा, इ.इ. धडकीभराऊ आयडी: 'फुत्कार सर्पिणी', 'गरळ ओकिनी, 'फाशीवाली मर्दानी', 'हंटरवाली', 'भैताड भवानी', 'हडळ भवानी', 'विक्राळ विध्वंसिनी', रणचंडिका इ. सुप्रसिद्ध आयडीवरून बेतलेले आयडी: विसूबाई खेचर, परीकथेतील राजकुमारी, प्रक्षिप्त_आदिती, कुत्सित_ आदिती, खाष्ट_आदिती, कमाल मुलगी, श्रावण मोदिका, इस्पिक राणी, चौकट छक्की, इ.इ. पाकृ. आयडी: फलुदा कुल्फी, रंगेल-रबडी, जलेबीवाली, रसमलाई इ.इ. संस्कृतप्रचुर आयडी: द्रुमदलशोभिनी, सुमधुरभाषिणी, दुर्गेशनंदिनी, शृंगारहारावली इ. खरेखुरे वाटणारे आयडी: कुंदा कुलकर्णी, चंपा चावरे, अनिता आपटे, बिंदु बिल्लोरे, ज्योतिका जोशी, पुष्पा पाखरे, चंचला चाटे इ.इ. साहित्यिक आयडी: पाषाणपालवी, काजळमाया, मोरूची मावशी इ.इ. ... तर मित्रहो, 'एकमेका सहाय्य करू, अवघे स्त्रीपंथचि धरू' म्हणून आता या कोशात तुम्हीही आपापली भर टाकाल काय ? इति.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
71061 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

भले! आता तुम्हीसुद्धा?

पिवळा डांबिस
Sat, 05/04/2013 - 00:17 नवीन
च्यायला, नेपोलियन वगैरे पाहून त्याबद्दल काही असेल म्हणून धागा उघडला तर त्यात हा भलताच माकिविलियन!! परीशियन शोभलात खरे!!! :)
  • Log in or register to post comments

स्त्रीआयड्यांना भाव देणारे

इनिगोय
Sat, 05/04/2013 - 00:28 नवीन
स्त्रीआयड्यांना भाव देणारे (आणि काव आणणारे) पण पुरुष आयडी. नि त्यांना भाव मिळतो म्हणून जळणारे पण पुरुष आयडीच. मजाय नि काय..
  • Log in or register to post comments

:ड

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 05/04/2013 - 00:34 नवीन
सध्या ऐकलेली खबर अशी की ज्यात अनुप्रास आहे असे आयडी खोटे समजतात म्हणे! या हिशोबाने खरेखुरे वाटणारे आयडी म्हणून जे तुम्ही दिलेले आहेत ते खोटे वाटणार. त्यापेक्षा कुंदा जोशी, सुलोचना देव, वैजयंती साठे, पुष्पलता वेंगुर्लेकर अशी नावं निवृत्त स्त्रियांची नावं म्हणून अधिक शोभतील. लज्जागौरी हे नाव सोज्ज्वळ पाहून अंमळ मौज वाटली. ढेरेंनी लावलेला अर्थ साधारण तसाच असला तरी लज्जागौरीचे फोटो पाहून मला वेगळंच काही वाटलं होतं.
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Sat, 05/04/2013 - 11:33 नवीन
लज्जागौरी हे नाव सोज्ज्वळ पाहून अंमळ मौज वाटली. ढेरेंनी लावलेला अर्थ साधारण तसाच असला तरी लज्जागौरीचे फोटो पाहून मला वेगळंच काही वाटलं होतं. त्यांना विद्यागौरी तसं लज्जागौरी वाटलं असावं. अभ्यास कमी पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅहॅहॅ अगदी अग्दी!

प्रकाश घाटपांडे
Sat, 05/04/2013 - 13:42 नवीन
हॅहॅहॅ अगदी अग्दी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

ठाउक आहे हो ते

चित्रगुप्त
Sat, 05/04/2013 - 14:28 नवीन
ठाउक आहे हो ते लज्जगौरी वगैरे सर्व. ढेरेंची पुस्तके पण वाचली आहेत. पण आम्ही चित्रकार, आम्हाला नग्नतेचे वावडे नाही, आणि कसलेच नाही. आम्हाला तर ते सगळे सोज्वळच वाटते, काय करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

(No subject)

अभ्या..
Sat, 05/04/2013 - 14:30 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आपल्या विशेषणांच्या आवडीमधे

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 05/04/2013 - 21:36 नवीन
आपल्या विशेषणांच्या आवडीमधे परस्परविरोध असला तरी मतांमधे फार नसावा. पाशवी शक्तींना एकंदरच सोज्वळ प्रकारांची अ‍ॅलर्जी. जीवाला आनंद देणार्‍या सगळ्या गोष्टी आपल्या आवडीच्या! पॅरीसला जाऊन तुम्ही मात्र कोरडेच राहिलात का काय अशी भीती वाटते आहे. ;-) (अवांतरः पॅरीसवरून आठवलं, वुडी अ‍ॅलनचा 'मिडनाईट इन पॅरीस' पाहिला आहेत का? मला आवडला. पॅरीस, ओवेन विल्सन आणि नॉस्टॅल्जियाची टर उडवणं हे सगळंच फार मस्त आहे. तुम्ही लिहिता त्या प्रकारचा विनोदही त्यात आहे असं वाटतं.) -- हेडॉनिस्ट पाशवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लज्जा आणि गौरी

चित्रगुप्त
Sun, 05/05/2013 - 16:52 नवीन
लज्जागौरी याचा ढेरेनियन संदर्भ बाजूला ठेऊन या शब्दाकडे बघितले, तर लज्जा आणि गौरी अशी फोड दिसते. गौरी पार्वतीचे एक नाव, पण त्याचा सामान्य अर्थ 'गोरी'(स्त्री) असा दिसतो, (जसे 'गौरवर्ण' 'हिमगौरी' 'गौरांगिनी' इ.) लज्जागौरी म्हणजे लज्जेमुळे गोरी वा पांढुरकी पडलेली वा पडणारी. अर्थात लज्जायुक्त अशी स्त्री. लज्जा हा स्त्रीचा अलंकार, तेंव्हा लज्जा हे भूषण जिच्या ठायी आहे, अशी. म्हणून हे नाव 'सोज्वळ' (सोज्वळ ची फोड ब्याम्या इ. नी सांगावी. स + उज्ज्वल ?) भितीमुळे मनुष्य पांढुरका पडतो म्हणतात. लज्जेमधे भितीचा अंश असतो का? भिती वाटल्यावर रक्तातील हिमोग्लोबीन वा लाल रक्तकण कमी होत असतात का? वगैरेवर तज्ञांनी प्रकाश टाकावा. काही असो, आमच्या पिढीच्या लोकांना 'लज्जेने खाली मान घालून, वेणीचा शेपटा बोटाला गुंडाळत, अंगठ्याने जमीन (सारवलेली) टोकरत, मधूनच तिरपे कटाक्ष टाकत बघणार्‍या षोडश वर्षिया याची देही, याची डोळा बघायला मिळाल्या, हे अहोभाग्य. अजून ती दृष्ये आठवतात. सांप्रतकाळी झोका फार उंच गेल्याने आजच्या तरुणांना अशी दृष्ये दुर्लभ असणार. बिचारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

लज्जेने चेहेरा लाल होतो,

राजेश घासकडवी
Sun, 05/05/2013 - 18:50 नवीन
लज्जेने चेहेरा लाल होतो, पांढरा नाही. आकर्षणातून लज्जा निर्माण होते, भीतीत लांब जाण्याची इच्छा असते.
सांप्रतकाळी झोका फार उंच गेल्याने आजच्या तरुणांना अशी दृष्ये दुर्लभ असणार. बिचारे.
आजकालच्या तरुण पिढीला बहुतेक ताकाची तहान दुधावर भागवावी लागते. बिच्चारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

होय होय, खरेच की

चित्रगुप्त
Mon, 05/06/2013 - 06:06 नवीन
......लज्जेने चेहेरा लाल होतो, पांढरा नाही. .... होय होय, खरेच की, स्मरण-रंजनात गुंग झाल्याने " लज्जेच्या प्रादुर्भावामुळे तिचे मुखकमल आरक्त होऊन अधिकच शोभायमान दिसू लागले" वगैरे विसरलोच. शरीर-शास्त्राचे दृष्टीने लज्जा, भिती इ. भावनांमुळे चेहरा लाल वा पांढरा इ. कसाकाय होतो, हे कुणी समजवेल का? ...आजकालच्या तरुण पिढीला बहुतेक ताकाची तहान दुधावर भागवावी लागते. बिच्चारे.... कसल्याश्या क्रांतिमुळे दुग्धाचा महापूर सांप्रतकाळी जिकडे तिकडे चोहीकडे आला आहे म्हणे. तरी ताकाची लज्जत न्यारी ती न्यारीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

कसल्याश्या क्रांतिमुळे

राजेश घासकडवी
Mon, 05/06/2013 - 07:29 नवीन
कसल्याश्या क्रांतिमुळे दुग्धाचा महापूर सांप्रतकाळी जिकडे तिकडे चोहीकडे आला आहे म्हणे. तरी ताकाची लज्जत न्यारी ती न्यारीच.
हा हा हा.... ऑपरेशन व्हाइट फ्लड म्हणतात त्याला. काय पण नाव आहे! ताकाची चव बरी लागावी म्हणून त्याला चांगली मिरची, कोथिंबीर, आलं, काळं मीठ वगैरे घालून मठ्ठा करतात. धगधगत्या दुपारी प्रवास करणाऱ्या एकांड्या शिलेदारांना ती शांती देते खरी. थोडे शौकीन लोक लस्सी वगैरे करूनही पितात. पण इलेक्ट्रिसिटी काढून घेतलेल्या पाण्याप्रमाणे दुधातून सत्व काढून घेतलेला पदार्थ तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

नीट आठवत नाही पण

चौकटराजा
Mon, 05/06/2013 - 08:42 नवीन
शरीर-शास्त्राचे दृष्टीने लज्जा, भिती इ. भावनांमुळे चेहरा लाल वा पांढरा इ. कसाकाय होतो, हे कुणी समजवेल का? आता नीट आठवत नाही पण एका पुस्तकात वाचलेले आहे की शरीरात विविध कारणानी रक्ताची आवश्यकता शरीराच्या निरनिराळया भागात वेगवेगळी निर्माण होते. भीतीच्या वेळी हात पाय याकडे ( संरक्षणाच्या भावनेने) अधिक रकपुरवठा झाल्याने चेहरा पांढरा पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

शोभायमान

चित्रगुप्त
Mon, 05/06/2013 - 12:25 नवीन
लज्जेच्या मुळाशी आकर्षण असते म्हटले, तर अधिक रक्तप्रवाहामुळे चेहरा अधिक आकर्षक होणार, तेंव्हा "लज्जेच्या अविर्भावामुळे मुखकमळ आरक्त होउन अधिकच शोभायमान झाले " वगैरे साहित्यिक वर्णन शास्त्रीय कसोटीवरही खरे उतरते म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कालच कोणीतरी कोणाला तरी सांगत

ढालगज भवानी
Sat, 05/04/2013 - 01:27 नवीन
कालच कोणीतरी कोणाला तरी सांगत होते "हलकट जवानी" नाव कसय =)) मला सुचणारे- चिसौकां : ), खाष्ट सासू, अवदसा : )
  • Log in or register to post comments

प्रतिसादप्रिया,

ढालगज भवानी
Sat, 05/04/2013 - 01:30 नवीन
प्रतिसादप्रिया, द्विशतककांक्षिणी देखील सुंदर वाटतं नाही? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

कंपूप्रवेशासक्ता ,

ढालगज भवानी
Sat, 05/04/2013 - 01:40 नवीन
कंपूप्रवेशासक्ता =)), काथ्याकूट्प्रावीण्यलतिका आता बास करते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

च्यायला!

धमाल मुलगा
Sat, 05/04/2013 - 04:41 नवीन
क्काय एकेक नावं...क्काय एकेक नावं! आँ? नुसती नावं वाचूनच आमचा चेहरा वधस्तंभाकडं नेल्या जाणार्‍या चारुदत्तासारखा झाला की! अशा नावाच्या बाया (म्हणजे, त्या बाया; बाया नसून बाप्पे आहेत हे ठाऊक असल्यानं तर अधिकच त्रास!) रोज येऊन बोर्डाची एकतर राखरांगोळी करणार नायतर संगीतबारी! अरेऽऽ....आधीच इथं हैत त्या मुलुखमैदान अन फत्तेलष्कर कमी हैत काय? :P (स्वगतः बेट्या..मोहोळाखाली धूर करुन आणि दगड मारलायस, आत शून्य मिनिटात पळ नायतर 'चिंधड्या राई राई एव्हढ्या...' झाल्याशिवाय राहणार नाही......पळाऽऽऽ.............. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

आणखी काही कंपू - नायिका

चित्रगुप्त
Sun, 05/05/2013 - 08:32 नवीन
कंपूप्रवेशासक्ता वरून सुचलेल्या आयड्या: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा सध्या एवढेच पुरे. पुन्हा भेटूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

हॅहॅहॅ...

मदनबाण
Sun, 05/05/2013 - 09:16 नवीन
हॅहॅहॅ... शॉलिट्ट... :) (मदनगुप्त) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कंपूनामविशेषप्रकांडपंडीत

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/05/2013 - 10:52 नवीन
कंपूनामविशेषप्रकांडपंडीत चित्रगुप्ता, आमचा __/\__ स्विकारावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चित्रगुप्तांच्या

बॅटमॅन
Sun, 05/05/2013 - 12:16 नवीन
चित्रगुप्तांच्या प्रतिभात्सुनामीसमोर साष्टांग लोटांगण!!!!!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

:ऑ कंपूवहीनी ???????? अर्र

ढालगज भवानी
Sun, 05/05/2013 - 16:30 नवीन
:ऑ कंपूवहीनी ???????? अर्र तिच्या कंपूवाहीनी आहे व्हय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

काका लैच फॉर्मात आहेत !!!

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/05/2013 - 17:08 नवीन
काका लैच फॉर्मात आहेत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हे म्हणजे चीरहास्यनिर्माता प्रतिसाद आहे

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 03/05/2015 - 17:49 नवीन
वा बुवा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अरारारारा

बॅटमॅन
Sat, 05/04/2013 - 01:54 नवीन
अरारारारा =)) =)) =)) =)) चित्रगुप्तजी, आमचा साष्टांग दंडवत घ्यावा. श्वा , युवा आणि मघवा हे पाणिनीने एकाच सूत्रात कसे बसवले असतील हे थिंकून थिंकून आम्ही हतमेंदूबल होत होतो, पण आज तर आपण कमालच केलीत. _/\_ कुठे प्यारिस-नेपोलियन आणि कुठे दासबोध, आणि कुठे मिपावरच्या महिला ;) आजपासून आपला शिष्य झालो, स्वीकार व्हावा. (तेवढी चित्रंबित्रं काढायला सांगू नका, पाया पडतो अजून एकदा हवं तर ;) )
  • Log in or register to post comments

व्हिज्युअलायझेशन म्याटर्स

अभ्या..
Sat, 05/04/2013 - 02:10 नवीन
व्हिज्युअलायझेशन म्याटर्स ब्याट्या. :) (चित्रं हाताने काढ नायतर मनात रंगव पण व्हिजुअलायझेशन पायजेच. आणि त्यात सुध्दा चित्रगुप्तजीसारखा दांडगा एक्स्पीरीयन्स म्हणजे आपण फक्त त्यांच्या पायाच पडू शकतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हे बाकी खरं. हाताने चित्रे

बॅटमॅन
Sat, 05/04/2013 - 02:16 नवीन
हे बाकी खरं. हाताने चित्रे काढा नैतर मनात रंगवा. आम्ही चित्रकला-निरक्षर असल्याने मनातच चित्रे रंगिवतो :) बाकी चित्रगुप्तजींबद्दल बहुत काये लिहिणे? मर्यादेयं विराजते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

श्वा , युवा आणि मघवा

चित्रगुप्त
Sat, 05/04/2013 - 10:04 नवीन
...आजपासून आपला शिष्य झालो, स्वीकार व्हावा... भो शिष्योत्तमा, आधी "श्वा, युवा आणि मघवा हे पाणिनीने एकाच सूत्रात कसे बसवले " हे काय प्रकरण आहे, याचा खुलासा मजजैश्या 'असंस्कृत' जनांना कर बा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

श्वन्, युवन् आणि मघवन् या

बॅटमॅन
Sat, 05/04/2013 - 15:42 नवीन
श्वन्, युवन् आणि मघवन् या एकमेकांशी काहीच संबंध नसलेल्या शब्दांच्या विभक्तीचे नियम मात्र एकसारखेच आहेत. म्हणून ते एका सूत्रात गोवलेत. त्याबद्दल एक श्लोक फेमस आहे. त्याचा अर्थ असा, की काच, मणी आणि सोने या तीन एकदम विजोड गोष्टी एखाद्या बालिकेने एकाच दोर्‍यात ओवल्यामुळे तिजबद्दल आश्चर्य वाटावे तर पाणिनीने श्वान, युवा आणि मघवान (इंद्र) या तीनही विजोड गोष्टींना एकाच सूत्रात ओवलेले आहे. तद्वतच नेपोलियन, दासबोध आणि मिपावरच्या आयड्यांची त्सुनामी हे तीन विषय तुम्ही एका लेखात गोवले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

तो फेमस श्लोक कोणता?

चित्रगुप्त
Sat, 05/04/2013 - 17:02 नवीन
असे होय.. तो फेमस श्लोक कोणता? अणि ते सूत्र कोणते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काचं मणि: काञ्चनमेकसूत्रे

बॅटमॅन
Sat, 05/04/2013 - 18:10 नवीन
काचं मणि: काञ्चनमेकसूत्रे मुग्धा निबध्नन्ति किमत्र चित्रम् | विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह || हा तो श्लोक. सूत्र कुठले ते मला माहिती नाही कारण अष्टाध्यायी वाचली नाही कधी. इतकेच माहिती की श्वान, युवा आणि मघवान या तीनही शब्दांची विभक्तिरूपे एकाच प्रकाराने होतात- त्यांचे विभक्तिप्रत्यय सारखे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

श्वान युवान मघवान

श्रीनिवास टिळक
Sun, 05/05/2013 - 01:28 नवीन
पुण्याला Modern High School (१९५४-५७) मध्ये शिकत असताना आमच्या दीक्षित सरानी एकदा फळ्यावर लिहिलेला हा श्लोक थोडा वेगळा होता तो असा: शुनेव यूना प्रसभं मघोना प्रधर्षिता गौतमधर्मपत्नी | विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह || तरुण असलेल्या इंद्राने [मघोना] गौतम ॠषीच्या धर्मपत्नीचा बळजबरीने कुत्र्याप्रमाणे [श्वानाप्रमाणे] विनयभंग केला. म्हणूनच विचारपूर्वक पाणिनिने त्या तिघांना एका सूत्रात [एकत्र] कोंबले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आयला भारी!! हा दुसरा पाठ मी

बॅटमॅन
Sun, 05/05/2013 - 04:12 नवीन
आयला भारी!! हा दुसरा पाठ मी कधीच ऐकला नव्हता. हा पाठ जास्त रोचक अन एक्स्प्लेनसुद्धा जास्त करणारा वाटतोय. बहुत धन्यवाद या पाठासाठी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक

बिचारी अहिल्या.

चित्रगुप्त
Sun, 05/05/2013 - 04:16 नवीन
टिळक साहेब, तुम्ही त्यावेळी कितवीत होता हो ? (असा श्लोक कितवीच्या मुलांना शिकवणे त्याकाळी ग्राह्य मानले जायचे, हे विचारायचे आहे) 'श्वानाप्रमाणे विनयभंग' म्हणजे नेमके काय, असे कुणी दिक्षित सरांना विचारले होते काय? (आम्ही असतो, तर विचारले असते). बिचारी अहिल्या. इंद्रदेवाचा याबद्दल जेवढा निषेध करावा, तेवढा थोडाच. (कदाचित अहिल्येने पूर्वजन्मी एकाद्या कुत्र्याला भाकरतुकडा देण्याऐवजी 'हाड मेल्या' म्हटले, म्हणून कुणीतरी "हे दुराचारिणी, तू श्वानाप्रमाणे विनयभंगित होशील" असा शाप दिल्यामुळे हे कर्तव्य खुद्द इंद्र देवांना करावे लागले असेल. ( कुठूनही कसलाही आयडी सुचतो, आताच आम्हाला 'विनयभंगिता' सुचला. काही अंशी इंद्रदेवांच्या या कृत्यामुळे जो काही ब्रम्हघोटाळा झाला, त्याचे वर्णन इथे वाचा. http://www.misalpav.com/node/23698
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक

आता अहिल्येला अजून शिव्या

बॅटमॅन
Sun, 05/05/2013 - 04:28 नवीन
आता अहिल्येला अजून शिव्या घातल्यागत होईल, पण या संदर्भातला एक श्लोक सांगूनच टाकतो. पार्श्वभूमी अशी, की गौतम ऋषींनी अहिल्येला शिळा बनवले, पुढे रामाच्या पदस्पर्शाने ती पुनः जिवंत झाली. नंतर एकदा नारदमुनी तिच्याकडे आले आणि तिला विचारले, खरं खरं सांग, गौतम ऋषींच्या वेषातला तो इंद्रच होता हे तुला कळलं होतं की नाही? ती म्हणाली हो. मग त्याला का होकार दिलास हे सांगताना तिने सरळ सांगितले की ब्रह्मचर्य पालन करणारी अगदी साध्वी स्त्री असली, तरी "योग्य" असा पुरुष दिसला की ती एक्साईट होते. "ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्या: साध्व्या: ह्यपि च श्रूयते | युक्तं हि पुरुषं दृष्ट्वा योनि: संक्लिद्यते स्त्रियः||"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

व्वा.

चित्रगुप्त
Sun, 05/05/2013 - 04:46 नवीन
उगाच नाही संस्कृतास देवभाषा म्हणत. (सुचलेले आयडी: संक्लिद्यता, संक्लिता, इ.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

युक्तं हि पुरुषं दृष्ट्वा योनि: संक्लिद्यते स्त्रियः||

संजय क्षीरसागर
Sun, 05/05/2013 - 10:48 नवीन
संस्कृतमधे कितीही अश्लील लिहीलेलं इथे चलतंय असं दिसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

संजय क्षी. यांनी फार मोलाचा मुद्दा उपस्थित केलाय

चित्रगुप्त
Sun, 05/05/2013 - 11:35 नवीन
....संस्कृतमधे कितीही अश्लील लिहीलेलं इथे चलतंय असं दिसतं... हा फार मोलाचा मुद्दा उपस्थित केलाय. असंच काहिसं चित्रकला, फोटोग्राफि यात घडत असतं. ज्या प्रमाणात नग्न व्यक्तिचा फोटो अश्लील मानला जातो, त्या मानाने नग्न चित्रे तशी मानली जात नाहीत. या मुद्द्याचा विस्तृतपणे छडा लावण्यासाठी एकादा धागा काढला पाहिजे. साहित्य, सिनेमा, नाटक, संगीत, चित्रकला आदि सर्वांचा यात विचार व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एकूण प्रकाशित गोष्टी पाहता

संजय क्षीरसागर
Sun, 05/05/2013 - 13:22 नवीन
ते व्यक्तीनिहाय असावं असं वाटतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अश्लीलतेचा प्रश्न

चित्रगुप्त
Sun, 05/05/2013 - 13:39 नवीन
मी म्हणतोय तसा धागा मिपापुरता नसून एकूणच साहित्य/कलाक्षेत्राविषयी, त्यातील अश्लीलतेच्या प्रश्नाविषयी असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

इथे प्रकाशित होणार म्हणजे इथल्या धोरणांनुसारच उहापोह होणार

संजय क्षीरसागर
Sun, 05/05/2013 - 14:33 नवीन
`इथे कशाला अश्लील म्हणायच आणि कशाला नाही' असंच त्याच स्वरूप असेल. तुम्ही पोस्ट टाका म्हणजे व्याख्या काय ते एकदा नक्की समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

इथे कशाला अश्लील म्हणायचं ते एकदा नक्की कळेल

संजय क्षीरसागर
Sun, 05/05/2013 - 14:37 नवीन
तुम्ही पोस्ट टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

तुम्हाला येतं संस्कृत????

प्यारे१
Sun, 05/05/2013 - 14:03 नवीन
तुम्हाला येतं संस्कृत???? आम्हाला नाय जमत ब्वा! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कैच्या कै

चित्रगुप्त
Sun, 05/05/2013 - 04:42 नवीन
हे संस्कृतवाले पण कैच्या कै शिकवतात. आम्हाला आता या श्लोकातून 'विनयभंगिता' विनयभंगिनी' 'श्वानसम विनयभंगिता' कुक्कुटसम विनयभंगिता' असले आयडी सुचू लगले, तर कुणाला दोष देणार ? आँ ? आणि मूळ श्लोकात 'विनयभंग' हा शब्द नाहीच, तरी अर्थाची नीट फोड करून सांगावी. प्रत्येक गोष्टीच्या अगदी मुळापर्यंत जाउन शिकणे बरे. ( आयडी: 'मूलगामिनी' 'मूलगमिता' 'मूलगमनप्रिया')
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

"श्वयुवमघोनामतद्धिते"

श्रीनिवास टिळक
Sun, 05/05/2013 - 08:52 नवीन
नक्की वर्ष आता आठवत नाही बहुतेक १९५७ असावे जेव्हा मी अकरावीत होतो (माझा जन्म १९३९) पाणिनीचे मूळ सूत्र असे आहे 'श्वयुवमघोनामतद्धिते" (6:4.133)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मूळ सूत्राबद्दल बहुत धन्यवाद

बॅटमॅन
Sun, 05/05/2013 - 12:29 नवीन
मूळ सूत्राबद्दल बहुत धन्यवाद :) आणि चित्रगुप्तजी, अजून नावे येऊद्यात ;) बाकी असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक

लै भारी

श्रीरंग_जोशी
Sat, 05/04/2013 - 02:10 नवीन
शीर्षक वाचून बराच वेळ धागा उघडला नव्हता (हाच एखाद्या स्त्रीसदस्यनमाने प्रकाशित केला असता तर.., जाउद्या जर तर चा प्रश्न कशाला उगाच?) शेवटी काही प्रतिक्रिया आलेल्या पाहून उघडला, मग प्रतिक्रिया वाचल्या अन मग मूळ लेख वाचला. क्या बात हैं, १ नंबरी!!! काय काय ती नावे? कालच मी खफवर पूजासाठी नवे सदस्यनाम म्हणून 'भटकती आत्मा' हे नाम सुचवले होते. "मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर" कसे वाटेल? मराठी मुलगी, कोकणी नखरेवाली, मुंबईची छोकरी... नवी स्त्रीसदस्यनामे सुचणं वाटते तेवढं सोपं नाही बुवा.
  • Log in or register to post comments

!

धमाल मुलगा
Sat, 05/04/2013 - 04:30 नवीन
>>मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर नि:शब्द!!! तोडलंस मित्रा, तोडलंस! ये बैस इथं. नामकरणाच्या वेळी मलाही कुण्णीच अर्धीसुध्दा सुचवणी मागत नाहीत. आपल्याला नावं ठेवण्यातच जास्त विंट्रेष्ट...हे असलं क्रिएटिव्ह कधी अन कसं जमावं? भो चित्रगुप्त महाराज, तुमचा हा बारशाचा कार्यक्रम जोरात चालुद्या! मी लक्ष ठेऊन आहे. पुढंमागं एखादी पोरगी झाली की तिचं नाव काय ठेवावं हा माझा प्रश्न मिटेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

"मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर"

आदूबाळ
Sat, 05/04/2013 - 11:57 नवीन
"मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर"
यापेक्षा "लवंगलतिका खानझोडे-मोगलगिद्दीकर" हे मशीनगण नाव भारीये! मूळ लेखः "कुक्कुटगंधा" वाचून ह.ह.लो. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा