✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्राध्यापकांचा संप मिटणार कधी ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sun, 08/16/2009 - 09:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23553 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

धन्यवाद

आजानुकर्ण
गुरुवार, 04/04/2013 - 23:07 नवीन
पगारवाढीव्यतिरिक्त आणखी कोणते मुद्दे प्राध्यापक संघटनेच्या कार्यकक्षेत येतात? प्राध्यापकांचा दर्जा वाढण्यासाठी एखादी उपसंघटना स्थापण्यासारखे काही उपाय करता येतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कार्यक्षेत्र मोठं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/04/2013 - 23:23 नवीन
>> पगारवाढीव्यतिरिक्त आणखी कोणते मुद्दे प्राध्यापक संघटनेच्या कार्यकक्षेत येतात ? पगारवाढीव्यतिरिक्त म्हटलं तर भविष्य निर्वाह निधींचे शिक्षकांच्या अडकलेली प्रकरणे, चुकीचे रोष्टर भरुन नियुक्त्या दिल्या जातात तेव्हा नियुक्त्या नियमाप्रमाणे झाल्या पाहिजेत, शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविणे, शासन, शासन नियम आणि शिक्षक यांच्यात समन्वयाचे काम प्राध्यापक संघटना करते. अजूनही बरीच कामे प्राध्यापक संघटनेच्या कार्यक्षेत्रात येतात. >>>प्राध्यापकांचा दर्जा वाढण्यासाठी एखादी उपसंघटना स्थापण्यासारखे काही उपाय करता येतील का ? उपसंघटना वगैरे स्थापन करुन शिक्षणाचा दर्जा वाढवता येईल असे मला वाटत नाही. विद्यापीठ अनुदान आयोग शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक प्रयोग करत असतात, काही यशस्वी होतात कदाचित काही अपयशी ठरत असावेत. आणि सध्या उच्च शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे, असे मला वाटत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

>>>आणि सध्या उच्च शिक्षणाचा

नाना चेंगट
गुरुवार, 04/04/2013 - 23:42 नवीन
>>>आणि सध्या उच्च शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे, असे मला वाटत नाही. सहमत आहे. खालावण्यासाठी आधी वरचा दर्जा असायला हवा त्यामुळे आधीच रसातळाला असलेला अजून किती खोल जाणार हा प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ यू टू??? उच्च

बॅटमॅन
गुरुवार, 04/04/2013 - 23:49 नवीन
प्राडॉ यू टू??? उच्च शिक्षणाचा दर्जा खालावला नाही हे तुम्हाला कसे म्हणवते याचे सखेद आश्चर्य वाटते. नाही, चांगले प्राध्यापक असतातच हो सगळीकडे-मान्य आहेच. पण त्यांचे प्रमाण किती? त्यांचे ऐकतो कोण? जण्रल विद्यापीठांचा दर्जा कसा आहे??? इतकी मारामारी होत असलेले टेक्निकल इंजिनिअरिंग फील्डच इतके गंडलेले आहे, तिथे इतरांची काय कथा? इतर फील्ड्स तर अलीकडे सापत्न झालेली आहेत जवळपास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाण्यात राहून माशाशी वैर

नाना चेंगट
गुरुवार, 04/04/2013 - 23:51 नवीन
पाण्यात राहून माशाशी वैर कशाला अशा भावनेने त्यांनी तसे लिहिले असावे किंवा टिपीकल प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी झापडे लावलेली असावीत किंवा त्यांना समजूनही त्यांचे हितसंबंध दुखावू नये म्हणुन त्यांनी तसे लिहिले असावे किंवा.. अशा अनेक शक्यता असाव्यात. हो की नै प्रा डॉ ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हो

श्रावण मोडक
Fri, 04/05/2013 - 00:00 नवीन
हो. त्यांनी वेगळ्या भाषेत ते आधीच सांगून ठेवलंय. आणि त्याचं उत्तरही तुम्ही दिलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

च्यायला ! शोध पत्रकार लै

नाना चेंगट
Fri, 04/05/2013 - 00:04 नवीन
च्यायला ! शोध पत्रकार लै डेंजर ब्वा ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वाचक

श्रावण मोडक
Fri, 04/05/2013 - 00:11 नवीन
वाचक हो... इथं पत्रकारिता म्हणजे मुंगी मारायसाठी... ;-) खरं की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

वाचक म्हणजे कोण हो?

नाना चेंगट
Fri, 04/05/2013 - 00:14 नवीन
वाचक म्हणजे कोण हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

इथं

श्रावण मोडक
Fri, 04/05/2013 - 00:20 नवीन
इथं आहे कोण? तुम्ही आणि मी, हे नक्कीच. बाकीचे येतील. तेव्हा पाहू... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

काय आहे...

श्रावण मोडक
गुरुवार, 04/04/2013 - 23:57 नवीन
फिर्यादी, साक्षीदार, (आरोपी), अभियोक्ता, न्यायाधीश या सर्व भूमिका एकाच ठिकाणी आल्यावर सखेद आश्चर्य करण्याजोगे काही असत नाही. पण... असो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नशीब चलन ठरवणे, पुरवणे, छापणे

नाना चेंगट
Fri, 04/05/2013 - 00:22 नवीन
नशीब चलन ठरवणे, पुरवणे, छापणे इत्यादी अधिकार नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हाहाहा

श्रावण मोडक
Fri, 04/05/2013 - 00:26 नवीन
नाना, आपले आजचे पंतप्रधान मनमोहन सिंह एकेकाळी दिल्ली विद्यापीठात शिकवायचे. तेही 'प्रा.डॉ.'च आहेत. जरा स्मरणशक्तीला ताण द्या राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

हो लक्षात आहे. फक्त प्रा डॉ

नाना चेंगट
Fri, 04/05/2013 - 00:30 नवीन
हो लक्षात आहे. फक्त प्रा डॉ असतांना जर त्यांना तो अधिकार मिळाला असता तर अजून किती वाट लागली असती याचा विचार करा :) प्राडॉ हा शब्द जरा भरकन बोलला की फ्रॉडा फ्रॉड असा का उच्चारला जातो हे कळत नाही. लहानपणी शब्द नीट उच्चारायची सवय नाही लागली.. त्याचा परिणाम की काय कोण जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

पटलं

श्रावण मोडक
Fri, 04/05/2013 - 00:37 नवीन
फक्त प्रा डॉ असतांना जर त्यांना तो अधिकार मिळाला असता तर अजून किती वाट लागली असती याचा विचार करा
हां... हे बाकी खरं. पण आजकाल काय आहे की, हे अधिकार असणारे प्राध्यापकीही करतात ना...
प्राडॉ हा शब्द जरा भरकन बोलला की फ्रॉडा फ्रॉड असा का उच्चारला जातो हे कळत नाही. लहानपणी शब्द नीट उच्चारायची सवय नाही लागली.. त्याचा परिणाम की काय कोण जाणे.
पटलं... सारे 'लहानपणी'चेच दोष आपले. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

रिसर्च पेपर

लॉरी टांगटूंगकर
Fri, 04/05/2013 - 00:04 नवीन
जर्नल इम्पॅक्ट फॅक्टर वगैरे गोष्टी असतात तसलं काही तरी ठेवायचं नं मग. त्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर ढीमका असेल तर ते ठरलेले गुण वगैरे...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खिक्...

श्रावण मोडक
Fri, 04/05/2013 - 00:10 नवीन
खिक्... हे वाचलं नाहीत का काय? अशांसाठीच्या यंत्रणा तयार करणं मुश्कील नाही राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

च्यामारी ! निदान

नाना चेंगट
Fri, 04/05/2013 - 00:13 नवीन
च्यामारी ! निदान प्राध्यापकांना तरी लोकपालाच्या कक्षेत आणायला हवं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

लोकपाल

श्रावण मोडक
Fri, 04/05/2013 - 00:18 नवीन
लोकपाल कोण? तिथल्या अटींत दोनेक 'प्राध्यापक' निवांत 'बसतात'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

अरे देवा ! किती पोच आहे या

नाना चेंगट
Fri, 04/05/2013 - 00:19 नवीन
अरे देवा ! किती पोच आहे या लोकांची... राजकारणी परवडले पण... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

कोटी

श्रावण मोडक
Fri, 04/05/2013 - 00:21 नवीन
कोटी रुपयांचा प्रश्न आहे हा... प्राध्यापकांचा. राजकारण्यांचा नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

सहमत आहे.

नाना चेंगट
Fri, 04/05/2013 - 00:25 नवीन
सहमत आहे. शिकवणे हा मुद्दा दुय्यम पहिले छन छन... रोकडा फेका.. शार्पच्या नोटसवरुन तुम्हीच शिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वाचले हो म्हणूनच लिहिलो

लॉरी टांगटूंगकर
Fri, 04/05/2013 - 00:25 नवीन
नुसतं आयएसएसएन क्रमांक असलेल्या नियतकालिकात वगैरे चुकीचं झालं असे म्हणायचं होतं. इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे ते जर्नल पुढे किती जण वापरत आहेत किंवा कितपत उपयोगी आहे अशा अर्थाचे रेटिंग. विकीच्या म्हणण्यानुसार The impact factor (IF) of an academic journal is a measure reflecting the average number of citations to recent articles published in the journal. It is frequently used as a proxy for the relative importance of a journal within its field, with journals with higher impact factors deemed to be more important than those with lower ones. The impact factor was devised by Eugene Garfield, the founder of the Institute for Scientific Information. Impact factors are calculated yearly for those journals that are indexed in the Journal Citation Reports. जर का ते कोणाला उपयोगी नाही तर कोणी वापरणार नाही अन् शून्य इम्पॅक्ट फॅक्टर असे. http://en.wikipedia.org/wiki/Impact_factor
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हां...

श्रावण मोडक
Fri, 04/05/2013 - 00:33 नवीन
काय सांगताय!
reflecting the average number of citations to recent articles published in the journal
हे रिफ्लेक्शन मोजायचं कसं एवढंच सांगा. मग मी तुम्हाला, कराडच्या नियतकालिकात (हे तेच, वरच्या लेखात असणारे) संगमनेरच्या नियतकालिकाचा संदर्भ देतो, आणि हे दोन्ही संदर्भ एखाद्या शोधनिबंधात देतो, हे कसं जमते ते दाखवतो. मग आपण ते मान्य करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

खरडफळाच करायचाय का?

लॉरी टांगटूंगकर
Fri, 04/05/2013 - 00:47 नवीन
खरडफळाच करायचाय का? त्यात जगभरात कुठे कसा वापरला गेला त्याचे डिस्ट्रिब्युशन असावे. अशा लोकल लेव्हलच्या जर्नलचा जगभर वापरल्या जाणाऱ्या जर्नलवर परिणाम करता येईल??? अन् तुम्ही दिलेलं उदाहरण पटलंय, असलं काही करायला लागलो तर संपलच. खरं तर यावर मला विचार करता येत नाहीये. अनासपुरेचा पिक्चर आठवायला लागलाय (निशाणी डावा अंगठा) :) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

जी नाही

श्रावण मोडक
Fri, 04/05/2013 - 01:18 नवीन
खरडफळाच करायचाय का?
तिथं असं काही चालतं का हे माहिती नाही. त्यामुळं, जी, नाही. 'जगभर' म्हणाल तर अलीकडेच वाचनात आलेला एक लेख आहे. हा लेखक प्राध्यापक नसावा, पण विज्ञानातील आहे, फिजिसिस्ट आहे. यात बरंच काही आलं. जगभरातील ही नियतकालिकंही कशी चालतात हा संशोधनाचा विषय नक्कीच नाही. त्यामुळं अशाही नियतकालिकात 'साईट' झालं म्हणजे संशोधन झालं असं असेल, तर गोष्ट वेगळी. 'जगभरात' याची व्याख्या काय हा प्रश्न अलाहिदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

जो चल रहा है चलने दो...

लॉरी टांगटूंगकर
Fri, 04/05/2013 - 10:57 नवीन
वरचा प्रतिसाद टायपून होई पर्यंत ४,५ प्रतिसाद आलेले होते. म्हून खफ करायचा का लिहिलं. दुवा वाचला, सगळी नियतकालिके अशीच आहेत काय ?? अन् रिसर्चलं लागणारा पैसा तर वेगळाच. इथे बऱ्याच ठिकाणी जर्नल्स घेतली जात नाहीत. तिथे संशोधनाला किती पैसा दिला जात असेल देवच जाणे. खाली म्हणल्याप्रमाणे एकूण ठिगळं लावायची तरी किती ?? जो चल रहा है चलने दो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

माझ्या माहितीप्रमाणे भारताचा

पिशी अबोली
Fri, 04/05/2013 - 01:04 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे भारताचा या इम्पॅक्ट फॅक्टरनुसार केलेल्या यादीत अतिशय खालचा क्रमांक आहे. रिसर्च पेपरच्या फॅक्टर्‍या असल्याप्रमाणे ते प्रकाशित होतात.त्यांची खरी किंमत? शून्य.. आणि हे असे भरमसाठ पेपर प्रकाशित न करणारे लोक वेडे ठरतात आपल्याकडे संशोधन किंवा शिक्षणक्षेत्रात. विद्यार्थ्यांनाही असेच पेपर करण्यासाठी उत्तेजन दिलं जातं. नावावर पेपर आला म्हणजे झालं, ही मनोवृत्ती अगदी अपवाद सोडले तर सगळ्यांचीच आहे. हे अपवाद तरी करुन करुन काय करणार? प्रवाहाच्या फार विरुद्ध जाता येत नाही त्यांनाही. एकूण ठिगळं लावायची तरी किती ठिकाणी आणि कशी हा मोठाच प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/05/2013 - 09:04 नवीन
प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

सदर बातमी वाचून दोन विचार

निनाद मुक्काम …
Fri, 04/05/2013 - 04:25 नवीन
सदर बातमी वाचून दोन विचार मनात आले. च्यायला आमच्यावेळी असे नव्हते च्यायला आमच्यावेळी असे का नव्हते.
  • Log in or register to post comments

कॉलेज बंद करुन काढुन टाका ह्या प्राध्यापकांना

प्रसाद१९७१
Fri, 04/05/2013 - 10:00 नवीन
आता सरकार ने फक्त परिक्षा घेणे आणि निकाल लावणे इतकेच काम करावे. ज्या विद्यार्थ्यांना शिकायचे आहे, ते शिकतील खाजगी शिकवणी लावुन. ९०% प्राध्यापकांची लायकी शाळेची घंटा वाजवणार्‍य शिपायाची सुद्धा नाहिये. उरलेले १०% क्लासेस चालवून शिकवतील ज्यांना शिकायचे आहे त्यांना.
  • Log in or register to post comments

कृपया शाळेतील शिपायाचा

नाना चेंगट
Fri, 04/05/2013 - 10:29 नवीन
कृपया शाळेतील शिपायाचा प्राध्यापकांशी तुलना करुन अपमान करु नका. शिपाई कष्ट करुन कमावत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

अपमान करु नका. शिपाई कष्ट करुन कमावत असतो.

प्रसाद१९७१
Fri, 04/05/2013 - 11:29 नवीन
माझी चुक मान्य. शिपायांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील प्राध्यापकांशी तुलना करुन त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

ह्या नान्याला

कुंदन
Sat, 04/06/2013 - 04:19 नवीन
ह्या नान्याला बॅन करा ब्वॉ. लई पिडतो हल्ली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

परशुरामा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/05/2013 - 16:07 नवीन
परशुरामा, वाचतोय ना प्रतिसाद. सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम नको, नेट-सेटचे लाभ नको, संप तर नकोच नको, पण मिपावरचे प्रतिसाद तेवढे आवर रे बाबा......!!!! :) अवांतर : आमचा मित्र मिभो उर्फ सर्किट याची धाग्याची निमित्तानं लै आठवण येतेय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हा हा हा

नाना चेंगट
Fri, 04/05/2013 - 23:10 नवीन
हा हा हा दमलात एवढ्यात ! चक चक चक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राध्यापकाना खुपच सवलती कमी पडत्तात

वेताळ
Fri, 04/05/2013 - 16:37 नवीन
माझ्यामते १) त्याना कमीतकमी २ लाख प्रतिमहिना एवढा पगार करावा. २)त्याना सर्वात उत्कृष्ट व महागडी सेडाना कार ड्रायव्हर सह सरकारने पुरवावी.(गाडी पुसण्याचा व चालवण्याचा त्याचा वेळ व पैसा वाचेल व एकाद्या होतकरु विद्यार्थ्याला नोकरी देखिल मिळेल.) ३) त्याना ३ किंवा ४ बीएचके बंगला अथवा सदनिका द्यावी. त्यात करकामासाठी एक घरगडी व स्वंयपाकासाठी एक बाई असावी.(आजकाल सर्व प्राध्यापकाच्या बायका बीएड करत असतात त्यामुळे सरांना वेळेत बर्‍याच गोष्टी मिळत नाहीत) ४)सेट नेट किंवा पीएचडी ह्या गोष्टींची सक्ती त्याच्यावर करु नये.(एकाच विषयावर १०० जणानी पीएचडीचा एकसारखा शोधनिबंध लिहण्याचा त्रास तरी वाचेल.) ५)प्राध्यापकाना दररोज ३च लेक्चर असावीत. (निदान त्याना तरी कळेल आपण आज काय शिकवले.) ६)कॉलेजात त्याना स्टाफरुम मध्ये इंटरनेट सुविधा,फुकट प्रिंटाउट मिळाव्यात.(म्हणजे एमएलएम कंपण्याचे लॉगैन व प्रिंट त्याना वेळेत कॉलेजातच मिळत जातील.तसेच नवीन कोणत्या एमएलएम कंपण्याचालु झाल्या आहेत त्याची माहिती त्याना नोटिसबोर्डावर उपलब्द करुन दिली जावी) ७)एल आयसी किंवा इतर विमा कंपन्यानी सर्व प्राध्यापकाना आपले एजंट म्हणुन नोंदणी करुन घ्यावे.म्हणजे त्याना कमी पडणारा पैसा त्यातुन ते मिळवु शकतील. अजुन बरेच काही सांगता येईल. पण सरकारने निदान वरील ७ मागण्या तात्काळ मंजुर करुन घ्याव्यात.
  • Log in or register to post comments

income tax नसावा

प्रसाद१९७१
Fri, 04/05/2013 - 17:01 नवीन
एल आयसी किंवा इतर विमा कंपन्यानी सर्व प्राध्यापकाना आपले एजंट म्हणुन नोंदणी करुन घ्यावे.म्हणजे त्याना कमी पडणारा पैसा त्यातुन ते मिळवु शकतील.
आणि सर्व विद्यार्थ्यांनी कमीत कमी एक कोटीची पॉलिसी घेतलीच पाहिजे ह्या प्राध्यापकांकडुन. १ दिवसाला ३ तास घेणे फार होते. एक लेक्चर पुरे. २. Staff room AC असावी. त्यात प्रत्येक प्राध्यापकांसाठी बेड असावेत. ३. Staff room मधे १०० इन्ची LED TV असावा. ४. income tax नसावा अजुन बर्‍याच काही मागण्या आहेत.
  • Log in or register to post comments

मास्तरच हैत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/05/2013 - 19:18 नवीन
मास्तरच हैत एवढा आजचा लोकसत्ताचा लेखही वाचावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खरय आज कुणीही उठाव आणी

प्राध्यापक
Fri, 04/05/2013 - 20:22 नवीन
खरय आज कुणीही उठाव आणी प्राध्यापकांना झोड्पावं अशी स्थिती दिसते,प्राध्यापकांमधे काही लोक म्हणतात तसे काही लोक असतीलही पण सगळ्यांना एकाच तराजुने तोलण कस शक्य आहे,आज कुठल अस क्षेत्र आहे की ज्यात सगळे एक सारखेच लोक आहेत. प्राध्यापकांचा पगार सर्व समाजाच्या डोळ्यात खुपतोय अस दिसत्,फक्त पाच तास काम करुन एव्हढा पगार हेच वरकरणी दिसतय पण ते पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही. प्राध्यापकांच्या बहिष्कारा बद्दल बोललं जातय पण पण ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली याचा विचार होताना दिसत नाही,मित्रहो प्राध्यापकांनाही त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी भांडण्याचा हक्क आहेत हे आपण विसरता. बाकी चर्चेच्या हीन पातळी बद्द्ल काही न लिहणंच बर,,,,,
  • Log in or register to post comments

मनातला कोंडमारा आणि हिशेब टीशेब पूर्ण करायची संधी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/05/2013 - 20:47 नवीन
>>> बाकी चर्चेच्या हीन पातळी बद्द्ल काही न लिहणंच बर,,,,, चालायचंच सर....!!! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राध्यापक

सहमत

श्रीरंग_जोशी
Fri, 04/05/2013 - 21:37 नवीन
आपल्याला घडवण्यात शाळेपासून महाविद्यालयापर्यंतच्या शिक्षकांचा / प्राध्यापकांचा पुरेपूर वाटा आहे. प्रत्येकच क्षेत्रात चांगल्याबरोबर वाईटही असणारच. संपूर्ण प्राध्यापकवर्गावर इतकी टोकाची टिका करण्यापेक्षा शिक्षणक्षेत्रात सुधारणा होण्यासाठी स्वतःला काय करता येईल हे पहावे. काहीच नाही तर आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधीत अभ्यासक्रम शिकवला जातो तिथे जाऊन विद्यांर्थ्यांना गेस्ट लेक्चर्स वगैरे द्यावीत. म्हणजे पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येतो हे विद्यार्थ्यांना योग्य वेळी कळेल. मी हे करून पाहिले आहे व त्यासाठी प्राध्यापक व विद्यार्थी या दोन्हींचेही पूर्ण सहकार्य मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राध्यापक

मला घडवण्यात महाविद्यालयापर्यंतच्या प्राध्यापकांचा वाटा नाही

प्रसाद१९७१
Mon, 04/08/2013 - 12:37 नवीन
प्रचंड असहमत. मी जेव्हडे काही शिकलो आहे आणि नोकरी करुन पोटापाण्याची सोय करत आहे त्यात महाविद्यालयापर्यंतच्या प्राध्यापकांचा थोडा सुद्धा वाटा नाही. माझी प्राध्यापकांबद्दल ची मते माझ्या अनुभवातुन बनली आहेत. समाजावरची बांडगुळे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वाटा

श्रावण मोडक
Mon, 04/08/2013 - 13:02 नवीन
वाटा नाही कसा? आहेच. सकर्मक नसेल, अकर्मक आहेच. काय करायचे हे त्यानी सांगितले नसेल, पण काय करू नये हे वागण्या-बोलण्यातून नक्कीच शिकवले असेल. तो वाटाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

तुमची सगळ्यात Positive अर्थ शोधायची वृत्ती आवडली आपल्याला

प्रसाद१९७१
Mon, 04/08/2013 - 13:55 नवीन
तुमची सगळ्यात Positive अर्थ शोधायची वृत्ती आवडली आपल्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

>>>खरय आज कुणीही उठाव आणी

नाना चेंगट
Fri, 04/05/2013 - 23:04 नवीन
>>>खरय आज कुणीही उठाव आणी प्राध्यापकांना झोड्पावं अशी स्थिती दिसते,प्राध्यापकांमधे काही लोक म्हणतात तसे काही लोक असतीलही पण सगळ्यांना एकाच तराजुने तोलण कस शक्य आहे,आज कुठल अस क्षेत्र आहे की ज्यात सगळे एक सारखेच लोक आहेत. तेच तर आम्ही म्हणतोय. पण प्राध्यापक आम्ही नाही तसले असा आव आणतात तो चुकीचा आहे एवढेच >>प्राध्यापकांचा पगार सर्व समाजाच्या डोळ्यात खुपतोय अस दिसत्,फक्त पाच तास काम करुन एव्हढा पगार हेच वरकरणी दिसतय पण ते पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही. हा हा हा असे किती तयारी करुन तासिका घेणारे आहेत प्राध्यापक? एकदा त्यांच्या चरणाचे तीर्थ प्राशन करावे म्हणतो. असतील म्हणा नाही असे नाही पण गेल्या चाळीस वर्षांत एक माईचा लाल असा तयारीने आलेला दिसला नाही. सगळे आपले आपल्या बॅ़क बॅलन्सच्या फिकीरीत.. असो ! आमचे नशीब आम्हाला चांगले प्राध्यापक दिसलेच नाहीत. >>प्राध्यापकांच्या बहिष्कारा बद्दल बोललं जातय पण पण ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली याचा विचार होताना दिसत नाही,मित्रहो प्राध्यापकांनाही त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी भांडण्याचा हक्क आहेत हे आपण विसरता. भांडावे की जरुर भांडावे... ! पण न्याय्य मागण्यांसाठी भांडतांना आपले कर्तव्य विसरु नये. असो. विषय मोठा आहे. >>>बाकी चर्चेच्या हीन पातळी बद्द्ल काही न लिहणंच बर,,,,, सहमत आहे. मिपावर यापेक्षाही हीन पातळीवर चर्चा झाली आहे. त्यावेळेस आपण काही बोललेले दिसले नाही. तुम्हाला दुजोरा देणारे तर आनंदाने टाळ्या वाजवून सामिल झालेले आम्ही पाहिले आहे. मिपा हे समाजाचे प्रतिबिंब आहे. आज समाजात प्राध्यापक हा हेटाळणीचा आणि कुचेष्टेचा विषय होत चालला आहे हे नक्की. मिपावर त्याचे प्रतिबिंब उतरणारच. प्राध्यापकांना फक्त आरत्याच ओवाळून घ्यायच्या असतील तर इतर हुच्चभ्रु संकेत स्थळे आहेत किंवा कुठल्यातरी खेड्यातून प्रसिद्ध होणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची (!) जर्नल्स आणि शेमिनार्स आहेत. जै हो !! >>विद्याविनयेन शोभते सहमत आहे. आमच्यापाशी ना विद्या ना विनय त्यामूळे शोभण्याचा प्रश्नच नाही. जातीचे नंगट ! पटल त्याला उचलून धरणार नाही पटल त्याला शिव्या देणार ! हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राध्यापक

आवरा!

दादा कोंडके
Sun, 04/07/2013 - 02:00 नवीन
फक्त पाच तास काम करुन एव्हढा पगार हेच वरकरणी दिसतय पण ते पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही.
अभ्यासक्रम बदलला तरीही वर्षानुवर्ष त्याच पुटं चढलेल्या, पिवळ्या झालेल्या वह्यातलं शिकवायचं, एक-दोनच विषय घेउन दशकानुदशकं शिकवायचं, क्वालेजच्या ट्रस्टीज समोर हांजी हांजी करायची वगैरे हे विसरलात. आमच्यावेळी बहुतांश क्वालेज मध्ये इंटर्नल मार्क्स प्राध्यापक मंडळींच्या हातात नसते तर वर्गात काळं कुत्रं फिरकलं नसतं अशी परिस्थिती होती (आताचं माहीत नाही ;) ) आया(याया)यटीज/रिजनल वगैरे क्वालेजेसचं माहीत नाही पण मागच्या तीन-चार दशकांपासून कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या उगवलेल्या अभियांत्रिकी क्वालेजेसचं सांगतो. ज्यांना कंपन्यात कुठेच चांगली नोकरी मिळत नाही ती लोकं कंटाळून प्राध्यापकी करतात असा माझा समज माझ्या ब्याच मेटस नी पक्का केला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राध्यापक

>>आया(याया)यटीज/रिजनल वगैरे

नाना चेंगट
Mon, 04/08/2013 - 08:58 नवीन
>>आया(याया)यटीज/रिजनल वगैरे क्वालेजेसचं माहीत नाही यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसांनी मतप्रदर्शन करायला बंदी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

विषय दिलेला नाही

दादा कोंडके
Mon, 04/08/2013 - 13:53 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

क्वालेजच्या ट्रस्टीज समोर

गणामास्तर
Mon, 04/08/2013 - 17:41 नवीन
क्वालेजच्या ट्रस्टीज समोर हांजी हांजी करायची वगैरे हे विसरलात. आमच्यावेळी बहुतांश क्वालेज मध्ये इंटर्नल मार्क्स प्राध्यापक मंडळींच्या हातात नसते तर वर्गात काळं कुत्रं फिरकलं नसतं अशी परिस्थिती होती (आताचं माहीत नाही )
हॅ हॅ हॅ..आज काल तर कॉलेजच्या ट्रस्टीज चे वाढदिवस सुद्धा प्राध्यापक मंडळीं कॉलेज समोर बॅनर वैग्रे लावून, फटाके फोडून साजरे करतात. बाकी, अजून पर्यंत जरी इंटर्नल मार्क्स प्राध्यापक मंडळींच्या हातात असले तरी वर्गात उपस्थिती मात्र प्रचंड रोडावली आहे एव्हढाचं काय तो फरक. त्याचे कारण तुम्हाला मी सांगायला नकोचं ;)
ज्यांना कंपन्यात कुठेच चांगली नोकरी मिळत नाही ती लोकं कंटाळून प्राध्यापकी करतात असा माझा समज माझ्या ब्याच मेटस नी पक्का केला आहे.
सेम हियर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा