रात्रीच्या पावसाने
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
तुझ्या घरातील काही
गळक्या कौलांना वाहून
घेऊन आला
वाहत वाहत त्या कौलांनी
माझ्या घराशी आधार घेतला
त्यांनी माझ्या मनाचा
नकळत ठाव घेतला
.
.
पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही?
.
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
सारे अंगण मनासारखेच
भिजवून गेला
भिजल्या मनाने भिजल्या अंगणात
जीव कासावीस झाला
अंगणातून कुंपणाजवळ
धावाधाव करत राहिला
.
.
घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही?
.
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला
विझणाऱ्या निखाऱ्यांना
धग देऊन गेला
अन् वरची राख तेवढी उडवून गेला
.
.
वारा तरी कसा ना?
राख उडवतो आणि निखारे भडकावतो
.
खरचं
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२८/०३/२०१३)
मिकामूड = मिकाकाव्य
...हललं काहितरी...
आवडली...!!!!!
आवडली.
किंचित बदल करुन वाचली
+१
मिका, तोडलंस मित्रा... कमाल
नेहमीप्रमाणेच सुंदर काव्य
छान
नो मिका दादा .... नाहि .....
विझणाऱ्या निखाऱ्यांना
मस्त!! खूप महिने नव्हतो मिपा
मस्त !!
या ओळी.