✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साय

ल — लीलाधर, Wed, 09/12/2012 - 14:44
साय ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया, वडरुपी छायेत करील मातृरुपी माया ! सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !! गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

प्रतिक्रिया द्या
54315 वाचन

💬 प्रतिसाद (151)

आयला. हे कसं सुटलं ब्वॉ

गणामास्तर
गुरुवार, 09/13/2012 - 19:18 नवीन
आयला. हे कसं सुटलं ब्वॉ नजरेतून. पब्लीकला हैदोस घालायला चिक्कार वाव असून त्यातल्या त्यात कमीचं घातलाय की. ;) बाकी कवी आणि बुवांशी याविषयी सविस्तर चर्चा शनिवारी करण्यात येईल.
  • Log in or register to post comments

पब्लीकला हैदोस घालायला

बॅटमॅन
Fri, 09/14/2012 - 11:17 नवीन
पब्लीकला हैदोस घालायला चिक्कार वाव असून त्यातल्या त्यात कमीचं घातलाय की.
बाडीस. पीतग्रंथविद्याविभूषितांची मांदियाळी असूनदेखील असे कसे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

वहिनीला मातृरुपी, वडाची का

रेवती
गुरुवार, 09/13/2012 - 19:28 नवीन
वहिनीला मातृरुपी, वडाची का होईना छाया वगैरे म्हणणं ठीक आहे पण वहिनीच्या गोर्‍या, सायीसारख्या अंगाबद्दल कश्याला दिरानं बोलावं? हा प्रश्न पडला. ही कवीता दादाच्या नजरेस पडली तर काही खरे नाही. ;)
  • Log in or register to post comments

रेवती आज्जे त्याचं काय

लीलाधर
गुरुवार, 09/13/2012 - 20:10 नवीन
आहे ना तुझ्या प्रश्नाचे उत्तर इथे चाललेल्या चर्चेतच आहे गो जरा नीट बघून घे बरे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

गूढ

तिमा
गुरुवार, 09/13/2012 - 19:47 नवीन
या कवितेत गूढ अर्थ भरलेला आहे. यावर एखादा 'सायस्पर्श' निघू शकेल.
  • Log in or register to post comments

'सायस्पर्श'

ज्ञानराम
Fri, 09/14/2012 - 09:08 नवीन
'सायस्पर्श' <<<<<<<<, आवडल्या गेले आहे...:bigsmile:
  • Log in or register to post comments

त्याचं क'साय'.. असलं

अर्धवट
Fri, 09/14/2012 - 12:35 नवीन
त्याचं क'साय'.. असलं प'साय'दान लिहील्यावर फ'साय'चेच प्रसंग अधीक हो. ;)
  • Log in or register to post comments

च्यामारी... लीलीधराच्या या

मदनबाण
Fri, 09/14/2012 - 16:51 नवीन
च्यामारी... लीलीधराच्या या सायलीली ? ;)
  • Log in or register to post comments

कविने वापरलेलं साय हे रुपक

सूड
Fri, 09/14/2012 - 17:38 नवीन
कविने वापरलेलं साय हे रुपक आणि वहिनी घरात आल्यावर मिळणारी साय पाहता कवीची भावी वैनी चितळ्यांची, आरे डेरी वाल्यांची थोडक्यात कुठल्यातरी डेअरीवाल्यांची पुतणी किंवा मुलगी असावी. लग्नानंतर तिला एखादी दुग्धफॅक्टरी आंदण म्हणून मिळणार असावी, असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

वा वा.. म्हणजे ताजी बाकरवडीही

गवि
Fri, 09/14/2012 - 17:51 नवीन
वा वा.. चितळेंपैकी का? म्हणजे ताजी बाकरवडीही घरबसल्या.. वेळेचं बंधन नाही.. सर्वच बोटं तुपात.. आरेपैकी नसावी वहिनी.. नाहीतर कवी वहिनी आली की एनर्जी मिळेल असं म्हणाला असता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नाहीतर कवी वहिनी आली की

मदनबाण
Fri, 09/14/2012 - 19:02 नवीन
नाहीतर कवी वहिनी आली की एनर्जी मिळेल असं म्हणाला असता.. हॅहॅहॅ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

इइइइइइइइइइइइइइइइइइइइइकै च्या

जेनी...
Fri, 09/14/2012 - 18:17 नवीन
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइ कै च्या कैच लिहितात बै हे लोक.....\(
  • Log in or register to post comments

भावनांची किती ही उधळपट्टी आँ?

बॅटमॅन
Fri, 09/14/2012 - 18:24 नवीन
भावनांची किती ही उधळपट्टी आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

पूजाबै, येवढी काही वैट्ट नाय

सूड
Fri, 09/14/2012 - 18:28 नवीन
पूजाबै, येवढी काही वैट्ट नाय हों कविता चचाची. पाल पडल्यागत काय किंचाळताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अहो बैंना किनै लैसन्स टु

बॅटमॅन
Fri, 09/14/2012 - 18:32 नवीन
अहो बैंना किनै लैसन्स टु स्क्रीम आहे असं म्हंटात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@येवढी काही वैट्ट नाय हों

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/14/2012 - 18:38 नवीन
@येवढी काही वैट्ट नाय हों कविता चचाची.>>> त्या प्रतिसादांबद्दल बोलताहेत,,, :-p होय ना गं बालिके...? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अहो सुडपंत ..मी त्या गविंच्या

जेनी...
Fri, 09/14/2012 - 18:44 नवीन
अहो सुडपंत ..मी त्या गविंच्या एनर्जी पोस्ट बद्दल बोलली \( आले लगेच आग लावायला .......\(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

होशी जरि लवकरी इतकी लाल तू

बॅटमॅन
Fri, 09/14/2012 - 18:51 नवीन
होशी जरि लवकरी इतकी लाल तू रागाने | काये कवण करु धजैल बापडा आगीने ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

बादवे

बॅटमॅन
Mon, 05/11/2015 - 14:19 नवीन
तमिळ अन तेलुगुमध्ये पाल म्हणजे दूध बरंका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लयीच स्निग्धांश ह्ये सायीत ..आपलं कवितेत...

घायाळ
Sun, 09/16/2012 - 11:05 नवीन
लयीच स्निग्धांश ह्ये सायीत ..आपलं कवितेत...
  • Log in or register to post comments

काय लिलाध्रा

स्पा
गुरुवार, 02/28/2013 - 16:32 नवीन
काय लिलाध्रा साय दिली कि नाय वैणीने अजून
  • Log in or register to post comments

(No subject)

गणामास्तर
गुरुवार, 02/28/2013 - 17:08 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

बॅटमॅन
गुरुवार, 02/28/2013 - 17:17 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

स्पा
गुरुवार, 02/28/2013 - 17:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

प्रचेतस
गुरुवार, 02/28/2013 - 18:21 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

दूध तापवता येत नाय वाट्टं

शुचि
गुरुवार, 02/28/2013 - 19:26 नवीन
दूध तापवता येत नाय वाट्टं धाक्ल्या दीराना :)
  • Log in or register to post comments

मेलो

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/28/2013 - 19:42 नवीन
गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया,
लैच अचाट उडी आहे ही .... वडाच्या झाडाखाली दुध तापवतात काय तुमच्याकडे ? त्याशिवाय असली कल्पना सुचणे म्हणजे अशक्यच.... _/\_
  • Log in or register to post comments

=) =)

लॉरी टांगटूंगकर
Tue, 08/27/2013 - 23:06 नवीन
झाडाखाली दुध तापवतात =) =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

किती वेळ झाला......

फिरंगी
गुरुवार, 02/28/2013 - 19:51 नवीन
किती वेळ झाला ..... मनातल विडंबन काही बाहेर येत नाही ................. वाट पाहतो .......
  • Log in or register to post comments

तुमच्या असल्या लिला बघून

अधिराज
गुरुवार, 02/28/2013 - 20:06 नवीन
तुमच्या असल्या लिला बघून वहिनी पळून जायची.
  • Log in or register to post comments

वहीनी पुराण संपवा

फिरंगी
गुरुवार, 02/28/2013 - 20:52 नवीन
वहीनी पुराण संपवा आणि विडंबन एकवा आता...................
  • Log in or register to post comments

या कवितेतला दादा कोण म्हणायचा

धन्या
गुरुवार, 02/28/2013 - 22:05 नवीन
या कवितेतला दादा कोण म्हणायचा? आहे का अजून तो?
  • Log in or register to post comments

तुम्हास आत्मूदादा अपेक्षित

प्रचेतस
गुरुवार, 02/28/2013 - 22:15 नवीन
तुम्हास आत्मूदादा अपेक्षित आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@आत्मूदादा अपेक्षित आहे काय?>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/28/2013 - 23:45 नवीन
@आत्मूदादा अपेक्षित आहे काय?>> Image removed. दुष्ट खौट अगोबा... अगोबा....आत्मा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अच्छा. म्हणजे या कवितेतले

धन्या
गुरुवार, 02/28/2013 - 23:57 नवीन
अच्छा. म्हणजे या कवितेतले दादा तुम्हीच का? मला वाटलं की काल्पनिक कविता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सगळे आहेत

अभ्या..
Fri, 03/01/2013 - 00:04 नवीन
अस्तित्वात दादा आहेत, कविता आहे, साय आहे, फक्त वहिनी तेवढी सध्या काल्पनिक आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मला पण !!

सूड
Fri, 03/01/2013 - 00:05 नवीन
मला पण ही कविता (पक्षी: विडंबन) काल्पनिक आहे असं वाटत होतं अजूनपर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@ म्हणजे या कवितेतले दादा

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/01/2013 - 00:18 नवीन
@ म्हणजे या कवितेतले दादा तुम्हीच का?>>> तुंम्ही कित्तिही काहिही जरी म्हणलात,तरी..
तो मी नव्हेच!!!
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

स्पा काकाचे धन्यवाद. वर

भिकापाटील
गुरुवार, 02/28/2013 - 22:30 नवीन
स्पा काकाचे धन्यवाद. वर आणल्याबद्दल. नाहीतर आम्ही कविवर्य लीलाधराच्या ह्या वाडःमयीन कलाकृतीस मुकलो असतो. अवांतरः वहिनी बहूधा वडराची आहे नि तीचे नाव छाया आहे.
  • Log in or register to post comments

ह्या

तिमा
Sun, 03/03/2013 - 14:24 नवीन
ह्या कवितेवर आधारित 'साय'को चित्रपट काढण्याच्या विचारात आहेत काही प्रोड्यूसर्स!
  • Log in or register to post comments

मसडतड

स्पा
Mon, 08/26/2013 - 17:14 नवीन
मसडतड
  • Log in or register to post comments

सहमत आहे...

धन्या
Mon, 08/26/2013 - 17:48 नवीन
अतिशय वास्तवदर्शी काव्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

डोक्याला शॉट कविता !!

प्रसाद गोडबोले
Mon, 08/26/2013 - 17:43 नवीन
डोक्याला शॉट कविता !!
  • Log in or register to post comments

पुनर्वाचनाचा आनंद मिळाला.

प्रचेतस
Mon, 08/26/2013 - 18:16 नवीन
पुनर्वाचनाचा आनंद मिळाला.
  • Log in or register to post comments

पुनर्वाचनाचा आनंद मिळाला -

मोदक
Mon, 08/26/2013 - 18:28 नवीन
पुनर्वाचनाचा आनंद मिळाला - तुम्हाला तर मुखोद्गत आहे हे काव्य! :D असो, आम्हालाही पुनर्वाचनाचा आनंद मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आँ??

कोमल
Tue, 08/27/2013 - 19:08 नवीन
आँ?? वल्ली ने काढला होय याला वर... तरीच म्हटलं चचा ला कसा वेळ मिळाला हिकड फिरकायला... ;)
  • Log in or register to post comments

मी नाय. स्पाने काढला हां धागा

प्रचेतस
Tue, 08/27/2013 - 19:41 नवीन
मी नाय. स्पाने काढला हां धागा वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

कुणी का काढे ना? साय- वर'च

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/27/2013 - 22:25 नवीन
कुणी का काढे ना? साय- वर'च येत असते! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

यशोधरा
Tue, 08/27/2013 - 19:39 नवीन
कविता आणि प्रतिसाद वाचून हहपुवा!
  • Log in or register to post comments

९७.

प्यारे१
Tue, 08/27/2013 - 20:42 नवीन
९७. चचा ला लग्नाचा आहेर करा '१०१' चा. ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा