Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by neeta on Wed, 02/20/2013 - 14:37
आजकाल सगळ्यांचेच लहान आणि मोठ्या माणसांचे वाचन कमी होत चालले आहे. मुले इंटरनेट मुळे आणि मोठी माणसे टी व्ही सिरयल मुळे वाचत नाहीत. याचा अनुभव मी सोसायटीत वाचनालय चालू केले तेव्हा मला आला. लोक सरळ सांगतात की आम्हाला वाचायला वेळ नाही म्हणून. आपल्याला काय वाटते. यासाठी काय करता येईल?
  • Log in or register to post comments
  • 6840 views

प्रतिक्रिया

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 02/20/2013 - 14:41

Permalink

वाचनालयाची पुस्तकं नवीन असतील तर

आता लोकांना भेट द्यायला वापरता येतील
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Wed, 02/20/2013 - 14:42

Permalink

हो.

आपले निरीक्षण बरोबर आहे - असे माझेही मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Wed, 02/20/2013 - 15:02

In reply to हो. by तर्री

Permalink

+१

सहमत. अगदी अडिचोळीचे धागेसुद्धा वाचवत नाहीत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 02/20/2013 - 15:11

In reply to +१ by दादा कोंडके

Permalink

दादा, अडिचोळीचे ?

तुमच्या या नव्या जोडाक्षरामुळे चोळीचा नवीन प्रकार बाजारात आला की काय असं वाटलं !
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Wed, 02/20/2013 - 16:14

In reply to दादा, अडिचोळीचे ? by संजय क्षीरसागर

Permalink

तुमचे वाचन आणि निरीक्षण -

------/\------ तुमचे वाचन आणि निरीक्षण दोनेही कमी दिसते आहे . अडीचोळी काही महिन्यांपासून सतावते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on Wed, 02/20/2013 - 14:44

Permalink

जाउद्या हो... असते काही

जाउद्या हो... असते काही जणांना काजू कतरी सोडून शेण खायची सवय... आपण आपलं वाचन कमी होऊ द्यायचं नाही.. सिरियल बघून जगाचं जे काही अगाध ज्ञान मिळतं त्यापेक्षा आपल्याला पुस्तकातून मिळालेलं ज्ञान पुरे...
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 02/20/2013 - 14:48

In reply to जाउद्या हो... असते काही by नानबा

Permalink

मिस्टर फडणीस, त्या स्वतः किती वेळ स्वत:च्याच लायब्ररीची

पुस्तकं वाचणार? असा प्रश्न आहे
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on Wed, 02/20/2013 - 14:50

Permalink

मग ती पुस्तकं एखाद्या

मग ती पुस्तकं एखाद्या सार्वजनिक वाचनालयात देऊन त्यांचं सदस्यत्व घ्यायचं.... आणि नवनवीन वाचत रहायचं... इच्छा तेथे मार्ग... :)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 02/20/2013 - 15:01

In reply to मग ती पुस्तकं एखाद्या by नानबा

Permalink

दोन वेगवेगळ्या इच्छा आणि वेगवेगळे मार्ग आहेत

एकतर सार्वजनिक वाचनालयाला यांची पुस्तकं हवी असली पाहिजेत आणि दोन, तिथे लेखिकेला हवी असलेली पुस्तक उपलब्ध असायला पाहिजेत. बरं एवढं करून सुद्धा मूळ प्रश्न कायमच : (लोकांचं) `वाचन कमी होत चालल आहे'.
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on Wed, 02/20/2013 - 15:05

In reply to दोन वेगवेगळ्या इच्छा आणि वेगवेगळे मार्ग आहेत by संजय क्षीरसागर

Permalink

हम्म्म्म... तेही खरंय म्हणा..

हम्म्म्म... तेही खरंय म्हणा.. बोंबलायला लोकं आजकाल त्या डबड्यात डोकं खूपसून बसायलेत रिकाम्या वेळात.. आणि बघतात काय, तर सिरियल्स म्हणे. काय पण...
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Wed, 02/20/2013 - 14:59

Permalink

एक काम करा.....

वाचनालयात लॅपटॉप किंवा कॉप्युटर वर मिसळपाव उघडुन ठेवा...ईथेहि बरच वाचनीय असतं! लोक्स ऑनलाईन वाचाला तरि नाहि म्हणणार नाहि. @ संजयः :))
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 02/20/2013 - 15:04

In reply to एक काम करा..... by दिपक.कुवेत

Permalink

म्हंजे वाचनालयाची वाट लागलीच म्हणून समजा!

लोक वाचनालयातून इथे लॉग इन व्हायला लागतील... यांची पुस्तकं पुन्हा पडून ती पडून.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Wed, 02/20/2013 - 23:29

In reply to म्हंजे वाचनालयाची वाट लागलीच म्हणून समजा! by संजय क्षीरसागर

Permalink

मग ही पुस्तके मिपावर प्रकाशित केली तर ?

वर्गणी घेउन ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 02/20/2013 - 16:17

Permalink

हल्ली इंटरनेट जास्त वापरणारे

हल्ली इंटरनेट जास्त वापरणारे जास्त चिडचीड करतात म्हणे, म्हणुन म्हणतो वाचाल तर वाचाळ
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 02/20/2013 - 16:20

Permalink

वाचन कमी होत चाललं असेल

वाचन कमी होत चाललं असेल-नसेलही पण तुमची टीचभर धाग्यांची फ्रीक्वेन्सी काही कमी व्हायला तयार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 02/20/2013 - 16:39

In reply to वाचन कमी होत चाललं असेल by बॅटमॅन

Permalink

हम्म्म

आपल्या प्रतिसादात भावी संपादक दिसले. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 02/20/2013 - 16:40

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

शैली आपल्याकडूनच उचललीये

शैली आपल्याकडूनच उचललीये बादवे =))
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 02/20/2013 - 16:43

In reply to शैली आपल्याकडूनच उचललीये by बॅटमॅन

Permalink

अच्छा ! असे आहे होय. मग..

माफी मागता मागता, वाक्यात बदल केल्या गेल्या आहे. :- आपल्या प्रतिसादात भावी 'मिपाद्वेष्टे' दिसले.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 02/20/2013 - 16:49

In reply to अच्छा ! असे आहे होय. मग.. by परिकथेतील राजकुमार

Permalink

अंमळ हळवा होऊन, ड्वॉळे

अंमळ हळवा होऊन, ड्वॉळे पाणावल्या गेले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 02/21/2013 - 08:08

In reply to अच्छा ! असे आहे होय. मग.. by परिकथेतील राजकुमार

Permalink

आँ!!

आपल्या प्रतिसादात भावी 'मिपाद्वेष्टे' दिसले.
पराशेठ, पण आपल्य प्रतिसादात आम्हाला चार काड्या दिसताहेत ब्वॉ!! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 02/20/2013 - 16:43

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

हा हा हा.. त्रागाकुमाराने

हा हा हा.. त्रागाकुमाराने आपल्या त्रागा नं ३.१ साठी इथे लक्ष द्यावे ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 02/20/2013 - 23:49

In reply to हा हा हा.. त्रागाकुमाराने by ऋषिकेश

Permalink

त्रागाकुमाराच्या

त्रागाकुमाराच्या त्राग्यांपुढे फिक्का पडेल असा नीतातैंचा त्रागा आहे. एव्हढी चांगली लायब्ररी त्यांनी सुरु केलीय आणि लोक ईतके करंटे की म्हणे पुस्तके वाचायला वेळ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 02/20/2013 - 16:34

Permalink

बदलत्या काळानुसार, रुचीनुसार

बदलत्या काळानुसार, रुचीनुसार बदलणारी पुस्तके लिहिली का जात नाहीत? असा प्रश्न पडायला हवा. बाकी, हीच वेळ नसणारी माण्सं राशीभविष्य, गर्भसंस्कार, यशस्वी होण्याचे क्षक्षक्ष उपाय वगैरे पुस्तके मात्र हमखास वाचताना दिसतात नै?
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Wed, 02/20/2013 - 23:53

In reply to बदलत्या काळानुसार, रुचीनुसार by ऋषिकेश

Permalink

लोकांचं वाचन वाढावं यासाठी

लोकांचं वाचन वाढावं यासाठी आता आपल्यालाच लिखाण केलं पाहीजे.... असं कुणाकुणाला वाटतं त्यांनी हात वर करावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 02/20/2013 - 16:59

Permalink

वाचणे म्हणजे काही ग्रेट आहे की काय?

नाही वाचले तर काय झाले? सगळ्यांनी सगळे केलेच पाहिजे का? अभ्यासाची पुस्तके तर सगळेच वाचतात. काहिंना तेव्हडेच पुरेसे वाटत असेल तर तुमची काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 02/20/2013 - 17:08

In reply to वाचणे म्हणजे काही ग्रेट आहे की काय? by प्रसाद१९७१

Permalink

हो हो !

काही लोकं तर फक्त 'मचाक' वाचतात आणि संतुष्ट होतात असे निरिक्षण आहे. हो का नाही रे स्पावड्या ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 02/20/2013 - 17:21

Permalink

हो सर , आम्ही तुमचे फ्यान हौत

=)) =)) =)) हो सर , आम्ही तुमचे फ्यान हौत
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 02/20/2013 - 18:38

Permalink

वाचन कमीबिमी काहीही होत नाही

वाचन कमीबिमी काहीही होत नाही आहे. उलटपक्षी त्यात वाढच होत आहे. १. मराठी पुस्तकांच्या विक्रीत गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. नवनवीन प्रकाशक येताहेत. जुने प्रकाशक वाचकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना काढत आहेत (५० रुपयांत कुठलेही पुस्तक, किलोच्या भावाने पुस्तके वगैरे) २. आंतरजालावर मराठी साहित्याची भरभराट होते आहे. मिपा (आणि इतर प्रतिस्पर्धी मंचां) वर उत्तमोत्तम साहित्याची लयलूट सतत चालू असते. त्यामुळे आंतरजाल हे साहित्याच्या वाढीला मारक नसून पूरक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ३. टीव्हीचं (आणि इतर माध्यमांचं) ही तसंच. नुकतेच आलेले "शाळा", "निशाणी डावा अंगठा", "पांगिरा" हे चित्रपट साहित्यकृतींवर आधारित होते. मालिकांच्या बाबतीत "गंगाधर टिपरे" आणि "साळसूद" या आठवतात. तुमच्या सोसायटीच्या वाचनालयाबाबत खालील मुद्दे तपासून पहा: - पुस्तकांचा संग्रह किती मोठा आहे? - त्यातली "हमखास उठावाची" पुस्तकं किती (उदा. सुहास शिरवळकर, वपु), अभिजात पुस्तकं किती (उदा. खांडेकर), वगैरे. ही यादी अजूनही पुढे वाढवता येईल. - कार्यपध्दतीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे का? (उदा. लोकांना वाचनालयात आणण्याऐवजी घरपोच पुस्तकं देणे) मी स्वतः वाचनालयाचा सभासद होताना (किमान) या बाबींचा विचार केला असता. अजून एकः वाचनालय सुरू करताना "मार्केट सर्व्हे" नीट केला आहे ना?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 02/20/2013 - 19:04

In reply to वाचन कमीबिमी काहीही होत नाही by आदूबाळ

Permalink

भरभराट ?

आंतरजालावर मराठी साहित्याची भरभराट होते आहे. मिपा (आणि इतर प्रतिस्पर्धी मंचां) वर उत्तमोत्तम साहित्याची लयलूट सतत चालू असते
"माझं वाचन कमी आहे (ते दिसतंच) पण मी जे काही लिहिन ते तुम्ही मात्र वाचा(आणि फक्त छान छान म्हणा)" असे म्हणायची फॅशन पण जोरात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 02/20/2013 - 19:16

In reply to भरभराट ? by अभ्या..

Permalink

असू द्या ना. लोक लिहितात तरी

असू द्या ना. लोक लिहितात तरी - हे महत्त्वाचं. जर ३० लेख पालथे घालून १ वाचनीय असा मिळाला तरी २९ लेख वाचण्याचे श्रम कामी आले, असं मला वाटतं. आणि शेवटी कंट्रोल+डब्ल्यूची कळ वाचकाच्या हातात असतेच!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 02/20/2013 - 19:27

In reply to असू द्या ना. लोक लिहितात तरी by आदूबाळ

Permalink

नेते

सगळेच नेते झाल्यावर जय हो कुणी म्हनायचं आदूबाळ? लेखक व्हा की पण वाचक हवेत ही इथे समस्या आहे. स्वयंघोषीत लेखक फक्त ऑटोग्राफ वाटण्याच्या तयारीत कायम. "अभ्यासोनी प्रकटावे" कुठेय?
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 02/20/2013 - 22:48

Permalink

आजकाल लोकांना पोरं कमी असतात

आजकाल लोकांना पोरं कमी असतात म्हणून कमी होत आहे हो लोकांच.... असं म्हणायच का?
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Wed, 02/20/2013 - 23:43

Permalink

हल्ली मराठी लेखक इंग्रजीमध्ये

हल्ली मराठी लेखक इंग्रजीमध्ये बेस्टसेलर म्हणून मिरवत आहेत. किती दिवस ते दहा कॉपी फ्री च्या बोलीवर पुस्तक छापायला द्यायचं मराठी लेखकांनी तरी ?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 02/21/2013 - 00:06

Permalink

वाचनालय बंद करून

प्रताधिकार कायद्याचा अभ्यास करा..
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on गुरुवार, 02/21/2013 - 00:21

Permalink

असं वाटत नाही

पुस्तके वाचणे कमी होत चाललंय असं अजिबात वाटत नाही पण पुस्तके त्यांच्या पारंपारिक म्हणजेच कागदी स्वरूपात वाचली जाणे कमी होत चाललंय असे मात्र वाटते. हा बदलही प्रचंड स्वरूपात होत आहे असे नाही.पण आंतरजाल हे एक अपार ज्ञानभांडार बनून आपल्यासाठी हवे ते ज्ञान मिळवणे अत्यंत सुकर झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 02/21/2013 - 08:16

In reply to असं वाटत नाही by हारुन शेख

Permalink

+१

हेच म्हणतो!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com