सामंतानु,
अगदी आजोळात फिरवून आणल्यात!! आमच्या लहानपनच्या आजोळात घालवलेल्या सुट्टीची आठवण आयली.
माझा आजोळ शिरोड्याचा! तेंव्हा तुमचा ह्यां सगळां वर्णन अगदी तो परिसर डोळ्यापुढे उभो करून गेलां!
काळोख संपून सुर्योदय होण्यापुर्वी आमची वाट तेरेखोलच्या घाटीची चढण चालू होण्यापर्यंत मजल गाठायची. तेरेखोलच्या घाटीची महती अशी की गोवामुक्ती संग्रामाच्या वेळी ह्याच घाटीतून गोव्याच्या पणजी गावात स्वातंत्र्य सैनीकांच्या एका तुकडीने मजल मारली होती.ही घाटी तिनएक मैलाची असावी.
माझ्या मावसआजोबाबरोबर (आजीचो भाव!) ही घाटी अनेकदा पार केलंसंय! तो त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या तुकडीत होतो. तेच्याकडून त्यांनी तेरेखोलचो किल्लो कसो पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतलो, आणि मग गावाक समजूच्यासाठी ढोल कसे वाजवले याची कथा अनेकवेळा ऐकलसंय! कथेचा शेवटचा वाक्य, "रे मेल्यांनो! आम्ही कधी घाटावर गेलेलो नाय! आमच्यासाठी हीच पावनखिंड!" डोळ्यातली आंसवां टिपून तो सांगी....
सकाळी दहाच्या सुमारास पेज आणि फणसाची भाजी,आणि त्याबरोबर मधूनच खोबऱ्याची कातळी.फणसाची भाजी ही अर्ध्या पिकलेल्या आणि अर्ध्या कच्या फळाची करायची असते.नाहीतर त्याच्या पुर्वी केल्यास अगदी कोवळ्या फणसाची भाजी करतात.त्याला फणसाच्या कुवऱ्याची भाजी म्हणतात.ती पण चवदार लागते.
फणसाची भाजी,खोबऱ्याची कातळी,आणि पेज हे कॉंबीनेशन अप्रतीम लागतं.नाहीतर दुसरं म्हणजे पेज आणि वालीची भाजी.ह्याच्यात पण खाताना मजा येते.
क्या बात है!! वालीच्या भाज्येचो जवाब नाय! तशी दादर मार्केटांत पण वालीचे पेंडे मिळतत, पण गावाकड्च्या वालीची चव नाय...
काजूच्या झुडपातून रंगीबेरंगी बोंडू काढून खाणं आणि काजूची बिया जमवून मग कधीतरी आगीच्या धगीत भाजून आतला काजू काढून खाण्याच्या प्रयत्नात बोटं काळी करून घेणं असे कार्यक्रम असायचे.
ऊन चढल्यावर जास्त बोंडु खाल्ल्यावर डोक्या मिरमिरणां आणि काजू बी फोडून काढतांना हाताक चीक लागून फोड येणां याची पण एक वेगळीच मजा होती...
आणि जगमां? ती विसरल्यात काय? उर्वरित महाराष्ट्राक जगमां ह्या फळ माहित नसतलां....
(इतरेजनांसाठी माहिती): जगम ह्या करवंदासारख्याच पण लाल फळ असतां. तां जर तसाच खाल्ला तर आंबट-तुरट लागता. पण तेका हाताच्या दोन तळव्यात धरून गोल्-गोल फिरवून मऊ करून घेवंचा मग नंतर खाल्ल्यावर अतिशय मधुर लागतां...
शिरोड्या गावाची महती अशी की प्रसिद्ध लेखक आणि ज्ञानपीठ अवॉर्डचे मानकरी वि.स.खांडेकर यांचं हे जन्मस्थळ.
सामंतानु, खांडेकर शिरोड्याच्या शाळेत अनेक वर्षां शिक्षक होते. आमचो मामा नेहमी माझ्याकडे फुशारक्या मारी, "रे मेल्या मुंबयकरां, तू माकां मराठी शिकवू नको, मी वि. स. खांडेकरांचो विद्यार्थी आंसय!!" माका वाटतां पण खांडेकरांचो जन्म अन्यत्र आसां, चूभूद्याघ्या...
तो पर्यंत मामा मासळी बाजारातून आमच्यासाठी सुरमई,सरंगा आणि कर्ली घेऊन यायचा. मामी थोडे मासे दूपारच्या जेवणासाठी आणि थोडे रात्रीच्या जेवणासाठी ठेवायची.
आणि खापी....
आणि बांगडे...
आणि तारल्या....
आणि पेडवे (हळदीच्या पानातलां सुक्यां करूक)....
हा हन्त हन्त नलिनिं गज उज्जहारः!:(
आसो! आमकां आमच्या आजोळाची सफर करून आणल्याबद्दल धन्यवाद!!
आपलो,
पिवळो डांबिस
डांबीसजी,
"जुस्त" हो मालवणी शब्द "उज्जू" वापरल्यात.त्या एका शब्दान मालवणीवर(कोकणीवर) असलेलां तुमचां प्रभुत्व माका थईंच कळला.
तुमच्या मावसआजोबाची थरारक गजाल ऐकून तेंचो आदर वाटलो.
"पण तेका हाताच्या दोन तळव्यात धरून गोल्-गोल फिरवून मऊ करून घेवंचा मग नंतर खाल्ल्यावर अतिशय मधुर लागतां..."
जगमाक मी विसरूक नाय.पण वरचां जां तुम्ही लिहिल्यात तां वाचून माझी आठवण जागी केल्यात.
पेड्व्यांचा तिखला तिरफळा घालून खाल्लेलो माझो जीव, पेडवे,खापी,सुंगटा,बुरयाटे,तारल्यो,ह्या माशांचो गातनी मी कसो विसरान.?
तुमच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
वा..वा... अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दांत मांडलेले वर्णन. कोणालाही हेवा वाटावे असे आजोळ आणि निसर्ग. भाग्यवान आहात. मी अजून गोवा पाहिलेले नाही. पण लवकरच तो योग आणावा लागणार.
कथे सोबत माडांचे, पोफळीचे, मासळी बाजाराचे २-३ फोटो टाकले असतेत तर, कथा नववधू सारखी नटली असती. असो.
तेरेखोल खाडीचा हा धावत्या गाडीतून काढलेला.
नीट आला नाही. पण गाडीच्या प्रवासाची दहा-एक मिनिटे मध्ये नदी आणि दोन्ही बाजूला माडाची आणि इतर झाडे, असा सुरेख प्रवास होता.
वेंगुर्ल्याजवळच्या एका खेड्याजवळचं चलच्चित्र येथे
नंदनजी,
साडे दहा हजार मैलावरून हा फोटो पाहून मला सुचलं,
"माझिया आजोळी जा ! जा रे ! नंदना
माझिया आजोळी जा!
देतो तुझ्या सोबतीला
मिसळपावातला माझा लेख
वाट दाखवायाला तुला
माझं त्यातलं वर्णन"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
जुस्त (हुबेहूब!), अगदी जुस्त!!
डांबीसजी, "
पिडांकाका
आभार
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वावा....
मजा आली
फोटोज
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
माझिया आजोळी जा !