✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही जुन्या लेखनांचे धागे

प
प्रसाद गोडबोले यांनी
Wed, 02/06/2013 - 16:13  ·  लेख
लेख
नमस्कार मी मिपावर नवीनच आहे . इथे काही सुंदर (/ "प्रसिध्द") जुन्या लेखांच्या कवितांच्या इतर लेखनाच्या लिन्क्स देणार का ? माझ्या बरोबर इतर नवीन सभासदांना फार मदत होईल . (तसेच जुन्या सभासदांना जुन्या लेखनाचा पुनःप्रत्यय घेता येइल ) प्रतिसादा मधे लेखनाचे नाव , थोडक्यात वर्णन , आणि लिन्क असे अपेक्षित आहे . (अवांतर : १) चांगले लेखन शोधण्याचा स्वतः प्रतत्न केला पण साहित्य ४२४ पाने , चर्चा १८६ पाने , काव्य २४६ पाने , पाककृती ७४ पाने ... इतकं सगं लेखन सर्फ करणे जरा अवघड आहे ... त्यापेक्षा जाणकार रसिक वाचकांचे आवडते लेखन आधी वाचावे असा विचार आला म्हणुन हा धागा ! २) हा धागा काथ्याकुट मधे टाकणयाचे एकमेव कारण म्हणजे काथ्याकुट हा मिपावरील सचिन तेन्डुलकर आहे असे आमचे गेल्या काही दिवसात ठाम मत झाले आहे . अति-अवांतर : ३) संविधानात "असे धागे काढु नयेत " अशी तरतुद न सापडल्या मुळे धागा काढण्याचे धाडस करीत आहे ...राग नसावा :) ) --- आपली कृपाभिलाषि राष्ट्रकाकु गिरीजा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55615 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

उपयोगी धागा.

मनीषा
Fri, 02/08/2013 - 16:57 नवीन
उपयोगी धागा. वाचनखूण साठवते आहे.
  • Log in or register to post comments

+१..

चिगो
Fri, 02/08/2013 - 19:14 नवीन
+१..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

रवींद्र रुपन

शुचि
Sat, 02/09/2013 - 03:30 नवीन
http://www.misalpav.com/user/21434/authored "आज फिर जीनेकी तमन्न है" या गाण्याचे रसग्रहण वाचून तर पार वेडावून गेले होते.
  • Log in or register to post comments

ओ काकू किती जणांनी तुमच्या

शुचि
Tue, 02/12/2013 - 01:34 नवीन
ओ काकू किती जणांनी तुमच्या विनंतीवरून, प्रयत्नपूर्वक खोदकाम करुन जुने जुने धागे दिले. जरा त्या धाग्यांबद्दल फीडबॅक द्या की. की तुम्ही वाचलेच नाहीत ते?
  • Log in or register to post comments

त्यांनी फक्त स्वतची ओळख करुन

श्री गावसेना प्रमुख
Tue, 02/12/2013 - 09:19 नवीन
त्यांनी फक्त स्वतची ओळख करुन देण्यासाठी एव्हढा आटापीटा केलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

आटापिटा

प्रसाद गोडबोले
Tue, 02/12/2013 - 13:07 नवीन
गावसेना प्रमुख , प्रत्येक काथ्याकुट वर वाद / राडा केलाच पाहिजे असा काही नियम आहे का ? स्वतःची ओळख काय करुन देणार मी ? इथे भले भले लिहिणारे आहेत ...त्यांच्या पुढे मी फारच लहान आहे . ( संकलक म्हणुन ओळख होणार असेल तर मला हरकत नाही त्याची ) आता तुम्हाला कळत असेल तर हे पहा Appreciation and critisism are works of second rate mind - G.H. Hardy .( अ म्यॅथेम्यॅटीशियन्स अपोलोजी ) सो मी सध्या फक्त वाचत आहे ...जिथे अ‍ॅप्रिसियेशनची उर्मी टाळता येत नाही तिथे प्रतिसाद देत आहे . आता ह्याही उपर , तुम्हाला हा धागा टोचत असेल तर मी संध्याकाळी बॅकअप घेवुन धागा डीलीट करेन . ओके ? आपली स्पष्टवक्ती गिरीजा तांबे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

जाऊं द्या हो

संजय क्षीरसागर
Tue, 02/12/2013 - 13:19 नवीन
काही लोक आधी कमेंट टाकतात आणि मग विचार करतात (किंवा तोही करतात का नाही काय माहिती)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खुपच विचारी आहात हो तुम्ही

श्री गावसेना प्रमुख
Tue, 02/12/2013 - 18:57 नवीन
खुपच विचारी आहात हो तुम्ही(आम्ही जे बोलतो ते समोर मागाहुन विचार नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ते जाउ द्या ह्या बद्दल तुमच

श्री गावसेना प्रमुख
Tue, 02/12/2013 - 19:04 नवीन
ते जाउ द्या ह्या बद्दल तुमच काय म्हणन आहे ते सांगा ,मनावर घेतल्याशिवाय तुम्हाला चैन नाही पडत वाटते. बिचारे खोदकाम करुन दमले,आणी तुम्हाला ह्याच काहीच नाही होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/12/2013 - 10:11 नवीन
शुचिमामीने सदर लेखीक काकू म्हणले आहे, म्हणजे सदर लेखीका ह्या वयाने देवा पेक्षा दोन दिवसांनी लहान असाव्यात. आता ह्या वयोमानाच विचार करता 'फिडबॅक'ला वेळ लागणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

सदर लेखीका ह्या वयाने देवा पेक्षा दोन दिवसांनी लहान असाव्यात. ..

संजय क्षीरसागर
Tue, 02/12/2013 - 10:44 नवीन
आता ह्या वयोमानाच विचार करता 'फिडबॅक'ला वेळ लागणारच
अवांतर : एनी वन इन्टरेस्टेड इन ब्लाइन्ड डेट ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हाहाहा ..... परा तुझे टोमणे

शुचि
Tue, 02/12/2013 - 18:33 नवीन
हाहाहा ..... परा तुझे टोमणे कळतात हो मला म्हातारीला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छे छे !

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/12/2013 - 19:29 नवीन
शुचिमामी तू अजून यंग अँड ब्युटीफुल आहेस हो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

..... थँक्स रे

शुचि
Tue, 02/12/2013 - 19:35 नवीन
:) ..... थँक्स रे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नक्कीच

प्रसाद गोडबोले
Tue, 02/12/2013 - 13:01 नवीन
धन्यवाद शुचि ! मी क्हरच सर्वांचीच आभारी आहे मदती बद्दल ! वाचत आहे हळु हळु रामदास ह्यांचे लेखन चाळत आहे सध्या .( श्रामों चा बंदा आणि खुर्दा : समर्थ हाही लेख वाचनात आला आहेच ) शिवाय http://www.misalpav.com/comment/457936 हे फारच भारी वाटले . मागे एकदा "निल्या म्हणे " एका विडंबन कवितेत(हे रोज कविता करणारे ) म्हणाला होता " मायबोली अन मिसळपावचे मैत्रीण होतय रे " पण इथे तर लोक लईच भारी सीरीयसली लेखन करीत आहेत असे दिसते वाचायला वेळ लागणारच . पुनश्च एकवार सर्वांचे आभार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

च्यायला !!

सुहास..
Tue, 02/12/2013 - 20:49 नवीन
सुबक च नाव नसल्याने महाप्रचंड त्रास झाल्याने हा प्रतिसाद लिहायला प्रेरित झालो आहे ....... सुबक चा " चवीने खाणार त्याला " ब्रिटिश ची " आत्महत्येवरील कविता " त्या ट्वाळ पर्‍याची " मनस्वी " मनोबा चा स्साला, आईने बनविलेल्या पाकृ वरचा लेख , धम्या ने लिहीलेला " बारमध्ये भेटलेला एक माणुस " दुष्मने-जान अदिती ने लिहीलेले " नाशिक-पुणे " प्रवास वर्णन . रंगाशेठ ला भेटलेली " नेक्स्ट डोअर गर्ल " नंद्याच्या तर... साल्याला ( धरून झोडला पाहिजे ) त्यो मदन्या नुसता फोटो काढत फिरतो आजकाल ! जागु ताईं ची आख्खी सिरीज ( काय मस्करी आहे का भाज्यांचे चाळीस प्रकार म्हणजे ) बिकांचा टिंब आणि मग नंतर स्साला रडवणार " भिकारी मातेच सत्य " केसूगुर्जींच चापट पारून ही न समजणारी चापट, क्रान्तीताई आणि मिक्का च्या गझल , ररां च आर्थिक-ए-सामाजिक-ए-भंडावुन सोडणार लिखाण ! गणपा आणि पेठकर काकांच्या पाकृ !! अरे , काय वाचलंस मिपा तु.... नसल वाचलसं तर ...एकदा श्रामोंच्या " अश्या तश्या नोंदी " वाच, आणि त्या नंतर पम्याची डायरी पण वाचायला घे.
  • Log in or register to post comments

हे आवर्जून लिहिल्याबद्दल

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/13/2013 - 09:36 नवीन
हे आवर्जून लिहिल्याबद्दल धन्यवाद रे... विशेषतः पम्याची डायरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

काही नवोदित आणि काही जुने

सुहास..
Wed, 02/13/2013 - 09:55 नवीन
:) काही नवोदित आणि काही जुने राहिलेच . फट्टु म्हणजेच धन्या ने गाण्यांची काढलेली ईभ्रत ( गान समीक्षण/ परीक्षण या माणसाने आंजावर आणला असे म्हणावे लागेल.) फारएन्ड या आयडी ने लिहीलेले चित्रपट परीक्षण ( हाफिसातून अजिबात याचे धागे ऊघडु नयेत हि विनम्र सुचना ) स्पावड्या हा धारपांची शैली उचलुन भयकथा लिहितो हे मान्य , पण त्याची फोटो, ३डी, अ‍ॅनिमेशन लिहिण्याची स्वता शैली ( आपल्याला आवडते ब्वा ) सोक्या ( सोत्रि) च्या चावडी वरच्या गप्पा आणि तांत्रिक विषय सोप्पे करून लिहीलेले सर्वकाही ईंडियाना वल्ली जोन्स ने लिहिलेल्या भटकंती तात्याने केलेली व्यक्तीचित्रे सगळेच सांगतील, पण हाच तात्या कधे मधे प्रतिसाद, कौल, चर्चा आणि चपलांमधुन ही छाप सोडुन जातो. ( मायकल जॅक्सन च्या धाग्याची लिंक डकवा रे कोणीतरी :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

"पम्याची डायरी?"

प्रमोद देर्देकर
Mon, 09/30/2013 - 15:27 नवीन
"पम्याची डायरी!" क्रुपया direct link द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ही एका वाटचालीची कथा http:/

विजुभाऊ
Fri, 09/26/2014 - 12:26 नवीन
ही एका वाटचालीची कथा http://misalpav.com/node/18704
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हे

श्रावण मोडक
Wed, 02/13/2013 - 11:06 नवीन
हे लिहिणाऱ्या सुहासचेही काही लेखन आवर्जून वाचावे असेच आहे. त्याने दोन भिन्न आयडीने लेखन केले आहे. कुणी तरी काढा रे तेही बाहेर... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

त्याची आठवण

पैसा
Wed, 02/13/2013 - 11:12 नवीन
अगदी सुरुवातीलाच मनोबाने केली आहे. एकाने लिहिलेले सहसा दुसर्‍या कोणी रिपीट केले नाही तर त्यात भर आणखी टाकली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+११

स्पा
Wed, 02/13/2013 - 11:20 नवीन
श्रा. मो वाशाचे काही विनोदी लेख वाचून मी हापिसात गडबडा लोळलेलो आहे =)) http://www.misalpav.com/node/19918 हा कहर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

प्रच्चंड सहमत! अतिशय

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/13/2013 - 11:34 नवीन
प्रच्चंड सहमत! अतिशय पोटेन्शियल असलेला माणूस आहे सुहास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वेगवेगळ्या लिंक दिलेल्या

बांवरे
Wed, 02/13/2013 - 06:36 नवीन
वेगवेगळ्या लिंक दिलेल्या सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments

रामदास काका , विसोबा खेचर

जेनी...
Wed, 02/13/2013 - 11:10 नवीन
रामदास काका , विसोबा खेचर काहिहि वाचा . पर्‍याचं अर्धवट लिखान वाचुन भरपूर शिव्या द्या :-/
  • Log in or register to post comments

आभार............

गौरव जमदाडे
Wed, 02/13/2013 - 11:12 नवीन
धन्यवाद गिरीजा ! सर्वांचे आभार ! मिपावर नवीन असाल्यामुळे ह्या धाग्याची फार मदत झाली. आणि लेखनाबरोबर त्यावरील प्रतिसादही वाचण्यासारखे आहेत.
  • Log in or register to post comments

प्रसिद्ध आणि आवडत्या

मृत्युन्जय
Wed, 02/13/2013 - 11:22 नवीन
प्रसिद्ध आणि आवडत्या लेखकांच्या यादीत माझा साधा नामोल्लेखसुद्धा करावासा तुम्हाला वाटला नाही ना? अरे हाच दिवस बघायचा होता तर आम्ही स्वातंत्र्य चळवळीत कशासाठी लढलो मग? तसा मी प्रसिद्धीसाठी कधीच हपापलेला नव्हतो. माझ्या 'विचारांचा उकीरडा' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार देण्याचे ठरले होते. मी विनयाने पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. आता वाटते, की ती चूकच झाली. असो, जेव्हा मला साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळेल तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल. पण नकोच. कुणाच्या नजरेत भरण्यासाठी पुरस्कार हवाच कशाला? आज लोक मला विसरलेत, पण एकेकाळी 'राया माझा धोतरातच' या नाटकाला लोकांनी केवढे डोक्यावर घेतले होते, याची तुम्हा मुलांना कल्पना नाही. काही कुचाळांनी 'शीर्षक अपुरे आहे. काही शब्द राहिलाय का?' असेही खवचटपणे विचारले, पण मी सांगितले, की 'जग जरी प्यांट वापरायला लागले असले तरी माझ्या रायाने अद्याप धोतर सोडलेले (वापरायचे) नाही. म्हणून नाटकाचे नाव 'राया माझा धोतरातच' असे आहे. शीर्षक तिथेच संपले आहे.' त्यानंतर या नाटकाने मागे वळून पाहिले नाही. 'वाचा आणि नाचा' (बालसाहित्य), 'एक तरी शिवी अनुभवावी' (गहन आध्यात्मिक साहित्य), 'भुंकले कोण..थुंकले कोण' (समीक्षा), 'रेझर इरेझर' (विज्ञानकथा), 'कारल्याच्या मांडवात' (काव्यसंग्रह), 'रस्त्यातले रहस्य' (रहस्यकथा), या माझ्या काही उल्लेखनीय साहित्यकृती. बाकी नावे यादीत बघून सांगेन. असो. देवा त्यांना माफ कर. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून हे लोक माझी सही घ्यायला येतील तेव्हा माझ्या मनात काही पूर्वग्रह राहू नको दे... ****************************************************************************** योगप्रभूंचा वरील प्रतिसाद अशक्य आहे. हा प्रतिसाद ज्या धाग्यावर आहे तो धागाच इथे महत्वाचा ठरावा: http://www.misalpav.com/node/19057
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
Wed, 02/13/2013 - 11:38 नवीन
योगप्रभू अशक्य माणूस आहे! त्याचेही लेखनच नव्हे तर प्रतिसाद लै भारी असतात. या धाग्यावर आणखी एक लिंक मिळाली. http://www.misalpav.com/node/14173
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हाहाहाहा

श्रावण मोडक
Wed, 02/13/2013 - 11:49 नवीन
हाहाहाहा... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ही ही ही ही ही. ह्या ह्या

रेवती
Mon, 03/04/2013 - 22:01 नवीन
ही ही ही ही ही. ह्या ह्या ह्या. हा धागा बघायचा रहिला म्हणून इतके दिवस तुमचा प्रतिसाद वाचनात आला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जुने ते सोने

कपिलमुनी
Wed, 09/10/2014 - 12:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments

नुकतेच

प्रसाद गोडबोले
Wed, 09/10/2014 - 12:55 नवीन
विनयक प्रभू http://www.misalpav.com/user/1235/authored हे लेखन वाचायला मिळाले .... कसले भन्नाट लिहितात हे ... तुफान !!
  • Log in or register to post comments

हा एक धागा मुद्दाम देतो आहे ,

सुहास..
Wed, 09/10/2014 - 19:45 नवीन
हा एक धागा मुद्दाम देतो आहे , चर्चा, त्याचा समारोप , हसु ही यायच आणि बर ही वाटायच .. http://misalpav.com/node/3201 खास नव मिपाकरांसाठी .. मुद्दा रेटेकर
  • Log in or register to post comments

ज्याक ड्यानियल्स्

स्वप्नज
Mon, 09/22/2014 - 17:52 नवीन
ज्याक ड्यानियल्स्(?) यांच्या सर्प लेखमालेचा दुवा आहे का कुणाकडे..??
  • Log in or register to post comments

हे घ्या

एस
Mon, 09/22/2014 - 17:57 नवीन
http://misalpav.com/node/26292 इथेही मिळतील http://misalpav.com/user/22352/authored
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज

धन्यवाद....

स्वप्नज
Mon, 09/22/2014 - 18:00 नवीन
धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हे बघा http://misalpav.com

विजुभाऊ
Fri, 09/26/2014 - 12:24 नवीन
हे बघा http://misalpav.com/node/25166 आणि हे http://misalpav.com/node/26437 तसेच हेही http://misalpav.com/node/26361 झालंच तर ही आख्खी सिरीज http://misalpav.com/node/6675 आनि जेनीबै बरोबर मिळून लिहीलेली http://misalpav.com/node/25357
  • Log in or register to post comments

वा

बाबा योगिराज
Wed, 09/30/2015 - 18:45 नवीन
हेच तर हव होत. लगेच वाखु सठवाली.
  • Log in or register to post comments

वा! खजिनाच सापडला!

दमामि
Wed, 09/30/2015 - 19:13 नवीन
वा! खजिनाच सापडला!
  • Log in or register to post comments

+१

द-बाहुबली
Wed, 09/30/2015 - 20:34 नवीन
वाखुसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

मस्तच

diggi12
गुरुवार, 06/16/2022 - 01:11 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा