जन्ता अनाडी और नेता खिलाडी!
नुकतेच भारतीय ऑलिंपिक संघटनेला जागतिक ऑलिंपिक संघटनेने निलंबित केले. कधी नव्हे ते सहा पदके मिळवणार्या भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकला कायमचे मुकावे लागणार की काय असे वाटू लागले आहे.
ह्याचे कारण साधे सोपे आहे की क्रीडा क्षेत्रात नको इतका राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार ह्यांचा बुजबुजाट झाला आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटनेने भारताचे नाक कापले आहे.
http://www.esakal.com/esakal/20121204/4945269043476996758.htm
पुण्याची शान समजले जाणारे भ्रष्टाचाराचे श्यान आकंठ खाणारे महान नेते सुरेश कलमाडी ह्यांच्या अथक परिश्रमांना शेवटी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचपावती मिळाली आहे असे समजायला हरकत नाही. तुरुं़गवास, थोबाड रंगवणे असे कार्यक्रम झाले आता आंतरराष्ट्रीय मानहानीची भर पडली म्हणायचे!
हाही लेख वाचनीय आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/very-good-snout-break-20842/
विविध पक्षांचे लोक ज्यात भाजपाही सामिल आहे, हे क्रीडाक्षेत्रातील मानाची स्थाने कशी उपभोगत आहेत ह्याचे सुरस वर्णन वाचायला मिळेल.
आपले जाणते राजेही ह्यात मागे नाहीत. माझे सासरे क्रिकेटपटू होते ह्या जोरावर ते क्रिकेटवर आपला हक्क सांगत आले आहेत असे ऐकिवात आहे. अर्थात हे राजेसाहेब चेंडूपेक्षा नोटांचे खेळ खेळण्यात माहिर आहेत हे सर्वज्ञात आहेच!
क्ष.
प्रतिक्रिया
लज्जास्पद वर्तन
पैश्याकडे पैसा
अरे परा, खेळाडूंच्या
भलतेच काय?