नेहमी काहीतरी कथा आणि गविछाप लेख लिहून मी कंटाळलो आहे. मलाही आता काथ्याकूट करायचा आहे. आणि खरंच जेन्युईन काथ्या मनात भरला आहे. शिवाय किमान वर्षभरात मी काथ्या कुटला नाही, तेव्हा खलबत्त्यावर गंज चढला आहे.
तर...
-अमुकअमुक न्यायालयाच्या खंडपीठाने अमुक निर्णय दिला.
-न्यायाधीश अमुकतमुक यांनी ***वर कडक ताशेरे ओढले.
-सुप्रीम कोर्टाने अमुक केसमधे दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार आता अमुक करता येईल.
-सध्याही एका आयटेम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्त्रीने एका राजकारण्यावर बर्याच कोटींचा "अब्रूनुकसानीचा दावा" लावला आहे..
असं बरंच काही वाचण्यात येतं माझ्या. आणि मग माझ्या मनात पूर्वीपासून साठलेले बरेच प्रश्न पुन्हा रिफ्रेश होतात.
१. न्यायाधीश ही व्यक्ती आपल्या सारासार विवेकबुद्धीने सर्व बाजू पाहून निर्णय देते असं माझं मत झालेलं आहे. पण त्यात त्याचा स्वतःचा काही विचार असतो की फक्त आणि फक्त कायद्याच्या पुस्तकातल्या चपखल बसणार्या कलमांचं अॅप्लिकेशन?.. म्हणजे त्याला स्वतःच्या विचारांनी / भावनांनी / मतांनी /सद्सद्विवेकबुद्धीने निवाडा करण्याचा हक्क नसतोच आणि फक्त घटनेत काय लिहीलंय ते पाहून त्याप्रमाणे आज्ञा द्यायची हे इतकंच त्याचं काम आहे? नेमकं काय करायचं असतं जज्ज या व्यक्तीने.
२. कोणत्याही खटल्यात "निर्णय देणं" हे जर न्यायाधीशाचं काम आहे, यामधे कोणावर "ताशेरे" मारणं बसतं का?
३. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांना पुढे अनेक खटल्यांत रेफर केलं जातं, याचा अर्थ सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायदा होतो का? कायदा तर लोकसभेत / राज्यसभेत बनतो ना?
४. सर्वच गुन्ह्यांना किमान आणि कमाल शिक्षा ही आधीच घटनेत ठरवून दिलेली असते का. कमाल आणि किमान शिक्षा ठरलेली असेल तर मग त्यातली नेमकी किती (वर्षे /दंड रक्कम) द्यायची हा निर्णय न्यायाधीशाच्या बुद्धीवर, व्यक्तिगत इच्छेवर सोडलेला असतो का?
५. कोणत्याही खटल्यात नुकसान (डॅमेज) कसं मोजून काढतात? फिर्यादीने जो आर्थिक आकडा नमूद केला असेल तितकं नुकसान बिनशर्त मान्य करणं शक्य नाही. मग पुराव्यांवरुन हे नुकसान शोधण्याचं काम जज्ज करतात का? यात कॉन्सिक्वेन्शियल डॅमेज धरलं जातं की कसं? कॉन्सिक्वेन्शियल डॅमेजची सीमारेषा कशी ठरवावी?
उदा. "धबॉक" कंपनीचा बूट खरेदी करुन मी शोरुमबाहेर पडताक्षणी त्याचा सोल फाटला आणि:
अ. त्यामुळे माझा तोल जाऊन माझ्या डोक्याला मार लागला, आयसीयूत दाखल केले, तीन लाख खर्च आला.
ब. या पडण्यामधे माझा ३० हजाराचा टॅबफोन उडून हरवला.
क. आणि माझ्या खिशात असलेलं महाराष्ट्र राज्य लॉटरीचं एक कोटी रुपयांचं पोटेन्शियल तिकीट गटारात वाहून गेलं. ते आता माझ्याकडे नसल्याने तेच विजेतं तिकीट आहे का हे सिद्ध करता येणार नाही, आणि अन्य कोणी बक्षिसावर दावा केला नाही तर मीच तो विजेता असण्याची शक्यता गृहीत धरावी
ड. पुढचे तीस दिवस मी हॉस्पिटलात असल्याने माझा तीस लाखांचा धंदा बुडाला.
ई. शिवाय माझा नवीन (ग्यारंटीवाला) दीड हजाराचा बूट फाटून नष्ट झाला हे नुकसान झालं.
यापैकी कोणत्या क्रमांकांचे दावे कायद्याने ग्राह्य आहेत? धबॉक कंपनी मला काय काय देऊ लागते.
हा प्रश्न अतिशयोक्त आहे, पण हे विचारण्याचं कारण असं की माझ्या अर्धज्ञानी वाचनात कायद्यामधे "मेकिंग गुड द लॉसेस" किंवा "नुकसानभरपाई करुन देताना जणू ती मूळ नुकसानकारक घटना घडलीच नसती तर फिर्यादीची आज जी स्थिती असती ती पैशाने रिस्टोअर करणे" असा अर्थ होतो.
६. साक्षीदार आणि पुरावे हे दोन्ही शब्द आपण सिनेमात आणि बातम्यांत ऐकतो. हे दोन्ही घटक एकसारखेच समजले जातात का? कोणताही एक भाग असला तरी बास होतं की साक्षीदार आणि पुरावे असे दोन्ही वेगवेगळे सादर करावेच लागतात? साक्षीदाराच्या म्हणण्याला वेटेज असतं की तो जे म्हणेल ते सत्य मानलं जातं? साक्षीदाराचं म्हणणंही पुन्हा पुराव्याने शाबीत करावं लागतं का? साक्षीदार नात्यातला असणं नसणं याने काही फरक पडतो का?
७. गीतेवर हात ठेवून शपथ घेणे यामागे केवळ एक परंपरा याखेरीज काही अर्थ आहे का? कायदा एरवी इतका काटेकोर आहे तर गीतेवर हात ठेवून शपथ या क्रियेला काय अर्थ राहतो?
..फार प्रश्न झाले. काही उलगडा होत नाहीये. गूगलबाबाला साकडे घालूनही बर्याच कल्पना क्लियर होत नाहीयेत.
कोणी यातली माहिती असलेले आहेत का?
ही फक्त एक उत्सुकता आहे. मी कोणत्याही खटल्यात पडलेलो नाही सुदैवाने..
डोके पिकवण्याबद्दल काही खटला दाखल करता येत असेल तर मिपाकर माझ्यावर करतील अशी भीती आहे.. मग तो गुन्हा दखलपात्र आहे का हे बघावं लागेल. त्यानंतर मी जामिनावर बाहेर येईन.
हो .. आणखी दोन विसरलेले प्रश्न आठवले.
८. दखलपात्र /अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय? अदखलपात्र गुन्हा म्हणजे तो करणार्याला पोलीस पकडतच नाहीत का? मग अशा गुन्हा-क्याटेगरीला अर्थ काय राहतो?
९. जामीन नेमका कोणाला मिळू शकतो आणि कोणाला नाही? सिनेमात पाहून आणि पेपरात वाचून तर जो कोणी अटकेस प्राप्त होतो तो पुन्हा जामिनावर बाहेर येतोच. हा काय प्रकार असतो? कोणीही यावे आणि पैसे भरुन सोडवावे इतकं सोपं आहे का?
अडाणीपणाबद्दल क्षमस्व. हे खरंच मला पडलेले प्रश्न आहेत.
वाचने
30637
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा !!
हटके का कु !
योग्य प्रश्नावलि....
तितकीच अडाणी उत्तरे
गीता
In reply to तितकीच अडाणी उत्तरे by सुनील
ताशेरे.
In reply to गीता by श्रावण मोडक
न्यायाधीश महाराज ताशेरे नाय
In reply to गीता by श्रावण मोडक
ताशेरे - बहुधा ताशेरे मारणे
In reply to तितकीच अडाणी उत्तरे by सुनील
१. निर्णय हा कायदा/घटनेनुसारच
हा हा...
त्यामुळे "ताशेरे ओढण्याचा"
In reply to हा हा... by दादा कोंडके
ताशेरे...
In reply to हा हा... by दादा कोंडके
अच्छा...
In reply to ताशेरे... by खेडूत
ताशेरे ओढण्याचा वेगळा अर्थ मी
In reply to अच्छा... by दादा कोंडके
शंकांमधे भर
तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर...
In reply to शंकांमधे भर by तिमा
पुण्यात खंडपिठ तयार झाले कि
In reply to तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर... by अपूर्व कात्रे
पुण्यात खंडपिठ तयार झाले कि
In reply to तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर... by अपूर्व कात्रे
डोळे विस्फारून
कायदा व न्यायसन्स्थेबद्दचा
कोर्टाचा अपमान :)
In reply to कायदा व न्यायसन्स्थेबद्दचा by डॉ सुहास म्हात्रे
मग तसे तर असा पण प्रश्न पडू
In reply to कायदा व न्यायसन्स्थेबद्दचा by डॉ सुहास म्हात्रे
८. दखलपात्र / अदखलपात्र :
+१००. वरच्या सुनील यांच्या
In reply to ८. दखलपात्र / अदखलपात्र : by तिरकीट
दखलपात्र/ अदखलपात्र
दुरूस्त
In reply to दखलपात्र/ अदखलपात्र by आळश्यांचा राजा
आयला....
In reply to दखलपात्र/ अदखलपात्र by आळश्यांचा राजा
धन्यवाद राजासाहेब,
In reply to दखलपात्र/ अदखलपात्र by आळश्यांचा राजा
आरा आक्शी बरुबर..
गवि माझा मित्र न्यायाधिश आहे,
प्रश्नावली फारच छान आहे.
अभिमत न्यायालये
पु लं नी त्यांच्या एका
कोर्टाच्या कामकाजात अडथळे
In reply to पु लं नी त्यांच्या एका by विजुभाऊ
एक प्रयत्न
वा...
In reply to एक प्रयत्न by माम्लेदारचा पन्खा
कोर्टत याचिका दाखल करताना
In reply to वा... by गवि
वा.छान प्रस्ताव
उत्तरे वर आलेली आहेत
अजून एक राहिले:
जामिनाचे पैसे
अदखल पात्र गुन्हा
कोर्टात याचिका दाखल करताना
निकाल राखून ठेवणे
खालापुरचे कोर्ट
@गवि,धागा चांगला होता,आहे आणि
"मालकाला दुसऱ्यांच्या ताब्यात
In reply to @गवि,धागा चांगला होता,आहे आणि by कंजूस
आणखी प्रश्नः भाडेती घर सोडत नसेल तर ?
धागा वर आणत आहे
कोणत्या कारणास्तव भाड्याने
कृष्ण बिहारी नूर.....
तुम्ही कष्ट घेऊन कागदपत्रे
In reply to कृष्ण बिहारी नूर..... by कर्नलतपस्वी
पुस्तक