हिंदी मराठी प्रशासकीय नावे
मित्रांनो आपण बरेचदा शासकीय कार्यालयांवर इंग्रजी खेरीज हिंदी (केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्यास) व मराठी (राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्यास) नावे वाचतो पण बहुतांश वेळा त्यांच्या इंग्रजी नावांचा व्यवहारात उपयोग होतो. पण लक्ष देऊन वाचल्यास भारतीय भाषांतील नावे कधी फार मजेदार तर कधी फार कंटाळवाणी वाटतात.
उदा. पुण्यातील बायपास रस्त्याचे मराठी नाव - कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्ग (सलग १० वेळा म्हणायला गेल्यास कच्चा पापड पक्का पापड सोपे वाटेल).
पण जर आपण लक्ष देऊन ही नावे समजून घेतली अन त्यांचा वापर सुरू केला तर अनेक फायदे होतील, जसे
१) आपल्या भाषांमधले कमी वापरल्या शब्दांचे अर्थ अधिक चांगल्या प्रकारे कळू लागतील
२) यातील बहुतांश उच्चारायला जरा अवघड वाटतील पण त्यांचा वापर करून करून बऱ्याच उच्चारदोषांचे उच्चाटन करता येईल. व एखादी भाषा नव्याने शिकताना उच्चारक्षमतेत मिळवलेल्या लवचीकतेचा बराच उपयोग होईल. (याबाबत परदेशी भाषांत पारंगत असणाऱ्या मिपाकरांचे विचार ऐकण्यास उत्सुक).
३) ज्यांच्या कुटुंबात लहान मुले असतील तर अशी नावे उच्चारायचा सराव त्यांच्याकडून करून घेतल्यास त्यांची उच्चारक्षमता जोमाने विकसित होण्यास मदत होईल.
४) अनेक भाषातज्ज्ञांनी परदेशी संज्ञांना एतद्देशीय स्वरूप देण्याचे अवघड व बहुमोल कार्य केले आहे, त्यांच्या या कार्याचा आपापल्या परीने गौरव करता येईल.
चला तर मग या धाग्यावर या प्रकारच्या नावांची चर्चा व त्याविषयी अधिक माहितीचे आदानप्रदान करूया.
काही उदाहरणे:
अवांतर - महाराष्ट्रातील नगरपालिका व महानगरपालिकांमधील सदस्यांना पूर्वी नगरपिते असे संबोधले जायचे. त्याचा अर्थ जरी नगराचे पालक असा होत असला तरी तो नगराचे रक्त पिते (पिणारे) असा घेतला जायचा. मुंबईचे महापौर असताना मनोहर जोशींनी त्याऐवजी नगरसेवक हा शब्द सुचवला जो पुढे जाऊन इतका रूढ झालाय की नगरपिते हा शब्द कधी अस्तित्वात होता याची शंका यावी.
| इंग्रजी नाव | हिंदी / मराठी नाव |
| Agricultural Products Marketing Committee (APMC) | कृषी उत्पन्न बाजार समिती (कृ उ बा स) |
| Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ |
| Maharashtra State Electricity Board (MSEB) | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म रा वि म) |
| State Reserved Police Force (SRPF) | राज्य राखीव पोलिस दल |
| Central Reserved Police Force (CRPF) | केंद्रीय राखीव पोलिस दल |
| National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) | राष्ट्रीय कृषी और ग्रामीण विकास बँक |
| National Environmental Engineering Research Institute (NEERI) | राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान |
| Defense Research and Development Organization (DRDO) | रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन |
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शेवटचे दोन सोडले तर इतर
+१
एम एस इ बी
+१
आणखी काही उदाहरणे...
Small Industries Development
CIDCO बरोबर आहे...
रंगाकाका, तुमचं 'झालं' की
झालय असं समजा
कशाचं काय समजायचंय??? आटपू दे
हम्म्म
हम्म
+१
+१
-३ इतक्या अप्रतिम धाग्याला
काय दिवस उजाडलाय. नाना आणि
मी पा वर कोणी काय लिहायचा आणि
जौ द्या ओ... ! येक डाव माफी
समस्त मिपाकरहो आजपासून कुणी,
घ्या..
"वळूबीज गुणन प्रक्षेत्र"
बरोबर आहे.. गणितीय अथवा
वळूबीज "गुणू(ण)न" प्रक्षेत्र