हुर्रेssss..भारताला पहिलं सुवर्ण पदक!
आताच मटा मध्ये वाचले.
१० मिटर रायफल शुटिंग स्पर्धेत भारताच्या दिल्लीवासी अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताला मिळालेले हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
अभिनव बिंद्रा चे हार्दिक अभिनंदन. इतर खेळाडूंनीही भारताची शान अशीच वाढवो. भारताच्या सर्व खेळाडूंना आणि अभिनव बिंद्रा ला पुढील वाटचालीस शुभेच्छा .
वाचन
7686
प्रतिक्रिया
27