✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अंगणात बाप, दारात माय,

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sun, 05/13/2012 - 09:50
अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय हे मराठी शब्द माझेच आहेत. मूळ हिंदी शब्द कुणाचे आहेत, ते तुम्ही ओळखालच! वळीख वळीख चिल्बुली पुष्कर गोळे** **(आमच्या नावात जर कोणी श्लेश काढायचा प्रयत्न केला तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) आगामी भाषांतर :- सरकायल्यो खटीया जाडा लगे.

प्रतिक्रिया द्या
7805 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रयत्न आवडला पण

jaypal
Sun, 05/13/2012 - 11:32 नवीन
संस्कृतात असता तर आधिक भवला असता. ;-) Image removed.
  • Log in or register to post comments

संस्कृत....???

चैतन्य दीक्षित
Sun, 05/13/2012 - 14:56 नवीन
परवाही एका दुसर्‍या कुठल्यातरी कवितेवर 'संस्कृतानुवाद असता तर मजा आली असती' असा प्रतिसाद होता. ही काय चेष्टा आहे? यात नक्की काय विनोद आहे ते कळत नाही, पण संस्कृतभाषेची थट्टा करणे योग्य नाही इतकेच नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

ही संस्कृत भाषेची थट्टा

सूड
Sun, 05/13/2012 - 21:24 नवीन
ही संस्कृत भाषेची थट्टा नाही. त्यामुळे अभ्यास वाढवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

एखाद्या गोष्टीचा संस्कृत

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/13/2012 - 21:48 नवीन
एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा कशी होते ते कृपया समजावून सांगता काय ? त्यानंतर संस्कृतची थट्टा करणे योग्य का नाही यावर चर्चा करूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

संस्कृत

चैतन्य दीक्षित
Mon, 05/14/2012 - 11:22 नवीन
एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा होते असे मला म्हणायचे नाही. पण 'उचलली जीभ, लावली टाळ्याला' असं करत संस्कृत अनुवाद हवा होता असे प्रतिसाद दिसतात, वर डोळे मारणारी स्मायलीही असते, यातून मला तरी थट्टेचा सूर जाणवला. म्हणून हे योग्य नाही इतकेच नमूद केले. कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

खपल्या गेलो आहे. मस्तच जमले

प्रचेतस
Sun, 05/13/2012 - 11:35 नवीन
Image removed.Image removed.Image removed. खपल्या गेलो आहे. मस्तच जमले आहे.
  • Log in or register to post comments

(No subject)

JAGOMOHANPYARE
Sun, 05/13/2012 - 11:36 नवीन
:)
  • Log in or register to post comments

हा हा हा हा .... !!! =))

सुहास झेले
Sun, 05/13/2012 - 11:46 नवीन
हा हा हा हा .... !!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sun, 05/13/2012 - 11:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हा हा हा... असेच

स्मिता.
Sun, 05/13/2012 - 15:33 नवीन
वाचून अगदी अशीच स्थिती झाली =)) =)) संस्कृतात अनुवाद असता तर बहार आला असता! हल्ली पैसाताई बर्‍याचवेळा भटजीबुवांच्या 'रिझर्व्ड टेरेटरीमधे' अतिक्रमण करताना दिसतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

:: काय हुईल बाजारन जर आली

जोशी 'ले'
Sun, 05/13/2012 - 14:19 नवीन
:: काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) काय काय श्लेष दडलेत....:-)
  • Log in or register to post comments

वळीख वळीख !!!

यकु
Sun, 05/13/2012 - 14:28 नवीन

Image removed.
अगा माय माय माय
  • Log in or register to post comments

लैच भारी जमलं आहे. और भी आने

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/13/2012 - 16:10 नवीन
लैच भारी जमलं आहे. :) और भी आने दो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अगं बाबो..बाबो..बाबो.. पार

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/13/2012 - 16:26 नवीन
अगं बाबो..बाबो..बाबो.. पार बाजार उठवलाय... Image removed. @काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई,>>> Image removed.
  • Log in or register to post comments

=)) =))

शुचि
Sun, 05/13/2012 - 19:45 नवीन
एकेक नग आहेत मिपावर :) ...... काही प्रतिसादही उच्च कोटींचे आहेत.
  • Log in or register to post comments

उत्तम, अशा प्रकारे अनुवाद

५० फक्त
Mon, 05/14/2012 - 08:02 नवीन
उत्तम, अशा प्रकारे अनुवाद करण्यासाठी उत्तम गाणे आहे हे.
  • Log in or register to post comments

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

प्रीत-मोहर
Mon, 05/14/2012 - 10:43 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

खिक. अवांतर : 'माताय,तद

प्यारे१
Mon, 05/14/2012 - 11:09 नवीन
खिक. अवांतर : 'माताय,तद माताय' वर बंदी आणावी लागेल चैतन्य दिक्षितांच्या म्हणण्यानुसार! मग अश्व विराजीत करण्याचं तर लांबच ;)
  • Log in or register to post comments

=))

बिपिन कार्यकर्ते
Mon, 05/14/2012 - 12:59 नवीन
=))
  • Log in or register to post comments

अफलातून..!

उपटसुंभ
Wed, 06/20/2012 - 19:33 नवीन
काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय अफलातून..! :)
  • Log in or register to post comments

मस्त

होबासराव
Wed, 01/13/2016 - 14:02 नवीन
अंगना मे बाबा द्वारे पे मा =))
  • Log in or register to post comments

थर्ड अंपायरकडे रेफर करताना

आदूबाळ
Wed, 01/13/2016 - 15:45 नवीन
थर्ड अंपायरकडे रेफर करताना मैदानातला अंपायर जशी खूण करतो तशी खूण गोविंदा करतो. असं का असावं हे कोडं बरेच दिवस उलगडलं नव्हतं. मग लक्षात आलं की "द्वारे" हा संस्कृत शब्द लोकांना कळेल की नाही या भीतीने दरवाजाचा आकार हवेत काढून दाखवण्यात आला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

:))

पद्मावति
Wed, 01/13/2016 - 15:10 नवीन
:))
  • Log in or register to post comments

बाब्बो.....

बाबा योगिराज
गुरुवार, 01/14/2016 - 13:54 नवीन
बाब्बो.....
  • Log in or register to post comments

सुन्दर...

वपाडाव
गुरुवार, 01/14/2016 - 15:38 नवीन
सुन्दर... अशाच काही गाण्यान्चे भाषाण्तर केलेले आहे. सवडीने टाकीन.
  • Log in or register to post comments

भाषाण्तर केलेले आहे तर

होबासराव
गुरुवार, 01/14/2016 - 16:17 नवीन
भाषाण्तर केलेले आहे तर सवड कशाला =)) आण दो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा