✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

<उगा मारखा>

र — रमताराम, गुरुवार, 03/29/2012 - 12:55
प्रेरणा: मित्रवर्य अन्या दातार यांची हीनि कविता नि दुसरी अतृप्त आत्मा यांचेहे विडंबन आणि अर्थातच महिला मंडळाकडून मार खाण्याचे आमचे आजचे भविष्य. मंद बायका त्या कडाडती घरी पती गर्भगळित सदोदित । जसा वनवास करे हतोत्साही तसा सहवास जीवघेणा । दुर्लंघ्य सागर जैसे तुझे मन भलतेच पैलू दावितसे । तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट निघायची वेळ आता वेणीफणी? टीपः वास्तववादी कविता लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, जमली नसल्यास आधुनिकोत्तर आहे असे समजावे.

प्रतिक्रिया द्या
18194 वाचन

💬 प्रतिसाद (43)

आजोबा

पैसा
गुरुवार, 03/29/2012 - 13:02 नवीन
तुम्ही पण? आज नक्की मार खाणार तुम्ही!=)) =))
  • Log in or register to post comments

कुणाचा

श्रावण मोडक
गुरुवार, 03/29/2012 - 15:23 नवीन
तुम्ही पण? आज नक्की मार खाणार तुम्ही!=)) =))
कुणाचा? नाही, सहजच विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हम्म..

पैसा
गुरुवार, 03/29/2012 - 15:29 नवीन
दीपकने दिलेली सप्रेम भेट बघा ना! आणि प्रीतमोहर पण मोर्चा घेऊन निघालीच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

झक्कास एकदम.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/29/2012 - 13:04 नवीन
विडंबन आवडल्या गेले आहे. मात्र ह्या प्रकाराचा अनुभव नसल्याने फक्त प्रतिसाद पोच दिली आहे. (मंद बायका, पती गर्भगळीत ह्या सारख्या द्विरुक्त्या टाळल्या असत्या तर पद्य अधिक कसदार झाले असते असे वाटते.) जाणकारांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

मात्र ह्या प्रकाराचा अनुभव

राजेश घासकडवी
गुरुवार, 03/29/2012 - 19:19 नवीन
मात्र ह्या प्रकाराचा अनुभव नसल्याने फक्त प्रतिसाद पोच दिली आहे.
घ्या. आणि हे म्हणे बाया नाचवणारे. बाकी 'रमताराममामांना रमणींचा मार' यात केवढा अनुप्रास आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

च्यायला !

परिकथेतील राजकुमार
Fri, 03/30/2012 - 12:35 नवीन
घ्या. आणि हे म्हणे बाया नाचवणारे.
अहो गुर्जी, बाया नाचवणे आणि बाया नांदवणे ह्यात किती मोठा फरक आहे हे तुमच्या सारख्या बेरकी माणसाला माहिती नाही काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पर्‍या,

वपाडाव
Fri, 03/30/2012 - 12:53 नवीन
पर्‍या, जरा २ पुस्तकं विक अन आम्हालाही काम करु दे रे... आता काय बसल्या-बसल्या जीव द्यावा का माणसानं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सहमत

जेनी...
Fri, 03/30/2012 - 12:57 नवीन
सहमत :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सध्या फक्त येवढेच...

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/29/2012 - 13:06 नवीन
सध्या फक्त येवढेच... --^--^--^-- ;-)
  • Log in or register to post comments

विचक्षण

नंदन
गुरुवार, 03/29/2012 - 13:10 नवीन
तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट निघायची वेळ आता वेणीफणी?
अगागागा, पूर्ण वेणीसंहारच की! विडंबन झक्कास.
  • Log in or register to post comments

आयो...कविता आणि प्रतिसाद

बॅटमॅन
गुरुवार, 03/29/2012 - 13:13 नवीन
आयो...कविता आणि प्रतिसाद वाचून श्लेषमाँगर्सच्या मेळाव्यात आल्याचे सार्थक झाले :) सही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

__/\__

अन्या दातार
गुरुवार, 03/29/2012 - 13:12 नवीन
हे खरं विडंबन!
  • Log in or register to post comments

अगदी, याला तोड नाही.

सूड
गुरुवार, 03/29/2012 - 16:04 नवीन
अगदी, याला तोड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

अभिनंदन

सहज
गुरुवार, 03/29/2012 - 13:19 नवीन
लग्न ठरलं वाटतं!!! नाही वास्तववादी वगैरे म्हणताय म्हणून हो
  • Log in or register to post comments

खिक्...

श्रावण मोडक
गुरुवार, 03/29/2012 - 15:24 नवीन
म्हणूनच त्यांनी आधुनिकोत्तर असंही म्हणून ठेवलंय. आधुनिकोत्तरात लग्नाची गरज नसते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

:-)

सहज
गुरुवार, 03/29/2012 - 15:58 नवीन
ते पती वगैरे उल्लेख आला व आम्ही जरासे जुन्या वळणाचे म्हणून लग्न असे समाजमान्य शब्दप्रयोग केले. :-) बाकी आधुनिकोत्तरात बहुदा गरज कसलीच नसते, असलीच तर ती केवळ सोय! जाणकार लोक सोयीचा अर्थ सांगतीलच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हम्म

रमताराम
गुरुवार, 03/29/2012 - 16:38 नवीन
दोन परंपराद्वेष्ट्या ज्येष्ठांनी एका वृद्धाची चालवलेली नृशंस थट्टा पाहून 'उठा ले ना रे बाऽबाऽ' असे म्हणावेसे वाटले. तो आकाशातला बाप यांना सद्बुद्धी देवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

झकास.

प्रचेतस
गुरुवार, 03/29/2012 - 13:19 नवीन
झकास.
  • Log in or register to post comments

_/\_

मूकवाचक
गुरुवार, 03/29/2012 - 13:21 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

वाचून चर्चा विडंबन अन तारका

सस्नेह
गुरुवार, 03/29/2012 - 13:21 नवीन
वाचून चर्चा विडंबन अन तारका मंद चोरून उगा जीभ उचलून लाविली टाळ्याला ! पण जमले आहे विडंबन..!
  • Log in or register to post comments

पोरा टोरांनी रमतारामाला गुरू

गणपा
गुरुवार, 03/29/2012 - 13:22 नवीन
पोरा टोरांनी रमतारामाला गुरू मानुन धडे गिरवावे. ;)
  • Log in or register to post comments

अरे

रमताराम
गुरुवार, 03/29/2012 - 13:30 नवीन
इथे उलट आहे. विडंबन हा आमचा प्रांत नव्हे. आम्हीच पोराटोरांपैकी एकाचा गंडा बांधायचा विचार करतोय. पण पर्याय इतके आहेत की बहुधा अवधूतासारखे चोवीस गुरू करावे लागतील की काय. पर्‍या बहुधा सर्वात शेवटचा (पर्‍याचे नाव पोराटोरांमधे घेतलेले पाहून खुद्द पर्‍याचेच ड्वाले पानावतील हे ठौक आहे.) असेल. अवांतरः 'रमतारामाला गुरु...' हा शब्दप्रयोग वाचून उगाचच आपल्या खांद्यावर एक धनुष्य आहे नि उग्र चेहर्‍यावरच्या विशाल भालप्रदेशी लाल-केशरी टिळा आहे असा भास झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+ १

मेघवेडा
गुरुवार, 03/29/2012 - 13:34 नवीन
पोरा टोरांनी रमतारामाला गुरू मानुन धडे गिरवावे.
असेच म्हणतो. कधी येऊ दीक्षा घ्यायला गुर्जी? विडंबन फस्क्लास! या रमत्या रामानं पती-पत्नीबद्दलची वास्तववादी कविता लिहिलेली पाहून नि त्यात वनवास, दुर्लंघ्य सागर इ. उल्लेख पाहून त्या प्रभू श्रीरामाचीही या चक्रातून सुटका झाली नसावी की काय असं वाटलं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तर हो

रमताराम
Fri, 03/30/2012 - 12:34 नवीन
त्या बिचार्‍याला तर त्या कांचनमृगापाठी कुठे काट्याकुट्यात भटकावं लागलं. उगाच नाही त्याला पुरुषोत्तम म्हणत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

ओक्के

मी-सौरभ
गुरुवार, 03/29/2012 - 13:26 नवीन
गुरु श्री श्री रमताराम महाराज की जय!! गुरु श्री श्री रमताराम महाराज की जय!! गुरु श्री श्री रमताराम महाराज की जय!! गुरु श्री श्री रमताराम महाराज की जय!! गुरु श्री श्री रमताराम महाराज की जय!! (पोरा-टोरांमधे मोजला जाणारा)
  • Log in or register to post comments

(No subject)

सांजसंध्या
गुरुवार, 03/29/2012 - 13:30 नवीन
:D
  • Log in or register to post comments

रमताराम

प्रीत-मोहर
Fri, 03/30/2012 - 15:33 नवीन
आज्जोबांचा त्रिवार निषेध!!!! तुर्तास इतकेच पोच म्हणुन.. सविस्तर मोर्चा नंतर सवडीने घेउन येउ उगा मारद्या म्हणत (मिपा महिला आघाडी सदस्या) प्रीमो ही आमची फुलाची पाकळी <<उगा रडका>> मस्त बायका त्या नांदवती घरी तरी रडका तु सदोदित| तुझे सहकारी नित्य आनंदात जरी तू डोक्याने जरा उणा| अंगणीचे कूप जैसे तुझे मन तेच्-तेच पैलू दावितसे| किंवा अंगणीचा कूप जैसे तुझे मन पाडिन म्हणते नवे पैलू| तुझी माझी गाठ पडे कोण क्षणी मेंदु ही शिणला विचारात| - प्रीमो *विशेष आभारः ररा गुर्जी :)
  • Log in or register to post comments

शाबास गो!

पैसा
Fri, 03/30/2012 - 15:38 नवीन
पण आभार ररा ना कशाला! त्याना मार द्यायचाय ना? आणि एक सुधारणा अंगणीचा कूप जैसे तुझे मन मंडूक त्यातून फेका आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

काय हे

रमताराम
Fri, 03/30/2012 - 21:29 नवीन
शिकवणीकडे नीट लक्ष न दिल्याचा परिणाम पहा. तुझी सहचरी नित्य आनंदात जरी तू डोक्याने जरा उणा| सहकारी आनंदात असण्याचा नि पतीच्या डोक्याने उणा असल्याचा काय संबंध. डोक्याने उणा पती असूनही सहचरी आनंदी राहू शकते हे श्रेय सांगण्याजोगे. छ्या: हल्लीचे विद्यार्थी अजिबात वर्गात लक्ष देत नाहीत बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

डोक्याने उणा

पैसा
Fri, 03/30/2012 - 21:34 नवीन
असल्यामुळेच आनंदात असेल कदाचित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हे राम

रमताराम
Fri, 03/30/2012 - 21:47 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खिक्...

श्रावण मोडक
Fri, 03/30/2012 - 21:51 नवीन
खिक्... काय दिवस आलेत ररावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

:)

दिपक
गुरुवार, 03/29/2012 - 15:01 नवीन
तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट निघायची वेळ आता वेणीफणी?
हा हा हा ! सहीच. हे घ्या आता प्रोटेक्श्नसाठी ;) Image removed.
  • Log in or register to post comments

थ्यांक्यू हो

रमताराम
गुरुवार, 03/29/2012 - 16:35 नवीन
असे एकमेका साह्य करत राहिलो तर अशा वादळांना तोंड देऊनही हा भवसागर तरुन जाणे अवघड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

हा हा हा हा ... ररा एकदम

सुहास झेले
गुरुवार, 03/29/2012 - 17:30 नवीन
हा हा हा हा ... ररा एकदम जोरदार विडंबन :) :)
  • Log in or register to post comments

नवकाव्य चांगले आहे.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/29/2012 - 18:05 नवीन
नवकाव्य चांगले आहे.
  • Log in or register to post comments

जाम भारी रे, या आगीत होरपळत

५० फक्त
गुरुवार, 03/29/2012 - 18:17 नवीन
जाम भारी रे, या आगीत होरपळत असल्यानं प्रत्येक शब्दाची धग जाणवली, कटुता जीभेवर आली अन काटे टोचले, टोचायचे तिथं.
  • Log in or register to post comments

हाहाहा! लै भारी!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/29/2012 - 19:40 नवीन
हाहाहा! लै भारी!
  • Log in or register to post comments

अय्यो!

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/30/2012 - 05:44 नवीन
"पती गर्भगळित" यात फाऊल विनोद असला तरी मात्रा जमत नाहीयेत. "पती घाबरती" चालेल का? आणि शेवटचा चरणः
तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट निघायची वेळ आता वेणीफणी?
या ऐवजी तुझी-माझी गाठ डोक्यालाही शॉट वेणीफणी आता ऐनवेळी? चालेल का? मीटरात मावतंय म्हणून विचारलं. बाकी तुमचा घाऊक स्त्री-द्वेष चालू द्या. तुम्ही पाजलेल्या लिंबूपाण्याला जागून मी काही बोलत नाहीये.
  • Log in or register to post comments

तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट

जेनी...
Fri, 03/30/2012 - 07:59 नवीन
तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट निघायची वेळ आता वेणीफणी? मला तरी हेच परफेक्ट वाटतय गं आदिती :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

निन्ने येना कंडु..मोट्टो

धन्या
Fri, 03/30/2012 - 10:51 नवीन
निन्ने येना कंडु..मोट्टो मोट्टो शिरुने कंडु..वातिलोमाका निरे निरे वंडु ...निरुलोमा शिरुलोमा शिरुने कंडु...!!
हा कंडु कन्नडमधला का? तेलुगू आणि तमिळ वाटत नाही. ररा, खुप दिवसांनी "क्वालिटी" विडंबन वाचायला मिळालं. हल्लीची विडंबने वाचली की केसुगुर्जींची विडंबने आठवून उसासे निघतात. असो. (आता इथून पळावे नाहीतर लोक टल्ली होऊन एखादया अतृप्त आत्म्यासारखे मागे लागतील ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

नाही

रमताराम
Fri, 03/30/2012 - 12:31 नवीन
'मात्रा' स्त्रिलिंगी असल्याने घाऊक द्वेषाला स्मरून त्यांना फाट्यावर मारले आहे. (पळा आता नायतर इथेच 'रराचा खिमा' असा नवा पदार्थ मेन्यू कार्डावर दिसायला लागेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहीच!

निनाद
Fri, 03/30/2012 - 06:37 नवीन
आवडली. टीपही आवडली. जसा वनवास करे हतोत्साही तसा सहवास जीवघेणा । दुर्लंघ्य सागर जैसे तुझे मन भलतेच पैलू दावितसे । दोन्ही कडवी आशय घन आहेत...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा