Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चेतनकुलकर्णी_85 on Wed, 02/15/2012 - 22:29
मित्रानो, मी एका सरकारी संधोधन आणि विकास प्रबोधानीत काम करतो..माझ्या कामा निमित्त गेल्या आठवड्यात एका अमेरिकन स्थित बेंगलोर मधील "software" विकसित करणाऱ्या कंपनी बरोबर संबंध आला ...आम्हाला त्यांच्या कडून एक "software" घ्यायचे होते जे अभियांत्रिकी शी निगडीत होते.परंतु त्यांनी हजार सबबी सांगून (अमेरिकन कायद्याचा हवाला देत... व "end use certificate" वर सही करणे आवश्यक आहे जे अर्थातच शक्य नव्हते ...) आमची ऑफर नाकारली. ह्या घटने वरून असा प्रश्न पडतो कि आपण रोज वाचतो कि भारतीय "IT" कंपन्यांनी इतकी प्रगती केली वगैरे वगैरे.. पण ह्याच कंपन्या अभियांत्रिकी शी निगडीत "softwares" बनविण्यात अग्रेसर का नाहीत ?(उदाहरणार्थ "MATLAB",ANSYS,PSpice). कि या कंपन्या फक्त "support" देण्याचे काम करीत आहेत...मला माहित आहे कि बँकिंग क्ष्रेतात काही भारतीय कंपनी अग्रेसर आहेत मग अभियांत्रिकी क्ष्रेतातील "softwares" विकसित करणायत का नाहीत??? मिपा वर बरेच "IT" मधील बरीच तज्ञ व अनुभवी मंडळी आहेत असे माहित आहे म्हणून योग्य उत्तराच्या अपेक्षेत.... :) ह्या लेखाने मला IT and non IT हा वाद मला बिलकुल काढायचा नाहीये.... ;)
  • Log in or register to post comments
  • 44439 views

प्रतिक्रिया

Submitted by आनंदी गोपाळ on Wed, 02/15/2012 - 22:33

Permalink

झाड्+पॉपकॉर्न

इथे माझा नं. पहिला ;) सोळा दुणी आठ असे म्हणून पॉपकॉर्न खात बसलो आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चेतनकुलकर्णी_85 on Wed, 02/15/2012 - 22:38

Permalink

आयला ,,मंजे आता माझे काय

आयला ,,मंजे आता माझे काय चुकले बुवा...??? कि प्रश्न पण विचारायचे नाहीत प्रामाणिक पणाने??? :( कि मिपाची कोणती आचारसंहिता आहे जिचे मी उल्लंघन केले आहे राव?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Wed, 02/15/2012 - 22:45

In reply to आयला ,,मंजे आता माझे काय by चेतनकुलकर्णी_85

Permalink

नै भो.

तुंचं काहीच चुक्लं नै. धागा जोरदार आहे. दोन्ही बाजूंनी सैन्य चाल करून येणारे. मी आधीच विंगेतली सीट पकडून बस्लो आहे. इतकंच. ता.क. माझं फॉर्मल ट्रेनिंग आय्टी मधे नाही. पण मला या विषयाबद्दल फार प्रश्न आहेत. मी 'कॉम्प्युटर' नावाची वस्तू २८६ होती, तेव्हापासून वापरतो आहे. भारतीय १२वी पास 'कॉम्प्युटर तज्ञाने' 'वर्डस्टार' वापरून लिहिलेला 'प्रोग्राम' वाचून आवाक होण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे. प्रस्तुत लेखातील विचारांशी मी सहमत आहे असे इथे नोंदवून पुढील चर्चा वाचण्याच्या उत्सुकतेत पॉपकॉर्न खात बसलो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 02/15/2012 - 23:11

Permalink

कदाचित

मग अभियांत्रिकी क्ष्रेतातील "softwares" विकसित करणायत का नाहीत???
माझा पूर्वी autocad पुरताच संबंध आला होता. माझ्यामते अभियांत्रिकी सॉफ्टवेयर business software पेक्षा बनवणे अधिक क्लिष्ट असते. सध्याचे autocad बघितलेत ,आणि त्याच्याशी स्पर्धा करणारे सॉफ्टवेयर बनवायचे ठरवलेत तर कदाचित माझ्या अंदाजानुसार कमीत कमी ३०० माणसांना(programmers) ४/५ वर्षे लागतील. एवढी जोखीम घेवून सॉफ्ट्वेयर किती प्रमाणात खपेल,मार्जिन किती मिळेल हाही मुद्दा आहे. अभियांत्रिकीतील संकल्पना आणि graphics,programming वगैरे ज्ञान ह्या दोन्ही गोष्टीं अवगत असलेली माणसे भारतात कमी आहेत. हे ही एक कारण आहे. Geometric software वगैरे काही कंपन्या ह्यात काम करतात. अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर मध्ये business software पेक्षा (गुंतवणुकीच्या प्रमाणात)मार्जिन,गिर्‍हाईक कमी असते असा माझा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Wed, 02/15/2012 - 23:15

In reply to कदाचित by चिरोटा

Permalink

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद. याबद्दल आम्हालाही काही मूलभूत प्रश्न विचारायचे आहेत, पण ते नंतर.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतनकुलकर्णी_85 on Wed, 02/15/2012 - 23:22

Permalink

एवढी जोखीम घेवून सॉफ्ट्वेयर

एवढी जोखीम घेवून सॉफ्ट्वेयर किती प्रमाणात खपेल,मार्जिन किती मिळेल हाही मुद्दा आहे. हो..हि वर उल्लेख केलेली "softwares" वापरताना मनातून खरोखरच त्या लोकानन दाद द्यावी लागते...पण तरीही ह्या softwares च्या किमती अव्वाच्या सव्वा असतात त्यामुळे उपभोक्ते जरी कमी असले तरी आमदनी चांगली व्यायला काही हरकत नाही...शिवाय ह्या "softwares नुसते तयार करून उपयोग नाही त्याच्या प्रशिक्षणा साठी पण ह्या कंपनी मजबूत फी आकारतात .. :) ह्याचाच अर्थ असा आहे कि profit margin कमी असण्याचे काही एक कारण नाही..फक्त संबंधित कंपनी ला कुशल व तरबेज अभियान्तांची टीम तयार करावी लागेल व काही काल द्यावा लागेल...हे सहज शक्य आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 02/15/2012 - 23:39

In reply to एवढी जोखीम घेवून सॉफ्ट्वेयर by चेतनकुलकर्णी_85

Permalink

हम्म

आम्दनी चांगली असलीच पाहिजे.पण गुंतवणूकीच्या प्रमाणात मार्जिन किती हे ही महत्वाचे आहे.उ.दा. autocad चे मार्जिन अर्थातच बरेच असेल पण ही कंपनी १९८२ पासून त्यात आहे.असल्या सॉफ्टवेयरच्या किंमती अवाच्या सव्वा असतात हे मान्य आहे.३०० माणसांचा ४ वर्षाचा पगार आणि ईतर खर्च किती(कोटी) येईल? कंपनीत ज्यांनी गुंतवणू केली असेल ते (venture capitalists!) एवढा वेळ थांबतील?
  • Log in or register to post comments

Submitted by चेतनकुलकर्णी_85 on Wed, 02/15/2012 - 23:45

In reply to हम्म by चिरोटा

Permalink

प्रत्येक IT कंपनीत कायम

प्रत्येक IT कंपनीत कायम ठराविक माणसे बेंच वर असतात असे अनेक मित्रान कडून ऐकून आहे.. ३०० लोकांच्या आकडा ह्या बेंच वरील लोकां पेक्ष नक्कीच नगण्य असेल... जर प्रस्तापित कंपनी ला टक्कर देणे जर काह्रेच एवढे कठीण असेल तर एवढ्या शेकडो कंपन्या उदायासच आल्या नसत्या ....सर्वच क्ष्रेत्रात...
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on गुरुवार, 02/16/2012 - 00:10

In reply to प्रत्येक IT कंपनीत कायम by चेतनकुलकर्णी_85

Permalink

प्रत्येक

सॉफ्ट्वेयरमध्येही प्रत्येक क्षेत्र निराळे आहे. social networking/search engine साईट काढून करोडपती १/२ वर्षात होणे एकवेळ सोपे आहे पण अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर बनवून ते विकून करोडपती होईपर्यंत निवृत्तीची वेळ येईल.! माझ्याकडे आकडा नाही पण (भारतात वा एतरत्रही)अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर बनवणार्‍या कंपन्या business software बनवणार्‍या कंपन्यांच्या तुलनेत कमी असल्या पाहिजेत.कदाचित १:५० ? वर म्हंटले आहे तसे दोन्ही गोष्टींवर कमांड असणारे मनुष्यबळ आपल्याकडे कमी आहे. नुसते प्रोग्रॅमर्स संख्येने अधिक असून उपयोग नाही. business सॉफ्ट्वेयर बनवण्यासाठी (बर्‍याच वेळा) संगणक विज्ञान्,तर्क आणि संगणक प्रणाली पुरते. अभियांत्रिकी सॉफ्ट्वेयर बनवताना ह्यात अभियांत्रिकीच्या संकल्पनांची भर पडेल. उ.दा. differential equation सोडवणारे सॉफ्ट्वेयर बनवायचे तर आधी differential equation संगणक न वापरता कसे सोडवायचे ह्याची माहिती हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 02/16/2012 - 15:13

In reply to प्रत्येक by चिरोटा

Permalink

मस्त संवाद चिरोटा व चेतन...

मला चिरोटा यांच्या भाष्यात काही भर घालायची आहे... मुद्दे क्रमवार येणार नाहीत, कारण जसे आठवले तसे लिहित आहे... * सर्वप्रथम - कंप्युटर जिथे विकसित झाला अन गणिती अल्गोरिदम्स ज्या देशांनी लिहिले, (हे बर्‍यापैकी युरोपात झाले आहे). त्यांनी ही सॉफ्टवेअर तयार करण्याची शक्कल लढवली. कारण हाताने ड्रॉइंग्स काढुन त्यांचे आकलन करण्यात खुप वेळ जात असे. *मग द्विमितीय नंतर त्रिमितीय (2D-3D) सॉफ्टवेअर तयार केले. ह्या मंडळींनी अश्या प्रकारच्या कोडिंगची बेसिक प्रोसिजर तयार केली. ते त्यात प्रविण झाले. *भारतात हे सर्व कालांतराने आले. आपण ह्या काळात (वैज्ञानिक शोध आणि गणितीय सुत्रे जेव्हा ऑन हाय-एकोणिसावे शतक- होती) पारतंत्र्यात होतो. त्यामुळे आप्लयाकडे R&D थोडेसे उशिरा सुरु झाले. *जर ती मंडळी, आपल्या २०-२५ वर्षे आधी(१९७०-७५) कंप्युटिंगच्या मागे लागली तर निश्चितच ती ह्यात अग्रेसर असणार. म्हणजे आपण कोणती गोष्ट शुन्यापासुन पुर्णत्वाकडे नेण्याचा विचार करत असताना ती मंडळी त्याच गोष्टीत अजुन विविधता आणि 'ईज ऑफ युज' कशी आणता येइल हे बघत असणार. *अन साहजिकच आपण ज्या सेवा देणार त्यात आपण जास्त खर्च केला असल्या कारणाने त्यांचे बाजारी मुल्य जास्त असणार. पण या उलट ते सुधारलेली सेवा आपल्यापेक्षा कमी पैशात उपलब्ध करुन देउ शकत असल्याने बाजारात त्यांचे नाणे चलनी असणार. *सर्वात महत्वाचं म्हणजे, हे सॉफ्टवेअर बणवण्यासाठी त्यांच्याकडे डेडिकेटेड स्टाफ असणार. म्हणजेच मॅनपॉवर, जे की आपल्या देशात (अर्थात आयटीत) कमी आहे. * पण तरीही Ansys, Geometric, Siemens या कंपन्यामध्ये बर्‍याच प्रमाणावर भारतीय ह्या सॉ. डेव्हलपमेंटच्या कामात गुंग असलेले आढळुन येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on गुरुवार, 02/16/2012 - 17:16

In reply to मस्त संवाद चिरोटा व चेतन... by वपाडाव

Permalink

+१

जर ती मंडळी, आपल्या २०-२५ वर्षे आधी(१९७०-७५) कंप्युटिंगच्या मागे लागली तर निश्चितच ती ह्यात अग्रेसर असणार
हे एक महत्वाचे कारण आहे. हे सगळे करण्यासाठी जी ईको सिस्टिम लागते ते आपल्याकडे नाही. विद्यापीठे,संशोधन्,मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवू पाहणारे गुंतवणूकदार ही साखळी लागते. एका प्रतिसादात भारताकडे एकही जगभर मान्य असलेली operating system/language नाही असे लिहिले आहे. ईतिहास पाहिलात तर Berkley,MIT,Stanford,Waterloo वगैरे विद्यापीठांनी ५०/६०च्या दशकातच ह्यात काम करायला चालु केले होते.BSD(लिनक्स),Watcom compiler ही काही उदाहरणे आहेत. LISP भाषा जी AI मध्ये वापरली जाते ती १९५८ साली Stanford जॉन मॅकार्ती ह्यांनी बनवली होती. ही अशी पार्श्वभूमी असताना भारतिय आय टी कंपन्यांनी/लोकांनी काही तरी भव्य्-दिव्य करावे म्हणजे KFC/McDवाले पुरणपोळी,मसालेभात का बनवत नाहीत असे विचारण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 02/17/2012 - 11:57

In reply to +१ by चिरोटा

Permalink

ईतिहास पाहिलात तर

ईतिहास पाहिलात तर Berkley,MIT,Stanford,Waterloo वगैरे विद्यापीठांनी ५०/६०च्या दशकातच ह्यात काम करायला चालु केले होते हे अगदी योग्य बोललात. आपली विद्यापीठे आनि त्यातील विद्यार्थ्यांकडून जे संशोधन होते ते किती जणाना उपलब्ध होते हो? विद्यापीठात असलेले प्रबंध रद्दीच्या गठ्ठ्यात पडून असतात. त्यांचा उपयोगच कोणाला होत नाही. दुसरे म्हणजे बहुतेकदा संशोधन म्हणजे त्यात नवे काहीच नसते कोणी काय म्हंटले आहे त्यावर कोणाचे काय म्हणणे आहेह याचीच जास्त चर्चा असते. तुम्ही नवे काही मांडले तर त्याचा काहीच उहापोह करणे मान्यच नसते
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Fri, 02/17/2012 - 12:40

In reply to ईतिहास पाहिलात तर by विजुभाऊ

Permalink

पुन्हा

फ्रेम ऑफ रेफरन्सचा प्रश्न आला.
आपली विद्यापीठे आनि त्यातील विद्यार्थ्यांकडून जे संशोधन होते ते किती जणाना उपलब्ध होते हो?
यापेक्षा, इंडस्ट्रीतील किती लोक यातले कुठले संशोधन आपण आपल्या कामात वापरु शकू याचा विचार करतात? किती कंपन्या विद्यापीठांशी संपर्क साधून तेथील संशोधन कार्याचा वापर करतात?
दुसरे म्हणजे बहुतेकदा संशोधन म्हणजे त्यात नवे काहीच नसते कोणी काय म्हंटले आहे त्यावर कोणाचे काय म्हणणे आहेह याचीच जास्त चर्चा असते. तुम्ही नवे काही मांडले तर त्याचा काहीच उहापोह करणे मान्यच नसते
तुम्ही जर ठरावीकच भाग वाचला (लिटरेचर रिव्यु) तर हे दिसेल. संपूर्ण वाचल्यास नवे काय ते पुढे येईल. :) काही पेपर्स हे फक्त लिटरेचर रिव्यु असतात जे इतर संशोधकांसाठी उपयुक्त असतात. सगळेच रिसर्च पेपर्स असे नसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Wed, 02/15/2012 - 23:27

Permalink

सपोर्ट

सपोर्ट मध्येच इतका पैसा मिळत असताना उगाच जास्त त्रास का करुन घ्यावा डोक्याला ? --(प्रॉडक्शन सपोर्ट कम फंक्शनल कम टेक्निकल कंसल्टंट) कुंदन
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 02/16/2012 - 00:07

In reply to सपोर्ट by कुंदन

Permalink

अनिवाशी कुठले!

पैशाच्या मागे पळण्याची अनिवाशी आयटी-वृत्ती पाहून ड्वाळे पाणावले. देशप्रेम वगैरे काही आहे की नाही, आँ?
  • Log in or register to post comments

Submitted by चेतनकुलकर्णी_85 on गुरुवार, 02/16/2012 - 00:17

In reply to अनिवाशी कुठले! by Nile

Permalink

आता विषय काढला आहे म्हणून

आता विषय काढला आहे म्हणून सांगतो... देश प्रेम खूप दूरची गोष्ट झाली...अभियान्त्रीकेच्या तिसर्या वर्ष पासून ९५% मंडळी जेवा बाकीची पुस्तके बंद करून जेन्वा शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायची तेवा कीव यायची बघा...
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 02/16/2012 - 00:31

In reply to आता विषय काढला आहे म्हणून by चेतनकुलकर्णी_85

Permalink

कीव का म्हणे....

कीव का म्हणे यायची? जरा इस्कटुन सांगा की? वर्षाच्या ३६५ दिव्सांमध्ये मला वाट्ट ९० + ९० म्हण्जे एकुण १८० दिवसच अभियान्त्रीकी कॉलेज मध्ये शिकवणे होते. आता कीव कोणाची करायची? विद्यार्थ्यांची की अभ्यासक्रम ठरवणार्‍यांची? बाकी ...चालु द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 02/16/2012 - 09:45

In reply to आता विषय काढला आहे म्हणून by चेतनकुलकर्णी_85

Permalink

मग?

अभियान्त्रीकेच्या तिसर्या वर्ष पासून ९५% मंडळी जेवा बाकीची पुस्तके बंद करून जेन्वा शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायची तेवा कीव यायची बघा
मग नक्की कोणती पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचावीत/ सोडवावीत असे तुम्हाला वाटते? आणि शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवणारी मंडळी तुमचीही किव करत असतीलच की. मग कोणाचे बरोबर हे कसे ठरवायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on गुरुवार, 02/16/2012 - 09:52

In reply to मग? by क्लिंटन

Permalink

तेवढंच करायचं असं नाही.

अभियान्त्रीकेच्या तिसर्या वर्ष पासून ९५% मंडळी जेवा बाकीची पुस्तके बंद करून जेन्वा शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायची तेवा कीव यायची बघा
मग नक्की कोणती पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचावीत/ सोडवावीत असे तुम्हाला वाटते? आणि शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवणारी मंडळी तुमचीही किव करत असतीलच की. मग कोणाचे बरोबर हे कसे ठरवायचे?
शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायच म्हणजे अभ्यासक्रम बाजूला ठेऊन तेवढंच करायचं असं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 02/16/2012 - 10:29

In reply to तेवढंच करायचं असं नाही. by sagarpdy

Permalink

ज्याचा त्याचा चॉईस

शकुंतला देवी किंवा R.S. agarwal सोडवत बसायच म्हणजे अभ्यासक्रम बाजूला ठेऊन तेवढंच करायचं असं नाही.
ज्याचा त्याचा चॉईस दुसरे काय? काही मंडळी दिवसरात्र अभ्यास करतात तर काही आपला वेळ खेळ/चित्रपटे किंवा इतर गोष्टींमध्ये घालवतात.इतर कोणी काही केले त्याबद्दल किव वगैरे करणे फारसे समजले नाही. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 02/16/2012 - 10:51

In reply to ज्याचा त्याचा चॉईस by क्लिंटन

Permalink

ही काय भानगड आहे?

शकुंतला देवींची पझल्स वगैरेची पुस्तकं पाहिली आहेत, पण ९५% लोक हे का सोडवायची? आपण तर साला एकाला पण नाय बघितला सोडवताना. आम्हाला तर इंजिनीअरींगला जाण्यार्‍यांचीच कीव यायची आणि येते... आता बोला. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 02/16/2012 - 13:08

In reply to ही काय भानगड आहे? by Nile

Permalink

काय कीव कीव आपलं चीव चीव

काय कीव कीव आपलं चीव चीव चालवली आहे रे बाळांनो?
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on गुरुवार, 02/16/2012 - 00:19

Permalink

कश्याला नवीन करा

आपली मेकेनिकल इंडस्ट्री मुख्यतः प्रोसेस इंडस्ट्री आहे,नवीन प्रोडक्ट बनवण्यापेक्षा रिव्हर्स इंगीनीरिंग वर बऱ्याचदा भर दिसतो.आपल्या कडे मनुष्यबळ स्वस्त आहे तर ते वापरून bulk manufacturing हेच ध्येय दिसते.डिझाईन बहुतांश वेळा outsourse करतात(किंवा कोपी पेस्त करतात ) कारण आपला मुख्य फायदा mass manufacturing वर आहे. सोफ्टवेरचा वापर कमी आहे अशातला भाग नाही पण आहे तर कश्याला नवीन करा??मुख्य फायद्याचा सोर्स वेगळा आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on गुरुवार, 02/16/2012 - 21:54

In reply to कश्याला नवीन करा by लॉरी टांगटूंगकर

Permalink

मॅकॅनिकल इंडस्ट्री बद्दल

मॅकॅनिकल इंडस्ट्री बद्दल तुमच्या मतां बद्दल प्रचंड असहमत आपल्या इथे हि खुप नविन डेव्हलपमेंट ची कामे व व्हेल्यु इंजी. ची कामे होतात. आणि महत्वाचे असे कि ते स्वस्ता मधे होतात....
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 02/16/2012 - 01:32

Permalink

"सर्व्हिस" देणारे स्वतःच्या

"सर्व्हिस" देणारे स्वतःच्या कामाला कमी का लेखतात अजूनही कळलेले नाही. फक्त काही "बिल्ड" करणे म्हणजे हुच्च असा काही नियम आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on गुरुवार, 02/16/2012 - 02:22

In reply to "सर्व्हिस" देणारे स्वतःच्या by शुचि

Permalink

वलयाचा अभाव

सेवा देणारे हे कमी समजले जातात कारण त्या कामाला वलय नाही. सिनेमात काम करणारे नट वा दिग्दर्शक आणि सिनेमा दाखवणारे थेटरचे कर्मचारी आणि मालक ह्यांना मिळणार्या मानात फरक आहे की नाही? फार काय, सिनेमा नटाइतके सिनेमाचा कॅमेरामन, वेगवेगळी दृश्ये संपादित करुन विकण्याजोगा, सलग सिनेमा बनवणारे तंत्रज्ञ ह्यांचा उदोउदो होत नाही. गाणे गाणारे, संगीत देणारे ह्यांना लोक डोक्यावर घेतात पण त्यांना उत्तम साथ देणारे वादक, रेकॉर्ड तंत्रज्ञ, गीतकार ह्यांच्याकडे तसे दुर्लक्षच होते. मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, टाटा हे कार बनवणारे आणि त्या दुरुस्त करणारे ह्यांना मिळणारा मान सारखा असतो का? अर्थातच नाही. काही तरी नवे निर्माण करणार्‍याला जास्त प्रसिद्धी, नाव मिळतेच मिळते. हाच जगाचा न्याय आहे. आर्थिक फायदा असा आहे की नवे उत्पादन पैसे मिळवून देत रहाते. उत्तम सिनेमा, उत्तम गाणे, उत्तम सॉफ्टवेअर अनेक वर्षे विकले जाते आणि मालकाला पैसे मिळवून देत रहाते. उदा. मायकेल जॅक्सनची गाणी आज २०-२५ वर्षांनंतरही विकली जात आहेत. मायक्रोसॉफ्टचे विंडोज एक्स पी अजून विकले जाते आहे. सर्विस देणार्‍या लोकांना तसा पैसा फार काळ मिळत नाही. जितना काम उतनाही दाम.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 02/16/2012 - 15:17

In reply to वलयाचा अभाव by हुप्प्या

Permalink

प्रतिसाद

आवडला
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Fri, 02/17/2012 - 20:28

In reply to वलयाचा अभाव by हुप्प्या

Permalink

गाणे गाणारे, संगीत देणारे

गाणे गाणारे, संगीत देणारे ह्यांना लोक डोक्यावर घेतात पण त्यांना उत्तम साथ देणारे वादक, रेकॉर्ड तंत्रज्ञ, गीतकार ह्यांच्याकडे तसे दुर्लक्षच होते.
ही analogy "सेवा देणारे" च्या संदर्भात चुकीची वाटते. वादकांकडे होणारे दुर्लक्ष हे लोकांचे वाद्या संबंधी , त्याच्या तंत्रा संबंधी असणार्‍या अज्ञानामुळे असते. कित्येक वेळा लोकांना वाद्यांची नावे पण व्यवस्थित माहीत नसतात. अन्यथा वाद्य वाजवणे ही एक अफलातुन कला आहे. IT मधील सेवा क्षेत्रात मात्र फारसे उल्लेखनिय असे काही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Fri, 02/17/2012 - 20:37

In reply to गाणे गाणारे, संगीत देणारे by मराठी_माणूस

Permalink

+१

सहमत. मागे कुणीतरी, आपण घरकाम करणं शक्य असतानाही ते काम मोलकरीण/नोकर ठेउन आउटसोअर्स करतो आणि वाचलेला वेळ आणी शक्ती "चांगल्या" कामासाठी वापरतो. अशी काहीतरी अ‍ॅनॅलोजी वापरली होती. तो धागा आठवत नाहिये.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 02/16/2012 - 01:44

Permalink

हा एक मोठाच विषय आहे.

हा एक मोठाच विषय आहे. अभि. सोफ्ट्वेअर बाबत सगळ्यात महत्वाचे म्हणजे खर्चिक, अर्थातच जास्त माणसे लागणारा प्रकार आहे. आपलेच लोक तिकडे जाऊन या कंपन्यात काम करतात म्हणून वाईट वाटून घेणे किंवा खूष होणे, दोन्हीही निरर्थक आहे असे वाटते. सारा क्लियर व्यवहार आहे. आपल्याकडे आय आय टी मध्ये या प्रकारच्या सोफ्ट्वेअर निर्मितीचे शास्त्र शिकवणारे विषय आताही आहेत. पण ते फक्त शिकण्या पुरतेच . मुळात याला एकदम फंडू गणित वाले शेकडो लोक कंपनी कडे पायजेत.आणि ते १०-१२ वर्षे एका जागी टिकले पाहिजेत. एकदा छोट्या छोट्या खूप अल्गोरीदम्स चा संग्रह निर्माण करणे आणि मग त्यांचे उपयोजन. हे सुरु असताना नव्या संकल्पनांवर लक्ष असणे. मुख्य म्हणजे दिलेल्या माहितीवरून बराच अचूक अंदाज करू शकणारी अल्गोरीदम्स. मग त्रुटी आपोआप कमी करणारी, स्वतः शिकून पुढच्या वेळी सुधारणा करणारी अशी (भयानक ) अल्गोरीदम्स. वगैरे वगैरे ...(पी जी ला असले काहीतरी शिकवलं होतं पण ते तिथच राहिलं ) या सगळ्यात सोफ्ट्वेअर बरेच नंतर येते. त्यामुळे खूप सोफ्ट्वेअर तज्ञ पदरी असले म्हणून काही अभियांत्रिकी सोफ्ट्वेअर करता येत नाहीत. या शिवाय बौद्धिक संपदा स्वामित्व हक्क वगैरे बाबतीत आपल्याकडे जागरूकता नाही. कारण एकदा बाजारात आणल्यावर त्याच्या नकला झाल्या तर कंपनीचे दिवाळे वाजणार. याशिवाय दर वर्षी होणारे अपडेट्स घेऊन जगभर सपोर्ट द्यावा लागतो तो वेगळाच. त्यामुळे किंमत जास्त असणारच. सोफ्ट्वेअर ची किंमत असते हेच आपल्याला मान्य नसते तिथे असे काही तयार होणे कठीण. आणि जास्त आहे म्हणाल तर ते रुपया मधे महागच वाटणार. त्यातून येणारी उत्पादकता/ उपयुक्तता त्याच्या किमतीपेक्षा मोठीच आहे.तसे नसेल तर तुम्ही ते योग्य प्रकारे वापरत नाही आहात. उदा: MATLAB घेताना तुम्ही सगळे toolboxes न घेता हवे तेवढेच घेऊ शकता. परवाने घेण्याचे पण बरेच लवचिक पर्याय आहेत.मग किंमत जास्त कशी? मधे भारतावर अमेरिकेने निर्बंध लादले त्या काळी कंपनी तर्फे काही संरक्षण आस्थापना बरोबर अशा प्रकारचे अगदी बेसिक काम करायची संधी मिळाली. त्या क्षेत्रात बराच वाव आहे पण सुरुवात कशी होणार हाच प्रश्न आहे! टाटा या पण क्षेत्रात येणार असं ऐकलंय, तेवढीच आशा! बाकी आपल्या आयटी इंडस्ट्री ची तुलना यापूर्वीच दांडेकर पुलावरील कामगारांशी झाली आहे. त्याबद्दल कुणाला वाईट वाटायचं कारण नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on गुरुवार, 02/16/2012 - 02:29

Permalink

ओपन सोर्स सॉफ्टवेअर

एखाद्या विषयात सॉफ्टवेअर बनवायचे असेल तर ते विकलेच पाहिजे असे नाही. ओपन सोर्स सॉफ्टवेअर नावाचा प्रकार जो अफाट लोकप्रिय आहे त्या क्षेत्रात भारताला काहीतरी करणे सहज शक्य आहे. अनेक क्षेत्रातील सॉफ्टवेअर फुकट असते अगदी सोर्स कोडसहित. पोटापाण्याचे काम संभाळून अशा कामात मदत करणारे अनेक आहेत. लिनक्ससारखे प्रोग्रॅम मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या धेंडाला जबरदस्त उत्तर देत आहेत. त्यांचे उत्पन्न कमी करत आहेत. मॅटलॅबला उत्तर म्हणून ऑक्टेव्ह नामक उत्पादन आहे. फोटोशॉपसारखे गिम्प आहे. ह्या कामात पैसा उत्पादनात नसून ते इन्स्टॉल करणे, त्यात नव्या गोष्टी घालणे, लोकांना ते वापरायला शिकवणे ह्यात असतो. शिवाय अशा कामात घसघशीत सहभाग असणार्‍या लोकांची कीर्ती दिगंत होते. लिनस टोरर्व्हॅल्ड्स हे नाव आपण ऐकले असेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on गुरुवार, 02/16/2012 - 09:45

In reply to ओपन सोर्स सॉफ्टवेअर by हुप्प्या

Permalink

पायथन देखील मॅटलॅबला अगदी

पायथन देखील मॅटलॅबला अगदी तोडीस तोड आहे हि Linux ची निर्मितीगाथा
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on गुरुवार, 02/16/2012 - 02:46

Permalink

ह्या विषयाशी डायरेक्ट नसला

ह्या विषयाशी डायरेक्ट नसला तरी थोडासा संबंधीत असा माझा एक वेगळा प्रश्न आहे. भारतीयांना (प्रामुख्याने विद्यार्थ्यांना) कोणत्या कामाविषयी 'पॅशन' वाटते? एक शेअरबाजार सोडला तर मी तरी कोणाला कोणत्यातरी वेडानं झपाटून काम करताना फारसं पाहिलेलं नाही. नाहीतर एवढी लोकसंख्या असलेल्या देशात कितीतरी बिल-गेटस्, मार्क झुकरबर्ग निर्माण व्हायला हवेत. नाही म्हणायला तशी पॅशन पारतंत्र्यात असताना कित्येक तरूणांमधे देशासाठी दिसून येत होती. क्वचित एखादा कलेचं किंवा क्रिकेटचं वेड जोपासतानाही दिसतो म्हणजे इथे पॅशनेट लोकं नाहीत असं नाही. पण ही वेडं फक्त यापुरतीच मर्यादीत आहेत. शाळा कॉलेजमधे उत्तमोत्तम सोफ्टवेअर आवडीने लिहीणारे पुढे ते वेड न जोपासता ओझ्याचे बैलच होणं जास्त पसंत का करतात?
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on गुरुवार, 02/16/2012 - 09:40

In reply to ह्या विषयाशी डायरेक्ट नसला by मराठे

Permalink

कारण अगदीच सरळ आहे,

कारण अगदीच सरळ आहे, संस्कार! पिढ्यानपिढ्या आपण तेच करत आलोय [काही सन्माननीय अपवाद वगळता]
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 02/16/2012 - 09:51

In reply to ह्या विषयाशी डायरेक्ट नसला by मराठे

Permalink

त्याला कारण आहे...उद्या एखादा

त्याला कारण आहे...उद्या एखादा झपाटुन कामाला लागेलही पण त्याचे नातेवाईक, आई वडील वगैरे त्याला करुच द्यायचे नाहीत. नोकरी केल्याशिवाय त्यांच्या जिवाला चैन पडणार नाही.. पाश्चिमात्य देशात मुलं फार लवकर स्वतंत्र होतात अन हव्या त्या क्षेत्रात प्रयत्न करतात. नोकरीच केली पाहीजे वगैरे फंडा नसतो. लवकरात लवकर लग्न करुन सेटल होणे, पोरं काढणे हे ध्येय नसतं.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on गुरुवार, 02/16/2012 - 09:53

In reply to त्याला कारण आहे...उद्या एखादा by शिल्पा ब

Permalink

+1

+1
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on गुरुवार, 02/16/2012 - 10:49

In reply to त्याला कारण आहे...उद्या एखादा by शिल्पा ब

Permalink

+ अगणित

त्याला कारण आहे...उद्या एखादा झपाटुन कामाला लागेलही पण त्याचे नातेवाईक, आई वडील वगैरे त्याला करुच द्यायचे नाहीत.
याला +अगणित. आपण ज्या पध्दतीचे आयुष्य जगलो आहोत तसेच आपल्या मुलांनीही जगावे आणि त्यापेक्षा वेगळा विचार मुलांनी करणे हे अगदी महापाप असल्याप्रमाणे पालकमंडळी आणि इतर नातेवाईक त्याला विरोध करतात-- "चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि आलाय मोठा हुषारी करणारा" अशा स्वरूपाची वाक्ये सुनावली जातात हे मी स्वतः अनेकवेळा अगदी जवळून बघितलेले आहे. इनोव्हेशनसाठी स्वातंत्र्य लागते आणि तेच जर मिळत नसेल तर पुढचे काहीच होत नाही. मुळात कुठल्याही समाजात इनोव्हेशन करावेसे वाटणारे लोक थोडे असतात. ते करायची पात्रता असलेले लोक त्याहूनही कमी असतात. आणि जे आहेत त्यांनाही असा विरोध झाला तर त्या विरोधाला न जुमानता पाहिजे ते करणे सगळ्यांना शक्य होतेच असे नाही. आणि मग परिणाम समोरच असतो. अमेरिकेतील लोक आपल्यापेक्षा काही फार जास्त प्रतिभाशाली आहेत असे मानायचे काही कारण नाही.पण वेगळा विचार करायची मोकळीक असणे, अमुक एक गोष्टच कर, ती अशाच पध्दतीने कर अशा स्वरूपाची सक्ती तिथे आपल्याकडे आहे त्यापेक्षा बरीच कमी असते हे वेगळे सांगायलाच नको. गेल्या शतकात अनेकविध इनोव्हेटिव्ह गोष्टी (अगदी लाइटच्या बल्बपासून गुगल, फेसबुकापर्यंत) अमेरिकेत झाल्या त्यामागे हे कारण मोठे आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 02/16/2012 - 11:59

In reply to त्याला कारण आहे...उद्या एखादा by शिल्पा ब

Permalink

लग्न करुन...पोरं काढणे

लग्नाशिवायच तिकडे पोरं काढणे सहज शक्य असल्याचे कानावर आले आहे , ते खरे का हो ?
  • Log in or register to post comments

Submitted by चेतनकुलकर्णी_85 on गुरुवार, 02/16/2012 - 22:34

In reply to त्याला कारण आहे...उद्या एखादा by शिल्पा ब

Permalink

लवकरात लवकर लग्न करुन सेटल

लवकरात लवकर लग्न करुन सेटल होणे, पोरं काढणे हे ध्येय नसतं. हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते कोणी सांगितले?? कळत नाही माणूस "तिकडे"" गेला कि "इकडच्या" सर्वच गोष्टीना का नाके मुरडतो...
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 02/16/2012 - 12:06

In reply to ह्या विषयाशी डायरेक्ट नसला by मराठे

Permalink

सामाजिक उतरंड आणि जडणघडण

मराठे, आपली सामाजिक उतरंड आणि जडणघडण ह्याला कारणीभूत आहे. आपल्याला आपल्या आवडीचे काम करण्याची मोकळीक असते? काल पर्यंत कोणती करीयर आपण पहात होते इंजीनीयर आणि डॉक्टर शिवाय? आज किती पालक खूष होतील त्यांच्या मुलगा जर येऊन म्हणाला की त्याला 'बार टेंडर' व्हायचे आहे किंवा 'शेफ' व्ह्यायचे आहे? 'भिकेचे डोहाळे' असे म्हणून त्याची संभावना केली जाइल. आपण सर्वजण एका घाण्याला जुंपले गेलो आहोत. 'बक्कळ पैसा आणि स्थैर्यता'. हे झाले की आपण आयुष्यात 'सेटल' होउन जातो. तसेच मुलांना वाढवताना आपण त्यांना किती विचार स्वातंत्र्य देतो? त्यांना आयुष्यभर आपल्या प्रेमाच्या बेगडी छायेत आपल्यासारखेच 'नोकरशहा' बनवून टकतो. पाश्चात्य जगात मुले १६ वर्षांची झाली की त्यांना आपापले पोटापाण्याचे स्वतःचे स्वतः बघावे लागेत. ती मुले पालकांच्यावर अबलंबून नसतात. त्यामुळे त्यांचे 'रिस्क अ‍ॅपेटाइट' फार जास्त असते. कुठेलेही महत्वाचे निर्णय घ्यायला ते १६ वर्षांपासूनच तयार होतात, म्हणून त्यांच्याकडे बिल-गेटस्, मार्क झुकरबर्ग तयार होतात. पण आपली संकुचित विचारधारा पण बिल-गेटस्, मार्क झुकरबर्ग हेच तयार व्हावेत अशी आशा करते. सर्जी बुबका, मायकल जॉर्ड्न(खेळाडू), जॉन मरे (स्कॉच तज्ञ), Steve Irwin (वन्यप्राणी तज्ञ), वीणा पाटील (केसरी ट्राव्हल्स) अश्यापैकी कुणी व्हावे असे वाटू देत नाही. - (पॅशनेट) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 02/16/2012 - 12:31

In reply to सामाजिक उतरंड आणि जडणघडण by सोत्रि

Permalink

क्या बात कही है.

>>>आज किती पालक खूष होतील त्यांच्या मुलगा जर येऊन म्हणाला की त्याला 'बार टेंडर' व्हायचे आहे किंवा 'शेफ' व्ह्यायचे आहे? 'भिकेचे डोहाळे' असे म्हणून त्याची संभावना केली जाइल. १०० % सहमत आहे. सध्याचे सांगता येत नाही. कारण आज जे पालक आहेत ते यातुन गेले असल्याने ते आपल्या पाल्यासाठी वेगळा विचार करू शकतात. परन्तु याप्रकारे काहीकाळापुर्वी नक्कीच संभावना केली जायची. (अनुभवी) चिंतामणी
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on गुरुवार, 02/16/2012 - 03:20

Permalink

सरळ शब्दांत सांगायचे झाले तर

सरळ शब्दांत सांगायचे झाले तर सॉफ्टवेअर प्रॉडक्शन बाहेर आणि सपोर्ट इथून. कारण सपोर्टसाठी इथले मनुष्यबळ स्वस्तात उपलब्ध होते. - (आयटी सपोर्टवाला) पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on गुरुवार, 02/16/2012 - 09:34

In reply to सरळ शब्दांत सांगायचे झाले तर by पिंगू

Permalink

हाच तो .

हाच तो .
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 02/16/2012 - 10:47

Permalink

कॉलींग

ध.मु., सोत्री, विजूभौ आणि चोता दोन सुद्धा.Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 02/16/2012 - 14:07

In reply to कॉलींग by चिंतामणी

Permalink

आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात

आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रगतीवर आहोत वगैरे म्हणणे म्हणजे बांधकामावरच्या मजुरानी आपण दहा बिल्डिंगा बांधल्याची फुशारकी मारावी.. आपण भारतीयानी एखादी मायक्रोसॉफ्ट किंवा लिनक्स सारखी ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे तयार केली असती तर गोष्ट वेगळी होती. निदान एम एस ऑफिस किंवा एखादे ई आर पी सॉफ्टवेअर किमान एखादी स्वतन्त्र लँगेव्ज वगैरे डेव्हलप केले असते ते जगाने वापरले असते तर गोष्ट वेगळी होती. कॉल सेंटर वगैरे सर्विसेस मधून पैसा मिळतो पण सर्विसेस या प्रॉडक्ट्स होउ शकत नाहीत. आपल्या बहुतेक गमजा अमेरीकेतील/युरोपातील ग्राहकांच्या मागणी वर चालतात. ज्या दिवशी अमेरीकन ग्राहकाला त्याच्या उधळेपणाची जाणीव होईल त्या दिवशी कोणाचेच काही खरे असणार नाही. तिरफळाने माशाचा आब राखून झणझणावे.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपोटी on गुरुवार, 02/16/2012 - 15:01

In reply to आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात by विजुभाऊ

Permalink

व्वा !

विजुभौ,
तिरफळाने माशाचा आब राखून झणझणावे.
क्या बात है! - दिपोटी
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 02/16/2012 - 17:45

In reply to आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात by विजुभाऊ

Permalink

+१

ज्यांकडुन मिलियन डॉलर(त्याकाळचे ४०० कोटी रुपये ) वेब बेस्ड इमेल चे इनोवेशन सुरुवातीलाच घडलं तिथे ऑर्कुट फेसबुक अथवा युट्युब संकल्पनांचा उगम सोडा तगडा स्पर्धकही निर्माण होउ शकला नाही हि वस्तुस्थीती दुर्दवाने मजेशीर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on गुरुवार, 02/16/2012 - 19:28

In reply to आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात by विजुभाऊ

Permalink

आपल्या बहुतेक गमजा

आपल्या बहुतेक गमजा अमेरीकेतील/युरोपातील ग्राहकांच्या मागणी वर चालतात. ज्या दिवशी अमेरीकन ग्राहकाला त्याच्या उधळेपणाची जाणीव होईल त्या दिवशी कोणाचेच काही खरे असणार नाही.
खत्रा सहमत. सुरुवातीला जसं आयटी नवीन होतं तसे ग्राहकही नवखे होते. आता ग्राहकही हुशार होउ लागलेत. पुर्वी थोडसं टेलरींग करून एकच सॉफ्टवेअर दोन ग्राहकांना विकता येत असे. पण आता कोड रियुजेबिलीटी वगैरे फंडे अगदी बँकींग वगैरे सेक्टर्स मधल्या लोकांनापण कळत आहेत. त्यामुळे ते सुद्धा वेरियंट च्या नावाखाली खूप फिचर्स असलेलं एकच सोफ्टवेअर करून मागत आहेत. पण तरीही भारतात आयटीला अजून १५-२० वर्षे तरी मरण नाही. :( विषयांतर होतय पण अगदी रहावत नाही म्हणून सांगतो, जो आयटी हब की काय म्हणतात तो येत्या चार पाच वर्षात पुणे नसणार आहे. कारण ह्या सात-आठ वर्षात घरांच्या किमती वाढण्या व्यतिरीक्त काहिही बदल झाला नाही. शहरात पायाभुत सुविधा वगैरे तर दूरच, च्यायला हिंजेवडी आयटी पार्कात रस्ता देखील नीट नाही हो. एक बस वेळेवर जात नाही तीथ पर्यंत. स्वारगेट वरून हायवे, वारजे असं करत जावं लागतं. नुकतेच इंजिनीअरींग होउन बाहेर पडलेले रस्त्याच्या कडेला गळ्यात बॅज अडकवून, स्मार्टफोनशी चाळाकरत कंपनीच्या बसची वाट बघत आठ-दहा लाख पॅकेज घेणारी मुलं-मुली बघितली की च्यायला (बिचार्‍यांचा काय दोष, पण) डोक्यात सणक जाते. असो, कुणीतरी "तुझा पगार किती, तू बोलतोस किती" असं म्हणायच्या आत गप्प बसतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on गुरुवार, 02/16/2012 - 20:07

In reply to आपल्या बहुतेक गमजा by दादा कोंडके

Permalink

मला वाटतं भारतामधे पायाभूत

मला वाटतं भारतामधे पायाभूत सुविधा नसल्यामुळे 'मॅन्युफॅक्चरींग' इंडस्ट्री फारशी यशस्वी ठरू शकत नाही (याच कारणाने चीन मधे 'मॅन्युफॅक्चरींग' इंडस्ट्री चांगलीच फोफावली आहे). वाहतूकीच्या सोयी नसल्या तरी सर्विस इंडस्ट्री थोडीफार तग धरू शकते. पण फार काळ नाही. रस्ता, पाणी, वीज आणि दूरसंचार (कम्युनिकेशन) ह्या चार महत्वाच्या पायभूत सुविधा पुरवण्यामधे जर भारत असाच कमी पडत राहिला तर इतर देश सहज बाजी मारतील. भारताचा एकमेव युएस्पी म्हणजे 'इंग्रजी' जाणणारी इंजिनियरांची फौज. पण आताच चीन मेक्सिको वगैरे देश त्यांची धोरणं बदलून आपला बिजनेस खेचून नेत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतनकुलकर्णी_85 on गुरुवार, 02/16/2012 - 20:33

In reply to मला वाटतं भारतामधे पायाभूत by मराठे

Permalink

भारताचा एकमेव युएस्पी म्हणजे

भारताचा एकमेव युएस्पी म्हणजे 'इंग्रजी' जाणणारी इंजिनियरांची फौज अहो आपल्या कडील महाविद्यालायान्चिया एकूणच दर्जा पाहता ही बिन कामाची फौज काय कामाची?? माझ्या मते कोणत्याही देशाचा विकास ह्या तेथील आद्योगिक कंपन्याच्या कामाच्या दर्जा वर अवलंबून असतो...आपण चंद्रावर यान पाठवू शकतो ..उपग्रह तयार करू शकतो पण त्याच उपग्रहांना लागणारे विशिष्ट्य "srews" आपल्याला जपान कडून आयात करावे लागतात अमेरिका आणि जर्मनी चे उदगी उलटे आहे.. तिकडच्या सरकारी संस्थाना बाकीच्या देशान पुढे हात पसरावे नाही लागत... तरीही अनेक भारतीय "IT" कंपन्या ह्या प्रचंड वेगाने नफा कमवीत आहेत त्या पैकी एकानेही अश्या गोष्टींच्या विकास कामात ध्यान घालू नये ही नक्कीच खेदाची गोष्ट आहे...अश्याने भारतात सेर्वानन रोजगार नक्की मिळेल पण तांत्रिक दृष्ट्या आपण कायमच मागास राहू...१५० वर्षे मागे.....
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com