✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

म
महानगरी यांनी
Fri, 02/10/2012 - 11:23  ·  लेख
लेख
नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे. तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ? माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो. कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल युधिष्टिर - मनोज वाजपेयी भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व अर्जुन - अक्षय खन्ना कुंती - शबाना आझमी ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16936 वाचन

💬 प्रतिसाद (114)

प्रतिक्रिया

भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व

पियुशा
Fri, 02/10/2012 - 11:28 नवीन
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व आक्षेप ,आक्षेप,,आक्षेप,!!!! ऋतिक रोशन या रोलमध्ये फिट बसणार नाही अस माझ मत आहे ;) कारण ऋतिक भलताच क्युट आहे ;) भिमाचा रोल दुसर्या कुणाला तरी ,द्या सन्जुबाबाला का नै देत ;) ( चला आजच्या टि.पी ची सोय झाली ;) )
  • Log in or register to post comments

एवढा

चिरोटा
Fri, 02/10/2012 - 11:41 नवीन
जरा जास्तच तूल देताय ऋतिकला असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

भीम : सनी देओल

कपिलमुनी
Fri, 02/10/2012 - 11:44 नवीन
दुसरा कोणीच नही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

+१११

वपाडाव
Fri, 02/10/2012 - 16:19 नवीन
कपिलमुणींणा सहस्त्रवेळा अण्मोडण....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१

Maharani
Fri, 02/10/2012 - 15:52 नवीन
पियुशा बरोबर आहे!! भीम - ऋतिक रोशन ????????भलतच काही तरी!!!!!!!! त्याला हवे तर अर्जुन करा, कृष्ण करा!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

माझाही आक्षेप! कारण हृतिक

किचेन
Fri, 02/10/2012 - 22:30 नवीन
माझाही आक्षेप! कारण हृतिक क्युट बीट काही नाही. मुलखाचा बोर आहे.कहो न प्यार हे च्या पहिल्या भागात फक्त तो क्युट दिसला होता.बास.त्याला भीम काय कोणाच्याच रुपात घेऊ नका.भीम साठी सलमान खान चांगला वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

हे घ्या..............

इरसाल
Fri, 02/10/2012 - 22:50 नवीन
दुर्योधन - मुकेश ऋषी ----- दिग्विजय सिन्घ कर्ण - अभिषेक बच्चन=== अरुण जेटली युधिष्टिर - सुनिल शेट्टी------एम.करुणानिधी भीम - सनी देओल-----नितीन गडकरी अर्जुन - इमरान हाश्मी--------लाल क्रुष्ण अ डवाणी द्रौपदी - राखी साव न्त, मल्लिका शेरावत, पुनम पान्डे--------???????(ब्रूनी कार्ला) ध्रुतराष्ट्र -शत्रुघ्न सिन्हा--------मनमोहन सिन्ग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

एम.करुणानिधीला युधिष्टिर

रामपुरी
Fri, 02/10/2012 - 23:25 नवीन
एम.करुणानिधीला युधिष्टिर पेक्षा ध्रुतराष्ट्र चा रोल शोभून दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

द्रौपदी - राखी साव न्त,

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 02/11/2012 - 12:45 नवीन
द्रौपदी - राखी साव न्त, मल्लिका शेरावत, पुनम पान्डे--------???????(ब्रूनी कार्ला)
दादा, तुम्ही महाभारत वाचले आहे का नक्की ?? द्रौपदी म्हटल्यावर फक्त वस्त्रहरणाचा प्रसंग डोळ्यासमोर येतो का काय तुमच्या ? द्रौपदीचे नाव पाच महान पतीव्रतांमध्ये घेतात. राखी सावंत ते काम करणार ? कुत्री पण फिरकणार नाहीत थेटरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

माझाही आक्षेप! कारण हृतिक

मृगनयनी
Sat, 02/11/2012 - 20:30 नवीन
माझाही आक्षेप! कारण हृतिक क्युट बीट काही नाही. मुलखाचा बोर आहे.कहो न प्यार हे च्या पहिल्या भागात फक्त तो क्युट दिसला होता.बास.
:( :( :(
त्याला भीम काय कोणाच्याच रुपात घेऊ नका.भीम साठी सलमान खान चांगला वाटेल.
:| ह्म्म्म्म---- आणि मग हिडिम्बेसठी कोण बरं- ऐश्वर्या की कतरीना ? ;) ;) आणि सलमान भीम झाला तर मग अर्जुन'साठी अरबाजला घ्या... आणि नकुल'साठी सोहेलला घ्या.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

+१

मोदक
Fri, 02/10/2012 - 11:37 नवीन
(आडदांड) सन्जुबाबा बद्दल सहमत.
  • Log in or register to post comments

(आडदांड) सन्जुबाबा बद्दल

मृगनयनी
Fri, 02/10/2012 - 15:59 नवीन
(आडदांड) सन्जुबाबा बद्दल सहमत. :| त्याचा तो आडदान्ड "कान्चा चीना" पाहिल्यावर बिचारी द्रौपदीच त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी दु:शासनाकडे पळत जाईल!.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तो नाकपुड्या हलवत बसेल

लॉरी टांगटूंगकर
Fri, 02/10/2012 - 11:45 नवीन
ह्रितिक -भीमाच्या भूमिकेत पण तो नाकपुड्या हलवत बसेल आणि आमीर इतका बुटका कर्ण?कोणीहि येत जाता कर्णाच्या डोक्यात टपली मारून जातंय असे दाखवायचंय का?
  • Log in or register to post comments

ह्रितिक -भीमाच्या भूमिकेत पण

शुचि
Fri, 02/10/2012 - 17:46 नवीन
ह्रितिक -भीमाच्या भूमिकेत पण तो नाकपुड्या हलवत बसेल
आई शप्पत =)) रडेल तो हे वाचलं तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

सहमत! +१००

किचेन
Fri, 02/10/2012 - 22:32 नवीन
सहमत! +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

ते हॉलीवूडचं काय आपल्याला

यकु
Fri, 02/10/2012 - 11:55 नवीन
ते हॉलीवूडचं काय आपल्याला माहित नाही ब्वॉ.. पण मिपाभारत झालेच तर आमची पात्रयोजना अशी असेल. ;-) अक्रुर - गगनविहारी - मुद्याचं थोडक्यात आणि गरज पडली तर समोरच्याची बुद्धीच भ्रष्‍ट होईल इतपतही अघळपघळ मांडण्यात हातखंडा. अक्रूराच्या भूमिकेत फिट्ट बसतील. शकुनीमामा - परिकथेतील राजकुमार - यांचे ठेवणीतले प्रतिसाद पहाता हे शकुनीमामाच्या भूमिकेत. भीम - होऊन होऊन होणार कोण, टारझण शिवाय दुसरा कोण. ‍अर्जुन - झुल्पिखार उर्फ डॉणराव. हे आणि धमालबाबांच्या रुपातील कृष्‍ण अठरा अध्‍यायांच्या डेटा वर सुखसंवाद करीत आहेत हे दृश्‍य डोळ्यासमोर आणा. कृष्‍ण - धमालबाबा बारामतीकर. ऑलराऊंडर. संजय - या भूमिकेत श्रीयुत ‍अवलिया हे अगदी फिट्ट. भीष्‍माचार्य - 50 फक्त... (उत्तरायणाची वाट पहात बाणशय्येवर झोपल्याची कल्पना करा) धृतराष्‍ट्र -ही भूमिका पितवर्णी डांबिसकाकांना द्यावी युधिष्‍ठीर - नकुल - सहदेव - टार्गेटेड पण कोणती भूमिका द्यावी याबद्दल संभ्रमात: नगरीनिरंजन, युयुत्सू, विंग कमांडर ओक, प्रा. डॉ. बिरुटे सर, बिपीन कार्यकर्ते . बाकी पात्रे आणि कलाकार सांगा.. (वरच्या सगळ्या आयडींनी कृहघे हेवेसांन)
  • Log in or register to post comments

हित कुनाला

कपिलमुनी
Fri, 02/10/2012 - 11:55 नवीन
करायचं द्रोपदी ... आवगड झाला ना भावा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

:) :)

सुहास झेले
Fri, 02/10/2012 - 12:06 नवीन
यशवंता, लैच भारी रे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

:)

छोटा डॉन
Fri, 02/10/2012 - 12:06 नवीन
ते अर्जुन वगैरे ठिक आहे हो. पण ह्या युद्धाच्या भांजगडीत आणि पळापळीत केसं उगाच विस्कटतात ही आमची तक्रार आहे. शिवाय त्या युद्धभुमीवरची धूळ, उनं, वारा ..... छे छे छे, साला आमच्या केसांची खंप्लिट वाट लागायचा धंदा आहे हा. बाकी धम्या जर 'कृष्ण' होणार असेल तर जो कोणी 'दुर्योधन' होणार असेल त्याने व्यनीतुन आमच्याशी संपर्क साधावा. धम्याच्या बडबड आणि कुत्सित बोलणे ऐकण्यापेक्षा आम्ही दुर्योधनाशी दोस्ती वगैरे करुन प्रकरण मिटवुन घेऊ, असो. - (अजुन पत्ते न खोललेला आणि अर्जुन न झालेला, तूर्तास ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ठीक आहे. बिकांना दुर्योधन

यकु
Fri, 02/10/2012 - 12:09 नवीन
ठीक आहे. बिकांना दुर्योधन करण्यात येत आहे. बिकांशी दोस्ती करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हम्म्

छोटा डॉन
Fri, 02/10/2012 - 12:15 नवीन
'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा प्रकारची मराठीत जी म्हण आहे त्याचे हे परफेक्ट उदाहरण आहे. इन्फॅक्ट हा आमच्याविरुद्ध रचलेला कट आहे अशी शंका आता आम्हाला येत आहे. सध्या आम्ही सदर प्रसंगाचा बिंदुगामी पद्धतीने विचार करत आहोत व हे आत्मचिंतन पुर्ण झाल्यावर काय आहे ते सांगण्यात येईल, तोवर बाकी चालुद्यात. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>'इकडे आड आणि तिकडे विहीर'

यकु
Fri, 02/10/2012 - 14:11 नवीन
>>>'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशा प्रकारची मराठीत जी म्हण आहे त्याचे हे परफेक्ट उदाहरण आहे. इन्फॅक्ट हा आमच्याविरुद्ध रचलेला कट आहे अशी शंका आता आम्हाला येत आहे. ---- बघा, तुमची अर्जुनाच्या रोलसाठी केलेली निवड किती पर्फेक्ट आहे.. त्याच्याही समोर असंच झालं होतं म्हणे - इकडे आड, तिकडे विहीर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

यकु कर्ण!

कवितानागेश
Fri, 02/10/2012 - 14:18 नवीन
यकु कर्ण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>> यकु कर्ण! छ्या: छ्या: मी

यकु
Fri, 02/10/2012 - 14:24 नवीन
>>> यकु कर्ण! छ्या: छ्या: मी कस्चा कर्ण? ती भूमिका मुद्दाम चेतन सुभाष गुगळे यांच्यासाठी राखून ठेवलीय. आठवा <<<<< >>>>>> असली कवचकुंडलं ल्यालेले त्यांचे प्रतिसाद आणि प्रतिसादाच्या चिखलात वारंवार फसणारं त्यांच्या रथाचं चाक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ते 'नकु' म्हनतायत! तुमीच

कवितानागेश
Fri, 02/10/2012 - 14:28 नवीन
ते 'नकु' म्हनतायत! तुमीच र्‍हावा... मूकवाचकना विदूर करा, (त्यांचे म्हणने ज्यांना उद्देश्युन लिहिलय, त्यांना कधी कळतच नाही, किंवा कळलेच तर फार उशीरा कळते!) ;) शिवाय स्पा पेंद्या, ( त्याला 'ए कुत्ना, बल्लामा, हात!' टाइप्स संवाद द्यायचे)..... :) स्वगतः पळ्ळा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

विदुराची भूमिका श्रामोंकडे

यकु
Fri, 02/10/2012 - 14:33 नवीन
विदुराची भूमिका श्रामोंकडे आपोआप जाणार आहे हो.. त्यामुळं स्वारी ;-) मूकवाचक यांना द्रोणाचार्य, कृपाचार्य वगैरे आचार्यांपैकी त्यांना पसंत असेल ती भूमिका देऊ.. आणि स्पावड्याचं म्हणाल तर त्याला कपाळावर जखम करुन शूलपाणीच्या जंगलात पाठवायचंय. त्यामुळं स्पावड्या अश्वत्थामा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

यकु

चिंतामणी
Fri, 02/10/2012 - 14:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

स्पावड्याचं म्हणाल तर त्याला

स्पा
Fri, 02/10/2012 - 14:39 नवीन
स्पावड्याचं म्हणाल तर त्याला कपाळावर जखम करुन शूलपाणीच्या जंगलात पाठवायचंय. त्यामुळं स्पावड्या अश्वत्थामा. नर्मदे हर्र...... हम आसन लगाते हे अभी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

यकुशेठ

स्मिता.
Fri, 02/10/2012 - 14:57 नवीन
यकुशेठ आज एकदम फुल्ल फॉर्मात आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अस्सच म्हणायचं होतं. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/10/2012 - 15:59 नवीन
यकुशेठ आज एकदम फुल्ल फॉर्मात आहेत! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

+१

सोत्रि
Fri, 02/10/2012 - 22:13 नवीन
नेमके हेच म्हणतो! :) - (बाल्कनीत बसून यकुचे महाभारत पहाणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

स्पा पेंद्या ......खखिक्क्

सूड
Fri, 02/10/2012 - 20:19 नवीन
स्पा पेंद्या ......खखिक्क् :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

स्पा पेंद्या >>> नै

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/10/2012 - 20:23 नवीन
स्पा पेंद्या >>> नै रे....फाऊंटन-पेंद्या Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@छ्या: छ्या: मी कस्चा

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/10/2012 - 19:47 नवीन
@छ्या: छ्या: मी कस्चा कर्ण? ती भूमिका मुद्दाम चेतन सुभाष गुगळे यांच्यासाठी राखून ठेवलीय.>>> संपुर्ण अमान्य...चे सु गुं साठी एकच भुमिका योग्य---माहात्मा विदुर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

च्यायला! यकु, अ‍ॅट लीस्ट

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/10/2012 - 15:16 नवीन
च्यायला! यकु, अ‍ॅट लीस्ट दु:शासन तरी! पण आता केलंच आहे दुर्योधन तर कर्ण मी चूझ करणार. आणि श्रीकृष्ण म्हणजे केवळ केवळ मिष्टर मोडक! दुसरं कॉणच नाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>>>> च्यायला! यकु, अ‍ॅट

यकु
Fri, 02/10/2012 - 15:21 नवीन
>>>>>> च्यायला! यकु, अ‍ॅट लीस्ट दु:शासन तरी! ---- सबूर, बिका सबूर.. इथं द्रौपदीचाच पत्ता नाही आणि तुम्ही दु:शासनाचे कपडे घालून तयार ;-) >>>>>> पण आता केलंच आहे दुर्योधन तर कर्ण मी चूझ करणार. ---- म्हणजे? तुम्हाला चेतन सुभाष गुगळे कर्णाच्या भूमिकेत पसंत नाहीत? ;-) >>>>>> आणि श्रीकृष्ण म्हणजे केवळ केवळ मिष्टर मोडक! दुसरं कॉणच नाय! ---- पहा ब्वॉ, त्या डॉणरावची गोची होईल.कृष्‍णाच्या रुपातले श्रामो अर्जुन झालेल्या डॉणरावला मरायला किंवा मारायला उद्युक्त करतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मायला! त्या डान्याला काय पण

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/10/2012 - 15:27 नवीन
मायला! त्या डान्याला काय पण करायला उद्युक्त करायला सोप्पंय हो! उठ म्हण्लं उठतंय आन बस म्हण्लं की बसतंय त्ये! अजून एक प्रश्न! धृतराष्ट्र कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>>मायला! त्या डान्याला काय

यकु
Fri, 02/10/2012 - 15:33 नवीन
>>>>मायला! त्या डान्याला काय पण करायला उद्युक्त करायला सोप्पंय हो! उठ म्हण्लं उठतंय आन बस म्हण्लं की बसतंय त्ये! ----- श्रामो सांगणार दोन ओळीत गीता. त्यातही 'मोठे व्हा, मोठे व्हा'च जास्त असणार... पार अठरा अध्‍याय नुसतं मोठे व्हा वाचायला बोर होईल.. त्यातही श्रामोंना 'कदाचित मी समजून घ्यायला चुकत असेन' असंली वाक्य म्हणायची सवय आहे.. कृष्‍ण जर असली वाक्ये बोलू लागला तर गीता पूर्ण होणार कधी? >>>>अजून एक प्रश्न! धृतराष्ट्र कोण? धृतराष्‍ट्राच्या रोलसाठी पिडांकाकांच पर्फेक्‍ट वाटतात. पण बघा बुवा, तुमच्या मनात धृतराष्‍ट्राच्या रोलसाठी तात्या असतील तुम्हीच त्यांच्याशी बोला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हम्म!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/10/2012 - 15:37 नवीन
धृतराष्ट्र = पिडांकाका.... एकदमच पर्फेक्ट! मान्य! विदुर = विजुभाऊ! पर्यायच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>>>विदुर = विजुभाऊ! पर्यायच

यकु
Fri, 02/10/2012 - 16:09 नवीन
>>>>>विदुर = विजुभाऊ! पर्यायच नाही! फर्फेक्‍टच! पण शिष्‍टाईच्या बैठकीत विजूभौंचे बासरी वाजवणे, गजला म्हणून दाखवणे हे छंद उफाळून येऊ नयेत म्हणजे मिळवली. ;-) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हायला. खरे कलीयुग अवतरले आहे.

चिंतामणी
Fri, 02/10/2012 - 17:08 नवीन
इकडे बि.का. तीकडे चाचा गुडघ्याला बाशींग बाधून बसले आहेत दु:शासन व्हायला. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

चिंतूकाका, भीमाच्या भूमिकेत

यकु
Fri, 02/10/2012 - 17:12 नवीन
चिंतूकाका, भीमाच्या भूमिकेत गदाधारी टारझण असणार आहे हे थत्ते चाचा आणि बिका दोघांनाही माहित नाही. कशाला जागे करताय त्यांना? ;-) दोघांपैकी एकजण मागे हटला तर तुम्हालाच दु:शासन किंवा दुर्योधन व्हावं लागेल. =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

यकु- आज निसत्या सिक्सर हाणून राहीला

चिंतामणी
Fri, 02/10/2012 - 17:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

नाय नो नेव्हर!

नगरीनिरंजन
Fri, 02/10/2012 - 12:19 नवीन
यदाकदाचित ची आठवण झाली.
अक्रुर - गगनविहारी - मुद्याचं थोडक्यात आणि गरज पडली तर समोरच्याची बुद्धीच भ्रष्‍ट होईल इतपतही अघळपघळ मांडण्यात हातखंडा. अक्रूराच्या भूमिकेत फिट्ट बसतील. शकुनीमामा - परिकथेतील राजकुमार - यांचे ठेवणीतले प्रतिसाद पहाता हे शकुनीमामाच्या भूमिकेत. भीम - होऊन होऊन होणार कोण, टारझण शिवाय दुसरा कोण. ‍अर्जुन - झुल्पिखार उर्फ डॉणराव. हे आणि धमालबाबांच्या रुपातील कृष्‍ण अठरा अध्‍यायांच्या डेटा वर सुखसंवाद करीत आहेत हे दृश्‍य डोळ्यासमोर आणा. कृष्‍ण - धमालबाबा बारामतीकर. ऑलराऊंडर.
:D :D हहपुवा. धमालबाबा कृष्ण असतील तर आम्ही आनंदाने बलराम व्हायला तयार आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हे बेष्ट

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/10/2012 - 13:11 नवीन
शकुनीमामा - परिकथेतील राजकुमार - यांचे ठेवणीतले प्रतिसाद पहाता हे शकुनीमामाच्या भूमिकेत.
असे असेल तर मग आमच्या कांताला युधिष्ठीर करा. साला आधी सगळे संपादक, मग छुपे संपादक आणि शेवटी मिपा लावून घेतो पणावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हाहाहा... वेरी फनी..."भीष्म"

मृगनयनी
Fri, 02/10/2012 - 17:00 नवीन
हाहाहा... वेरी फनी... "भीष्म" म्हणून "तात्या अभ्यंकर" शोभतील!! आणि तात्यांना सर्वाधिक व्यनि करणारे लोक्स- तसेच सम्पादक मन्डळा'लाही मिपावरच्या छोट्या छोट्या गोष्टी कळवणारे लोक "सन्जय"च्या भूमिकेत शोभतील!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

युधिष्‍ठीर - पराने सुचवला आहेच

चिंतामणी
Fri, 02/10/2012 - 14:23 नवीन
आता नकुल - विमे सहदेव - स्पा ह्यांना कास्ट करायला हरकत नसावी. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

द्रोपदी ?

कपिलमुनी
Fri, 02/10/2012 - 11:52 नवीन
ऐश्वर्या ? कत्रीना ? करीना ??
  • Log in or register to post comments

महाभारत लिहिणारे व्यास

स्पा
Fri, 02/10/2012 - 11:52 नवीन
महाभारत लिहिणारे व्यास साक्षात : श्री स्प्यास ते लिहून घेणारा गंपती : - श्री वल्ली
  • Log in or register to post comments

झेपले नाही. दोन्ही लिहिणारे

प्रचेतस
Fri, 02/10/2012 - 11:57 नवीन
झेपले नाही. दोन्ही लिहिणारे मग सांगणारे कोण.? महाभारत व्यासांनी सांगितलय. गणपतीचा उल्लेख हा प्रक्षिप्त आहे. व्यासांनी वैशंपायनाला, वैशंपायनांकडून त्यांच्या शिष्यांना (सौती वगैरे) स्पाभाउ, इतिहासाचे असे विच्छेदन करत जाऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा