✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आवाहन: मराठीतील वाचनीय पुस्तके कोणती?

A
amit_m यांनी
Wed, 11/30/2011 - 14:46  ·  लेख
लेख
मराठीतील वाचनीय पुस्तके कोणती? पुस्तकांबद्दल योग्य माहिती नसल्याने महाजालावर पुस्तके खरेदी करताना खुपदा गोंधळ होतो. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे. कथासंग्रह, अनुवादित, कादंबरी, ललित, चरित्र-आत्मचरित्र, अनुवादित ई. प्रकार चालतील.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26383 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

विजय देवधर यांचे (अनुवादित)

नजदीककुमार जवळकर
गुरुवार, 12/01/2011 - 09:46 नवीन
विजय देवधर यांचे (अनुवादित) डेझरटर वाचा. संत चरित्र आवडते काय ?
  • Log in or register to post comments

+१ सहमत आहे

सागर
Mon, 01/23/2012 - 16:27 नवीन
विजय देवधर यांचे (अनुवादित) डेझरटर वाचा. मूळ लेखक गंथर बान्हमान याने जर्मन भाषेतून त्याचे अनुभव लिहिले होते. त्याची उत्तर आफ्रिकेतून केलेल्या पलायनाची ही चित्तथरारक युद्धानुभव कथा नंतर इंग्रजीत आय डेझर्टेड रोमेल या नावाने अनुवादित झाली आणि तिच्यावर अक्षरशः उड्याच पडल्या. विजय देवधर यांनी त्यातील थरार टिकवून मराठीतून अनुवाद केला आहे त्यामुळे 'डेझर्टर' हे अतिशय वाचनीय आहे. ब्रिटिश फौजांबरोबरच त्याला जर्मन फौजादेखील शोधत असतात. अशा सर्वांना तोंड देऊन तो कसा निसटतो ही एक अतिशय रोमहर्षक कथा आहे. जरुर वाचावी. युद्धकथा वा पलायनकथा वाचायला आवडणार्‍या वाचकांचा अपेक्षाभंग होणार नाही हे खात्रीने म्हणू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नजदीककुमार जवळकर

सचिन पिळगावकर यांचे

नजदीककुमार जवळकर
गुरुवार, 12/01/2011 - 09:50 नवीन
सचिन पिळगावकर यांचे आत्मचरित्र असेल तर बघा .. कदाचित १०० रु. मिळेल .. खी खी खी
  • Log in or register to post comments

आवर्जून वाचा

sagarpdy
गुरुवार, 12/01/2011 - 11:50 नवीन
चंपक, ठक-ठक, चांदोबा, हिमगौरी आणि सात बुटके, ईसापनिती, हितोपदेश, प्रयोग करू विज्ञान शिकू, आपडी-थापडी, लोकप्रिय बडबड गीते, इत्यादी
  • Log in or register to post comments

हायला ! हा पियुशा चा डुप्लीकेट आयडी आहे काय ? ;-)

वाहीदा
गुरुवार, 12/01/2011 - 12:59 नवीन
चंपक, ठक-ठक, चांदोबा, हिमगौरी आणि सात बुटके, ईसापनिती, हितोपदेश, प्रयोग करू विज्ञान शिकू, आपडी-थापडी, लोकप्रिय बडबड गीते, इत्यादी हायला ! हा पियुशा चा डुप्लीकेट आयडी आहे काय ? ;-) शक्यता नाकारता येत नाही ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

तो मी नव्हेच !

sagarpdy
गुरुवार, 12/01/2011 - 13:05 नवीन
तो मी नव्हेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

तो मी नव्हेच ????

चिंतामणी
Fri, 12/02/2011 - 14:28 नवीन
तो????? तु "तो" असणे शक्य नाहीच. कारण पियुषा "ती" आहे.:p :-p :tongue:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

सौरभ आणि नंदन

मैत्र
गुरुवार, 12/01/2011 - 12:32 नवीन
मागे पुस्तक आणि वाचनाचे काही धागे होते... मला वाटतंय सौरभच असावा. त्याचा व्यासंग पाहून अगदी थोरामोठ्यांनीही दंडवत घातला होता.. नंदनचे पण एक दोन धागे होते असेच जबरदस्त.. कोणी जमल्यास त्याचा लिंका द्या... जुन्या वाचनखूणा उडाल्या आहेत. आणि अमित -- नंदनचा ब्लॉग पहा... marathisahitya.blogspot.com/ काय वाचावं आणि त्यात काय खरंच पहावं / शोधावं/ समजून घ्यावं याची काही दिशा मिळेल... बरेच काही उगवून आलेले हा केवळ अप्रतिम लेख आहे... अर्थात राहवत नाही म्हणून आवडलेल्या काही पुस्तकांची यादी - १. गोनिदांची सगळीच -- विशेषतः माचीवरला बुधा, मृण्मयी, शितू, पडघवली, कुण्या एकाची भ्रमणगाथा, रानभुली, जैत रे जैत, दास डोंगरी राहतो, देवकीनंदन गोपाळा २. पु. ल. देशपांडे -- काही सांगण्याची गरज नाही ३. आनंद यादव -- चार पुस्तकं आहेत टप्प्या टप्प्याने जाणारी आत्मकथा -- झोंबी, नांगरणी,चारभिंति आणि काचवेल. ४. प्रकाश नारायण संत -- लंपन ची सगळी पुस्तकं ५. ना. सं. इनामदार -- शहेनशहा, झुंज, राऊ ६. रणजित देसाई - स्वामी, श्रीमान योगी ७. गंगाधर गाडगीळ -- दुर्दम्य ८. विजय देवधर -- डेझर्टर ९. पॅपिलॉन १०. विश्वास पाटील -- पानिपत, झाडा झडती, महानायक ११. शिवाजी सावंत -- युगंधर, मृत्युंजय, छावा १२. साधनाताई आमटे - समिधा आठवतील तशी लिहितो ...
  • Log in or register to post comments

गोनिदा

आनंदी गोपाळ
गुरुवार, 12/01/2011 - 21:36 नवीन
महाराष्ट्र दर्शन राहिलं! अन नॉस्टाल्जिया म्हणूनः ते समिधा मला ८वीत शाळेत पहिला आलो म्हणून बक्षिस मिळालं होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

माणदेशी माणसं - व्यंकटेश

रम्या
गुरुवार, 12/01/2011 - 15:49 नवीन
माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर रानवाटा - मारूती चितमपल्ली पाखरमाया - मारुती चितमपल्ली शब्दांचे धन - मारुती चितमपल्ली जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली हसणावळ - द. मा. मिरासदार हुबेहुब - द. मा. मिरासदार
  • Log in or register to post comments

यादी आवडली

सागर
Mon, 01/23/2012 - 16:21 नवीन
रम्या, तुमच्या यादीत माडगूळकर पाहून सुखावलो तरी माडगूळकरांची अजून २ पुस्तके येथे सुचवावीशी वाटतात. कोवळे दिवस आणि सत्तांतर या कलाकृती देखील त्याच तुलनेने सुंदर आहेत. मला त्यांची सत्तांतर सर्वात आवडली ( यासाठीच व्यंकटेश माडगूळकरांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे) एकही संवाद नसलेली सत्तांतर अगदी छोटी कादंबरी असली तरी एका बैठकीत वाचून पूर्ण होते इतकी चित्तथरारक आहे. तीच गोष्ट कोवळे दिवसची देखील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या

भालचन्द्र नेमाडेची सर्व पुस्तके

कपिलमुनी
गुरुवार, 12/01/2011 - 16:51 नवीन
नक्की वाचा .. हिंदु सर्वात शेवटी वाचा ( वाचुन झाला कि निरोप धाडा)
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला

सागर
Mon, 01/23/2012 - 16:18 नवीन
भालचन्द्र नेमाडेची सर्व पुस्तके नक्की वाचा .. हिंदु सर्वात शेवटी वाचा ( वाचुन झाला कि निरोप धाडा) नेमाड्यांच्या इतर पुस्तकांतून जो बौद्धिक आनंद मिळतो तिथे हिंदू कमी पडते. कोसला, बिढार ,हूल,,जरिल, आणि झूल या कादंबर्‍यांच्या दर्जाची तुलना हिंदूशी होते. आणि मला वाटते त्यामुळेच अपेक्षाभंग होतो. नेमाडे न वाचलेल्या वाचकाला कदाचित हिंदू वेगळी वाटू शकेल. माझ्या संग्रहात भालचंद्र नेमाड्यांची जवळपास सर्व पुस्तके आहेत (हिंदू सोडून :) ) हिंदू नक्की घेणार आहे पण अजून काही दिवसांनी. बाकी कपिलमुनींचा प्रतिसाद आवडला आणि ते म्हणत आहेत त्यात तत्थ्य नक्कीच आहे. माझीही भावना अगदी अशीच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

शशी भागवत

साबु
Mon, 01/23/2012 - 14:51 नवीन
grathalay.org मधे बघितले असता मुम्बइ येथील बर्याच ठिकणी (कळवा, ठाणे) येथील नगर वाचन मन्दिरात काहि प्रती आहेत...इछुकानी प्रयत्न करावा...जमल्यास मलाहि द्या वाचायला :)
  • Log in or register to post comments

http://granthalaya.org

साबु
Mon, 01/23/2012 - 14:52 नवीन
.
  • Log in or register to post comments

बरीचशी पुस्तके इथे

झुळूक
Fri, 01/27/2012 - 19:36 नवीन
बरीचशी पुस्तके इथे मिळतील- http://www.flipkart.com/books/marathi मी खुप वेळा order दिलेली आहे,cash on delivery option is good. Reliable service
  • Log in or register to post comments

पुस्तकांवर खूप दिवस झाले

सुजित जाधव
Sun, 11/20/2022 - 19:08 नवीन
पुस्तकांवर खूप दिवस झाले चर्चा झालेली नाही आणि मला पण काही पुस्तके घ्यायची आहेत म्हणून हा धागा उकरून काढतोय.. मी वपुंची ही वाट एकटीची, मी माणूस शोधतोय, पार्टनर, बाई बायको कॅलेंडर ही पुस्तके वाचली आहेत, अजून कोणती वाचावीत.. त्यांची रंगपंचमी, सखी, रंग मनांचे, दोस्त, तप्तपदी ही पुस्तके कशी आहेत.. आधी कोणती वाचायला घेऊ. पु. ल., वि. स. खांडेकर, रणजीत देसाई यांचे प्रसिद्ध साहित्य वाचलं आहे. स्वामी, श्रीमान योगी ई. ऐतिहासिक पुस्तके वाचली आहेत. (सध्यातरी ऐतिहासिक पुस्तके वाचायला पुरेसा वेळ नाही त्यामुळे निवांत वेळ काढूनच वाचायचं ठरवल आहे.) सुशिंची दुनियादारी, दास्तान, ऑर्डर ऑर्डर, समांतर ही पुस्तके वाचली आहेत, आणखी कोणती वाचू? या व्यतिरिक्त उपरा, कोल्हाट्याचे पोर, शाळा, एक होता कार्व्हर हीपण वाचलीत. २०० ते ३०० पानांची रहस्यमयी किंवा शाळा, दुनियादारी सारखी शालेय/महाविद्यालयीन जीवनाचे वर्णन करणारी कोणती पुस्तके सुचवाल? याव्यतिरिक्त जी. ए. कुलकर्णी, गदिमा, विजय तेंडुलकर, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, विश्वास पाटील, दांडेकर, विंदा करंदीकर, व्यंकटेश माडगुळकर या लेखकांची कोणती पुस्तके/कादंबऱ्या सुचवाल..
  • Log in or register to post comments

ही सर्व १९७० घ्या अगोदरची आहेत.

कंजूस
Mon, 11/21/2022 - 07:16 नवीन
एखाद्या जुन्या वाचनालयाचे सभासद व्हा. पुस्तके विकत घेण्यापेक्षा बरे पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

मुरलीधर खैरनारांची "शोध" ही

श्रीगुरुजी
Sun, 11/20/2022 - 19:37 नवीन
मुरलीधर खैरनारांची "शोध" ही खूपच उत्कंठावर्धक रहस्यमय कादंबरी आहे.
  • Log in or register to post comments

लेखकांची नावे नावे पाहिजेत

चौकस२१२
Tue, 11/22/2022 - 07:10 नवीन
मला पण हा प्रश्न आहे पण मला अलीकडच्या काळातील लेखकांची नावे नावे पाहिजेत ( खालील यादीतील वगळून) व्यनि करावा माझी आवड खालील प्रकारचाय लेखकयांचं लेखनाची आहे खानोलकर प्रकाश नारायण संत जयवंत दळवी श्री ना पेंडसे माड्गुळकर जी ए कुलकर्णी रहस्य कथेत फारसे गम्य नाही . प्रवास वर्ण पण नको अम्तचरित्र= व्यक्तीवर अवलंबून राजकीय चालेल
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा