रेखीव
घडे काय हे; ना कळे योजना ही
उभा ज्येष्ठ रावा; कुणी हाक मारी
मिळे कोपर्याला नव्याने उभारी
उधाणून ऊर्मी उमलली दुपारी
गाभ्या तळाशी किती रत्नराशी
लयधुंद वलये तरीही उराशी
अंगी दुरावा कसा हा म्हणावा
रेखे कुणी पापणी-आत नक्षी
स्मिताची कळी अंगणी अंग जाळी
नयनी खुळी ओढ नवती निराळी
अव्हेरू कसे आवरू वा कसे
गुंतला व्याध पाशात भुलला अवेळी
.....................अज्ञात
अव्हेरू कसे आवरू वा
मस्त
सुंदर! आणि रेखिव!!
गाभ्या तळाशी किती
फारच छान.. आवडली.