मागे वळून पाहताना
आज पुन्हा क्षणभर, मी थबकले
याच ठिकाणी पूर्वी, मी तुला भेटलेले
हलकेच झाली पानांची सळसळ
हृदयात माझ्या पुन्हा ती खळबळ
इतक्या दिसांनी मी परत जुनेच हसले
हरवलेले ते प्रेम, कधीच नव्हते मिळाले
तू नि मी, इथूनच, येण्यासाठी निघालो
वचने देऊनही, पुन्हा कधीच नाही भेटलो
वाट तुझी पाहून मी होते थकले
ना कळे तू प्रेम आपले, कुठे हरवले ?
किती दिवस न रात्री, मी एकटीनेच पाहिल्या
तुझ्याविनाच सर्व आठवणी पुनःपुन्हा आठवल्या
दूरवर कुठेच तुझी चाहूल नव्हती
सगळे आप्तेष्ट मात्र मला सतावत होती
काय त्यांना सांगावे कळेना
कुठे तुला शोधावे, उमजेना
मी पण मग माझ्यावर चिडले
पुन्हा एकदा मनाविरुद्ध लढले
जुन्या आठवणींना कोंडून टाकले
नव्याने मी परत उभी ठाकले
अवघड दिवस ते तसेही होते
पण नवी नाती मनही खुलवते
ठरवून काहीच घडले नव्हते
अकल्पित सारे हरवले होते
आयुष्याने मला परत वेगळे रंग दाविले
त्या रंगात मी, खरंच मनापासून रंगले
आज ते पण सारे आठवले
तुझे स्वप्न मात्र धूसर झालेले ....
छान ..
छानच. किती दिवस न रात्री, मी