गरजूला मदत करावी का?
गरजूला मदत करावी काय? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी काहीजण लगेच "हो" असे देतील.
आता हा गरजू जर "पाकिस्तान" असेल, तर आपले धोरण काय असावे?
http://72.78.249.107/esakal/20111102/5137155085083760384.htm इथे छोटिशी बातमी वाचायला मिळाली.
पाकिस्तान आपल्याकडे वीजेची मागणी करु शकते.
अर्थातच आपण वीज देणार म्हणजे निव्वळ जनहितार्थ देणार असे नाही. ती वीज"विक्री"च असेल. पण सध्या आपले आणि "त्यांचे" संबंध लक्षात घेता, हे करणे पटते का? आपण स्वतःच पाकिस्तानमार्गे येणार म्हणून इराणच्या अत्यंत उपयुक्त, किफायतशीर इंधनाच्या पापलाइनला टाळतोय. ह्याहून अधिक सांगण्याची ती काय गरज? शेजारी देश आणि आपले संबंध कसे आहेत, ह्यावार आधीच इथे प्रचंड चर्चा झाली आहे. ते पुन्हा लिहायची गरज वाटत नाही.
एक गट भावनिकतेतून म्हणतो की हा आपला शत्रू आहे. शत्रूशी संबंध ठेउ नयेत.
दुसरा मुत्सद्द्यांचा गट म्हणतो की असे हितसंबंध गुंतवणे हा कलह शांतपणे सोडावायचा व कलहात आपली कमीत कमी हानी करून घेण्याचा राजमार्ग आहे. जर आपली भरपूर देवाण घेवा॑ण असेल, तिथली अर्थव्यवस्था व समाजजीवन मोठ्या प्रमाणावर आपल्यावर अवलंबून असेल, तर तिथल्या जनतेलाच आपल्याशी वैर परवडणार नाही. शिवाय योग्य त्या वेळी आपल्याला त्यांचे नाक दाबायचीही सोय होइल.(कारण आपली अर्थव्यवस्था कैकपट मोठी आहे.)
साधारणतः ह्याच भावनेतून पाश्चात्त्य देशांनी, "दोस्त राष्ट्रांनी" दुसर्या महायुद्धानंतर आपले आर्थिक संबंध गुंतवून घ्यायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रिओय पातळीवर ह्या गोष्टीचा पुरस्कार केला.
एक उदाहरण म्हणजे आज ते वीज घेताहेत व हळुहळु संबंध वाढत जाउन त्यांची निदान काही भागातली का असेना जनता मोठ्या प्रमाणात आपल्यावर अवलंबी होणार. त्यावेळेस जर ह्यांनी कुरापत काढली, तर एक गोळीही न चालवता आपण फक्त सप्लाय थांबवून त्यांना बेजार करु शकतो.(अमेरिका-चीन आपसात असेच काही करत कुरघोडी करायचा छुपा प्रयत्न करताना सतत दिसतात.)तसेही प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता आपण नगण्ञच धरून चाल्लोत.थोडक्यात, वीज हे एक अदृश्य हत्यार असेल.
अजून एक आयाम म्हणजे, मुळात भारतात स्वतःलाच पुरेल इतकी वीज नाही. मग दुसरीकडे कशाला द्यावी? ह्या अजस्त्र विक्सनशील अर्थव्यवस्थेची उर्जाभूक दिवसेंदिवस तशीही वाढनारच आहे.
तुम्हांस काय ठीक वाटते?
प्रतिक्रिया
आपल्याकडे
आपल्याच आडात वीज कमी असताना
सहमत
दुखरी नस..