✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लोकसंख्येच्या भस्मासुरावर उपाय : तिसरे मूल झाल्यास जेलमध्ये ? -

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Fri, 09/30/2011 - 15:58  ·  लेख
लेख
केरळात तिसरे मूल झाल्यास तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. हा कायदा केरळातच नव्हे तर काश्मीर राज्य सहीत संपूर्ण भारतात कोणती ही सवलत न देत त्वरित लागू करावा... त्याच बरोबर जमीन माफियांनी आणि घरमालकांनी घरांचे जमिनीचे अवास्तव महत्व वाढवत जमिनीचा गुंतवणुकी साठी वापर करत जमिनीच्या किमती आकाशाला नेऊन ठेवल्यात. घरा करता कीती जागा वापरावी, एकाच्या नावावर कीती घरे असावी , मोकळे प्लॉट कीती असावे यावर कोणते ही कायद्याने बंधन नाही. या मुळे सामान्य जनतेस घरे मिळणे अवघड झाले. तरी सरकारने हे कायदे त्वरित अंमलात आणावे. - www.divyamarathi.bhaskar.com
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12904 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

दोन्ही मुद्दे बरोबर

चेतन सुभाष गुगळे
Sun, 10/02/2011 - 12:45 नवीन
प्रस्तुत धाग्यात दोन महत्वाच्या मुद्यांना वाचा फोडली आहे. १. लोकसंख्यावाढ २. जागेची टंचाई असताना काहींची जागेबाबतची तीव्र हाव हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी संबंधितच आहेत, त्यामुळे या दोन्ही मुद्यांचा एकत्रित विचार एकाच धाग्यात केला गेला आहे ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. लोकसंख्या वाढीमुळे स्त्रोतांची (अन्न, वस्त्र, निवारा, इंधन, इत्यादी) मागणी वाढते आणि तेवढा पुरवठा नसल्याने टंचाई जाणवत राहते. त्याचप्रमाणे काहींची राक्षसी हाव ही देखील स्त्रोतांच्या टंचाईला कारणीभूत ठरते. जसे की गरिबाचे एक कुटुंब (पाच जण) १२५ चौरस फुटांच्या जागेत राहतात तर एखाद्या श्रीमंत व्यक्तिला २५००० फुटांचा एक बंगला देखील पुरत नाही. त्याचे एकाहून अधिक बंगले एक वा अनेक शहरात असतात. त्याचप्रमाणे अन्नधान्य, कपडे, वीज, इंधन यांचीही हे लोक सामान्यजनांच्या तूलनेत अधिक नासाडी करतात. तर तिकडे गरीब लोक कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढवितात (उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबात १०-१२ मुले) आणि त्यामुळे देखील स्रोतांची मागणी वाढत जाते. लोक संख्या नियंत्रणात आणणे आणि असलेल्या लोकसंख्येच्या स्त्रोतांच्या गरजेवरही एका कमाल मर्यादेचे बंधन आणणे या दोन्ही उपायांची गरज आहे. अर्थात हे दोन्ही उपाय अतिशय संयमाने व हळुहळू अंमलात आणणे गरजेचे आहे. तुरूंगात टाकण्यासारख्या टोकाच्या पर्यायाची सध्या लगेच गरज नाही. परंतू सुरुवातीला काही facilities कमी करण्यासारखे सौम्य उपाय अंमलात आणले जाऊ शकतात.
  • Log in or register to post comments

अतिशय संयमाने व हळुहळू अंमलात

अप्पा जोगळेकर
Sun, 10/02/2011 - 13:53 नवीन
अतिशय संयमाने व हळुहळू अंमलात आणणे गरजेचे आहे आत्ता जे उपाय योजलेले आहेत ते अति हळुवार उपाय आहेत असेच वाटते. संजय गांधीं यांच्या काही कॄत्यांची राहून राहून आठवण येते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

पुष्कळ मुले असण्याचे फायदे व तोटे

चित्रगुप्त
Sun, 10/02/2011 - 21:24 नवीन
पुष्कळ मुले असण्याचे फायदे व तोटे वेगवेगळ्या (परिस्थितीतील) लोकांसाठी वेगवेगळे असतात असे दिसून येते. उदा. सुशिक्षित शहरी जोडप्याला दोन मुले खूप वाटतात, त्यांचे व्यवस्थित शिक्षण करणे वगैरेही खूपच खर्चाचे असते, मोठी झाल्यावर ती दूर होतात, कित्येकदा त्यांचा म्हातारपणी आधार मिळतही नाही. याउलट अशिक्षित लोकांना पुष्कळ मुले होणे हे फायद्याचे वाटते, कारण सात-आठ वर्षाचे झाल्यावर ते मूल कमवू लागते, शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न नसतो, कारण शिकवायचे नसतेच. पुष्कळ मुले असली, तर म्हातारपणी त्यातील निदान एखादे तरी आधार देइल, अशी आशा असते. अर्थात सर्वच दृष्टीने कमी मुले असणेच योग्य, असे असले तरी अनेकांना तसे वाटत नसते, ही वस्तुस्थिती. फ्रान्स मध्ये तिसरे मूल झाल्यास सरकार जास्त सोयी देते, उदा. त्या मुलाचे शिक्षण फुकट होते, वगैरे. :) :) आपल्या सरकारने फ्रान्स सारख्या देशांशी करार करून तीन मुले असलेल्यांना त्या देशाचे नागरिकत्व मिळेल, अशी सोय करावी... :) :)
  • Log in or register to post comments

गांधारीला १०० अपत्ये का बरं

आशु जोग
Sun, 10/02/2011 - 21:32 नवीन
गांधारीला १०० अपत्ये का बरं झाली असतील ? आणि कर्णासकट पांडवही ६ म्हणजे खूपच झाले ना !
  • Log in or register to post comments

नाही!

प्रियाली
Sun, 10/02/2011 - 21:45 नवीन
पांडव सहा असले तरी कुंतीचे ३ (ओढून ताणून कर्णाला बसवू नये कारण त्याची जबाबदारी कुंतीने घेतली नाही आणि त्याला सांभाळणारे आईवडिल होते.) आणि माद्रीचे दोन. त्यामुळे माद्री जेलमध्ये जाऊ शकत नाही. कुंतीच्या पुत्रांचे बाप वेगवेगळे असल्याने ते ही जेलमध्ये जाऊ शकत नाहीत.... गेलीच बिचारी तर कुंती जाऊ शकेल. ;-) टाकताय का तिला जेलमध्ये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

वसुदेव व देवकीला तुरुंगातच मुले झाली...

चित्रगुप्त
Sun, 10/02/2011 - 22:39 नवीन
या कायद्याचा मूळ जनक कंसमामा असावा, कारण वसुदेव व देवकीला तुरुंगातच मुले झाली... हा कायदा झाला तर तुरुंगात अश्या कैद्यांसाठी वेगळ्या सोयी (उदा. जोडपे व सात - आठ मुले राहू शकतील अश्या प्रशस्त कोठड्या इ.) कराव्या लागतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

मान्य ! पण इथे जेलरची पन

आशु जोग
Sun, 10/02/2011 - 23:23 नवीन
मान्य ! पण इथे जेलरची पन चुकी आहे हम अंग्रेजों के जमाने के जेलर है म्हणणारा कुणी हवा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कुंतीपण जेलमध्ये जाणार नाही...

योगप्रभू
Sun, 10/02/2011 - 23:34 नवीन
कुंतीने मुलांना जन्म देतेवेळी हा कायदा अस्तित्वात नसल्याने त्याखाली तिला शिक्षा दिली जाणार नाही. तरीपण ती काही प्रश्न जरुर उपस्थित करु शकेल. कायदा सर्वांसाठी समान असेल तर १) गंगेने ८ मुलांना जन्म दिला. (७ मुले स्वतःच मारुन टाकली.) तिचे काय करणार. २) देवकीने ८ मुलांना जन्म दिला (त्यातील ७ कंसाने मारली.) तिचे काय करणार? ३) १०० मुले व एक मुलगी अशी १०१ अपत्ये असणार्‍या गांधारीचे काय करणार? ४) १०० पुत्र असणार्‍या वसिष्ठ ऋषींचे काय करणार ५) ६०००० मुले असणार्‍या सगर राजाचे काय करणार? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

प्रकाटाआ

प्रियाली
Fri, 10/07/2011 - 01:10 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

६०००० मुले ......

शाहिर
Sun, 10/02/2011 - 23:42 नवीन
इथे शब्द आणि मती ( कॅलक्युलेशन) कुंठीत झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

माता राबडीदेवी बिहार

आशु जोग
Mon, 10/03/2011 - 23:18 नवीन
माता राबडीदेवी बिहार राज्याच्या सुविद्य मुख्यमंत्री यांना तर आजच्या काळात ११
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा