✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझं हे सारं सामान गं सखू...

ध — धन्या, Tue, 09/20/2011 - 15:07
बाजाराला निघालो मी घाई घाई, पिशवीची आठवण राहीलीच नाही सामान माझं सारं आहे थोडं खाली, तू जराशी वाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? तालुक्याच्या बाजाराला लागलाय सेल, केली खरेदी मी बराच वेळ माझं सामान झालंय बरंच मोठं, पिशवी जराशी फाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? वाण सामान आणि ताजा भाजीपाला, मासोळीचाही मी बाजारहाट केला ताजा, कडक बोंबील माझा, तुझ्या पापलेटनी झाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? सांगत असतो धन्या तो मला, पिशवी नेत जा रे नेहमी बाजाराला वापरू नये कधी हात सामानाला, आतापुरतं तू झाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?

प्रतिक्रिया द्या
52653 वाचन

💬 प्रतिसाद (91)

काय

नितिन थत्ते
Tue, 09/20/2011 - 15:11 नवीन
काय धनाजीराव? प्रवास जास्त झाला वाटतं ! ;)
  • Log in or register to post comments

खपलो

प्रचेतस
Tue, 09/20/2011 - 15:15 नवीन
खपल्या गेलो आहे. _/\_ धनाजीराव, आमचा दंडवत घ्यावा.
  • Log in or register to post comments

कविता प्रवासानंतर सुचली की

अन्या दातार
Tue, 09/20/2011 - 15:21 नवीन
कविता प्रवासानंतर सुचली की प्रवासादरम्यान??
  • Log in or register to post comments

कविता प्रवासानंतर सुचली की

धन्या
Tue, 09/20/2011 - 15:48 नवीन
कविता प्रवासानंतर सुचली की प्रवासादरम्यान??
प्रवासामध्ये झालेली सामानावरची चर्चा, कालचा आयटमला काय म्हणता वाला धागा, आणि मी ऐकत असलेली शिंदे बंधूंची अजरामर गीते अशा सार्‍यांचा एकत्रित परीणाम होऊन ही कविता सुचली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

_/\_ कमाल केलीत धनाजीराव

मालोजीराव
गुरुवार, 09/22/2011 - 23:08 नवीन
_/\_ कमाल केलीत धनाजीराव 'कामावर जायला ....रिक्षावाला' आणि 'तुझा झगा ग' याच्या मुस्कटात मारणारं गीत आहे......चाल बिल लावली कि नाइ अजून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हा हा हा हा हा

स्पा
Tue, 09/20/2011 - 15:24 नवीन
हा हा हा हा हा
  • Log in or register to post comments

ओय छुपे रुस्तम.

किसन शिंदे
Tue, 09/20/2011 - 15:35 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments

जमलयं

मी-सौरभ
Tue, 09/20/2011 - 17:37 नवीन
फक्कड काव्य जमलयं..... ;) कधी? कुठे?? या परीस काय सुचलं हे म्हत्वाच...
  • Log in or register to post comments

हा हा हा ... फुटलो

सुहास झेले
Tue, 09/20/2011 - 17:43 नवीन
हा हा हा ... फुटलो :D :D :D
  • Log in or register to post comments

फक्कड

राजेश घासकडवी
Tue, 09/20/2011 - 17:53 नवीन
फक्कड कविता. बाजूच्या ज्ञानेश्वर तुकारामांना काढून टाकावं या सूचनेवर विचार करतोय. (पळा आता, नाहीतर ओव्यांची फोडणी मिळतेय...)
  • Log in or register to post comments

तुकारामांचा फोटो ठेवता येईल

स्वानन्द
Tue, 09/20/2011 - 17:57 नवीन
तुकारामांचा फोटो ठेवता येईल बहुतेक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सहमत आहे...

धन्या
Tue, 09/20/2011 - 18:24 नवीन
तुकाराम अध्यात्माच्या मार्गाला लागण्याच्या आधी वाण-सामानाचे व्यापारी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

+१

सूड
Tue, 09/20/2011 - 18:03 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मेलो!

धमाल मुलगा
Tue, 09/20/2011 - 18:32 नवीन
आजपासून तुमचं नाव 'धनाजी शिंदे' :D -(रेतीवाला) ध.
  • Log in or register to post comments

मेलो मेलो मेलो .... वाचवा

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/20/2011 - 19:29 नवीन
:-D मेलो मेलो मेलो .... वाचवा वाचवा वाचवा... कामाक्षीप्रीय काममय कामोत्तम कामोत्सुक कामेश्वर मि.धनाजी राव वाकडे...यांस :bigsmile: हसुन हसुन अडव तिडव पडून गडबडा लोळून ...नंतर प्रत्येक कडव्यातल्या दुसय्रा ओळी साठी ;-) शिर सा-ष्टांग नमस्कार.... आज आंम्ही हसुन हसुन मरणार,आणी वरती गेल्यावर तिथुन धनाजी रावांवर पुष्पाचा वर्षाव करणार... ''पुष्पाचा''--आरं तिच्यायला अनुस्वार ह्रायला की राव ;-) स्वारी हो.. पुष्पांचा ...अता अनेकवचन..बोंबल्लं...आज काही कुठल्याही वाक्याचा सरळ अर्थ लागायचा योग दिसत नाहीये .... धनाजी राव,तुमचा रोग आमाला झाला हो... @-आजपासून तुमचं नाव 'धनाजी शिंदे' ... :-D ध मु शी +१०००००००००००००००००००००००००००००० टक्के सहमत अवांतर- या कवितेसाठी,,,पुनर्भेटीत आमच्या कडुन तुंम्हाला येक ''खटाक'' लव्हें-डर अत्तर भेट देण्याचे याच धाग्यावर ठरवीत आहे... कुठं भेटायचं?त्ये तुंम्ही सांगा... :-)
  • Log in or register to post comments

दोन तीन दिवसांपासून पाहतोय!

Nile
Wed, 09/21/2011 - 01:14 नवीन
भटजीबुवा भलतेच रंगेल दिसतां हां!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चांगलेच दिवे लावतात. जबरा

पाषाणभेद
Wed, 09/21/2011 - 02:14 नवीन
चांगलेच दिवे लावतात. जबरा काव्य धनाजी वाकडे :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

नायल्या ...हे घे स्पष्टीकरण ;-)

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/21/2011 - 18:16 नवीन
@---दोन तीन दिवसांपासून पाहतोय! तुंम्ही मला फारच निरखुन पहाताय.... ;-) आरश्यात पाहिल्या सारखं वाटत असेल नाइ....(ल्या) ....... :-p अवांतर-या खेळांचा कंटाळा आल्यावर लोक करतात पूजापाठ आमी बी तिकड कंटाळलो,की फोडतो कदीकदी इश्काचा माठ :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

भां** बा***!!!! =)) =))

बिपिन कार्यकर्ते
Tue, 09/20/2011 - 19:47 नवीन
भां** बा***!!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

चांगलं हाताळलंय

Nile
Wed, 09/21/2011 - 01:13 नवीन
हे काव्य चांगलं हाताळलंय! लै भारी हो धनाजीराव.. तुकारामाचे अभंग पाठ करायला सांगितले होते त्याचा फायदा झालेला दिसतो! ;-) चालूंदे चालूंदे, आराधना चालूंदे!
  • Log in or register to post comments

माताय

पप्पु अंकल
Sat, 01/19/2013 - 20:15 नवीन
खरोखरच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मिपा पुन्हा मुळ चांगल्या

५० फक्त
Wed, 09/21/2011 - 07:40 नवीन
मिपा पुन्हा मुळ चांगल्या रुपात येताना बघुन बरं वाटलं.
  • Log in or register to post comments

_/\_

ऋषिकेश
Wed, 09/21/2011 - 09:09 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

वात्स्यायनपुरी नामक नगरी

चित्रगुप्त
Wed, 09/21/2011 - 11:57 नवीन
श्री श्री श्री १०८ धनाजीस्वामी चाळेकुन्द्रीकर महाराज यांस शिरसाष्टांग दंडवत. स्वित्झर्लंड मधील अतिरम्य दरीत एक नवीन वात्स्यायनपुरी नामक नगरी उभारण्यात येत आहे. जगभरातील अगदी खास व्यक्तींनाच हिचे नागरिकत्व देण्यात येत आहे. या नगरीत आपला आश्रम उभारून अन्य नागरिकांना प्रेरणाप्रद मार्गदर्शन द्यावे, म्हणून विशेष आमंत्रण पत्र आपणास लवकरच पाठवण्यात येत आहे. आपण स्वीकार कराल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

अहो त्यांना कसले आमंत्रण

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/21/2011 - 12:11 नवीन
अहो त्यांना कसले आमंत्रण देताय... त्यांचेच आहे ते प्रोजेक्ट म्हणे! ;) चाळेकुंद्रीकर : =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

स्वित्झर्लंड मधील अतिरम्य

धन्या
Wed, 09/21/2011 - 12:52 नवीन
स्वित्झर्लंड मधील अतिरम्य दरीत एक नवीन वात्स्यायनपुरी नामक नगरी उभारण्यात येत आहे. जगभरातील अगदी खास व्यक्तींनाच हिचे नागरिकत्व देण्यात येत आहे.
बिपिनरावांनी वस्तूस्थितीवर प्रकाश टाकलाच आहे. आमच्या स्वप्नातल्या त्या प्रोजेक्टचं काम चालू असतानाच आम्हाला अचानक भारतात यावं लागलं. लोकांना आसनं शिकवण्याचं महान कार्य सोडून देऊन आमच्या कामदेवबाबांना देशाला भ्रष्टाचामुक्त सरकार दयायचे डोहाळे लागले. त्यामुळे यावं लागलं. असो. आता मेनका सावंत त्यांच्याकडे जातीने लक्ष देत असल्यामुळे ल्वकरच आम्ही स्वितझरलंडात येत आहोत "रुद्र्पुजा" करण्यासाठी. तेव्हा भेटूच. आपलाच, श्री श्री श्री १०८ धनाजीस्वामी चाळेकुन्द्रीकर महाराज कामकोटी पीठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आय्य्चा घो... जाम फुटलो...

शैलेन्द्र
Wed, 09/21/2011 - 13:07 नवीन
आय्य्चा घो... जाम फुटलो... वाइट्ट बेक्कार.. आनंद शिंदेसारख रेकुन म्हणायचा प्रयत्न चालु आहे..
  • Log in or register to post comments

झ्यॅक हाय!

दिपक
Wed, 09/21/2011 - 13:38 नवीन
Image removed. :)
  • Log in or register to post comments

वाकडे, वाकडे, वाकडे, कमाल

नगरीनिरंजन
Wed, 09/21/2011 - 15:00 नवीन
वाकडे, वाकडे, वाकडे, कमाल केलीत तुम्ही! आज ह.भ.प. दादामहाराज कोंडके असते तर त्यांनी तुमच्यासाठी 'माझं सामान तुझी पिशवी' नावाचा चित्रपट काढून तुमच्या सामानाला ग्लॅमरस पिशवी देऊन तुमच्या मेहनतीचं 'चीज' केलं असतं! असो. गाणं अप्रतिम उतरलं असलं तरी सामानातून सांडलवंड होऊन पिशवी ओली होण्याबद्दल एकही अवाक्षर न काढल्याबद्दल निषेध! कविमनाच्या माणसाने असं दुसर्‍याच्या पिशवीबद्दल बेफिकीर असणं शोभत नाही!
  • Log in or register to post comments

"गाणं अप्रतिम उतरलं असलं तरी

शैलेन्द्र
Wed, 09/21/2011 - 15:59 नवीन
"गाणं अप्रतिम उतरलं असलं तरी सामानातून सांडलवंड होऊन पिशवी ओली होण्याबद्दल एकही अवाक्षर न काढल्याबद्दल निषेध! कविमनाच्या माणसाने असं दुसर्‍याच्या पिशवीबद्दल बेफिकीर असणं शोभत नाही!" तेल नी तुप, दुध नी दही, मावामिठाई घेतली काहीबाही, मधीच सांडायची धास्तीच ग, तु पिशवी धुवुन मागशिल का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? बघा जमतय तरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

झक्कास !!!

धन्या
Wed, 09/21/2011 - 17:15 नवीन
मस्त जमवलंय... आमचा वारसा चालवणारं कुणीतरी आहे. जसा शिंदे बंधूंचा वारसा आम्ही चालवत आहोत तसा आमचा वारसा तुम्ही चालवाल याची आम्हाला खात्री आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

वारसाच काय हो... अजुनही बरच

शैलेन्द्र
गुरुवार, 09/22/2011 - 15:15 नवीन
वारसाच काय हो... अजुनही बरच चालवतो आम्ही.. (बारश्यावाला) शैलेन्द्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

खतरी आहे!!

प्रभो
Wed, 09/21/2011 - 21:22 नवीन
खतरी आहे!!
  • Log in or register to post comments

__/\__

मेघवेडा
गुरुवार, 09/22/2011 - 22:52 नवीन
आरारा! बेक्कार! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

=))

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/23/2011 - 04:39 नवीन
बेक्कार
  • Log in or register to post comments

हसून पुरेवाट झाली आहे. कमाल

अप्पा जोगळेकर
Wed, 09/28/2011 - 20:37 नवीन
हसून पुरेवाट झाली आहे. कमाल आहे धनाजीराव .
  • Log in or register to post comments

मस्त

मी-सौरभ
Sat, 10/01/2011 - 17:47 नवीन
ह्या धाग्याने पन्नाशी पार न करताच हा जुना झाला????? हे बरं नाय हां.... धन्या: या कवितेवर गाणं काढणार आहेस त्याचं काय पुढे??? त्यात हीरो म्हणून वप्याला घे असं सुचवतो...
  • Log in or register to post comments

धन्या: या कवितेवर गाणं काढणार

धन्या
Sat, 10/01/2011 - 19:32 नवीन
धन्या: या कवितेवर गाणं काढणार आहेस त्याचं काय पुढे??? त्यात हीरो म्हणून वप्याला घे असं सुचवतो...
उत्तम सल्ला दिला आहे तुम्ही. सध्या चित्रीकरण सुरेख व्हावे यासाठी युटयुबवरील "वाट माझी बघतोय रीक्षावाला" या गीताच्या चित्रफीतीचा अभ्यास सुरु आहे. तो झाला की लगेच सखूच्या शोधाला लागू. हीरोच्या भुमिकेत तुम्ही म्हणताय तसा वप्या आहेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हीरोच्या भुमिकेत तुम्ही

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/02/2011 - 00:00 नवीन
हीरोच्या भुमिकेत तुम्ही म्हणताय तसा वप्या आहेच. ---आईईई....गं !काय हे ...?म्हणजे तुमचं काम काय नक्की यात? सखू अणी वप्याचं मनोमिलन? की त्या दोघांच्या मधे येणारा व्हिलन....? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

म्हणजे तुमचं काम काय नक्की

धन्या
Sun, 10/02/2011 - 01:01 नवीन
म्हणजे तुमचं काम काय नक्की यात?
आम्ही दिग्ददर्शक. आणि वप्या पडदयावर दिसणार आहे. आणि पडद्यावर दिसतं ते खरं नसतं. पडद्यामागे जे घडतं ते मात्र खरं असतं. तुम्ही सुज्ञ आहातच. बाकी सांगणे न लगे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@-आणि पडद्यावर दिसतं ते खरं

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/02/2011 - 15:27 नवीन
@-आणि पडद्यावर दिसतं ते खरं नसतं. पडद्यामागे जे घडतं ते मात्र खरं असतं.... म्हंणजे तुम्ही अभिषेक बच्चन आणी वप्या विवेक ओबेरॉय असच ना? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

- तसं तर तसं -

वपाडाव
Tue, 03/06/2012 - 18:40 नवीन
वप्या विवेक ओबेरॉय असच ना?
शराब छलक गइ तो क्या हुआ, लोग तो यही कहेंगे ना के प्याले को छुके निकली है !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खुप दिवसांनी वर आला हा

धन्या
Tue, 03/06/2012 - 23:22 नवीन
खुप दिवसांनी वर आला हा धागा. हे महान काव्य मीच लिहिलेलं असूनही वाचून बेक्कार हसतोय राव.. तेव्हा नेमकं असं काय झालं होतं ज्यामुळे मी हे काव्य प्रसवलो याचा विचार करतोय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

@तेव्हा नेमकं असं काय झालं

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/07/2012 - 00:40 नवीन
@तेव्हा नेमकं असं काय झालं होतं ज्यामुळे मी हे काव्य प्रसवलो याचा विचार करतोय. >>> ते अत्ता नै कळनार...! पुन्हा तसं झाल्यावरच कळेल...! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तेच म्हणतो

विजुभाऊ
Tue, 08/30/2022 - 14:49 नवीन
तेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

गुरुजी

मी-सौरभ
Wed, 03/07/2012 - 11:19 नवीन
काही गप्पांवर विश्वास ठेवला तर... धन्या: बिग ब आणि वप्या: अभिषेक ब अशीही जोडी जमवता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

धन्या: बिग ब आणि वप्या:

धन्या
Wed, 03/07/2012 - 12:30 नवीन
धन्या: बिग ब आणि वप्या: अभिषेक ब
बाकी काहीही म्हणा, ब नका म्हणू राव. ब म्हटलं की लोक अनिवाशी, आम्रिकावाले, तिकडचे असा उद्धार करतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हहहहाआआ हा धागा बघुन मला माझा

शैलेन्द्र
Wed, 03/07/2012 - 18:30 नवीन
हहहहाआआ हा धागा बघुन मला माझा धागा आठवला आणी तिथे ब वर्गातल्या लोकांशी झालेला वाद आठवला.. मजेदार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ढीसक्लेमर

मी-सौरभ
Wed, 03/07/2012 - 18:46 नवीन
माझ्या वरील प्रतिक्रियेतील ब म्हणजे बच्चन बरं का. उगाच माझा 'ब' कसा काय वापरला असा वाद करु नये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हा हा हा हा भारी

रेशा
Tue, 03/06/2012 - 23:36 नवीन
हा हा हा हा भारी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा