Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 16:33
काही वर्षांपूर्वी धनंजय यांनी एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ हा लेख मिपावर टाकला होता. त्या लेखावर नजर टाकली आणि थोडी आजूबाजूला फिरवली तर त्या लेखाचा उद्देश कळून येईल. हा लेख त्या लेखाचे विडंबन निश्चितच नाही पण त्या लेखाचे स्मरणरंजन म्हणता यावे. तर पुढे, "मी आलोच शेळीचे दूध पिऊन" किंवा "आज माझा उपास आहे" वगैरे खोचक वाक्ये मिपाची शान होते, गांधींच्या नावाची अ‍ॅलर्जी वगैरे असल्यासारखी काही माणसे वागत असत याला सर्व साक्षी आहेत. नथुरामने गांधीजींचा नाही तर गांधीवादाचा खून केला सॉरी सॉरी हत्या केली, सॉरी सॉरी वध केला वगैरे विधाने मिपावर चमकत असत. गांधीजींच्या राजकारणाने देशाचे नुकसान झाले वगैरे विषयांना १०० प्रतिसाद हमखास असल्याने आजही अशा विषयांची आठवण होते. कालपर्यंत अहिंसेने प्रश्न सुटणार नाहीत म्हणणारे, गांधींना आणि गांधीवादाला भंपक म्हणणारे त्यांच्यापैकीच काहीजण आज अतिशय प्रेमाने दुसर्‍या गांधीवाद्याबद्दल लेख टाकत आहेत. उपोषणापूर्वी राजघाटावर जाऊन चिंतन करणार्‍या या नेत्याच्या सेवाव्रताला सलाम ठोकत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देत आहेत, उपासाने त्यांच्या क्षीण होणार्‍या प्रकृतीची काळजी करत आहेत. भ्रष्टाचारावर अण्णांचा तोडगाच प्रभावी असल्याचे छातीठोक सांगत आहेत. अण्णांचा मार्ग हाच खरा मार्ग हे पटवून देण्याची अहमिका लागली आहे. उजवे-डावे सर्व एकत्र होऊन अण्णा विरोधकांचा समाचार घेत आहेत. गांधीवादाला सतत विरोध करणारे आणि यापूर्वी एका गांधीवाद्याची रेवडी उडवणारे आज दुसर्‍या गांधीवाद्याचा उदो उदो करत आहेत हे पाहून वैषम्य वाटले. याला नेमके काय म्हणावे असा प्रश्नही पडला.
  • मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत?
  • अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे?
  • आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत?
  • की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?
  • Log in or register to post comments
  • 16489 views

प्रतिक्रिया

Submitted by छोटा डॉन on Wed, 08/24/2011 - 16:48

Permalink

नव्हे ...

गांधीवादाला सतत विरोध करणारे आणि यापूर्वी एका गांधीवाद्याची रेवडी उडवणारे आज दुसर्‍या गांधीवाद्याचा उदो उदो करत आहेत हे पाहून वैषम्य वाटले. याला नेमके काय म्हणावे असा प्रश्नही पडला. •मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत? •अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे? •आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत? •की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?
नाही, ह्यातले काही असावे असे वाटत नाही. सध्या आम्हाला अज्जिबात वेळ नाही हे आमच्या सहभाग नसण्यामागचे कारण आहे. जर ही परिस्थिती आली नसती तर तुम्हाला हा धागा काढावा लागावा नसता, आम्ही अनेकांच्या 'अपेक्षा' जरुर पुर्ण केल्या असत्या ;) असो, सध्या चालु द्यात ;) - (हम नहीं बदलेंगे वाला)छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 08/24/2011 - 16:54

Permalink

प्रियाली-जी, तुमच्या सारख्या

प्रियाली-जी, तुमच्या सारख्या जुन्या (जाणत्या असे पण लिहिणार होतो पण नकोच, बर्‍याच लोकांचा आक्षेप असेल) सदस्येने असे लिहावे याचा खेद वाटला. गांधी विरोधक असतील, पण त्यांना का मन नाही? त्यांचे का मतपरिवर्तन होऊ शकत नाही? शिवाय आमच्या एका गुर्जींनी 'मोठे व्हा' चा एवढा सतत धोशा लावला होता की 'होतो मोठा, पण धोशा आवर' असंही त्यांना वाटलं नसणार का? हे मानवी मनाचे कंगोरे आता काय आम्ही तुम्हाला समजवून सांगायचे का? छे:, तुम्हारा चुक्याच!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/24/2011 - 16:54

Permalink

हम्म.

मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत? परिवर्तन हा तर सृष्टीचा नियम आहे, त्याला मिपा अपवाद कसे असेल....? अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे ? हम्म...! संदर्भ श्री अण्णांच्या आंदोलनाचा असेल तर लोकांना आपली चीड व्यक्त करण्याची एक योग्य पायवाट श्री अण्णांच्या आंदोलनातून दिसत आहे. अहिंसेचा आणि उपोषणाच्या मार्ग स्वीकारणार्‍याचा उद्देश अतिशय स्वच्छ आणि विश्वासास पात्र ठरणारा असा आहे असे वाटल्यामुळे लोक अहिंसेचे आणि उपोषणाचे समर्थन करत आहेत असे मला वाटते. आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत? निरंक की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे? निरंक अवांतर : रामलीला मैदानावर पोलिसांची संख्या वाढवण्याचे काय कारण असेल बरं...? [खरडवहीत सांगा रे कोणीतरी] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 17:01

In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

काय म्हणता?

परिवर्तन हा तर सृष्टीचा नियम आहे, त्याला मिपा अपवाद कसे असेल....?
लेख वाचलात ना??? तुमचे उत्तर सांगते आहे की मिपा गांधीवादी होऊ लागले आहे. ;) बाबौ!!
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 08/24/2011 - 17:04

In reply to काय म्हणता? by प्रियाली

Permalink

-१

>> तुमचे उत्तर सांगते आहे की मिपा गांधीवादी होऊ लागले आहे. चूक ! कदाचित ते बिरुटेसरांचे 'वैयक्तिक मत' असेल, होय ना सर ? ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 17:10

In reply to -१ by छोटा डॉन

Permalink

वैयक्तिक मत

कदाचित ते बिरुटेसरांचे 'वैयक्तिक मत' असेल, होय ना सर ?
वैयक्तिक मत असायला हरकत नाही पण ते मत संपूर्ण मिपाबद्दल आहे हे लक्षात घ्या कारण प्रश्न संपूर्ण मिपाबद्दल आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 08/24/2011 - 17:13

In reply to वैयक्तिक मत by प्रियाली

Permalink

तेच ते ...

>>वैयक्तिक मत असायला हरकत नाही पण ते मत संपूर्ण मिपाबद्दल आहे हे लक्षात घ्या कारण प्रश्न संपूर्ण मिपाबद्दल आहे तेच की, पण एकदा वैयक्तिक मत आहे म्हटल्यावर ते 'सत्य' असेलच ह्याची खात्री देता येत नाही आणि तशी आकडेवारीही मांडता येत नाही, वैयक्तिक हे वैयक्तिकच असते आणि ते कधीच कुणाचे 'सेम' नसते ;) असो, ते प्रातिनिधीक मत नाही हेच मला म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 17:14

In reply to तेच ते ... by छोटा डॉन

Permalink

हे तुमचे वैयक्तिक मत झाले

ते प्रातिनिधीक मत नाही हेच मला म्हणायचे आहे
हे तुमचे वैयक्तिक मत झाले. बाकी, आम्हाला बिरुटेसरांच्या मताचा आदर आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 08/24/2011 - 17:20

In reply to हे तुमचे वैयक्तिक मत झाले by प्रियाली

Permalink

तसे नाही ...

बिरुटेसरांनी स्वतः खुलासा केल्याशिवाय 'बिरुटेसरांचे मत प्रातिनिधीक नाही' ह्या माझ्या मताला 'वैयक्तिक' ठरवता येणार नाही. ते जर ते प्रातिनिधीक असल्याचे मान्य करत असतील तर मग चर्चा वेगळ्या अनुषंगाने पुढे सरकु शकते व तेव्हा आम्ही अशी ढीगभर 'वैयक्तिक' मते मांडु. तुर्तास बिरुटेसरांचा खुलासा येत नाही तोवर बिरुटेसरांच्या सो कॉल्ड प्रातिनिधिक मताबद्दलचे माझे मत हे 'वैयक्तिक' ठरु शकत नाही ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 17:23

In reply to तसे नाही ... by छोटा डॉन

Permalink

प्रश्न तो नाही

मत वैयक्तिक असण्याबद्दल प्रॉब्लेम नाही पण ते मत संपूर्ण मिपाबद्दल आहे हे सांगायचे आहे. आता शब्द निघून गेले आहेत, फिरवून फायदा नाही. म्हणून "लेख वाचला ना" असा प्रश्न सरांना केला होता. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 08/24/2011 - 17:28

In reply to प्रश्न तो नाही by प्रियाली

Permalink

तेच ना ...

>>मत वैयक्तिक असण्याबद्दल प्रॉब्लेम नाही पण ते मत संपूर्ण मिपाबद्दल आहे हे सांगायचे आहे. अहो तुम्ही काय म्हणत आहात ते मला समजते आहे. पण एखाद्याने संपुर्ण समाज/गट/संस्था ह्याबद्दल काही 'वैयक्तिक' मत बनवले तर त्याची व्याप्ती तितकीच रहाते असे आमचे म्हणणे आहे. उदा : क्रिकेट हा भिकारडा खेळ आहे असे आमचे 'वैयक्तिक' मत आहे पण त्याने क्रिकेट खरोखरच १००% भिकारडे होत नाही ;) भारतीय षंढ आहेत असेही काही जणांचे वैयक्तिक मत आहे पण त्याने समस्त भारतीय षंढ होत नाहीत ;) तात्पर्य असे की 'वैयक्तिक' मत हे तेवढ्याच व्याप्तीपुरते व्हॅलिड असते असे आमचे ठाम 'वैयक्तिक' मत आहे - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 17:30

In reply to तेच ना ... by छोटा डॉन

Permalink

हरकत नाही

तात्पर्य असे की 'वैयक्तिक' मत हे तेवढ्याच व्याप्तीपुरते व्हॅलिड असते असे आमचे ठाम 'वैयक्तिक' मत आहे
आमची चर्चाही तेवढ्याच व्याप्तीत आहे तेव्हा आता चर्चेशी संबंधित प्रतिसाद येऊ द्या. ;) संपादकांनी फार अवांतर लिहिलेले आम्हाला रुचत नाही बॉ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/24/2011 - 17:19

In reply to -१ by छोटा डॉन

Permalink

हो हो.

>>> कदाचित ते बिरुटेसरांचे 'वैयक्तिक मत' असेल, होय ना सर ? हो हो. ते माझं वैयक्तिक मत आहे. डॉन म्हणतोय तेव्हा बरोबरच असेल. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 08/24/2011 - 17:22

In reply to हो हो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

घ्या ...

धन्यवाद बिरुटेसर :) प्रियालीतै, बघा बरं आम्ही काय म्हणत होतो ते. ;) असो, आता गैरसमज मिटला ह्याचा आनंद आहे, 'भ्रष्टाचारमुक्त सरकार येऊ शकते व तसे पुढारी असु शकतात' असे गैरसमजही मिटले तर तत्सम आंदोलनांची व त्या अनुषंगाने येणार्‍या धाग्यांची गरजच पडणार नाही असे एक 'वैयक्तिक' मत मी इथे मांडतो. ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 17:28

In reply to घ्या ... by छोटा डॉन

Permalink

+१/-१

'भ्रष्टाचारमुक्त सरकार येऊ शकते व तसे पुढारी असु शकतात' असे गैरसमजही मिटले तर तत्सम आंदोलनांची व त्या अनुषंगाने येणार्‍या धाग्यांची गरजच पडणार नाही असे एक 'वैयक्तिक' मत मी इथे मांडतो.
असे गैरसमज मिटत नाहीत म्हणूनच धाग्यांची आवश्यकता भासते असे आमचे निदान आहे. बाकी, तुमच्या वैयक्तिक मताचा आदर आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/24/2011 - 17:16

In reply to काय म्हणता? by प्रियाली

Permalink

>>>> मिपा गांधीवादी होऊ लागले

>>>> मिपा गांधीवादी होऊ लागले आहे. मिपा हे कोणत्या एका विचाराचे आहे हेच मला मान्य नाही. वेगवेगळया वृती-प्रवृत्तीची माणसं इथे वावरतात. कोणी गांधीवादी आहे, कोणी डाव्या-उजव्या विचारांचे आहे, मिपावर असे कोणी आहे हे तर मला अजून कळले नाही. (असेल तर माहिती नाही) एक-एक विचार प्रत्यक्ष जीवनात येण्यासाठी तितका ध्येयवाद जिवनात यायला लागतो. आपण इथे सर्व समवयस्क लहान-थोर अजून विचारांच्या बाबतीत शिकतोय, समजून घेतोय असे मला वाटते. असो, बाकी, चालू द्या......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 08/24/2011 - 17:33

In reply to >>>> मिपा गांधीवादी होऊ लागले by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

डावा

मी ना डावा ना उजवा मी आपला 'मधला'
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 17:34

In reply to डावा by विनायक प्रभू

Permalink

कमिंग आउट?

मी ना डावा ना उजवा मी आपला 'मधला'
नक्की का?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 08/24/2011 - 17:40

In reply to कमिंग आउट? by प्रियाली

Permalink

शंका

आता तुम्हालाच शंका असावी ह्यास काय म्हणावे ? माझ्या मधल्या विचारसारीणी बद्दल कुणालाही कधीच शंका नव्हती.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 08/24/2011 - 17:46

In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बिरुटें सरांच्या विवेकपूर्ण प्रतिसादांशी...

सहमत....
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 08/24/2011 - 16:59

Permalink

डॉन्याशी एकदम सहमत. अग्दी

डॉन्याशी एकदम सहमत. अग्दी माझ्या मनात्ले बोल्लास
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 08/24/2011 - 17:13

Permalink

प्रश्न गैरलागू

प्रश्न (माझ्यापुरते (तरी)) गैरलागू
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Wed, 08/24/2011 - 17:16

Permalink

गांधी तत्व् ज्ञान आणि व्यक्ती

गांधी तत्व् ज्ञान आणि व्यक्ती या भिन्न गो ष्ती आहेत ...तत्व ज्ञाना चा आदर आहे पण म्हणून त्या व्यक्ती ने केलेले सर्व बरोबर अशी आंधळी व्यक्ती पूजा नाहिये ...उद्या अण्णा हजारे नी चुकिची मागणी केली तर त्यांचे तत्व् ज्ञान पटत असुन सुद्ध त्यांना विरोध होइलच !
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 08/24/2011 - 17:16

Permalink

धाग्याचे टी आर पी वाढवायची .

धाग्याचे टी आर पी वाढवायची . २२/७ क्र. ची पॉलिसी सुरु झाली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 17:20

In reply to धाग्याचे टी आर पी वाढवायची . by विजुभाऊ

Permalink

थांकु

तुम्ही हातभार लावल्याबद्दल. इनो घेत चला!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 08/24/2011 - 17:30

In reply to थांकु by प्रियाली

Permalink

इनो घेत चला! न विचारता

इनो घेत चला! न विचारता दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Wed, 08/24/2011 - 17:43

In reply to थांकु by प्रियाली

Permalink

हे आणि काय?

<< इनो घेत चला! >> ही जाहिरात समजायची का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 19:28

In reply to हे आणि काय? by चेतन सुभाष गुगळे

Permalink

नाही

नाही. माझी इनोची एजन्सी नाही आणि कंपनीही नाही आणि मी माझा मोबाईलही दिलेला नाही. तुम्ही मात्र मोठे व्हा!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 08/24/2011 - 19:32

In reply to नाही by प्रियाली

Permalink

मग कसली एजन्सी आहे?

तुम्ही मात्र मोठे व्हा!
तुमची काँप्लानची एजन्सी आहे काय? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 19:47

In reply to मग कसली एजन्सी आहे? by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मोबाईल

तीही नाही आणि मी मोबाईल अद्यापही दिलेला नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Wed, 08/24/2011 - 19:54

In reply to मोबाईल by प्रियाली

Permalink

इनोमध्ये समभाग असू शकतो

किंवा तुम्हाला इनोनं ब्रॅंड ऍम्बॅसिडर म्हणून नेमलेलं असू शकतं (मुन्नीला नाही का झंडू बाम वाल्यांनी नेमलं). थोडक्यात मोबाईल नंबर न देताही जाहिरात करता येते (मुन्नी कुठं देते? तरीही झंडू बाम खपवतेच ना?)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 08/24/2011 - 20:03

In reply to इनोमध्ये समभाग असू शकतो by चेतन सुभाष गुगळे

Permalink

प्रियाली पुढच्या धाग्याचं

प्रियाली पुढच्या धाग्याचं शीर्षक सुचवते, "आंतरजालावरील सुप्रसिद्ध शद्बप्रयोग" काही शब्दप्रयोगांचा अंतर्भाव करच. उदा:
  • इनो घेणे
  • (काँप्लान घ्या आणि) मोठे व्हा
  • समाज ही गुंतागुंतीची चीज आहे
  • सडके
  • 'प्रेरणा'
  • आंतरजालावर कोणी कोणाचे मित्र नसतात, असतात ते फक्त हितचिंतक
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 20:55

In reply to इनोमध्ये समभाग असू शकतो by चेतन सुभाष गुगळे

Permalink

तुम्ही कशाला

तुम्ही कशाला रक्त आटवताय उगीच मला ब्रँड अँबॅसेडर बनवून आणि समभाग देऊन? याला फक्त स्वप्नांचे इमले बांधत बसणे म्हणतात. पुरे करा. काही उपयोग नाही. मोबाईल देऊन जाहीरात तुम्हीच करताय अद्याप ;) खरं सांगा!
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Wed, 08/24/2011 - 22:22

In reply to तुम्ही कशाला by प्रियाली

Permalink

कसली तेही सांगा

मी कशाला रक्त आटवू? << मोबाईल देऊन जाहीरात तुम्हीच करताय अद्याप खरं सांगा!>> आता तुम्ही सांगाच मी कसली जाहिरात करतोय ते. कारण जाहिरातीचा उद्देश जनतेत आपल्या व्यवसायाची माहिती देणे हा असतो. जर तुम्ही मी कुठल्या व्यवसायाची जाहिरात करतोय ते सांगु शकलात तर मी तुमचा आरोप मान्य करीन, अन्यथा तुम्ही हा आरोप बिनशर्त मागे घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 23:50

In reply to कसली तेही सांगा by चेतन सुभाष गुगळे

Permalink

जाहीरात

प्रशिक्षणासाठी संपर्क करा अशी जाहीरात नाही का केली भौ तुम्ही मग्गाशी?
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Wed, 08/24/2011 - 23:59

In reply to जाहीरात by प्रियाली

Permalink

मूळीच नाही.

उलट तुम्हीच शिकवणी केव्हा चालु करायची? असं मला विचारलंत तेव्हा मी आश्चर्याने <<अच्छा तुम्हाला कळले तर>> असा उद्गार टंकला होता याचाच अर्थ मी "इथे किंवा इतरत्र कोठेही या संकेतस्थळावर उल्लेख न करताही तुम्हाला कसे कळले" असा अभिप्रेत होता. तुमच्या माहितीकरिता सांगतो - तो माझा व्यवसाय नाहीच मूळी. ते काम मी हौसेखातर करतो, त्याचा कुठलाही मोबदला घेत नाही. चरितार्थाचे साधन दुसरेच आहे. त्याचाही कुठेच उल्लेख केलेला नाहीय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 08/25/2011 - 00:01

In reply to मूळीच नाही. by चेतन सुभाष गुगळे

Permalink

मोबदला असेल तरच...

तो माझा व्यवसाय नाहीच मूळी. ते काम मी हौसेखातर करतो, त्याचा कुठलाही मोबदला घेत नाही. चरितार्थाचे साधन दुसरेच आहे. त्याचाही कुठेच उल्लेख केलेला नाहीय.
मोबदला मिळाला तरच जाहीरात केली जाते असे थोडेच आहे का? जाहीरात काय प्रसिद्धीसाठीही होते. तुम्ही ते करत असाल.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on गुरुवार, 08/25/2011 - 00:11

In reply to मोबदला असेल तरच... by प्रियाली

Permalink

व्यवसायाच्या उल्लेखाशिवाय?

<< जाहीरात काय प्रसिद्धीसाठीही होते. तुम्ही ते करत असाल. >> व्यवसायाच्या उल्लेखाशिवाय कधी प्रसिद्धी होते का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 08/25/2011 - 00:36

In reply to व्यवसायाच्या उल्लेखाशिवाय? by चेतन सुभाष गुगळे

Permalink

काय गोल गोल फिरताय?

ही जाहीरात तुम्हीच केलीत ना? वर मला आमंत्रणही दिलंत.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on गुरुवार, 08/25/2011 - 07:39

In reply to काय गोल गोल फिरताय? by प्रियाली

Permalink

नाही

तुम्हीच तसा प्रस्ताव मांडलात. सगळं पुन्हा नीट क्रमवार वाचा. (अर्थात त्यामागचा तुमचा छुपा उद्देश वेगळाच होता. मलाच मनोरूग्ण ठरवून माझी शिकवणी घेण्याचा, जो मी उधळून लावला.)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 08/25/2011 - 11:04

In reply to नाही by चेतन सुभाष गुगळे

Permalink

अरेरे...

कॉमेडी अवांतराचा शेवट मात्र ट्रॅजेडी झाला ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 08/25/2011 - 14:50

In reply to नाही by चेतन सुभाष गुगळे

Permalink

छे! छे!

तुम्हीच तसा प्रस्ताव मांडलात.
मी मोठ्या वयाच्या बालीश बुद्धीच्या लोकांना शिकवण्यात रूची आहे असे लिहिले होते. तुम्ही ते होता म्हणून तुम्हाला त्यात छुपा उद्देश दिसला काय? म्हणून मी काय करावे - प्रशिक्षिका व्हावे असे तुम्हीच सुचवून सल्ले देत होता. मोठ्या वयाचे बालीश बुद्धीचे पुरुष फक्त असायलममध्ये दिसत नाहीत हेच खरे दुखणे असावे. ;) पण..... जाहीरात तुम्हीच केलीत. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on गुरुवार, 08/25/2011 - 15:10

In reply to छे! छे! by प्रियाली

Permalink

सगळे प्रतिसाद पुन्हा नीट वाचा

<< तुम्ही ते होता म्हणून तुम्हाला त्यात छुपा उद्देश दिसला काय?>> तुमच्यापासून शिकवणीची सुरूवात करते असं विधान तुम्हीच आधी मांडलंत आणि मला यात बळेच ओढलंत. माझ्यावर कसला जाहिरातीचा आरोप करताय? स्वत: दुसर्‍याला इनो घ्यायचा सल्ला देऊन पुन्हा तिसर्‍यावर जाहिरात केल्याचा आरोप करता. भलत्याच 'इनो'दी बाई आहात तुम्ही <<म्हणून मी काय करावे - प्रशिक्षिका व्हावे असे तुम्हीच सुचवून सल्ले देत होता.>> सल्ला न मागता दिला नव्हता. तुम्ही इथे सर्वच वाचकांना उघड प्रश्न विचारला होता - कुठे मिळतील असे पुरूष? म्हणून. पुढे तुम्हाला हवे तसे पुरूष दुर्मिळ आहे हे कळल्यावर तुम्हालाच ते तसे घडवावे लागतील या करिता हा सल्ला दिला होता. अशा पुरूषांची तुम्हाला खरंच रिक्वायरमेंट आहे का? असल्यास माझ्याशी वाद कशाला घालता, उलट मी मदत करतोय याचे आभार तरी माना की; नसल्यास माझा सल्ला मागे घेतो म्हणजे मग विषयच संपला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 08/25/2011 - 15:11

In reply to सगळे प्रतिसाद पुन्हा नीट वाचा by चेतन सुभाष गुगळे

Permalink

नाही हं!

तुमच्यापासून शिकवणीची सुरूवात करते असं विधान तुम्हीच आधी मांडलंत आणि मला यात बळेच ओढलंत. माझ्यावर कसला जाहिरातीचा आरोप करताय?
मी करते असा आशावाद व्यक्त केला. संपर्क साधण्यासाठी तुम्ही सांगितलेत. मोबाईल तुम्ही देता. जाहीरात तुम्ही केलीत. :-)
कुठे मिळतील असे पुरूष? म्हणून. पुढे तुम्हाला हवे तसे पुरूष दुर्मिळ आहे हे कळल्यावर तुम्हालाच ते तसे घडवावे लागतील या करिता हा सल्ला दिला होता. अशा पुरूषांची तुम्हाला खरंच रिक्वायरमेंट आहे का? असल्यास माझ्याशी वाद कशाला घालता, उलट मी मदत करतोय याचे आभार तरी माना की; नसल्यास माझा सल्ला मागे घेतो म्हणजे मग विषयच संपला.
कुठे मिळतीलचे उत्तरही मी कवितेत शेवटी दिले होते. त्यामुळे तुमचे आभार मानायची गरजच नाही पण तुम्ही सल्ला मागे घेत असलात तर थोडे "मोठे" झालात असे म्हणायला वाव आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on गुरुवार, 08/25/2011 - 15:38

In reply to नाही हं! by प्रियाली

Permalink

आता खोटेपणा करू नकात

<< मी करते असा आशावाद व्यक्त केला. संपर्क साधण्यासाठी तुम्ही सांगितलेत. मोबाईल तुम्ही देता. जाहीरात तुम्ही केलीत.>> नाही आशावाद नुसता व्यक्त केला नाहीत तर चक्क कधीपासून शिकवणी चालु करताय असा प्रश्न टाकला. मी उत्तर दिलं नसतं तर पलायनवादी म्हणून आरोप करायला मोकळ्या, म्हणून उत्तर. आता शिकवणी चालु करायची म्हणजे तुम्हाला माझ्याशी संपर्क करायला हवाच म्हणून माझा संपर्क तपशील खाली आहे एवढंच सूचित केलं. (तो नेहमीच माझ्या स्वाक्षरीत असतो. मुद्दाम वेगळा दिला नाही.) अर्थातच ती जाहिरात ठरत नाही कारण त्यात कुठलेही अर्थकारण सूचित होत नाही (जसे की तुमच्या 'इनो'दी सल्ल्यातून सूचित होते - इनोच्या विक्रीचे). <<कुठे मिळतीलचे उत्तरही मी कवितेत शेवटी दिले होते. त्यामुळे तुमचे आभार मानायची गरजच नाही >> हा कृतघ्नपणा झाला. तुमच्या कवितेचा शेवट नीट पाहा. <<कुठे मिळतील असे पुरुष?, इतिहासात दुर्मिळ होते वर्तमानातही थोडेथोडकेच आहेत>> कुठे भेटतील याचं उत्तर नाहीच दिलेलं. आता तुम्ही खोटेपणाच करायचं ठरवताय. << पण तुम्ही सल्ला मागे घेत असलात तर थोडे "मोठे" झालात असे म्हणायला वाव आहे. >> तुमची मापन निकषता काय आहे? आणि तुमच्या ठरविण्याने मी लहान / मोठा ठरणार आहे का? आणि तुम्ही किती मोठ्या हे कोण ठरवणार? तेही तुम्ही स्वत:च का? याला म्हणतात मुद्दा नसला की गुद्यावर उतरणे. तुम्ही उतरला असलात तरी मी सुसंस्कृत असल्याने या गुद्दा गुद्दीत उतरू इच्छित नाही. तुमचं चालु द्या. (तसेही उपप्रतिसादाला उपप्रतिसाद देत देत हे उपुपुपुप्रतिसाद बरेच संकुचित होत चालले आहेत (जरा यांची रूंदी पाहा). असल्या संकुचितपणात मला रस नाही. तेव्हा माझ्याकडून मी आता या विषयावरचा संवाद थांबवित आहे. म्हणजे गांधीवाद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या या धाग्यावरील ही वादावादी तरी संपुष्टात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 08/25/2011 - 15:46

In reply to आता खोटेपणा करू नकात by चेतन सुभाष गुगळे

Permalink

तुम्ही सुसंस्कृत?

आता शिकवणी चालु करायची म्हणजे तुम्हाला माझ्याशी संपर्क करायला हवाच म्हणून माझा संपर्क तपशील खाली आहे एवढंच सूचित केलं. (तो नेहमीच माझ्या स्वाक्षरीत असतो. मुद्दाम वेगळा दिला नाही.) अर्थातच ती जाहिरात ठरत नाही
मोबाईल तुम्ही दिला की नाही? म्हणजे जाहीरात तुम्ही केलीत. मी माझा संपर्क दिला नाही म्हणजे जाहीरात नाही. अर्थकारणासाठीच जाहीरात होते असे नाही.
तुमची मापन निकषता काय आहे? आणि तुमच्या ठरविण्याने मी लहान / मोठा ठरणार आहे का? आणि तुम्ही किती मोठ्या हे कोण ठरवणार? तेही तुम्ही स्वत:च का?
मोठे झालात हे तुमचे कौतुक होते. तुलना नै कै. पण ठीक आहे तुम्हाला तुमचे कौतुक नको असेल तर नाही करत.
याला म्हणतात मुद्दा नसला की गुद्यावर उतरणे. तुम्ही उतरला असलात तरी मी सुसंस्कृत असल्याने या गुद्दा गुद्दीत उतरू इच्छित नाही.
खोखोखोखो! तुम्ही सुसंस्कृत? ही देखील जाहीरात का?
जसे की तुमच्या 'इनो'दी सल्ल्यातून सूचित होते - इनोच्या विक्रीचे
चला तुम्हीही पटकन इनो घेऊन टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Wed, 08/24/2011 - 17:16

Permalink

ही लढाई आणि ती लढाई यात फरक आहे.

ती लढाई परक्यांविरूद्ध असल्याने त्यावेळी त्यांना अहिंसेचा मार्ग चूकीचा वाटला असेल. आता ही लोकनियूक्त सरकारविरूद्ध असल्याने हा मार्ग बरोबर वाटत असेल. हा मुद्दाही ध्यानात घ्यायला हवा. माझे वैयक्तिक मत : शत्रुविरुद्ध अहिंसेचा मार्ग चूकीचा आहे. त्याला त्या मार्गाने हरविणे वेळखाऊ असते. तर जनतेने निवडून दिलेल्या सरकारला वेठीस धरण्याकरिता शांततामय मार्गाने केलेले आंदोलनही चूकीचे असते. स्वत: निवडणूका लढवून लोकप्रतिनिधी बनून संसदेत जाणे / न्यायालयात जनहितयाचिका दाखल करणे असे घटनात्मक मार्ग उपलब्ध असतातच ना.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 08/24/2011 - 17:20

Permalink

चक्रनेमिक्रमेण

हा 'चक्रनेमिक्रमेण'मधला प्रकार असावा काय? :) बाकी जाणकार सदस्यांच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 08/24/2011 - 17:22

Permalink

गेले ते दीन गेले

राम राम मिपाकरहो, यापुढे मिपावर मोहनदास करमचंद गांधी, जे भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात आणि काही लोक ज्यांचा उल्लेख 'महात्मा गांधी' असा करतात, त्यांच्याविषयी या पुढे मिपावर काहीही (सविस्तर) लिहिण्यास, चर्चेचा कोणताही धागा काढण्यास पूर्णत: बंदी आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.. अनेक घन्यवाद, ================================================== हे राहून राहून आठवत आहे आज.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/24/2011 - 17:26

In reply to गेले ते दीन गेले by परिकथेतील राजकुमार

Permalink

असहमत

परा हा धागा गांधींबद्दल नसून एका गांधीवाद्याबद्दल आहे. नीट वाच बघू!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com