✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाब्लो नेरूदा - I do not love you... अनुवाद

म
मनिष यांनी
Tue, 07/01/2008 - 15:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7286 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

एकरूपता....

भडकमकर मास्तर
Tue, 07/01/2008 - 15:50 नवीन
माझे मन तुझे झाले.... ! इतके जवळ, की तू डोळे मिटतेस आणि मला झोप लागते. ही कल्पनाच एकदम निराळी आहे... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खरं तर...

मनिष
Tue, 07/01/2008 - 15:58 नवीन
मी झोपतो आणि तुझे दोळे मिटतात असे पहिजे होते - मुळ कवितेनुसार! अफलातून कल्पना हे पाब्लो नेरूदाचे एक महत्वाचे (आणि माझे सगळ्यात आवडते) वैशिष्ट्य! जाऊ द्या! मनिषभाई, तुझे कुछ झेपा नही यार! - (ओशाळलेला) मनिष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

नाही जमला...

मनिष
Tue, 07/01/2008 - 15:54 नवीन
मीच माझा अनुवाद वाचून पाहिला आणि ते जमले नाही हे जाणवले! :( पाब्लो नेरुदाची त्रिवार माफी! पुढच्या वेळी माझ्याच एखाद्या कवितेचा अनुवाद करून पाहीन.
  • Log in or register to post comments

जमलाय रे

आनंदयात्री
Tue, 07/01/2008 - 16:27 नवीन
जमलाय रे मनिष, का उगाच असे म्हणतो, उदा --thanks to your love a certain solid fragrance, --हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध हे बघ बरं किती मस्त जमलयं. बाकी कविता भारी आहे पण जराशी गुढ वाटली ! मी तुझ्यावर प्रेम करतो ते एका न फुललेल्या रोपासारखे, पण ते रोप जपते उरात ज्योत लपलेल्या फुलांची हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध ह्या धरेतून उमलून, राहतो अंधारून माझ्या ह्या देहात! मला डोळे झोप पेक्षा हे कडवे खुपच आवडले, डिफ्रंट कल्पना आहे एकदम, न फुललेले रोप त्याच्या उरात त्याच्याच न फुललेल्या फुलाची सल, धरेतुन उमलुन येणारा मृदगंध पण तो ही रहाणार अंधारुन त्याच्या देहात अन ते पण न उमललेल्या फुलाच्या ज्योतीबरोबर ...... बापरे !!!!! खुप म्हणजे खुपच वेगळे वाचायला मिळाले, शतशः धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ह्म्म..

मनिष
Tue, 07/01/2008 - 17:26 नवीन
मला खूपच ओढून-ताणून आणलेल्या वाटतात आहे ओळी.
मला डोळे झोप पेक्षा हे कडवे खुपच आवडले, डिफ्रंट कल्पना आहे एकदम, न फुललेले रोप त्याच्या उरात त्याच्याच न फुललेल्या फुलाची सल, धरेतुन उमलुन येणारा मृदगंध पण तो ही रहाणार अंधारुन त्याच्या देहात अन ते पण न उमललेल्या फुलाच्या ज्योतीबरोबर ...... बापरे !!!!! खुप म्हणजे खुपच वेगळे वाचायला मिळाले, शतशः धन्यवाद.
वेगळेपणा आहे खरच पाब्लो नेरूदा ह्यांच्या कवितेत...त्या वेगळेपणाची आणि पाब्लो नेरूदा ची ओळख करून द्यावी हाच माझा उद्देश!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

शिवधनुष्य

धनंजय
Tue, 07/01/2008 - 20:39 नवीन
पाब्लो नेरुदा यांची प्रेमगीते जितकी थेट सहज हृदयाला भिडतात, तितकीच हळुवार भावनांची गुंतागुंत असते. मस्त प्रयत्न! (कोणाला ध्वनी-संगीत हवे असेल तर मूळ स्पॅनिश असे : Soneto XVII (Pablo Neruda) No te amo como si fueras rosa de sal, topacio o flecha de claveles que propagan el fuego: te amo como se aman ciertas cosas oscuras, secretamente, entre la sombra y el alma. Te amo como la planta que no florece y lleva dentro de sí, escondida, la luz de aquellas flores, y gracias a tu amor vive oscuro en mi cuerpo el apretado aroma que ascendió de la tierra. Te amo sin saber cómo, ni cuándo, ni de dónde, te amo directamente sin problemas ni orgullo: así te amo porque no sé amar de otra manera, sino así de este modo en que no soy ni eres, tan cerca que tu mano sobre mi pecho es mía, tan cerca que se cierran tus ojos con mi sueño. )
  • Log in or register to post comments

आनंदयात्र

यशोधरा
Tue, 07/01/2008 - 21:36 नवीन
आनंदयात्रीला अनुमोदन. मी तुझ्यावर प्रेम करतो ते एका न फुललेल्या रोपासारखे, पण ते रोप जपते उरात ज्योत लपलेल्या फुलांची हे सुरेखच जमलेय!
  • Log in or register to post comments

मी म्हणते

शितल
Tue, 07/01/2008 - 23:14 नवीन
अनुवादाचा प्रयत्न चागला आहे मनिष वाईट वाटुन घेऊ नका :) पण जे कवी लिहितो त्याने त्याच्या कविते असे काही स्वत:चे ओतले असते की बाकीच्यानी अनुवाद केला तरी तो मुळ कवितेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्यावर त्याने अनुवाद अवलबुन आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख

चित्रा
Wed, 07/02/2008 - 00:21 नवीन
वेगळीच कविता. आणि अनुवादही चांगला उतरला आहे, थोडे बदलता येईल असे वाटते, पण सुरेख प्रयत्न. or the arrow of carnations the fire shoots off. यात "अग्निचे स्फुल्लिंग निघते अशी कार्नेशन आहे, म्हणून नाही." याऐवजी आगीची फुले असा काही अर्थ आहे का (म्हणजे फुलबाज्यांच्या टोकाशी जशी फुले दिसतात तसे) इंग्रजी अनुवादही आवडला. स्पॅनिश कळत नाही :-( या कवीची आणि कवितेचीही ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

कार्नेशन

धनंजय
Wed, 07/02/2008 - 00:59 नवीन
"आग फैलवणार्‍या कार्नेशन फुलांचा बाण" अशी काही मूळ प्रतिमा आहे. (इथे बहुधा इंग्रजी अनुवाद फसला आहे.) कार्नेशनची रंगसंगती कधीकधी पसरणार्‍या ज्वाळांसारखी असते. Image removed. जंगली गुलाब : Image removed. यातील पहिल्या ओळींमधल्या सर्व प्रतिमा - जंगली गुलाब, टोपाझ, कार्नेशन, सुंदर आणि काहीसे भडक आहेत, आणि खास दुर्मिळ किंवा बेशकिमती नाहीत. त्यापेक्षा ज्याची फुले दिसतच नाही पण त्यांचा उज्ज्वल रंग आतमध्ये भरलेला आहे, त्या न फुलणार्‍या झाडाचे असे प्रेम आहे, आणि कवीच्या अंगात ("तू"च्या मुळे) गुप्तपणे एकटावलेला मृद्गंध आहे, तसे कवीचे प्रेम आहे, इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अच्छा!

चित्रा
Wed, 07/02/2008 - 19:33 नवीन
दिसतात खरी आगीच्या जाळासारखी. शोधले तर जालावर दोन अनुवाद मिळाले ज्यात फक्त ही एक ओळ वेगळी आहे ( मूळ अनुवादकाने चूक दुरूस्त केली असावी). मनिष यांनी एक अनुवाद मराठीत अनुवाद करण्यासाठी वापरला आणि दुसरा चुकून इथे जोडला असावा. पण काही बिघडले नाही, अनुवाद छानच जमला आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

यातील

मनिष
Wed, 07/02/2008 - 20:48 नवीन
यातील पहिल्या ओळींमधल्या सर्व प्रतिमा - जंगली गुलाब, टोपाझ, कार्नेशन, सुंदर आणि काहीसे भडक आहेत, आणि खास दुर्मिळ किंवा बेशकिमती नाहीत. त्यापेक्षा ज्याची फुले दिसतच नाही पण त्यांचा उज्ज्वल रंग आतमध्ये भरलेला आहे, त्या न फुलणार्‍या झाडाचे असे प्रेम आहे, आणि कवीच्या अंगात ("तू"च्या मुळे) गुप्तपणे एकटावलेला मृद्गंध आहे, तसे कवीचे प्रेम आहे, इ.इ.
हे बरोबर आहे, असेच म्हणतो...पाब्लो नेरूदांच्या काव्याचे गद्य रसग्रहण करता येईल फार तर, पण अनुवाद फार अवघड गेला...तो काही जमला नाही मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

अजून काही

मेघना भुस्कुटे
Wed, 07/02/2008 - 07:05 नवीन
मस्त प्रयत्न आहे. अजून काही कवितांचा अनुवाद वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

हे तुझ्या

विसोबा खेचर
Wed, 07/02/2008 - 17:16 नवीन
हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध ह्या धरेतून उमलून, राहतो अंधारून माझ्या ह्या देहात! ह्या ओळी सुंदर आहेत... एकंदरीत कविता ठीक वाटली. परंतु यात नेरुदांचे मोठेपण किंवा वेगळेपण जाणवण्याइतकी ही कविता खास वाटली नाही. आपल्या मराठीत अश्या ५६ प्रेमकविता वाचायला मिळतात! मनिषराव, नेरुदांचं वेगळेपण, मोठेपण जाणवेल असं काहीतरी भारीतलं येऊ द्या की! तात्या.
  • Log in or register to post comments

पटले...

मनिष
Wed, 07/02/2008 - 20:52 नवीन
तात्या, तुमचे पटते आहे मला...ह्यात तो फार काही ग्रेट वाटत नाही. तो तसा जाणवेल अस मला लिहिता येईल का ही शंकाच आहे. जमल्यास एक-दोन कवितांवर "गद्य" लिहीन जमले/झेपले तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

ओहो...

शेखस्पिअर
Wed, 07/02/2008 - 21:10 नवीन
मला वाटले पाब्लो पिकासो हाच फक्त गूढ आहे.. हा पण त्याच तोडीचा वाटतो... दिलीपोत्तम यांची पण एक कविता अशीच काहीशी आहे.. काही प्राक्रुत शब्द वापरून..
  • Log in or register to post comments

पाब्लो पिकासो आणि पाब्लो नेरूदा

मनिष
Wed, 07/02/2008 - 21:16 नवीन
गंमत म्हणजे, पाब्लो नेरूदा ला कवितेतला पिकासो म्हणतात..गूढ आहे खरच तो....आणि त्या गुढतेत लपलेले कित्येक अर्थ, पिकासोच्या पिवळ्या रंगासारखेच... त्याचेच आकर्षण वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखस्पिअर

गूढ..

शेखस्पिअर
Wed, 07/02/2008 - 21:28 नवीन
माणसाला गूढतेचे आकर्षण असतेच... त्यात हे पाब्लो लोक अजुन भर घालतात..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा