स्वगत म्हणजे मनातल्या मनात
विवाहाची निमंत्रण पत्रिका आल्यावर आपण हळुच "अहेर आणू नये" हे वाक्य बघतो बघतो व सर्वांनी फुकट जेवण हादडायला जायचं असं मनात ठरवतो, तश्यागत.
ऐकणारा समोरच्याचे खोटेच कौतुक करत असतो. पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पाहाच.
बोलणारा (उघड): (आनंदाने) साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झालं. मुलगा झाला साहेब.
ऐकणारा (मनात): (मग एवढी वर्षे काय करत होतास?)
बोलणारा (उघड): साहेब ही माझी पत्नी सोनाली.
ऐकणारा (मनात): (मग एवढे दिवस तुझ्याबरोबर फिरत होती ती कोण?)
बोलणारा (उघड): साहेब मुलगा १०वी च्या बोर्डात पाचवा आला.
ऐकणारा (मनात): (तो शेवटी का येईना मला काय करायचे आहे?)
बोलणारा (उघड): विवाहाचे निमंत्रण द्यायला आलोय. सरोजशी लग्न ठरलंय.
ऐकणारा (मनात): (च्यायला, एवढे दिवस तर ती दिन्या बरोबर फिरत होती.)
बोलणारा (उघड): साहेब बढती मिळाली. उद्या पार्टी ठेवली आहे.
ऐकणारा (मनात): (एवढी वर्षे चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा.)
बोलणारा (उघड): ही माझी बायको, पल्लवी.
ऐकणारा (मनात): (या माकडाला मस्त चिकणी बायको मिळाली, मज्जा आहे साल्याची.)
बोलणारा (उघड): हे फोटोंचे अल्बम्स पाहत बसा.
ऐकणारा (मनात): (आग लाव त्या अल्बम्सना, वैताग साला.)
प्रतिक्रिया
27 Jun 2008 - 3:29 am | पक्या
वा. मस्त :)
>>बोलणारा (उघड): हे फोटोंचे अल्बम्स पाहत बसा.
ऐकणारा (मनात): (आग लाव त्या अल्बम्सना, वैताग साला.)
हा विचार तर बहुतेकांच्या मनात येत असणार.
27 Jun 2008 - 3:46 am | टारझन
अगदी पुलंच्या . मी आणि माझे शत्रूपक्षची आठ्वण झाली.
पुलप्रेमी) कुबड्या खवीस
http://picasaweb.google.com/prashants.space
27 Jun 2008 - 7:34 am | सहज
लिहणारा (उघड): - हे वाचा हास्यतुकडे - १
वाचणारा (मनात): - बापरे आता अजुन किती तुकडे कोंबणार हा!!
;-) कृ. ह. घ्या.
27 Jun 2008 - 11:34 am | II राजे II (not verified)
लिहणारा (उघड): - हे वाचा हास्यतुकडे - १
वाचणारा (मनात): - बापरे आता अजुन किती तुकडे कोंबणार हा!!
:D
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
27 Jun 2008 - 7:57 am | अनिल हटेला
ह्या ह्या ह्या!!!!!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
27 Jun 2008 - 11:30 am | स्नेहश्री
सॉलीड धमाल हास्यतुकडे आहेत हे.
मजा आली.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी