अभिव्यक्ति स्वातंत्र्य

विनायक's picture
विनायक in काथ्याकूट
17 Sep 2007 - 11:08 pm
गाभा: 

मंडळी

"प्रसव" कविता दुसर्‍याच दिवशी गेली. मनोगतावर अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणार्‍या , वेलणकरांना शिव्यांची लाखोली वाहणार्‍या मालकांनीच असा प्रकार करावा, तोही दुसर्‍या दिवशीच हा ढोंगीपणाचा कळस आहे. सबब इथे राहण्यात मला काहीही स्वारस्य नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते इथे दिसले.

हा माझा इथला पहिला आणि शेवटचा लेख.

विनायक

प्रतिक्रिया

मिसळपाव पंचायत समिती's picture

17 Sep 2007 - 11:18 pm | मिसळपाव पंचायत समिती

आपल्या येथील वास्तव्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद! आपला पुढील मराठी आंतरजालीय प्रवास सुखासमाधानाचा होवो हीच शुभकामना!

मिसळपावतर्फे आपल्याला ही लहानशी भेट! मिसळपावला आपली नेहमी आठवण राहील! शुभेच्छा..

कळावे,
आपले नम्र,
मिसळपाव पंचायत समिती.

सर्किट's picture

17 Sep 2007 - 11:25 pm | सर्किट (not verified)

विनायकराव,

आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या कळू शकेल का ? आणि आपल्याला कमरेखाली छुपे वार करणार्‍या लेखनाची एवढी गोडी कधी निर्माण झाली ? ढोंगीपणाचा कळस वगैरे म्हणताय, तिकडे ढोंगीपणाच्या उत्तुंग शिखराकडे दुर्लक्ष का झाले ? कारण आजवर ह्या कारणासाठी आपण आपल्या मित्राचे स्थळ सोडल्याचे ऐकिवात नाही.

असो, असे प्रकार घडू नये असे वाटत असेल, तर मिसळपावच्या पंचायतीच्या निवडणुकीत उभे रहा. लोकशाही पद्धतीची सवय करणे सुरुवातीला कठीण जाईल. पण हळू हळू सवय होईल. प्रशासकीय अनुमतीची सवय झालीच होती ना तुम्हाला ?

- सर्किट

रोहिणी's picture

17 Sep 2007 - 11:26 pm | रोहिणी

इथे अभिव्यक्ति स्वातंत्र्य नसेल तर मलाही इथे राहण्यात स्वारस्य नाही.
कळावे.
रोहिणी

मिसळपाव पंचायत समिती's picture

17 Sep 2007 - 11:29 pm | मिसळपाव पंचायत समिती

आपल्या येथील वास्तव्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद! आपला पुढील मराठी आंतरजालीय प्रवास सुखासमाधानाचा होवो हीच शुभकामना!

मिसळपावतर्फे आपल्याला ही लहानशी भेट! मिसळपावला आपली नेहमी आठवण राहील! शुभेच्छा..

कळावे,
आपले नम्र,
मिसळपाव पंचायत समिती.

सर्किट's picture

17 Sep 2007 - 11:29 pm | सर्किट (not verified)

येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसेल, तर मलाही राहण्यात स्वारस्य नाही. म्हणूनच मी येथे टिकून आहे.

- सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2007 - 11:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून तिसरा दिवसही मावळत नाही तर अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या कारणाने जाण्याचा निर्णय.
अजून इथे लोकशाहीने निर्णय होणार असल्यावर जाण्याची इतकी घाई करु नका ! अहो,तिकडे मनोगतावर होतो तेव्हा एकदा प्रतिसाद टाकल्यावर किती दिवसांनी अनुमती मिळते ते मी पाहण्याचे विसरुन जात होतो.त्या मानाने मिसळपावचे सन्माननीय सदस्य 'टिकाकार' यांचे आजचे प्रतिसाद पाहा, स्वातंत्र्याचा आनंदाचा कळस काय असतो ते कळेल.

सर्किट's picture

17 Sep 2007 - 11:45 pm | सर्किट (not verified)

प्रसव http://72.14.253.104/search?q=cache:Z9xN2pZ9zh4J:www.manogat.com/node/11...प्रसव&hl=en&gl=us&strip=1 येथे वाचता येईल. पण त्यातला विखार आणि संदर्भ कळण्यास (कमरेखालचे वार) थोडे अधिक वाचन करावे लागेल. असो.

मलाही वाटते की ही कविता येथून जायला नको होती. आणि सध्या पंचायत मालकांनी नियुक्त केलेली असल्याने (लोकनियुक्त नसल्याने) अशा प्रकारचे गळचेपीचे आरोप होतच राहणार. त्यामुळे, लवकरात लवकर पंचायतीच्या निवडणुका घ्याव्यात हे बरे.

- सर्किट

धनंजय's picture

18 Sep 2007 - 12:35 am | धनंजय

हे मात्र खरे. त्या कवितेतले बरेच संदर्भ मला कळले नाही.

कोलबेर's picture

18 Sep 2007 - 12:36 am | कोलबेर

तसे कवितेतले मला कमीच कळते पण बरेच संदर्भ लागले नाहीत हे खरे!!

चित्तरंजन भट's picture

18 Sep 2007 - 1:10 am | चित्तरंजन भट

त्या कवितेतले बरेच संदर्भ मला कळले नाही.
ह्यातच सर्व आले.

प्रियाली's picture

18 Sep 2007 - 1:52 am | प्रियाली

मलाही वाटते की ही कविता येथून जायला नको होती.

एखाद्याच्या घरात घुसून वाभाडे काढणे एवढीच प्रतिभा असलेले साहित्य का राहावे? लोकांना वाचायला मिसळपावावर यापेक्षा दर्जेदार काही मिळणार नाही असे वाटते का तुम्हाला?

जर तुमच्या घरातील गोष्टी चव्हाट्यावर आणल्या तर चालेल का? त्याची गरज असते का? माणसांना आपली मर्यादा कळायला नको का? आणि तीही कोणत्या वयात? पोरासोरांनी अशा वाह्यात गोष्टी केल्यातरीही योग्य नाहीच, एकवेळ समजण्यासारखे आहे पण थोरांना काय सांगा...आपलंच हसं करून घेण्याची हौस आहे म्हणायला हवे!

मिसळपावाला माझ्या अनेक शुभेच्छा! असल्या वाह्यात प्रकारांनी लागलेले गालबोट विसरून जाऊ.

सर्किट's picture

18 Sep 2007 - 2:02 am | सर्किट (not verified)

मान्य आहे. माझ्या प्रतिसादातील, घाईघाईने लिहिलेल्या

मलाही वाटते की ही कविता येथून जायला नको होती.

ह्या वाक्याबद्दल आपला गैरसमज झाला आहे, असे वाटते. हे वाक्यः

मलाही वाटते की ही कविता *कुठलेही स्पष्टीकरण न देता* येथून जायला नको होती.

असे मांडल्यास माझ्या मताच्या अधिक जवळ जाईल असे वाटते.

यापूर्वीही उपक्रमावर मी कुठलाही प्रतिसाद अथवा लेखन काढताना, त्यामागचे धोरण स्पष्ट करावे, असे लिहिल्याचे आपल्याला आठवत असेल.

ही कविता काढताना देखील, तेथे पंचायत समितीने "वरील कविता निव्वळ विखार आणि कमरेखाली छुपे वार करण्याच्या हेतूने येथे लिहिलेली आहे, असे पंचायत समितीचे मत आहे, त्यामुळे अप्रकाशित करण्यात येत आहे." अशी सूचना लिहायला हवी, असे वाटते. म्हणजे ज्या कुणी मनोगताची कचरापेटी अशी मिसळपावची संभावना करण्याचा घाणेरडा प्रयत्न केला होता, त्याचे नाव असे लपणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे वरील कचरा "पोष्टमन" ह्या सदस्याने मिसळपाव वर टाकला होता, ही माहिती आता गूगल मध्येही नाही, ह्याची खंत वाटते.

- सर्किट

प्रियाली's picture

18 Sep 2007 - 2:07 am | प्रियाली

मलाही वाटते की ही कविता *कुठलेही स्पष्टीकरण न देता* येथून जायला नको होती. असे मांडल्यास माझ्या मताच्या अधिक जवळ जाईल असे वाटते.

सहमत. मिसळपावाचे संपादन मंडळ अद्याप बाल्यावस्थेत आहे समजू. अशा प्रकारातून त्यांनाही कसे निर्णय घ्यायचे ते समजून येईल.वरील प्रतिसादांत मिसळपाव पंचायत समितीने हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले त्याबद्दल समाधान वाटले.

आजानुकर्ण's picture

18 Sep 2007 - 8:20 am | आजानुकर्ण

मिसळपाव पंचायत समितीने हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले त्याबद्दल समाधान वाटले.

खरे आहे.

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 11:29 am | विसोबा खेचर

ही कविता काढताना देखील, तेथे पंचायत समितीने "वरील कविता निव्वळ विखार आणि कमरेखाली छुपे वार करण्याच्या हेतूने येथे लिहिलेली आहे, असे पंचायत समितीचे मत आहे, त्यामुळे अप्रकाशित करण्यात येत आहे." अशी सूचना लिहायला हवी, असे वाटते.

सहमत आहे. पंचायतीची लोकं याची अवश्य नोंद घेतील असे वाटते!

तात्या.

माफ करा मंडळी! ही कविता मी पुन्हा वाचली पण मला त्यात कुणावरही वैयक्तिक टीका केलेली जाणवली नाही. आणि पुढे जाऊन असेही म्हणता येईल की 'जर खरोखरच असे काही त्यात असेल जे मला समजले नाही' तरी टीका केली म्हणून लगेच एखादी कविता/लेख/चर्चा प्रस्ताव जर असा उडवला जात असेल तर मग मनोगत,उपक्रम आणि ह्या संकेतस्थळामध्ये काय फरक राहिला?

नुसत्या टीकेला घाबरून अशी कृती करणे पंचायत समितीला शोभलेले नाही असे माझे स्पष्ट मत आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इतका आटापीटा आणि मेहनत करून हे संकेतस्थळ उभारलंय ते इतर संकेतस्थळांच्याच चालीने चालणार असेल तर मग तात्याने आजवर इतर ठिकाणी व्यवस्थापनाविरुद्ध केलेले बंड,निषेध वगैरे सगळे 'निव्वळ नाटक/तमाशा' ह्या सदरातच मोडेल. तेव्हा तात्याला आणि इतर समिती सदस्यांना माझे असे आवाहन आहे की टीका झाली म्हणून असे तडकाफडकी चूकीचे पायंडे पाडू नका. टीका सहन करायला शिका. त्यातून योग्य तो धडा घ्यायला शिका.

टीका करणार्‍यांना टीका करू द्या. जमेल तिथे आणि जमेल तशी त्याची नोंद घेऊन त्यावर समिती आपली बाजू मांडेल हे पाहा आणि काय चूक आणि काय बरोबर हे सदस्यांना ठरवू द्या. घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयामुळे निव्वळ शंका-कुशंकांना वाव मिळतो. तो तसा मिळू नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करा.

ह्या संकेतस्थळाचे वेगळेपण सिद्ध करायचे असेल आणि त्याही पुढे जाऊन ते टिकवायचे असेल तर असा उदार दृष्टीकोण स्वीकारावा लागेल आणि मला वाटते अंतिमतः तेच फायद्याचे ठरेल.

हे संकेतस्थळ वेगळे आदर्श निर्माण करो अशी सदिच्छा!

गुंडोपंत's picture

18 Sep 2007 - 9:29 am | गुंडोपंत

नुसत्या टीकेला घाबरून अशी कृती करणे पंचायत समितीला शोभलेले नाही असे माझे स्पष्ट मत आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इतका आटापीटा आणि मेहनत करून हे संकेतस्थळ उभारलंय ते इतर संकेतस्थळांच्याच चालीने चालणार असेल तर मग तात्याने आजवर इतर ठिकाणी व्यवस्थापनाविरुद्ध केलेले बंड,निषेध वगैरे सगळे 'निव्वळ नाटक/तमाशा' ह्या सदरातच मोडेल. तेव्हा तात्याला आणि इतर समिती सदस्यांना माझे असे आवाहन आहे की टीका झाली म्हणून असे तडकाफडकी चूकीचे पायंडे पाडू नका. टीका सहन करायला शिका. त्यातून योग्य तो धडा घ्यायला शिका.

हे पटले.
पण उगाच शिळे पाके साहित्य येथे आणून फालतु वादंगही सदस्यांनी निर्माण करू नयेत.

येथे "ताजे व स्वच्छ" पदार्थ जास्त आवडतील!

आपला
गुंडोपंत

राज जैन's picture

17 Sep 2007 - 11:52 pm | राज जैन (not verified)

लोकशाहीचा गैर वापर नको ...........
त्यामुळेच लोकशाही मध्ये पोलिस व सुरक्षा तंत्र नावाची एक व्यवस्था असते !

अरे काय हे !

तांदळात खडे आहेत की खड्यात तांदुळ ????

तात्या असे कसे झाले हो !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

बाकी बिरुटे साहेब,
मनोगत ची तर बात कुछ अलग आहे हो !
तेथे चालते पण काहींना येथे चालणार नाही ......... तेथे चार चार दिवस वाट पाहतील व मग सगळ्यांना सांगत सुटतील की आज माझा प्रतिसाद / लेख वाचा म्हणून पण ..... काय म्हणतात त्याला जेथे फ्री मध्ये मिळते आहे तेथे थोडे फार काळेनिळे दिसतेच ना !

राज जैन !

"व्यवस्था - ह्या शब्दावर विश्वास असलेला एकमेव {जैन}"

राजीव अनंत भिडे's picture

17 Sep 2007 - 11:54 pm | राजीव अनंत भिडे

तात्या,

तुझ्या अतिशय सुरेख संकेतस्थळाला विनायकने दृष्ट लागू नये म्हणून आल्याआल्याच एक छानशी काळी (!) तीट लावली आहे बरं का! -;)

बाय द वे तात्या, तू मालकाच्या नावाने मनोगतावर जी बोंबाबोंब केली होतीस ती जवळजवळ तिथे एक वर्षापेक्षा अधिक काळ राहूनच ना? तो पर्यंत तर तिथे तू भरभरून लिहीत होतास असे मला आठवते! त्यानंतरच तुझी मनोगतानद्दल आणि त्याच्या मालकाबद्दल काही एक मतं झाली होती आणि तू ती सगळीकडे जाहीररित्या प्रदर्शित केली होतीस असेही मला आठवते.

परंतु विनायकची मात्र खरोखरंच कमाल आहे. जे संकेतस्थ़ळ स्थापन होऊन अवघे दोन दिवसही झाले नाहीत, त्याची कार्यपद्धती काय आहे कशी आहे याकरता अवघा चार सहा महिन्यांचा कालावधीही गेला नसताना विनायक त्याच्याबद्दल ठाम मत देऊन मोकळाही झाला! सिंपली ग्रेट ना! -;)

असो, तात्या निदान माझा तरी तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. येथील प्रशासकीय कार्यपद्धतीबद्दल काही एक भाष्य करण्यापूर्वी मी किमान चारसहा महिने तरी थांबायाला तयार आहे!

राजीव अनंत भिडे,
शिवाजी पार्क, मुंबई.

अवांतर - रौशनीचा तिसरा भाग येऊ द्या लवकर. आम्ही वाट पाहात आहोत!

राजीव अनंत भिडे's picture

18 Sep 2007 - 12:15 am | राजीव अनंत भिडे

दुव्याबद्दल धन्यवाद मिलिंदजी,

हीच ती कविता! या संपूर्ण कवितेचा 'कंट्रोल+प्रिन्ट स्क्रीन' फोटोही आम्ही काढून ठेवलाय! :) इथे फक्त झलक देत आहोत. अरे पण इथे तर फक्त एकट्या विनायकाचाच प्रतिसाद दिसतो आहे! त्यानंतर मनोगतावरूनही ही कविता गेलेली दिसते! मग मनोगतासारख्या थोर संकेतस्थळावरही ज्या साहित्याला स्थान नाही तिथे बिचार्‍या आमच्या तात्याच्या पंचायत समितीचा काय दोष बरे?

आणि तिथे एकदा विनायकाला ती कविता आवडली असताना, त्याने तिला प्रतिसादही दिला असताना इथे पुन्हा ती छापून आणण्यात विनायकाचा नक्की काय हेतू आहे आणि कुठला व्यक्तिगत द्वेष दडला आहे हे काही कळले नाही बुवा!

असो,

राजीव अनंत भिडे,
शिवाजी पार्क, मुंबई.

-----------------------------------------------------------------------------------------------
प्रसव
चिन्मयी रवि, ०९/०९/२००७ - १७:४२. » प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा. कविता | प्रतिभा
नको वाटते प्रसव आताशा
नको रोज ती जुनी कहाणी......

......अरे प्रेषिता तूच घाव ये
तूच खरा रे देशिल माफी

आवडलीप्रे. विनायक (रवि, ०९/०९/२००७ - १७:५३)

विकेड बनी's picture

18 Sep 2007 - 12:23 am | विकेड बनी

प्रसव ही कविता गेल्याची मिरची विनायकाला इतकी का झोंबली ते त्यांनी सांगितलेच नाही. आमच्या गावात एक काका होते. ते दारावरून पोष्टमन जायला लागला की त्याला दरडावायचे म्हणायचे कोणाला कोणतं पोष्टकार्ड आलं ते वाचून दाखव. असं करून सर्व गावाची पंचाईत करायचे... तसेच हे काका दिसतात.

रंजन's picture

18 Sep 2007 - 12:37 am | रंजन

कविता वाचलि. तति इथे का दुसर्त नाहि? का काधुन टाकलि? कविता काध्ली तर म्ग हि चर्चा कशाला? इथे लेखन करताना आनि करणार नसेल तर दर वेऴ्ई अस लिहउन अस आहे का?मी लिहिनार नाहि असे सान्गावए लाघेल का.

चित्तरंजन भट's picture

18 Sep 2007 - 1:18 am | चित्तरंजन भट

आदरणीय विनायकराव,

ज्या कारणांसाठी 'प्रसव' ह्या कवितेला दुसर्‍याच दिवशी मनोगतावरून काढून टाकण्यात आले त्याच कारणासाठी कदाचित, बहुधा इथून तिची हकालपट्टी करण्यात आली असावी.

ज्या कोणावर टीका करायची त्यावर आपण मर्दासारखी टीका करावी असे मला वाटते. छाती खुली केली असताना पाठीवर कशाला वार करायचे? कुणाच्या घरात घुसण्याचा दीडबाजीरावपणा करणे चांगले नाहीच. ह्याला हलकेपणा म्हणतात असे मला वाटते. असा हलकेपणा करणे कठीण नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा ठीक आहेत पण उद्या समजा तुमच्याबाबत कुणी असा हलकेपणा केला तर तो मी तरी खपवून घेणार नाही. जे बोलायचे आहे ते मी विनायकरावांबद्दल बोलीन. मला विनायकरावांची 'ही' गोष्ट पटत नाही, असे स्पष्ट सांगीन.

ज्या गोष्टींचा, परिस्थितींचा एखाद्याच्या आंतरजालावरील वावराशी कुठलाही संबंध नाही त्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलणे मला तरी कुटिलपणा वाटतो. कुठल्याही परिस्थितीत बदला घ्यायचा, ही मनोवृत्ती त्यात दिसते. मग त्यासाठी एखाद्याकडून कविता कमिशन करून घ्यायची हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे. आणि अशा प्रकारांचे सतत समर्थन करणे मला ढोंगीपणाचा कळस वाटत नाही. असो, माणूस आहे तर चुका होणारच असाच विचार करायचा.

अनेकदा प्रतिसादात एखाद्या प्रवृत्तीबद्दल, खटकलेल्या गोष्टीबद्दल लिहिलेले एखाद्या चिंग्याला विनाकारण भलतेच झोंबतो आणि मग तो त्यावर एखादा सबंध कविता, लेख वाया घालवतो. 'आम्ही फ्याशनेबल होतो' वगैरे वगैरे. एखाद्या बाईला डोळा मारावा आणि तिने बलात्काराचा आरोप करावा, ह्याला काय म्हणावे. पण असे होते. गंमत म्हणजे हे पोरकट प्रकार करणाऱ्यांपेक्षा ज्यांचे प्रतिसाद अशा लेखनाला आलेले असतात ते प्रतिसाद देऊन स्वतःच स्वतःचे बुरखे फाडतात तेव्हा थोडी निराशा होते पण त्याहून जास्त गंमत. 'शिकारी कविता आवडली' वगैरे वगैरे प्रतिसाद अगदी मित्रांकडूनही येतात. असो. एका अर्थाने ते बऱ्यासाठीच होते. कुण्या बिचाऱ्याने सतत खदखदत राहून अचानक एक दिवस उद्रेक करण्याऐवजी असे मध्येमध्ये प्रतिसाद दिलेले बरे.

असो, माणूस आहे चुका होणारच, असाच विचार करायचा. थांबतो. संतवाङ्मयाच्या तुमच्यासारख्या गाढ्या अभ्यासकाला म्या पामराने काय सांगायचे? जो जे वांछील तो ते लाहो.

चित्तरंजन

अवांतर:

ह्याउप्पर मला तरी मिसळपाव ह्या संकेतस्थळावर चमचमीत, रंगतदार असे लिखाण वाचायला यायचे आहे. मिसळपावची तीच खासियत व्हावी आणि निश्चित होईल असे मला वाटते. मिसळपाववर आपला वेळ एकमेकांना नंगे करण्यात, शिव्या देण्यात, दुसऱ्या संकेतस्थळावर काय होते आहे आहे काय होत नाही हे सांगण्यात घालवण्यात मला बिलकुल स्वारस्य नाही. कुणाच्या पोटरीवर किती तीळ आहेत, हे जाणून घेण्यात मला स्वारस्य नाही. (पोटरीऐवजी दुसरा शब्द वापरू शकलो असतो.)
मिसळपावला आणि मिसळपाव पंचायतीला पुन्हा एकदा भरघोस शुभेच्छा. आग्गे बढ़ो हम तुम्हारे साथ है.

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 1:23 am | विसोबा खेचर

मग त्यासाठी एखाद्याकडून कविता कमिशन करून घ्यायची हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे.

अच्छा! म्हणजे ती कमिशन्ड कविता होती म्हणायची! :)

संतवाङ्मयाच्या तुमच्यासारख्या गाढ्या अभ्यासकाला म्या पामराने काय सांगायचे? जो जे वांछील तो ते लाहो.

हम्म! तरी आमचे काकाजी नेहमी सांगत असतात की अध्यात्माच्या न पेलणार्‍या गोळ्या कधी चढवू नयेत! :)

कुणाच्या पोटरीवर किती तीळ आहेत, हे जाणून घेण्यात मला स्वारस्य नाही.

हा हा हा!

मिसळपावला आणि मिसळपाव पंचायतीला पुन्हा एकदा भरघोस शुभेच्छा. आग्गे बढ़ो हम तुम्हारे साथ है.

आमच्याही शुभेच्छा!

तात्या.

--
अरे श्याम, बेटा ठेव ते गीतेचं पुस्तक बाजूला! फार थोर पुस्तक आहे बाबा ते! पण आपण नाही ना तेवढे थोर! (इति काकाजी, नाटक - तुझे आहे तुजपाशी)

धनंजय's picture

18 Sep 2007 - 2:13 am | धनंजय

अहो काहीकाही तिळांत आम्हाला रस आहे बरे का!

अब समझा मैं तेरे रुख्सार पे तिल का मतलब
दौलते हुस्न पे दरबान बिठा रखा है ।

अर्थात काष्टा खसकन ओढून दाखवलेला तीळ एक आणि नकाब नजाकतीने बाजूला सारून बघायचा तो दुसरा - पूर्णपणे मान्य. पहिला नको, दुसरा दाखवा म्हणतो या अड्ड्यावर!

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 8:29 am | विसोबा खेचर

अर्थात काष्टा खसकन ओढून दाखवलेला तीळ एक आणि नकाब नजाकतीने बाजूला सारून बघायचा तो दुसरा -

वा, क्या बात है...

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 1:13 am | विसोबा खेचर

काय गडबड आहे? हे काय विनायकराव? निघालात लगेच? अहो आलात काय, चाल्लात काय, कमाल आहे बॉ तुमची.. :)

बरं बुवा! मर्जी तुमची...

आपला,
(देवगडचा) तात्या.

आजानुकर्ण's picture

18 Sep 2007 - 8:15 am | आजानुकर्ण

असे माझे मत आहे.

मिसळपावाचे संपादक मंडळ अशी चूक पुन्हा करणार नाहीत अशी आशा आहे.

सहज's picture

18 Sep 2007 - 8:32 am | सहज

ती कवीता परत आणा, राहू दे येथे, परत परत तेच वाचून छान वाटेल असे मला तरी त्यात काही वाटत नाही आहे शिवाय परत एकदा आपले मत तपासून पहावे म्हणून सारखे परत इकडून तिकडे जाणे नको. एखाद्या संकेतस्थळाच्या हीट्स (भेटी??) वाढाव्या म्हणून हा डाव तर नाही आहे ना ;-) ह. घ्या. नाही तर परत स्टॅटीस्टीक्स चा मारा करेल कोणी तरी आणी म्हणेल की आम्हाला असे करायची काही गरज नाही.

त्या कवितेच्या असण्यापेक्षा त्या कवीतेच्या जाण्याचे स्तोम जास्त नको.

तसेच ह्या पूढे जे साहित्य काढले जाइल त्याची मिमांसा तिथल्या तिथे दिली जावी व त्या क्षणी त्या ठीकाणी नवीन प्रतिसाद द्यायला बंदी, (read only - वाचनमात्र) मग २४ किंवा ४८ तासात ती पोस्ट गाळली जावी.

बेसनलाडू's picture

18 Sep 2007 - 8:50 am | बेसनलाडू

तसेच ह्या पूढे जे साहित्य काढले जाइल त्याची मिमांसा तिथल्या तिथे दिली जावी व त्या क्षणी त्या ठीकाणी नवीन प्रतिसाद द्यायला बंदी, (read only - वाचनमात्र) मग २४ किंवा ४८ तासात ती पोस्ट गाळली जावी.

स्तुत्य आणि विचार करण्यायोग्य प्रस्ताव वाटला.
येथे वावरताना -
१. एकापेक्षा अधिक सदस्यनामे घेऊन वावरण्याचा आणि कुरापती काढण्याचा खोडसाळपणा टाळण्यासाठी पंचायत समितीने ठोस पावले उचलावीत, अशी विनंती करावीशी वाटते. बव्हंशी, चित्तरंजन म्हणत आहेत तसला हलकेपणा करणारे असे बहुरुपीच तिसर्‍याच नावाने याच प्रकाराबाबत गळेकाढूपणा करीत असतात, हे देखील नजरेआड करता यायचे नाही.
२. ज्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मूलभूत तत्त्वावर हे संकेतस्थळ स्थापन झाले, तेथे स्थापनेच्या तिसर्‍याच दिवशी चालू झालेला हा सर्वपरिचित नंगानाच आणि पडलेले प्रतिसादांचे तट पाहता अभिव्यक्तीस्वातंत्र्य = उखाळ्यापाखाळ्या असा बहुतेक सदस्यांचा गैरसमज झालेला दिसतो. टपल्या,चिमटे,टोमणे,लागट बोलणे, वस्त्रहरण यांच्यातल्या सीमारेषा कुठे कशा पुसट होत जातात, याचे भान सदस्यांनी तसेच पंचायत समितीने राखावे आणि योग्य तेथे हस्तक्षेप करून, तसेच विस्तारीत स्पष्टीकरणाद्वारे समज देणे आणि ते न चालल्यास कारवाई करणे, असे संकेतस्थळाचे स्वरूप बाळसे धरण्याच्या काळापुरते तरी असावे, असे वाटते.
(सूचक)बेसनलाडू

सर्किट's picture

18 Sep 2007 - 9:12 am | सर्किट (not verified)

्या कवितेच्या असण्यापेक्षा त्या कवीतेच्या जाण्याचे स्तोम जास्त नको

विनायकरावांनी मनोगतावर ही कविता वाचून, कधी नव्हे ते ज्ञानेश्वरांव्यतिरीक्त इतर कुणाच्या कवितांची भलावण केली होती. (अर्थात त्यांच्या वर्तणुकीचा मागोवा घेता, ते आपल्या मैत्रिणीम्च्या कवितांची न वाचताही तारीफ करतात, हे दिसते. रोहिणीकाकू, हे वर्तन आम्हाला तरी चिंतनीय वाटते बॉ. तुम्ही बघा काय ते.) त्यामुळे, आणि इतर वाचन करून ही कविता खास कमिशन्ड होती, हे चित्तोबांचे मत आम्हाला पटते.

त्यामुळे ह्या कवितेचे स्तोम विनायकराव त्या कवितेच्या जाण्यातून माजवीत आहेत, हे आम्हाला आमच्यापुरते स्पष्ट झाले आहे.

- सर्किट

चिन्मयीजोशी's picture

18 Sep 2007 - 9:34 am | चिन्मयीजोशी

मंडळी,
इथली चर्चा वाचून भलतेच मनोरंजन झाले. अर्थात दहा ठिकाणी झोळी फिरवून, कुठेच डाळ शिजत नाही हे पाहून काढलेला हा सवतासुभा आणि
मुख्य म्हणजे उपक्रमावरून उधार आणलेले इथले वादग्रस्त प्रशासक मंडळ पाहता ही कविता इथे राहणार नाही हे दिसतच होते. पण मनोगताच्या
प्रशासकांच्या नावाने जगभर शिमगा करून अनुशासन नसलेली साईट काढतो अशा वल्गना करणाऱ्या इथल्या मालकांचे मातीचे पाय पळण्यात पडायच्याही
आधी उघड झाले हेही नसे थोडके.
आता आप बीती झोंबायला लागल्यावर वर्षभर थांबा म्हणणे, आपल्याच दहा नावांनी आपली लंगडी बाजू सावरू पाहणे हे नेहेमीचे यशस्वी पोरकट प्रकार
मालकांनी इथेही लगेच सुरू केले आहेत हे पाहून तर हहमु वळली अगदी.
राहता राहिला प्रश्न प्रस्तुत कवितेचा. स्वतः नावे बदलून मुलींची जाहीर टिंगलटवाळी करण्यास पुरुषार्थ मानणाऱ्या प्रस्तुत साहित्यसम्राटांनी मर्दपणाच्या
गोष्टी करणे हास्यास्पदच आहे. आपल्यावर झालेली टीका त्यांना जरासुद्धा सहन होत नाही हे तर त्यांनी जाहीरच मान्य केलंय इथे. शिवाय
साहित्यसम्राटंना एकट्याला लढता येत नाही हेही दिसलं. प्रस्तुत कविता मनोगतावरून आणि इथूनही जावी आणि आपली उरलीसुरली अब्रू शाबूत
रहावी म्हणून प्रस्तुत साहित्यसम्राटंना आपले वजन खर्ची घालावे लागले हे खात्रीलायकरित्या समजते. साहित्यसम्राटांचे चमचे आणि मालकांचे
खुषमस्करे यांनीच भरलेल्या या साईटकडून दुसरी अपेक्षा तरी कशी ठेवणार.
बाईला डोळा मारला आणि त्ने बलात्कार झाल्याची ओरड केली असा कांगावा करणाऱ्यांचा स्वतःचा कांगावखोरपणा त्याहूनही मोठा आहे हे आता उघड
झालेच आहे. मी मोठा असा स्वतःचा गोड गैरसमज करून घेऊन जगाला अक्कल शिकवणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की मांजराने डोळे मिटून दूध
प्यायल्याने जगाला कळत नाही असे नाही.
हा प्रतिसाद इथे राहणार नाही हे उघड आहे कारण तो इथल्या चमचे मंडळींच्या पचनी पडणार नाही. त्यामुळे ही कविता माझ्या ब्लॉगवर कायमस्वरूपी ठेवली जणार आहे. त्याची लिंक स्वतंत्र प्रतिसादात दिली जाईलच.
चिन्मयी जोशी.

सर्किट's picture

18 Sep 2007 - 9:42 am | सर्किट (not verified)

क्लास !! आवडले..
म्हणजे, आपली विखारी कविता मनोगतावरून गेली, ह्यावर आगपाखड करण्यास मिसळपाव हे आयतेच स्थळ मिळाले की आता. छान !!
चिन्मयीजी, कीप इट अप !
हम तुम्हारे साथ है !
पण एकदा आपल्या ब्लॉग वर, अथवा आणखी आपल्याला आणि आपल्या ज्येष्ठ मित्रांना जिथे कुठे बोलण्याची संधी असेल तिथे मनोगताच्या हुकूमशाही प्रवृत्ती विषयी, किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याच्या वृत्तीविषयी आधी लिहा, असे म्हणणे चुकीचे ठरेल का ?

९ सप्टेंबर ते १८ सप्टेंब्बर वाट पाहिलीत. आगपाखड केलीत ती ३ दिवसांच्या मिसळपावाविषयी. आजवर आपल्यावर डोळे मारणार्‍या नाही, तर आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बलात्कार करणार्‍याविषयी मूग गिळून गप्प बसलात. एवढेच नाही, तर त्या बलात्कार्‍याविरुद्ध आवाज उठवणार्‍यांवर आपल्या "प्रतिभेचा" वापर करून जाहीर टीका केलीत.

असो. आपली ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या आवडली.

चालू द्या.

- सर्किट

चिन्मयीजोशी's picture

18 Sep 2007 - 11:11 pm | चिन्मयीजोशी

अरे वा!
सर्किटकाका ,
तुमचे उत्तर वाचून उरावरचा धोंडा एकदम उतरल्यासारखं झालं हो. आई शप्पथ सांगते, इतके दिवस तुम्ही कुठे दिसला नाहीत तेंव्हा उपक्रमावरच्या दुष्ट प्रवृत्तींनी तुमचं काही बरं वाईट तर नाही ना केलं अशी भिती वाटायला लागली होती हो. पण आज तुमचा प्रतिसाद वाचून तुम्ही सुखरूप आहात आणि तुमचा निदान हा आयडी तरी हॅक झालेला नाही हे कळलं. कित्ती बरं वाटलं म्हणून सांगू...
आम्हाला तर अशीही शंका आली होती की आपले साहित्यसम्राट आणि तुम्ही असे दोघे जण प्रत्येकी शंभर शंभर उंदीर उडवून झाल्यानंतर हाजला वगरे निघून गेलात की काय? निदान गेला बाजार वर्ध्याच्या आश्रमात ब्रह्मचर्य सत्य अस्तेय करीत बसावं लागतं की काय अशीही कुशंका माझ्या मनाला चाटून गेली. असो.
मनोगतावरून कविता गेली त्याचं कारण साहित्यसम्राटांनी तिथल्या प्रशासनाला घातलेली गळ आहे. त्यामुळे आमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणारे आपले साहित्यसम्राट ठरतात. म्हणूनच तर अशा चर्चा करायला योग्य व्यासपीठावर मी हा मुद्दा मांडला.
चिन्मयी जोशी

विकेड बनी's picture

18 Sep 2007 - 11:18 pm | विकेड बनी

साहित्यसम्राट आणि सर्किटांबरोबर मनोगतावरील ज्ञानेश्वरीकारांनाही घ्या शंभर शंभर उंदीर उडवायला.

हीहीहीही!!! स्वतःचे काही चालत नाही आता बायकांच्या नथीतून तीर मारा.

अहो तुमची कवीता छान आहे बघा मी कशी पाठ केली तुम्हाला म्हणून दाखवतो. बघा तरी अहो तुमच्या हातून तो कवीतेचा कागद पडला असेल तुमच्या सख्खा शेजार्‍यांनी इइइ हा कचरा माझ्या अंगणात का म्हणून कदाचीत तो कागद भिरकावला असेल.

पण आम्ही सामान्य वाचक (म्हणजे सामान्य साहीत्याचे वाचन करणारे बर का) तुम्चे काव्य पाठ करुन बसलो.

बघा तुमच्या खरडवहीत म्हणून दाखवतो. इथ नाही आवडत ना कोणाला म्हणून. आता चिडू नका हो. सगळच सगळ्यांना आवडत नाही व आपण तसा आग्रह धरूपण शकत नाही. खर आहे की नाही?

हा तिथून दोन दिवसात उडवू नका हा.

चित्तरंजन भट's picture

18 Sep 2007 - 11:03 am | चित्तरंजन भट

किती जळजळ ! ऍसिडिटीची गोळी घ्या बरे लगेच २-३. त्या कवितेची अभिजात साहित्यांत गणना होणार आहे. म्हणूनच मनोगतावरून ती जावी आणि इथूनही ती कविता जावी ह्यासाठी काही लोकांनी हे कारस्थान केलेले दिसते आहे. आणि त्यांचा आनंद आता गगनात मावेनासा झालेला दिसतो आहे.

असो, असो. उगाच कशाला ह्या गोष्टीत पडायचे?
आम्ही आपला संतवाङ्मयाचा अभ्यास सुरू ठेवतो.

मृदू सबाह्य नवनीत
तैसे सज्जनांचे चित्त

चित्तरंजन

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 11:24 am | विसोबा खेचर

असो, असो. उगाच कशाला ह्या गोष्टीत पडायचे?
आम्ही आपला संतवाङ्मयाचा अभ्यास सुरू ठेवतो.

मृदू सबाह्य नवनीत
तैसे सज्जनांचे चित्त

हा हा हा!

आपला,
(सज्जन!) तात्या.

सुवर्णमयी's picture

18 Sep 2007 - 7:10 pm | सुवर्णमयी

चिन्मयी जोशी असे नाव दिसल्याने काही विचारणा झाली म्हणून मुद्दाम हा प्रतिसाद देते आहे-
मनोगत, मायबोली, उपक्रम , मिसळपाव किंवा (आणखी येणार्‍या संकेतस्थळावर )असणारे चिन्मयी अथवा चिन्मयी जोशी या नावाने मी लिहित नाही/ लिहिणार नाही.

हा सुवर्णमयी आयडी माझा आहे. त्याशिवाय इथे येणारा / अशा प्रकारच्या संकेतस्थळावरअसा आयडी कि ज्यात माझे नाव - पूर्ण अथवा संक्षिप्त स्वरूपात दिसते आहे असे साधर्म्य असणारा कोणताही आयडी माझा नाही./नसेल. त्यामुळे त्याने होणार्‍या प्रतिसाद/ लेखनाची जबाबदारी माझी नाही.

कोणाच्याही व्यक्तीगत माहितीचा गैरवापर, एखाद्याच्या खाजगी आयुष्यावर अथवा वाडवडिलांवर, व्यंगावर टीका करणे मला आवडत नाही. असे प्रतिसाद येणारे कोणतेही आयडी कोणत्याही संकेतस्थळावर माझे नाहीत/ नसतील. त्या त्या संकेतस्थळाच्या प्रशासकांनी तशी खात्री करायला माझी काहीही हरकत नाही. (शक्य असल्यास त्यांनी जरूर तपासणी करावी असेच मी म्हणेन.)

चिन्मयीजोशी's picture

18 Sep 2007 - 11:19 pm | चिन्मयीजोशी

सोनालीताई,
आपण जोशी नावाचे पेटंट घेतले आहे काय?
आपण असे काय केले आहे की मराठी साहित्यविश्वात इतके जोशी असताना चिन्मयी जोशीपणाचा आरोप नेमका आपल्यावरच व्हावा? की जोशी नाव वाचून लोक डोळे मिटून आपल्यालाच ठोकायला येतात?
अर्थात आपण कधीतरी कुठल्यातरी मुद्द्यावर जाहीरपणे ठाम भूमिका घेतलीत हेही नसे थोडके! यापुढे कुठलाही नवा आयडी दिसताच "हा माझा नव्हे" असे जाहीर प्रतिज्ञापत्र आपल्याकडून येईलच अशी खात्री बाळगून आहोत!.तरी ते अवश्य पाठवावे
चिन्मयी जोशी

सुवर्णमयी's picture

18 Sep 2007 - 11:44 pm | सुवर्णमयी

नाही, जोशी नावाचे पेटंट माझ्याकडे नाही. आरोप आणि विचारणे यात फरक आहे. बाकी सर्व प्रश्न व्यक्तीगत पातळीवरचे वाटतात. त्यांची उत्तरे देण्यास मी बांधील नाही.

चिपलूनचा बाल्या's picture

18 Sep 2007 - 9:56 am | चिपलूनचा बाल्या

रे इनूभाऊ,

काय कलनां काय चाललाय ता.

इनूभाऊ, तुमि म्हंता ते काय अबिव्यक्ति स्वातंत्र का काय, ते कशासी खातात रं बा?

म्हंजे आपला ता खरा म्हनायचां त्येच का त्ये?

बाल्या

प्रकाश घाटपांडे's picture

18 Sep 2007 - 10:57 am | प्रकाश घाटपांडे

विडंबनाच्या माध्यमातून केलेली टीका जर अशी दिलखुलास असेल तर असा प्रतिसाद मिळतो.

प्रकाश घाटपांडे

दिगम्भा's picture

18 Sep 2007 - 11:00 am | दिगम्भा

कशाला काढली ती कविता? एवढं काही आभाळ कोसळत नव्हतं ती ठेवली असती तरी. ४ दिवसांनी कोणी वाचलीही नसती, आणि वाचून ८०% लोकांना समजण्यासारखीही नव्हती. एवढी चर्चा झाल्यामुळेच तिच्याकडे लक्ष वेधलं गेलं नि तिला महत्व आलं आहे.
हां, इतर संस्थळांवरती खिजवत राहिले असते हे खरं. पण आपण कोणाचं तोंड बंद करू शकतो का? इथे नाही तिथे लोक काय बोलायचं ते बोलणारच. इथून काढून टाकल्यामुळे फक्त प्रशासक वगैरेंच्या पंगतीला पंचायत समिती बसवली गेली हे सोडून काय साधलं?
तसंही मला वाटतं इथल्या सदस्यांनी बहुमताने काढून टाका असं सांगितल्यावरच तसं करायला हवं होतं. लोकशाही अनुशासनाची एक सुवर्णसंधी गमावली गेली याचं वाईट वाटतं.
"नरक" या कल्पनेचा पंचायत समितीने विचार करावा अशी सूचना करतो.
- दिगम्भा

आजानुकर्ण's picture

18 Sep 2007 - 11:03 am | आजानुकर्ण

दिगम्भा यांच्या प्रत्येक शब्दाशी सहमत. कविता हिणकस होती. आणि त्याकडे दुर्लक्ष झाले असते.
मनोगतावर गेली दीड वर्षे वावर असूनही मला स्वतःला ती कविता वाचून पहिल्यांदा बरेच संदर्भ लागले नव्हते.
पण या चर्चेत त्या कवितेचे संपूर्ण रसग्रहण झाले व अर्थ कळला.

जाऊ द्या आता.

सर्किट's picture

18 Sep 2007 - 11:06 am | सर्किट (not verified)

आम्ही (आजवर जसे देत आलो आहोत, तसे) उचंबळून प्रतिसाद दिल्यावर दिगभ्भांचा प्रतिसाद वाचला. खरेच पंचायत समितीच्या सदस्यांनी विचार करण्यासारखा प्रतिसाद आहे. विशेषतः दिगभ्भा ह्यांचा आजवर वावर लक्षात घेता, हा कुणा एका कवयित्रीच्या जवळिकीतून आलेला प्रतिसाद नसल्याने त्याला अत्याधिक महत्व देण्यात यावे, असे मी सुचवतो.

- (दिगभ्भांचा फ्यान) सर्किट

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 11:17 am | विसोबा खेचर

विशेषतः दिगभ्भा ह्यांचा आजवर वावर लक्षात घेता, हा कुणा एका कवयित्रीच्या जवळिकीतून आलेला प्रतिसाद नसल्याने त्याला अत्याधिक महत्व देण्यात यावे, असे मी सुचवतो.

हा हा हा! यातला 'आध्यात्मिक महत्व' हा शब्द आवडला! :)

ज्ञानोबा महाराज की जय! :)

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Sep 2007 - 11:23 am | प्रकाश घाटपांडे

हा हा हा! यातला 'आध्यात्मिक महत्व' हा शब्द आवडला! :)

तो 'अध्यात्मिक' च आहे चुकुन अत्याधिक लिहिले गेले असावे

प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत's picture

18 Sep 2007 - 11:10 am | गुंडोपंत

मी पण हेच म्हणतोय...
उगाच महत्व वाढवलंय... ते ही फालतू गोष्टीचे!
दिलदारी दाखवायची एक संधीच घालवली...

आपला
गुंडोपंत

प्रकाश घाटपांडे's picture

18 Sep 2007 - 11:06 am | प्रकाश घाटपांडे

एवढी चर्चा झाल्यामुळेच तिच्याकडे लक्ष वेधलं गेलं नि तिला महत्व आलं आहे.

याला म्हणतात इष्टापत्ती! आता ती कविता उडवली नसती तर एवढा काथ्याकूट झाला नसता! पण काथ्याकूट सदरातच असल्याने तो तर झालाच पाहिजे ना? एका अर्थाने ती उडवून मिसळपावने त्याला उचित न्याय दिला आहे.

प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 11:22 am | विसोबा खेचर

ती कविता इथेच जर राहिली असती तर तिला एवढी प्रसिद्धी मिळाली असती का? :) अहो तिच्यावर इथे इतका काथ्याकूट झाला म्हणूनच तर ती इतक्या लोकांनी वाचली, हे खरं की नाही?

उलटपक्षी ती अप्रकाशित करून पंचायत समितीने तिला अधिकच प्रसिद्धी मिळवून दिली आहे!

खरं की नाही चिन्मयी ताई? काय म्हणता विनायकराव, आम्ही बोलतोय ते चुकीचे आहे का? :)

मिसळपाव पंचायत समिती's picture

18 Sep 2007 - 11:42 am | मिसळपाव पंचायत समिती

झाल्या प्रकाराची नोंद हंगामी पंचायत समितीने घेतलेली आहे. असे प्रकार भविष्यात घडू नयेत ह्यासाठी पंचायत समिती कार्यशील राहील. ह्या संकेतस्थळाचे वय बघता सदस्यांकडूनही संयमरूपी मदतीची अपेक्षा आहे.

आपापली मते प्रामाणिकपणे इथे नोंदवणार्‍या सर्व सदस्यांचे आभार!

-मिसळपाव पंचायत समिती

उग्रसेन's picture

18 Sep 2007 - 2:35 pm | उग्रसेन

कवीता दोन दीस पडून होती कोनीबी वाचीत नव्हतं
कशाला काल्ढी कवीता .

कवीता पून्हा टाका जागेवर,ह्या सगळा काथ्याकूट बी काढून टाका.
असा जर आजच्या आज नै झालं तर पंचायत समीती म्होरं मी अन अन्नासाहेब हजारे आमरण उपोशनाला बसू
हीच नोटीस समजून कारेवाही करावी ही इनंती.

बाबूराव
राळेगण शिद्धी.

चिन्मयी's picture

18 Sep 2007 - 3:30 pm | चिन्मयी

ही कविता माझी आहे. ती मनोगतावरून गेल्यावर इतरत्र घालू नये असे मीच सांगितले होते तरीही ती कविता येथे घालण्यात आली. माझे आडनाव जोशी नाही. ज्या पोष्टमन"काकां"नी ती कविता येथे घातली त्यांनीच चिन्मयी जोशी असे नाव घेऊन आपली जळजळ व्यक्त केली आहे. त्यांच्यापासून सावध असावे.

ही कविता एका व्यक्तीवर लिहिली होती आणि असे हिणकस प्रकार माझ्याकडून भविष्यात घडणार नाहीत. परंतु माझ्या नावाने असे लिहून जर कोणी घाणेरडेपणा करत असेल तर ती मी नाही हे निश्चित.

विनायक काका आणि रोहिणी काकूंनी वरील प्रकार इतरत्रही केला होता हे ही येथे विसरून चालणार नाही. मिसळपाव पंचायत समितीवर माझा पूर्ण विश्वास आहे.

- चिन्मयी गोरे.

जुना अभिजित's picture

18 Sep 2007 - 3:52 pm | जुना अभिजित

मित्रांनो आता इथे या चर्चेला पूर्णविराम द्यायला हरकत नाही.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्रकाश घाटपांडे's picture

18 Sep 2007 - 4:06 pm | प्रकाश घाटपांडे

ष्टोरीने नवीन टर्न घेतलेला दिसतो. पन लई भारी ष्टोरी दिसते. भारी मिसळ आहे!
प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव's picture

18 Sep 2007 - 3:55 pm | प्रमोद देव

हे प्रकरण वाटतंय इतके साधे नाही असे दिसतेय. ह्यातले बोलविते धनी वेगळेच दिसताहेत. चांगले चाललंय कोंबड्या झुंजवणे!
आता इथे प्रतिसाद देणारा,लिहिणारा जो /जी कोणी असेल त्यांच्या बद्दल मनात शंका राहणार हे नक्की. ही व्यक्ती खरी तीच आहे (ज्या नावाने प्रतिसाद देत आहे) की तोतया?
इथे वेगवेगळ्या नावाने लिहिणारे बरेच लोक असल्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण हे कळणे कठीण होऊन बसलंय! अरे बाबांनो अन बायानो स्पर्धा करा,टीका करा पण उजळ माथ्याने समोर या. असे आडून वार करू नका. त्यामुळे आमच्यासारख्यांचा निष्कारण गोंधळ होतोय. टीका विधायक असू दे अन स्पर्धा निरोगी असू दे! एकमेकावर कुरघोडी करण्यात कसली धन्यता मानताय?

हर हर! काय दिवस आलेत?

मिसळपाव पंचायत समिती's picture

18 Sep 2007 - 3:57 pm | मिसळपाव पंचायत समिती

आता झाली तेवढी चर्चा पुरे झाली. असे पंचायत समितीचे मत आहे.

ही कविता एका व्यक्तीवर लिहिली होती आणि असे हिणकस प्रकार माझ्याकडून भविष्यात घडणार नाहीत.

हे वाचून आनंद झाला. हेच तुमचे मिसळपाव वर स्वागत आहे. येथे मनमोकळेपणाने लेखन करा.

कळावे,
आपले नम्र,
मिसळपाव पंचायत समिती.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Sep 2007 - 4:14 pm | प्रकाश घाटपांडे

हे वाचून आनंद झाला. हेच तुमचे मिसळपाव वर स्वागत आहे. येथे मनमोकळेपणाने लेखन करा.
खरंच , अगदी नि:संकोचपणे करा. मतभेद असले तरी दिलखुलास असावेत.

प्रकाश घाटपांडे

सहज's picture

18 Sep 2007 - 4:19 pm | सहज

मिसळपाव समीतीचा विजय असो!

बाय द वे जर का हे संपल असेल तर ह्या पोस्टला आता बंद करा.

मिसळपाव पंचायत समिती's picture

18 Sep 2007 - 11:46 pm | मिसळपाव पंचायत समिती

प्रसव ही कविता ज्यांची होती त्या कवयित्रीने येऊन हा वाद बंद करण्याचे आवाहन केल्यानंतरही या चर्चेत होणारे व्यक्तिगत वाद आणि आरोप यांना पूर्णविराम देण्यासाठी सदर चर्चा बंद करण्यात येत आहे.

कृपया, सदस्यांनी आपली प्रतिभा साहित्यनिर्मितीकरता खर्च करावी, जुने वाद उकरून काढण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या स्थळाचा वापर करू नये.

- मिसळपाव पंचायत समिती.