भारतीय संघाचे अभिनन्दन

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
3 Apr 2011 - 1:16 am
गाभा: 

भारतीय क्रिकेट संघाने १९८३ नंतर आज वर्ल्ड कप जिंकला.
विश्वचशक स्पर्धेतील गेल्या तीन मॅचेस मध्ये ऑस्ट्रेलीया पाकिस्तान च्या चित्तथरारक लढतीनंतर फायनल ला श्रेलंकेविरुद्ध महत्वाची मॅच जिंकून भारताने विश्वचषक जिंकला आहे.
भारतीय संघातील सर्व खेळाडुंचे अभिनन्दन.
भारतीय संघ पुर्वी चांगल्या अवस्थेतून अडचणीत येण्यासाठी प्रसिद्ध होता.
पण या विश्वचषक स्पर्धेत मात्र भारतीय संघ अडचणीवर मात करून अत्यंत टेन्स सिच्यूएशन असतानाही तणावावर मात करून जिंकू शकतो हे दाखवून दिले.
आजच्या मॅचमधले तुम्हाला आवडलेले काही क्षण सांगा.
मला आवडलेले काही
१) धोनीने मारलेला शेवटचा षटकार...त्यावेळेस चेंडूसिक्सरसाठी त्याच्या चेहेर्‍यावर डोळ्यात यशाचे प्रतिबिंब. याची तुलना १९८३ च्या स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना कपीलदेव चे डोळे अक्षरशः चमकत होते
२) भारतीय संघाची फिल्डींग अप्रतीम झाली
३) जहीर खानचा भेदक पहीला स्पेल
४) लसीत मलिंगने घेतलेली सेहवगची विकेट

प्रतिक्रिया

रमताराम's picture

3 Apr 2011 - 1:23 am | रमताराम

चक्क विजुभाऊंनी कौतुक केलंय म्हणजे नक्कीच ग्रेट असलं पाहिजे काहीतरी. नाहीतर आज विजुभाऊंकडून 'कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे' अशा प्रतिक्रियेची अपेक्षा होती.

(विजुभाऊ ह. घ्या बर्का.)

'कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे' अशा प्रतिक्रियेची अपेक्षा होती.
चांगल्याचे कौतूक करताना कुत्सीतपणा कशाला .
दिलखुलास पणे कौतूक करुया ना.
कबड्डी टीमच्या मॅचेस कलमाडीना इतक्या लोकप्रीय करता आल्या नाहीत याचे वैषम्य जरूर वाटतेय.
असो.
तुमच्याकडून "आजच्या मॅचमध्ये एन्जॉय केलेले क्षण " अशा प्रतीक्रीयेची अपेक्षा होती

चिंतामणी's picture

3 Apr 2011 - 9:26 am | चिंतामणी

कबड्डी टीमच्या मॅचेस कलमाडीना इतक्या लोकप्रीय करता आल्या नाहीत याचे वैषम्य जरूर वाटतेय.

विषय क्रिकेटचा असल्याने "लोकप्रियता" म्हणलात ते क्रिकेटबद्दल असणार असे गृहीत धरतो.

मा. कलमाडींचा आणि क्रिकेटचा काहिही संबंध नाही.

कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही असोसीएशनशी "साहेबांचा" संबंध आहे. त्यामुळे पुढील दूरूस्ती करावी ही नम्र विनंती

कबड्डी टीमच्या मॅचेस साहेबांना इतक्या लोकप्रीय करता आल्या नाहीत याचे वैषम्य जरूर वाटतेय.

रमताराम's picture

3 Apr 2011 - 11:10 pm | रमताराम

दिलखुलास पणे कौतूक करुया ना.
तुमचे मत आवडले. अलिकडेच बनले असावे. असो. आमचा आनंद आम्ही यत्र तत्र सर्वत्र व्यक्त केला आहेच (आमची खरडवही पाहणे) त्यामुळे हा प्रतिसाद खास 'विजुभाऊंना' होता. ;)

विजुभाऊ's picture

3 Apr 2011 - 1:56 am | विजुभाऊ

टॉस दोन वेळा उडवला गेला....
आश्चर्य म्हणजे दोन्ही वेळेस टॉस सम्गकाराच्या बाजूनेच पडला

म्याच नंतर कोहली ने दिलेली कॉमेंट सगळ्यात जास्त आवडली.

गणपा's picture

3 Apr 2011 - 2:38 am | गणपा

अगदी अगदी.

सूर्यपुत्र's picture

3 Apr 2011 - 10:59 am | सूर्यपुत्र

काय कॉमेंट दिली कोह्-ली ने?

-सूर्यपुत्र.

गणपा's picture

3 Apr 2011 - 11:19 am | गणपा

"Tendulkar has carried the burden of the nation for 21 years. It is time we carried him on our shoulders" इति कोहली

सूर्यपुत्र's picture

3 Apr 2011 - 11:26 am | सूर्यपुत्र

छान कॉमेंट आहे कोह्-ली ची... :)

(ग्रेट-ली)

-सूर्यपुत्र.

वपाडाव's picture

5 Apr 2011 - 2:13 pm | वपाडाव

अगदी अगदी हेच लिहायला आलो होतो....
अन भावी क्याप्टन (कोहली) यांना शुभेच्छा...

आत्मशून्य's picture

3 Apr 2011 - 3:07 am | आत्मशून्य

१) धोनीचा शटकार
२) गंभीरची खेळी
३) जेव्हां सचीन आउट झाला
४) भारतीय संघाची अप्रतीम फिल्डींग
५) जहीर खानचा पहीला स्पेल

सखी's picture

3 Apr 2011 - 5:09 am | सखी

३) जेव्हां सचीन आउट झाला

बाकी चारशी १००% सहमत, तिस-याबद्दल अजीबात १००१% नाही.

वपाडाव's picture

5 Apr 2011 - 2:16 pm | वपाडाव

आत्मशुन्यशी सहमत,
@सखी : त्याला असे म्हणायचे असेल की,
३) जेव्हा सचिन (शतक न बनवता) आउट झाला.

अप्पा जोगळेकर's picture

3 Apr 2011 - 10:37 am | अप्पा जोगळेकर

संपूर्ण सामनाच अविस्मरणीय होता. असे एक दोन क्षण नाही वेचून काढता येणार. कालचा दिवस आणि रात्र भारताचीच होती. काल प्रत्येक भारतीयाचे मन आनंद आणि अभिमान या भावनांनी भरुन आले असेल.

यशोधरा's picture

3 Apr 2011 - 11:11 am | यशोधरा

विजूभाऊ, मस्त धागा.
अख्खा सामनाच मस्त झाला! :) शेवटी शेवटी इतका अटीतटीचा सामना होत होता की कितीदा श्वास रोखला काय माहीत! :) धोनीची शेवटची सिक्स अफलातून!
सेहवाग, तेंडुलकर आणि गंभीर आउट झाले तेह्वाचा शॉक आणि निराशा...
संगाकाराला ४८ वर उडवला तेह्वाचा जल्लोष!

सहज's picture

3 Apr 2011 - 11:45 am | सहज

बरेच क्षण वर उल्लेख केलेले.

सगळ्यात मस्त वेळ ही कोहली-गंभीर-धोनी यांनी अतिशय जबाबदारीने टप्या-टप्याने लक्ष्याकडे केलेली वाटचाल. सेहवाग-तेंडूलकर यांच्या धावांशिवाय, धावांचा केलेला यशस्वी पाठलाग = हा नव्या खेळाडूंचा विजय!!

चिंतामणी's picture

3 Apr 2011 - 11:43 am | चिंतामणी

लेखन विषय "अभिनंदन" हे ठिक आहे. पण सदर धागा काथ्याकुट सदरात आणि " नृत्य, संस्कृती" या प्रकारात कसा मोडतो हे नाही समजले.

जरा खूलासा कराल काय?

वपाडाव's picture

5 Apr 2011 - 2:25 pm | वपाडाव

@चिंतामणीजी :
सामना झाल्यानंतरचे संभाव्य प्रकार लक्षात धरुन विजुभौंनी हे विचारात घेतले असावे असे वाट्टे...
जसे, जिंकल्यानंतर जल्लोष करत नाचुन बेभान होणारी पब्लिक - म्हणुन 'नृत्य' हा प्रकार,
तसेच, क्रिकेट संघाच्या इनामादाखल पुनम पांडे यांचा फ्यान्सी अनड्रेस शो (Fancy Undress Show)-हा 'संस्कृती' या सदराखाली मोडावा अशी (आमच्या मनातील) सुप्तेच्छा..

खुलासा कळाल्यास कळवावे...

चिंतामणी's picture

5 Apr 2011 - 5:24 pm | चिंतामणी

:D

तिमा's picture

3 Apr 2011 - 11:45 am | तिमा

भारतीय संघ का जिंकला ? कारण प्रेक्षकांत 'रजनीकांत' हजर होता. त्यामुळे सर्व संघाचा खेळाचा दर्जा उंचावला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Apr 2011 - 12:32 pm | निनाद मुक्काम प...

अनहोनी को कर दे होनी

जब (स्टेडीयम मे) जमा हो सारे
रजनी..........
,गजनी .......
और धोनी

चतुरंग's picture

3 Apr 2011 - 6:46 pm | चतुरंग

स्पिन चांगली खेळतो हे फक्त ऐकून होतो कालच्या सामन्यात त्याने खणखणीत प्रात्यक्षिकच दिले. मुरलीची मुरली बेसूर केली. कोहली आणि नंतर धोनी बरोबर केलेल्या टप्प्याटप्प्याच्या भागीदारीने लक्ष्य हळूहळू जवळ आणले.
याआधी मी फक्त कांगारूंना इतके प्रोफेशनली टारगेट फॉलो करताना अनुभवले होते. काही अनपेक्षित घडलेल्या घटनांनी विचलित न होता प्रत्येकाने आपापले काम नीट करणे हे ताणाच्या परिस्थितीत अत्यंत अवघड असते ते काल भारतीय खेळाडूंनी साध्य केले. सचिन आउट झाला की कच खाणे संपले ह्याचा सगळ्यात जास्त आनंद झाला! पुढे जाणार्‍या भारतीय संघासाठी ही बाब अत्यावश्यक आहे. अजून काही वर्षांनी सचिन रिटायर होईल त्यावेळी तो संघात नसताना जी पोकळी जाणवणार आहे त्याला तोंड कसे द्यायचे ह्या गोष्टीची मानसिक तयारी झाली, रंगीत तालीम झाली! भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
धोनीची कप्तानी अतिशय कणखर झाली. काही निर्णय तो इंस्टिंक्टिवली घेतो, तो रिस्क टेकर आहे आणि तेच त्याचं बलस्थान आहे! स्वतःला ५ नंबरवर खेळवायच्या घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी त्याने काल पेलली आणि नेमक्या कळीच्या सामन्यात उत्तम धावा जमवल्या. शेवटच्या धावासुद्धा उत्तुंग षटकाराने पूर्ण केल्या ह्यात त्याचा आत्मविश्वास दिसला!
मोक्याचे क्षण म्हणाल तर झहीरखानने पहिली ३ षटके निर्धाव टाकली, सेहवागने स्लिपमध्ये घेतलेला अवघड कॅच, दिलशानचे कोरीव शतक, श्रीशांतने केलेली धावांची खैरात, सेहवाग आणि तेंडुलकर गेले , कोहलीचा अफलातून कॅच दिलशानने घेतला, गंभीरची अत्यंत जबाबदार आणि धीराची खेळी, विराट, माही आणि युवीने त्याला दिलेली अफलातून साथ आणि भारतीय संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण!

अविनाशकुलकर्णी's picture

3 Apr 2011 - 11:17 pm | अविनाशकुलकर्णी

सचिन ची मिरवनुक खांद्यावर घेवुन मैदानातुन निघाली होति त्या वेळी धोनि कुठेच दिसला नाहि...
धोनि ने सचिन ला खांद्यावर घेवुन मिरवले असते तर सचिन ला हि बरे वाटले असते..
पण धोनि गायब होता. ..यात काहितरी राजकारण असेल का?

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Apr 2011 - 11:39 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. कुलकर्णी, मी तुमच्या विचारांचा निषेध करतो. याउप्पर जास्त दखल घेऊ इच्छित नाही!

विजुभाऊ's picture

4 Apr 2011 - 10:31 am | विजुभाऊ

बिपीन भाउंशी सहमत आहे.
कुलकर्णी साहेब इतका कोता विचार मांडायला नको होता

शेखर's picture

6 Apr 2011 - 1:44 am | शेखर

आफ्रिदी पण तुमच्याशी सहमत आहे विजुभाऊ... ;)

कुंदन's picture

3 Apr 2011 - 11:46 pm | कुंदन

धोनि वगळता इतर सर्व खेळाडुंनी सचिन ला खांद्यावर घेवुन मिरवले का ? तसे नसेल तर ते सारे त्या राजकारणाचा भाग असतील का ? अन काय असेल हो हे राजकारण ? कौल टाका की वेगळा ...;-)

पैसा's picture

3 Apr 2011 - 11:56 pm | पैसा

धोनी थकल्यामुळे सगळ्यांच्या मागून चालत होता. तुम्ही पाहिलं नसेल. पण धोनीबद्दल आत्ता असं लिहिणं बरोबर नाही. खेळत असताना सुद्धा त्याला खूप वेदना होत असाव्यात असं दिसत होतं, पण केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने सामना जिंकून दिला. याहून जास्त काय पुरावा हवा?

चतुरंग's picture

4 Apr 2011 - 4:34 pm | चतुरंग

अत्यंत हीन विचार! ह्या उप्पर काही बोलायचे नाहीये!

धोणी, युवराज अन भज्जी तिघेही सर्वप्रथम इंट्र्यु देत होते त्यामुळे त्यांना पोचण्यास वेळ झाला अन त्यामुळे हे बारगळले असावे असा अंदाज...
पण हा विचार तर धोणीद्वेष्ट्या माझ्या मनाला शिवलादेखील नाही...
-(सचिनच्या द्विशतकावेळी धोणीला सर्वात जास्त शिव्या हासडणारा)

तिमा's picture

4 Apr 2011 - 12:12 pm | तिमा

धोनी हा उमद्या स्वभावाचा शांत डोक्याचा माणूस आहे. त्याबद्दल उगाच नसत्या कुशंका नको.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Apr 2011 - 6:07 pm | निनाद मुक्काम प...

२००६ किंवा ५ मध्ये इंग्लंड मायदेशात प्रतिष्ठेची एशेष जिंकली तेव्हा त्या क्षणापासून ह्यांनी ढोसायला सुरवात केली .
राणीला त्याच अवस्थेत सकाळी भेटून जेव्हा ह्यांची विजय यात्रा ऑक्सफर्ड स्ट्रीट वरून निघाली तेव्हा अर्ध्याहून जास्त लोकांना तोल सांभाळता येत नव्हता ना शुद्ध नव्हती ,.
धोनीच्या संघाचे ह्या बाबतीत कौतुक वाटते .त्याने नवस फेडणे असो किंवा प्रतिभा ताईंना भेटायला सगळ्या संघाने जाणे असो .अत्यंत शिस्त बध्द पद्धतीने वर्तन आपल्या संघातर्फे झाले .
आमच्या हॉटेलात तमिळ निर्वासितांनी अक्षराशः लंका दहन झाल्याच्या अविर्भावात हा विजय साजरा केला .ह्यात त्यांचे दहन झालेले संसार व आप्त सकीय ह्यांच्या आठवणीची किनार त्याला होती .
बाकी पाकडे मात्र मिसाबहा ला शिव्या घालत होते . अख्तर खेळला असता तर किंवा आफ्रिदी ने १५ च्या वर स्कोर केला तेव्हा जरा स्थिर झाल्यावर लगेच पॉवर प्ले का नाही घेतला .
अश्या अनेक गोष्टीवर चर्चा चालू होती .
ह्या पराभवावर नुकत्याच झालेल्या आत्मघाती हल्याचे सावट होते .( आम्ही जिंकलो असतो तर काही काळ हा नरसंहार थांबला असता ,आमच्या देशाला ह्या कपची गरज होती असे हतबल उद्गार काही बुद्धीजीवी पाकिस्तानी मंडळींकडून निघाले .
ह्याने माझा आनंद जास्तच द्विगुणीत झाला .पेरावे तसे उगवावे हा सृष्टीचा नियम आहे .