✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाची हालहवाल..

प — परिकथेतील राजकुमार, Fri, 02/25/2011 - 12:00
चाललंय काय चाललंय काय.. मिपावर सध्या चाललंय काय.. बिका शेख, रंगा शेठ रजेवर आहेत VRS ची चाचपणी करत आहेत.. कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत.. कोदा आमचा ज्ञानेश्वर आहे शुचि मुक्ताईची जागा घेतच आहे... गवि आणि हर्षद पाठीशी आहेत निवृत्ती सोपान शोभत आहेत.. अदिती आजकाल विस्थापितांवर लिहिते विस्थापिताचे दु:ख विस्थापितांनाच जाणवते.. मकी आजकाल गायब असते फक्त व्यनीत रममाण असते.. टार्‍या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे.. अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय... डान्राव म्हणे प्रतिमा सुधारणार आहेत खैरनार आता बिल्डिंग उभारणार आहेत.. निदेंची तब्येत आता सुधारत आहे हुच्चभ्रु विळख्यातून मुक्ती मिळत आहे... सुकांची लेखणी थंड आहे काश्मिराची आग सध्या मंद आहे.. चुचु देखील लिहीत नाही झोपाळ्यावरून म्हणे तिला उतरवत नाही... विजुभौंनी कर्व्यांचा नाद सोडला आहे आता हेगडेवारांचा पुतळा डोळ्यात भरला आहे.. मिपावर आजकाल विनोद नसतात फावल्या वेळात लोक मुलखावेगळीची खव वाचतात.. सहजराव नवाच "उपक्रम" करतात मिपावर 'डेव्हील्स अ‍ॅडव्होकेट' बनतात.. त्यांच्या दुकानाच्या पाट्या श्रावण फोडतात पण खरडींतून भलतेच विनोदी लिहीतात.. कवितक सध्या मागे पडलंय घासूगुर्जींना सांख्यिकीने ग्रासलंय.. पुण्याला कोण भाव देतंय? विचाराने पराचं डोकं चळलंय.. धम्या डोक्याला हात लावून बसलं आहे पोरगं नुकतंच हलकट मिपाकरांच्या अंगा-खांद्यावर खेळून आलं आहे... कुंद्या आमचा आता सावकार होणार आहे गरीब मराठी उद्योजकांना भांडवल देणार आहे... गणपा आमचा थकला आहे सुगरणींच्या गराड्यात हरवत चालला आहे.. क्लिंटन विजुभौंना भेटून आले आहेत बहुदा म्हणूनच सध्या व्यवहारज्ञान शिकवत आहेत... थत्ते चाचा नैष्ठिक मौन पाळणार आहेत 'विचारवंत' शब्दाच्या हकालपट्टीची मागणी करणार आहेत.. नायल्या आमचा डॉल्बी मागवणार आहे प्रा. डॉ. बरोबर वरातीत नाचणार आहे.. स्पा सध्या डोक्यावर पडलाय स्वतःला बोका समजु लागलाय.. इंट्या मात्र प्रगल्भ झालाय संसार सारा माया आहे ओळखून चूकलाय.. प्रकाशराव खूश आहेत महिन्यात १११ कविता फिक्स आहेत.. गणेशा सुद्धा आनंदी आहे १११ प्रतिसाद रेडी आहेत... एकूणच मिपा आता प्रगल्भ होत आहे पुरस्कार समारंभाची तयारी चालू आहे... पहिला पुरस्कार शांततेचा देणार आणि तो म्हणे नैनी - वहिदाला विभागून देणार... एकुणात सगळे मिपाकर सुखात आहेत असल्या फालतू कविता लिहिण्या वाचण्या येवढे निवांत आहेत.

प्रतिक्रिया द्या
18742 वाचन

💬 प्रतिसाद (42)

आवडले

क्लिंटन
Fri, 02/25/2011 - 12:02 नवीन
हा हा हा आवडले.
  • Log in or register to post comments

हालहावाल उत्तम सांगितला ..

गणेशा
Fri, 02/25/2011 - 12:07 नवीन
हालहावाल उत्तम सांगितला .. भन्नाट !
  • Log in or register to post comments

लै भारी !!!

सहज
Fri, 02/25/2011 - 12:08 नवीन
फाडा फाडा आमच्या नावावर तुम्ही बील फाडा!! :-) ह ल क ट!
  • Log in or register to post comments

खतरनाक हालहवाल (डोक्यावर

स्पा
Fri, 02/25/2011 - 12:24 नवीन
खतरनाक हालहवाल :D (डोक्यावर पडलेला बोका) स्पा
  • Log in or register to post comments

हाहाहा..

स्वाती दिनेश
Fri, 02/25/2011 - 12:33 नवीन
मस्त रे परा.. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त...

हरिप्रिया_
Fri, 02/25/2011 - 12:35 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments

मस्त हाल हवाल रे परा बाकि

मुलूखावेगळी
Fri, 02/25/2011 - 12:38 नवीन
मस्त हाल हवाल रे परा बाकि तुमच्या कवितेत आनि लोकांच्या फावल्या वेळेत आमची खव ऐकुन ध्न्य :)
  • Log in or register to post comments

पराशेट, तुमचा न्यूज च्यानल

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/25/2011 - 12:39 नवीन
पराशेट, तुमचा न्यूज च्यानल आवडला. (प्रविस्थापित) अदिती
  • Log in or register to post comments

हा हा आवडल्या बातम्या!

पैसा
Fri, 02/25/2011 - 19:34 नवीन
या सगळ्या बातम्यांसाठी आधी आम्हाला परा नाहीतर धम्याची खव उचकपाचक करावी लागायची. असंच मधून मधून बातमीपत्र देत जा रे, म्हणजे तेवढे लोकांच्या खव उघडायचे कष्ट वाचतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हाण्ण !! हाण्ण !!

सुहास..
Fri, 02/25/2011 - 12:40 नवीन
=)) =)) =)) हाण्ण !! हाण्ण !! कमी हजेरीबद्दल प्राजुतैला शिक्षा होणार आहे तिला आता कोदाच्या सायटीवर संपादक करणार आहेत.. >>> प्राजुतै , किमान त्या सायटीवर तरी माझे प्रतिसाद राहु दे ग ;)
  • Log in or register to post comments

कोणती लाईन सोडु कोणती पकडु

टारझन
Fri, 02/25/2011 - 12:50 नवीन
कोणती लाईन सोडु कोणती पकडु असं झालं होतं .. हा हा हा आम्हाला सगळ्यात आवडले ते
प्रकाशराव खूश आहेत महिन्यात १११ कविता फिक्स आहेत.. गणेशा सुद्धा आनंदी आहे १११ प्रतिसाद रेडी आहेत...
=)) कवितेत फक्त "५१२" साबणवडी मिसींग आहे फक्त :)
  • Log in or register to post comments

पर्‍या, कुठला डाल्बी बे? साला

Nile
Fri, 02/25/2011 - 13:09 नवीन
पर्‍या, कुठला डाल्बी बे? साला इथे स्टीरीओपन नाय आपल्याकडे बोल! बाकी टार्‍या ५१२ साबनवडी संपली की रे (बाकरवडी पण संपली. ;-) ) केव्हाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

लय भारी पर्‍या.

जागु
Fri, 02/25/2011 - 12:54 नवीन
लय भारी पर्‍या.
  • Log in or register to post comments

झालात का मोकळे.

गणपा
Fri, 02/25/2011 - 12:56 नवीन
झालात का मोकळे. ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद, पराशेट मंड्ळ अंमळ

५० फक्त
Fri, 02/25/2011 - 12:59 नवीन
धन्यवाद, पराशेट मंड्ळ अंमळ आभारी आहे. अतिशय छान कविता, शरदिनितै नंतर एवढं क्रिप्टिक लेखन पहिल्यांदाच वाचलं, आता ह्या शब्दातील अक्षरं उभ्या कॉलम मध्ये टाकुन उलट वाचुन याचा अर्थ लावला पाहिजे.
  • Log in or register to post comments

>>>एकुणात सगळे मिपाकर सुखात

मनराव
Fri, 02/25/2011 - 13:08 नवीन
>>>एकुणात सगळे मिपाकर सुखात आहेत असल्या फालतू कविता लिहिण्या वाचण्या येवढे निवांत आहेत.<<< हे आवडलं .......... :)
  • Log in or register to post comments

(No subject)

नगरीनिरंजन
Fri, 02/25/2011 - 13:22 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

सही...

मदनबाण
Fri, 02/25/2011 - 13:27 नवीन
सही... ;)
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

लवंगी
Fri, 02/25/2011 - 13:45 नवीन
मस्तच >>टार्‍या पुन्हा अन-आवरेबल झाला आहे आता कुठे मिपाला रंग चढायला लागला आहे.. अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय... >> सर्वात हे आवडल
  • Log in or register to post comments

सही है भिडु

कच्ची कैरी
Fri, 02/25/2011 - 13:53 नवीन
एकदम सही !!!
  • Log in or register to post comments

आवडेश...

प्यारे१
Fri, 02/25/2011 - 14:01 नवीन
सही है भिडू! स्वगतः पराच्या नुस्त्या बुक(गूड/बॅड नंतर बघू)मध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल बरे...???
  • Log in or register to post comments

माझी भर.. काय पण दिवस आलेत,

स्पंदना
Fri, 02/25/2011 - 14:30 नवीन
माझी भर.. काय पण दिवस आलेत, पराला कविता सुचतेत॥
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Fri, 02/25/2011 - 14:32 नवीन
खण्ण!
  • Log in or register to post comments

!

अवलिया
Fri, 02/25/2011 - 15:12 नवीन
मस्त ! :) अवलियाचा आयडी हॅक झालाय दूषित वातावरण निरोगी करायला लागलाय नैत्र लागले पैलतीरी !
  • Log in or register to post comments

आपल्या शरदिनी बाईंना नविन काम्पिटिशन ;-)

वाहीदा
Fri, 02/25/2011 - 15:29 नवीन
बाब्बो ! पर्रा कसला हुशार काव्यकर्ता होत चाललाय ... आपल्या शरदिनी बाईंना नविन काम्पिटिशन ;-) कविता लई भारी हो ! असो, कवितेत उल्लेखल्या प्रमाणे आहोतच आम्ही शांतीदूत भगिनी ;-) कोई शक ?? मागल्या ६ महिन्यात मी अन नैनी एकदातरी कोणाशी भांडलो का ?? बघ बरं इतिहास ...
  • Log in or register to post comments

मागल्या ६ महिन्यात

सुहास..
Fri, 02/25/2011 - 19:01 नवीन
मागल्या ६ महिन्यात मी अन नैनी एकदातरी कोणाशी भांडलो का ?? >>> हॅ हॅ हॅ !! गुड जोक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

पराला आक्शिजन झाला?

असुर
Fri, 02/25/2011 - 15:50 नवीन
परा, काय रे हे?? काय ऐकतोय मी?? कसा काय झाला आक्शिजन तुझा?? तुला नक्कीच तरंगत घरी जाताना धडकवला असणार 'कुणी'तरी भिंतीवर. असो, काळजी घे रे! तब्येत बरी आहे का आता?? हास्पिटलात खूप ताप चढला होता म्हणे - आणि लवकर बरा हो रे!! उगाच तापात असलं काहीतरी लिहीत जाउ नकोस, तुझा आयडी हॅक झाल्याची आवई उठतेय!!! ;-) --(चिंताग्रस्त) असुर
  • Log in or register to post comments

सह्ही

प्राजक्ता पवार
Fri, 02/25/2011 - 16:56 नवीन
सह्ही :)
  • Log in or register to post comments

शई, मश्त , आवल्ले

नरेशकुमार
Fri, 02/25/2011 - 17:23 नवीन
शई, मश्त , आवल्ले
  • Log in or register to post comments

अफलातून! सास्टांग __/\___ !

मराठे
Fri, 02/25/2011 - 19:07 नवीन
अफलातून! सास्टांग __/\___ ! ;)
  • Log in or register to post comments

मस्तच ! आख्या मी पा करांची

जगड्या
Fri, 02/25/2011 - 19:18 नवीन
मस्तच ! आख्या मी पा करांची ओळख झाली !
  • Log in or register to post comments

खी: खी: खी:

रमताराम
Fri, 02/25/2011 - 19:25 नवीन
असल्या फालतू कविता लिहिण्या वाचण्या येवढे निवांत आहेत हॅ हॅ हॅ. किती हा विनय. चान चान.
  • Log in or register to post comments

परीकथेतील राजकुमारा - आपली

प्रकाश१११
Fri, 02/25/2011 - 21:55 नवीन
परीकथेतील राजकुमारा - आपली मस्त झणझणीत अंजन घालणारी कवितां . पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

काय पर्‍या.. वेळ जात नाहिये

प्राजु
Fri, 02/25/2011 - 22:59 नवीन
काय पर्‍या.. वेळ जात नाहिये का कॅफेत?? हिरवळ कमी झालेली दिसतेय तिथेली!! ;)
  • Log in or register to post comments

परा- तु आणि कवीता केलीस??????

चिंतामणी
Fri, 02/25/2011 - 23:56 नवीन
तीसुध्दा एव्हढी भारी. ह.ह.पु.वा. (बाकी प्रतिक्रीया व्यनी किंवा खवमधे अथवा प्रत्यक्ष भेटीत) :x ;)
  • Log in or register to post comments

इंट्या मात्र प्रगल्भ

इंटरनेटस्नेही
Sun, 02/27/2011 - 02:13 नवीन
इंट्या मात्र प्रगल्भ झालाय संसार सारा माया आहे ओळखून चूकलाय.. =)) =)) =)) =)) =)) खरयं... :) पराशेठ जबरी कविता! मनापासुन आवडली.!
  • Log in or register to post comments

लय भारी

राजेश घासकडवी
Sun, 02/27/2011 - 05:58 नवीन
__/\__ माझीही चारोळी पराचा उपरा बाप आलाय राज्यात नव्याने इतिहासाला गाठतंय काश्मीर इंचाइंचाने परा आता फुफाटा फाट्यावर मारणार आहे जुनी कुठची ती मालिका पूर्ण करणार आहे
  • Log in or register to post comments

पराशेठ

तिमा
Sun, 02/27/2011 - 10:49 नवीन
आवडली कविता, फक्त शेवटच्या दोन ओळी सोडून.
  • Log in or register to post comments

हा हा हा मस्त! राघव

राघव
Mon, 02/28/2011 - 21:31 नवीन
हा हा हा मस्त! :) राघव
  • Log in or register to post comments

ओह! परा!... मला शान्तीदूत

मृगनयनी
Wed, 03/02/2011 - 16:53 नवीन
ओह! परा!... मला शान्तीदूत साठी नॉमिनेट केल्याबद्दल आभार! आणि तेही माझ्या जीवाभावाच्या मैत्रीणीबरोबर!... सो$$ ग्रेटफुल टू यु! :) ;) ;) तूच खरा राजहन्स! ;) :)
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलय

खादाड अमिता
गुरुवार, 03/03/2011 - 11:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments

(No subject)

डावखुरा
गुरुवार, 03/03/2011 - 20:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा