डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग ७
मागील भाग - http://misalpav.com/node/16851
मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा. पन ईशय कोन्ता ? कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला "यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?" मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. "व्हय व्हय ! आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. " मास्तरचा अनूमोदन ईशय फिक्स - 'द्रुपदी वस्त्रहरन' "चला आता काश्टींग करुया " मास्तर म्हन्जे ? म्हात्र्यांचा सुरया "आर म्हन्जी कोनी कोनी क कराचा ते. तर मंडली , डायरेक्टर मीच होतय आनी नाटक बी लीवतं. मना म्हाईत हाय ईतीहास" मास्तर "बर मंग आता एयाक्टर बी तुमीच ठरवा. " बाबू घरत - खजिनदार हां. तर आता धर्मराज कोन ? मी हुतय " भास्कर राउताचा बंड्या अर्जुन .. भिम .. नकुल .. सगली पांडवा झायली "दुर्योदन ?" "तुकाराम तु हो." "पन मास्तर मना टेजवर बोलाया जमन? "आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर दुशासन कोन ? सगल्यांचा हात वर "आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर "ह्या काम आपन पक्याला देव . कुनाचा आब्जेक्सन ?" सगली मान्सा चिप रायली बोल. पक्या बीनईरोद दुशासन. आता द्रुपदी सगली लोका यकमेकांचे तोंडाकड बगु लागली. कोनाव कई बी सूचना आपल्या बायकामुली कोन पाटवल पक्या करुन पातल सोरवाला. कई ईपरीत झाला तर कवरा लफरा वाडलंअधिक वाचा - http://misalpav.com/node/3359 ***
यकदा आसच झिपर्या न आजा पेत बसलवत. (झिपर्या आमचा गडी हाय) 'शेट तुमी रोच्ची कती दारू पीताव ?' 'मना क म्हाईत र ? आनी कनाला मोजाची ? गल्यापातुर आली क बास कराची.' आजा 'तस नाय वो शेट, मना म्हनाच हाय क कती रुपयाची पीताव ?' 'आसा बग सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान' आज्यासचा तोंडी हिशेब. 'आर बाबा तिनशे रूपए !' 'मग ? म्हागाय कती वारलीय र . नव्वद ची यक बाटली येती. सकाल दूपार न राच्च. तीन टाईम' आजा 'आवशिद झेताव जनू' 'तर तर ! आवरा कड्क कनाला हाय मग?' 'पन मी क म्हन्तो आपल गाव पाउनशे ऊंबर्याच, घरटी यक मानुस तरी टुन होत आसल आवरेज पन्नास रुपये रोच्च धरल तरी साडेतीन हजाराव रोच्चा गल्ला जातुय. मंग आपूनच का न टाकावा गुत्ता? पैशे बी मिलतील न दारू बी' 'धंदा कराचा ? चालल क र?' आजा आगरी आसला तरी मराटी व्हता.' पन ह्यान प्रापीट कती व्हईल र' 'त्याच आस बगा' झिपर्यान जवल येऊन आज्याचे खांद्याव हात टाकला खाडकन गां*वर लात बसली. 'पायरीवर बस वर येव नको.' आजा फुगारला 'आवो समझुन सांगत व्हतो न्हव ' कलवलत झिपर्या बोल्ला 'त्याच क हाय सोनपाड्यान भीम्या कातकरी भट्टी लावत. त्याजेकडशी दारूच फुग हानाच. पीव्वरच. दिड हजाराला येक फुगा त्याच्यान धा बाटल्या व्हतान.'अधिक वाचा - http://misalpav.com/node/5127 *** वरचे दोन परिच्छेद ज्या लेखांमधले आहेत ते वाचुन त्यातली कथा, त्यातली भाषा, त्यात असलेल्या पात्रांचे एकंदर वागणे ह्यामुळे तुमच्या चेहर्यावर हसु फुलले असेलच किमान स्मित तरी आले असेलच. नसेल आले तर तुम्हाला उपचारांची गरज आहे हे नक्की. असो. तर साधीशीच कथा, त्यातले साधीच पात्रे, त्यांची साधीच बोली असं सगळं साधं साधं असलं तरी जेव्हा ते समोर येतं तेव्हा ते साधं नसतं इतकंच काय तसं लिहिणं सहजसाध्य सुद्धा नसतं. अगदी बरोब्बर ते काम येरागबाळ्याचे नोहे. तर हा लेखक आहे ब्रिटिश. :) याच्या विषयी जास्ती काहीही लिहिणे म्हणजे शब्दांचा व्यर्थ खडखडाट आहे कारण ब्रिटीश हा लेखक शब्दांत सांगता येण्यासारखा नाही त्याच्याविषयी जास्त न बोलता त्याचे लेख वाचुन आनंद लुटणे हेच योग्य. http://misalpav.com/newtracker/1509 इथे त्याचे लेखन वाचता येईल. ब्रिटिश आमचा या वेळचा "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे, कारण बरेच दिवसांत त्याने लेखन केले नाही, इतकेच काय त्याचे दर्शनसुद्धा हल्ली दुर्लभ झाले आहे. आम्हाला माहित आहे की त्याला फुल, गुच्छ, शाल इत्यादी सत्काराची मातब्बरी नाही. त्याला जे हवे आहे ते आम्ही गुपचुप देत आहोत. त्याचे जाहिर प्रदर्शन करता येणार नाही ह्याबद्दल क्षमस्व :) त्यात नक्की काय आहे हे जाणकारांना कळेलच, बाकीच्यांसाठी त्यात मुंब्र्याचा पिव्वर माल आहे हा खुलासा पुरे. ;) ब्रिटीश दादुस.. बाला कुठं हाय रं... :)
प्रतिक्रिया
हा यार ... बाल्या कुठं गेला
कौतुकास्पद लेखमाला ...
आत्तापर्यंतचे सर्व मानकरी
ब्रिटिश आमचा या वेळचा
दादुस कुठे हरवलाय???? लै भारी
मिथून महाराज कोठे गेलेत? नाव
कुठं
चांगला परिचय करवून दिलात,
बाला गायप हाय! रं बाला! ये रं
दादूस, ये रं परत लवकर.
खरच, बालाची आठवन युन
लेखमालेचं राहून राहून कौतुक
लय भारी लेख आहेत ब्रिटिश
ब्रिटिश टिंग्या आणि ब्रिटिश
सुधारणा
कुटंय रं बाला?
तस तर त्याच बहुतेक लिखाण
गायब
ब्रिटीशचे लिखाण कोणी तरी चोरुन ओर्कुट वर टाकलेले आठविते
जियो..!