प्यासा : एक निष्कर्मवाद
प्यासा चित्रपटाची चर्चा चालली आहे त्या निमित्ताने
प्यासा चित्रपटातील नायक विजय. एक कवी आहे. त्याच्या कविता तरल भावूक आहेत. त्याला सामाजीक वास्तवाची जाणीव आहे.
कॉलेजात असताना स्वत्/ल्सुद्धा किंचित कवी असल्याकारणाने प्यासा तील नायकाशी मनातल्या मनात स्वतःची तुलना व्हायची .
ये ताजो ये तख्तो ये महलो की दुनिया
जला दो जला दो जला दो ये दुनिया..
या ओळी भावायच्या. काहीशा स्वप्नालु कम्युनिस्ट विचारांचा तो कवी खूप आवडायचा. प्रचलीत व्यवस्थेविरुद्ध बंड करायला प्रवृत्त करायचा
प्यासा चित्रपटातील अगदी सुरवातीच्या प्रसंगापासूनच ( फुलावर भुंगा बसतो आणि मागे कवी कवितेची एक ओळ म्हणतो) चित्रपटाच्या प्रेमात होतो.
प्यासा ग्रेट चित्रपट आहे असे कोणीतरी म्हणाले होते म्हणून तो पहायच्या अगोदरच मी तो ग्रेट ठरवून टाकला होता.
थोड्याशा स्वप्नाळु विचारांचा कवी विजय ( गुरुदत्त ) नायीकेच्या प्रेमात असतो. अबोल असला तरी आपण कवी असल्याने "आम्ही कोण म्ह्नुणी काय पुसता दाताड वेंगाडूनी" अशा प्रकारचा एक अविर्भाव त्याच्यात सतत जागृत आहे.
स्वतः जगापेक्षा फार वेगळे असून जगाने आपली दखल घ्यावी असे त्या कवीला सतत वाटत आहे.
व्यवहारीक जगात जगण्यासाठी काही काम करावे लागते हे त्याच्या ध्यानीही नाही. प्रेमावरची उत्कट रचना करताना देखील तो प्रेयसीला धसमुसळेपणाने नव्हे तर मार्दवाने वश करू पहातो. तीने झिडकारले तरीही तिच्यावर प्रेमच करीत राहीन अशी ग्वाही देत रहातो. ( हम आपकी आखों मे इस दिल को बसा लेंगे) .
या विजयच्या कवितांच्या प्रेमात एक वेश्या गुलाबो आहे. तीचे त्याच्या कवितांवर असीम प्रेम आहे. त्याच्या कविता गाऊनच तीला गिर्हाईके मिळत असतात. ( जाने क्या तुने कही....जाने क्या मैने सुनी....बात कुछ बंधी हुयी)
ती विजयला एक गिर्हाईक समजते. जेंव्हा तिला कळते की तो गिर्हाईक नसून स्वतः कवी आहे... त्यावेळेस तीला त्याच्याबद्दल आपुलकी वाटु लागते.
विजय ला काहीही कामधन्दा नसतो. सतत नैराश्यात रहाणे आणि काहीच कामधन्दा न करता कविता करत रहाणे याला घरातले देखील वैतागलेले असतात.
विजयची प्रेयसी कोण्या व्यावसायीकाशी लग्न करते. विजय काही कामानिमित्त तीच्या घरी जातो . तिला जाब विचारण्याच्या अविर्भावात एक गाणे गातो ( जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्या मिला ) प्रेयसीच्या चेहेर्यावरचे सम्मिश्र भाव बरेच काही सांगून जातात. ( माझे चुकले...पण तू काही कामधामच करत नव्हतास्...माझा नाईलाज होता.वगैरे वगैरे.)
गुलाबोला विजयच्या कविता आवडत असतात. ती त्याच्या कविता प्रकाशीत व्हाव्यात म्हणून प्रयत्न करते. प्रेयसीचा पती "रेहमान " पैसे घेवून कविता संग्रह छापतो.
एका रात्रीत कविता संग्रह प्रसिद्ध होतो. लोकाना विजय बद्दल आता कुतुहल निर्मान झाले आहे. काव्यसंग्रहाला कसले तरी बक्षीस मिळालेले आहे. विजय ( कवी) कुठे आहे याबद्दल कोणालाच माहीत नसते. तो मेला आहे असेच सर्वजण समजत असतात. मिळणारी बक्षीसाची रक्कम , मानसन्मान घ्यायला घरचे लोक पुढे येतात.
त्या समारंभात विजय हजर होतो. विजयला ज्यानी ज्यानी धिक्कारले आहे तो लोक बिथरतात.
विजयला या सगळ्याची चीड येते. तो आपण स्वतः विजय नाही हे जाहीर करतो.
समारंभ उधळला जातो.
लोक विजयला /गुलाबो ला एक नगण्य मानून निघून जातात.
एक शून्य अवकाश शिल्लक रहातो.
गुलाबो नव्या उमेदीने विजयला स्वत्:सोबत घेवून जाते.
चित्रपटातील व्यक्तीरेखा कॉलेजात असताना भावल्या होत्या.
आज विचार करता काही गोष्ती प्रकर्षाने जाणवतात.
चित्रपटातील कवी विजय हा काहीच करीत नाही. निष्कर्म जगत असतो. तरीदेखील जगाने आपल्याला मानसन्मान द्यावा असे त्याला वाटत असते. ती व्यक्तीरेखा काहिशी मिर्झा गालीब च्या व्यक्तीरेखीशी जुळती.
गुरुदत्तने चित्रपटात छायाप्रकाशाची कमाल दाखवली आहे. सावल्यांचा वापर करून पात्रांचे मूड मस्त पकडले आहेत.
नेहरु युगातला काहीसा स्वप्नाळू आषावाद चित्रपटात सतत डोकावत रहातो. त्याच बरोबर त्या स्वप्नाळू आषावादातील फोलपणाची जाणीव होउन कवी निराश होतो. ( ये दुनिया अगर मिलो भी जाये तो क्या है?)
जग वाईट आहे स्वार्थी आहे याची त्याला चीड आहे. पण जग चांगले करण्यासाठी आपण काही करायचे असते याची जबाबदारी तो टाळत रहातो.
प्रेमात असफल झाल्यानन्तर कवी निराशेच्या टोकाला जातो तो एक निश्कर्म आयूष्य जगत रहातो.
आदर्श घेवू नये असा नायक बनत जातो.
चित्रपट संपल्यानन्तर त्याची मोहिनी बरेच दिवस उतरत नाही. त्यातील छायाप्रकाशाची जादू प्रत्येकवेळेस नव्याने उलगडत जाते
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म
विजय = साहिर...!
असहमत
"प्यासा"...आणि ईझम...!
अजूनही असहमत
एका जुन्या चित्रपटाची कथा
असहमत
चालायचेच
कर्म म्हणजे काय हे आधी जरासे
कर्म म्हणजे काय हे आधी जरासे
हे असे भणंग जगणारे
छे हो , काय कोणाची बिशाद .. साक्षात शरदिनी ताई समोर ???
आत्ममग्न
गूळ
मस्त
समाज वाद व समता या स्वप्नाळु
परिक्षन छान .. प्यासा
आक्षेप
(सन्जोप रावांना जसे
सुरेख प्रतिसाद
आमचेकडे
काल पुन्हा एकदा प्यासा पाहिला
प्यासा मी बरेच वेळा
आशय आणि पात्ररचना यांचा परस्परसंबंध
उतम प्रतिसाद
बाजार, यश, साध्य...
प्रदीपजी प्यासा मला
चित्रपटातील नायक विजय
काल परत एकदा प्यासा पाहिला