'मिपा-क्रिकेट विश्वचषक २०११' सदराचा शुभारंभ ...
नमस्कार मंडळी,
आजपासुन आपण इथे मिसळपाव.कॉम च्या 'मिपा-क्रिकेट विश्वचषक २०११' ह्या सदराची सुरवात करत आहोत. ह्यासाठीच आपण खास 'क्रिकेट' नावाचा लेखनप्रकार चालु केला आहे. तुम्हाला 'लेखन करा' ह्या पर्यायामधुन आता 'क्रिकेट' नावाचा पर्यायही दिसेल जो आपल्याला खास ह्या विश्वचषक स्पर्धेनिमित्त बहाल केला आहे.
तुम्हाला विश्वचषक स्पर्धेच्या तयारीबद्दल लिहायचे आहे, तुम्हाला एखाद्या संघाबद्दल लिहायचे आहे, एखाद्या खेळाडुबद्दल लिहायचे आहे, एखाद्या प्रत्यक्ष पाहणार असलेल्या सामन्याबद्दल लिहायचे आहे आणि तो अनुभव इथल्या लोकांसमवेत शेअर करायचा आहे तर हात मोकळे सोडुन मुक्तपणे ...मिपा-क्रिकेटमध्ये लिहा !
तुम्हाला जुन्या आठवणी जागवायच्या आहेत, तुम्हाला तुमचे लहानपणीचे क्रिकेट-जीवन पुन्हा जगायचे आहे, तुम्हाला क्रिकेट आणि तुमचे आयुष्य ह्यांच्यातके ऋणानुबंध कागदावर उतरवायचे आहेत, तर मग बिनधास्त लिहा ... मिपा-क्रिकेटमध्ये !
तुम्हाला एखाद्या सामन्याआधी, सामना चालु असताना, सामना संपल्यावर गरमागरम चर्चा करायची आहे, वाद घालयचा आहे, मते मांडायची आहेत, अहो मग लिहा ना .... मिपा-क्रिकेटमध्ये !
तुम्हाला क्रिकेटची सांख्यिकी, आकडेवारी, जुने रेकॉर्ड्स ह्यासंबंधी लिहायचे आहे ... मिपा-क्रिकेट आहे ना मालक !
क्रिकेटवर कविता लिहली आहे, चुटके / विनोद आठवत आहेत, एखादा किस्सा सांगु वाटतो ... मिपा-क्रिकेट आहेच !
मिपा-क्रिकेट तुमच्यासाठी आहे कारण मिपा आणि क्रिकेट हे दोन्हीही तुमचेच आहे !
लुटा मग ह्या विश्वचषकाचा आनंद मिपा-क्रिकेट समवेत ...
ह्यासोबत आम्ही तुम्हाला देऊ ...
टीप :
खास विश्वचषक-२०११ ह्या स्पर्धेला समर्पित असलेले खास 'मुखपृष्ठ' लवरकच तयार करुन ते सर्वांसाठी खुले करण्यात येईल.
तुर्तास उपलब्ध लेखनप्रकारात 'क्रिकेट' नावाच्या नव्या खास तयार केलेल्या लेखनप्रकाराचा समावेश करुन तो सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे, आपापले क्रिकेटसंबंध लेख टाकण्यासाठी ह्याचा वापर करावा ही विनंती.
- मिपा : क्रिकेट विश्वचषक २०११ चमु
ता.क. :
ह्या लेखातली आणि इथुन पुढे येणारी सर्व छायाचित्रे ही आंतरजालावरुन साभार आहेत / असतील. त्यांची श्रेयनोंद इथे केली आहे.
१. विश्वचषकसंबंधीत प्रत्येक दिवसाच्या महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी २. संघ, खेळाडु, सामने ह्यांची शक्य तितकी सविस्तर माहिती ३. जोरदार रंगलेल्या आणि अटतटीच्या सामन्यांचा आँखोदेखाँ हाल आणि परिक्षणे ४. मजेदार कौल आणि स्पर्धा ५. सामन्यांचे फोटोफिनिश .. अर्थात फोटो परिक्षण ६. सर्व सर्व आकडेवारी, गुणतक्ता, स्पर्धेची वाटचाल आणि आगामी शक्यतांची माहिती ७. समृद्ध व्हिडिओ-गॅलरीकाय मग आहात ना तयार ? आहात ना आमच्यासोबत ? चला, ह्या क्रिकेट-विश्वचषक : २०११ चे रंग पाहुयात आणि ह्या रंगात बेहोश होऊन रंगुयात ... मिपा-क्रिकेटसंगे.

प्रतिक्रिया
नवीन विभाग....क्रिकेट
वा.. सुरुवात झाली तर या क्षणी
श्रीसंथ ला घेतलाय खरा तो संथ
धन्यवाद!
कमॉण डॅणि कमॉण
९ डेज अहो मि. टारझण सराव
ह्यॅ: ... बोलायचं काम न्हायी!
असं करु नका, बोला जरुर बोला
बेश्ट
क्या बात है !
उ त्त म!! सक्रीय सहभाग असेलच!
ह्हाऽऽण्ण तिच्यायला.....
प्रवीण कुमार किंवा श्रीशांत
वावा
वोक्के बॉस....! क्रिकेटचा