✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भिवाण्णाची काळी माय

य
यशोधरा यांनी
Sun, 06/08/2008 - 01:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12792 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

टचिंग...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 06/08/2008 - 02:24 नवीन
कथा आवडली. छान लिहिली आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments

काळी माती

अरुण मनोहर
Sun, 06/08/2008 - 04:09 नवीन
काळ्या मातीचे पाय असलेली ही कथा ह्रदयाला भिडून जाते. औरभी लिख्खो यशोधरा....
  • Log in or register to post comments

फार आवडली

भाग्यश्री
Sun, 06/08/2008 - 06:06 नवीन
फार आवडली गं.. डोळ्यात पाणीच आलं.. एक -एक करून आठवण येत असताना भिवाण्णाची होणारी ढासळणारी स्थिती, आणि पोराच्या कडू आठवणीने,शेत सोडून जायच्या कल्पनेने त्याला झालेला त्रास.. बरोब्बर पकडलायेस.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान!

प्रशांतकवळे
Sun, 06/08/2008 - 09:29 नवीन
खुपच छान... हृदयाला हात घालते.. एसइझेड मध्ये ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्या भावना पण अशाच असतील.. प्रशांत
  • Log in or register to post comments

व्यथा...

प्रभाकर पेठकर
Sun, 06/08/2008 - 09:46 नवीन
भिवण्णाची व्यथा काळजाला घरं पाडणारी आहे. लेखन नेमके, भावनेने ओथंबलेले अणि प्रवाही आहे. अभिनंदन. अशाच नवनविन कथा मिपावर वाचायला मिळतील अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अभिज्ञ
Sun, 06/08/2008 - 10:18 नवीन
यशोधरा, अतिशय भावस्पर्शी व आशयगर्भ लेखन. लेखनाचा पोत हा अतिशय प्रगल्भ आणि प्रवाहि आहे. भिवण्णाची कथा अतिशय सुंदर खुलवली आहेस. ग्रामीण भाषेचा बाज चांगलाच जमलाय. असो, इथे आपले असेच उत्तम लिखाण वाचायला मिळावे. एका उत्तम लेखाबद्दल आपले अभिनंदन. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

सहमत..

विसोबा खेचर
Sun, 06/08/2008 - 22:53 नवीन
यशोधरा, अभिज्ञच्या आणि इतरही सर्वांच्या प्रतिसादाशी सहमत! खूपच सुंदर लिहिलं आहेस. एक दर्जेदार लेखन वाचण्याचा आनंद वाटला! तुझं अधिकाधिक उत्तमोत्तम लेखन मिपाकरांना वाचायला मिळो हीच इच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

हेच म्हणतो

बेसनलाडू
Sun, 06/08/2008 - 23:07 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अभिनंदन...

नारदाचार्य
Sun, 06/08/2008 - 16:41 नवीन
छान. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यातला एकच पैलू पकडत इतरांना स्पर्श करीत केलेली मांडणी आवडली. एरवी अशा प्रयत्नांत फसगत होत असते. इथे ती झाली नाही. बांधणी पक्की झाली. याचाच अर्थ तुम्ही रचनेविषयी विचार करूनच लिहिले आहे. या कथेची अखेर वेगळ्या शब्दांत मांडता आली असती का याचा विचार करतोय... (अखेर म्हणजे तुम्ही केली आहे तीच, फक्त शब्द-वाक्यरचना वेगळी काही...) त्याचबरोबर अधिक समर्पक काही शीर्षक करता येईल का?
  • Log in or register to post comments

यशोधरा,

शितल
Sun, 06/08/2008 - 17:49 नवीन
सुद॑र लिखाण केले आहेस, मस्त हळवा विषय आणि ग्रामीण भाषा ही जशीच्या तशी वापरली आहेस. वाचता वाचता डोळ्यात कधी पाणी येते ते कळत ही नाही. असेच छान लिखाण मिपाकरा॑ना वाचायला मिळु दे तुझ्या कडुन.
  • Log in or register to post comments

खूपच

इनोबा म्हणे
Sun, 06/08/2008 - 22:59 नवीन
सुंदर लिहीलं आहे. ग्रामीण बाज आवडला.भिवाण्णा मनाला चटका लावून गेला. पु. ले. शु. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

:)

पल्लवी
Mon, 06/09/2008 - 08:04 नवीन
शाळेत असताना अशा छान छान कथा अभ्यासक्रमात असायच्या..ग्रामिण बाजेच्या.. आज बर्‍याच दिवसांनी असं काहितरी वाचलंय.. येसु ताई, तु अजुन खुप खुप लिही.. अभिनंदन आणि शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

बिपिन

यशोधरा
Mon, 06/09/2008 - 08:08 नवीन
बिपिन कार्यकर्ते, अरुण मनोहर, भाग्यश्री, प्रशांत कवळे, पेठकरकाका, अभिज्ञ, तात्या, बेसनलाडू, शीतल, इनूभाव, पल्लवी कथा आवडल्याचं सांगितल्याबद्दल खूप खूप आभार. नारदाचार्य, कथेचा शेवट जरासा बदलला. अजून निराळे शीर्षक काही सुचत नाही मला. तुम्हांला काही सुचले असेल तर जरुर सांगा. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

शहारा !!

आनंदयात्री
Mon, 06/09/2008 - 11:42 नवीन
बर्‍याच दिवसांनी भान विसरुन काहितरी वाचले. कथेने सुरवातीपासुन पकड घेतली ते भिवाण्णा काळ्याआईशी एकरुप झाला तोपर्यंत.. अंगावरचा शहारा जाणवला .. यशोधरे खरच फार फार सुंदर लिहलं आहेस गं, अभिनंदन. ... कसं छोटसंच गोजिरवाणं झोपडीवजा घर होतं त्याचं. हसरी माय, पहाडासारखा बाप आणि - आत्तासुद्धा बहिणीचा तेह्वाचा अवतार आठवून हसू आलं त्याला - नाक सुरसूर ओढणारी आणि परकर नेसून, इकडून तिकडे कोंबड्यांमागं नाचणारी, आणि शेळीशी गप्पा मारणारी झिपरी, शेंबडी छोटी बहीण. आत्ता सुद्धा तिच्या आठवणीने तो आत जरा हलला. कशी गोजीरवाणी बाय होती... चंद्रभागा किती सुरेख वर्णन, शब्दांचा किती व्यवस्थित वापर !! ग्रेट वन इंडिड्ड यशभाय !! अशी लेखातली सौंदर्यस्थळं वेगळी काढता येणार नाहीत, सगळा लेखच छान आहे. राज्यस्तरीय सरकारी साहित्य स्पर्धेला पाठवावा, तु बक्षिस घेतांना आम्हाला टाळ्या वाजवतांना खुप आनंद होईल. :)
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

राजे (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 06/09/2008 - 14:50 नवीन
हेच म्हणतो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

खुप सुंदर

ऋचा
Mon, 06/09/2008 - 11:30 नवीन
खुप सुंदर लिहिले आहेस.. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Mon, 06/09/2008 - 11:47 नवीन
यशोधरा,कथा चटका लावून जाते.फार छान लिहिले आहेस.. असेच लिहित रहा..पुलेशु, स्वाती
  • Log in or register to post comments

उत्तम लेखन

सहज
Mon, 06/09/2008 - 11:48 नवीन
वरील सर्व अनुकूल प्रतिसादांशी सहमत. लेख अतिशय छान. अजुन असेच उत्तमोत्तम लेख वाचायला मिळावे ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments

सुरेख कथा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/09/2008 - 12:14 नवीन
कथेची सुरेख बांधणी आणि जीवाला चटका लावणारा समारोप. अजून येऊ दे, अशाच सुरेख ग्रामीण कथा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान आहे....

मनिष
Mon, 06/09/2008 - 12:23 नवीन
नुकताच 'सरकार राज' पहिला (नाही आवडला)...त्यांनीही सेझ सारखाच मुद्द घेतला आहे...खरच वाटते असेच वाटत असेल त्या शेतकर्‍यांना... गोष्ट छान जमली आहे यशोधरा!
  • Log in or register to post comments

हृदयस्पर्शी

पद्मश्री चित्रे
Mon, 06/09/2008 - 14:44 नवीन
लिहिलं आहेस अगदी..
  • Log in or register to post comments

छान सुंदर कथा.

llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/09/2008 - 22:49 नवीन
अप्रतिम कथा आणि हृदयस्पर्शी शेवट. जमिनीविकून जमिनदार म्हणवणार्‍या भिवण्णाच्या मुलाप्रमाणे आसपासचे उधळे पाटीलपुत्र्(आपल्या आडनावात पाटील लावणारे आणि सेझ साठी जमिनी विकणारे धेंड) पाहीले की जणू आपणच भिवण्णा झाल्याप्रमाणे वाटते. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

आनंदयात्र

यशोधरा
Tue, 06/10/2008 - 00:06 नवीन
आनंदयात्री, तुझ्या कौतुकाच्या शब्दांबद्दल आभार मानत नाही, भाय लोकांत इतका भाईचारा हवच ना!! :) राजे, ऋचा, स्वातीताई, सहज, डॉक्टरसाहेब, मनिष, पद्मश्री , पेशवे सरकार खूप खूप आभार कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्द्ल. असाच लोभ असूदे. :)
  • Log in or register to post comments

कथा आवडली

सुवर्णमयी
Tue, 06/10/2008 - 02:42 नवीन
हृदयस्पर्शी कथा.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

सुवर्णमयी
Tue, 06/10/2008 - 02:42 नवीन
हृदयस्पर्शी कथा.
  • Log in or register to post comments

भावस्पर्शी

धनंजय
Tue, 06/10/2008 - 02:56 नवीन
कथा. (पण मृत्यूने कथेचा शेवट साधायला नको होता असे वाटते.) असेच सुरेख लेखन येत राहू द्या.
  • Log in or register to post comments

पण

यशोधरा
Tue, 06/10/2008 - 22:36 नवीन
पण मृत्यूने कथेचा शेवट साधायला नको होता असे वाटते खरं सांगायच तर मलाही दु:खी शेवट वाचायला आवडत नाही, पण इथे ते अपरिहार्य आहे! कारण, भिवण्णा कधीच मृत्यू पावतो, जेह्वा त्याची जमीन विकली जाते तेह्वाच. मग शरीराने तो भले जिवंत का असेना! प्रत्यक्ष आपल्या मुलाने जमिनीचा सौदा करणं, ह्या दु:खातून तो सावरु शकलेला नाही, त्या धक्क्यानं त्याची पत्नी कायमची कोसळल्याचं शल्यही आहे त्याला. ज्या मुलावर त्याच्या आशा होत्या, जो मुलगा काळ्या आईसाठी झगडेल असं त्याला वाटत होतं, त्यानेच अशी जमीन भिवण्णाला काही न सांगता सवरता परभारे वि़कली, हा एक धक्काच आहे त्याला. पुन्हा जमीन हे केवळ शेतीचं साधन नाही आहे त्याच्यासाठी, त्याच्या आयुष्याच्या कित्येक आठवणी त्या जमिनीत रुजलेल्या आहेत... त्याचं थकलेलं म्हातारं शरीर आणि त्याच बरोबर उदासत चाललेलं मन, किती सोसेल? काय वाटत तुम्हांला?
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

डोमकावळा
Tue, 06/10/2008 - 22:01 नवीन
अतिशय सुरेख कथा.... मन अगदी हळहळून जातं. शब्द आणि भावना अत्यंत प्रभावी पणे मांडल्या आहेत.. जणु काही नजरेसमोर सगळं घडत आहे... यशोधरा, तुमचे मनापासून अभिनंदन... पुढील लेखनाच्य प्रतिक्षेत आहोत...
  • Log in or register to post comments

सुंदर!

चतुरंग
Tue, 06/10/2008 - 22:51 नवीन
ग्रामीण भाषेचा बाज चांगला साधलाय. भिवाण्णाची उलघाल नेमक्या शब्दात टिपली आहे. भीवाण्णाच्या लेखी काळ्या आईला सोडून जाणं ही कल्पनाच असह्य त्यामुळे शेवट असाच होणार कारण काळी आई हेच जगणं आणी तेच मरणं! अशाच उत्तम कथा येऊदेत. चतुरंग
  • Log in or register to post comments

आपलेपणा

वेदश्री
गुरुवार, 06/12/2008 - 12:04 नवीन
यशोधरा, काळ्या आईच्या लेकरांच्या कथा वाचायला मला नेहमीच अत्यंत आवडते. कुठेतरी जबरदस्त आपलेपणा वाटतो त्यात. भिवाण्णाही असाच माझा वाटला. खूपच नेमक्या शब्दात वर्णन करण्याची हातोटी झकास आहे तुझी. असंच लिहित जा मनापासून. नारदाचार्यांनी नाव सुचवायला सांगितलेले पाहून मला जर कुठले नाव सुचले असेल तर ते आहे 'मनासारखं'. कसं वाटतंय बघ.
  • Log in or register to post comments

डोमकावळा,

यशोधरा
Fri, 06/13/2008 - 08:34 नवीन
सुवर्णमयी, डोमकावळा, चतुरंग, वेदश्री धन्यवाद. छान आहे ग तुला सुचलेलं शीर्षक वेदश्री.. :) चतुरंग, अगदी ....
  • Log in or register to post comments

लाजवाब

काळा_पहाड
Fri, 06/13/2008 - 14:20 नवीन
रीतसर भागिरथी घरात आली, ती इथलीच होऊन गेली. ढेकूळ पाण्यात विरघळाव, तशी विरघळली. सही!!! लाजवाब!!!! भीवाण्णाच्या काळ्या माय ने डोळ्यांत अश्रू तरळले. सुंदर लिहीलंय. सर्वच अंगांनी लेख छान जमलाय. काळा पहाड
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत
Sun, 06/15/2008 - 12:03 नवीन
ही कथा थोडी उशीरा वाचली. त्यामुळे प्रतिक्रिया लिहायला वेळ लागला. कथा मला खूप आवडली. कथेचा स्कोप तुम्ही अगदी मर्यादित ठेवला आहे. गुंतागुंत टाळली आहे. मात्र या मर्यादित स्कोपमधे एकूण भाषेचा , कथानकाचा तोल ढळू न देता काम केले आहे. याबद्द्दल तुमचे अभिनंदन ! तुमचे हे लिखाण पाहून सांगावेसे वाटते की याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. जसजसे हे होईल तसतसे लिखाणाची लांबीसुद्धा वाढेलच. आणि मग भाषा, कथानक यांच्यातील एकजीवत्व , "कोहीरन्स" , आणि त्या सगळ्याचा मिळून एक गडद परिणाम होण्याची शक्यता निर्माण होईल. तुमची झेप अजून दूर जावी ; भरारी बनावी अशी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

काळा_पहाड,

यशोधरा
Sun, 06/15/2008 - 16:56 नवीन
काळा_पहाड, कथा वाचून तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल खूप आभार. याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा मुक्तसुनीत, मी जरुर प्रयत्न करेन. तुमच्या सूचनांबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून खूप धन्यवाद. सगळ्याच मिपाकरांचे खूप आभार. तुम्ही सगळेच खूप भरभरून दाद देता, कौतुक करता... खूप हुरुप वाढतो त्यामुळे! असाच लोभ असूदेत. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा