Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उदय सप्रे on गुरुवार, 06/05/2008 - 11:16

Submitted by अमोल केळकर on गुरुवार, 06/05/2008 - 11:25

Permalink

तूप-साखर

तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं ! मस्त रचना तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे ! हे पण छान आपली कवीतेने परत एकदा शाळेची आठवण आली.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on गुरुवार, 06/05/2008 - 13:15

Permalink

मस्त आहे

मस्त आहे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 06/05/2008 - 13:20

Permalink

सुरेख..!

क्या बात है! हृदयाला हात घालणारी कविता....! कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी "गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी ! "मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी ! ह्या ओळी सर्वात आवडल्या.... आपला, (इयत्ता पहिली 'अ' च्या आठवणीने हळवा झालेला) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on गुरुवार, 06/05/2008 - 14:27

Permalink

मस्त कविता...

शाळेची आठवण करून देणारी... मुलं तशीच आहेत , अभ्यासक्रम तेव्हढा बदललांय शिक्षकांचा "रोल" मात्र त्यांनी पालकांकडे ढकललाय ! अगदी खरोखर हीच परिस्थिती आहे..:)
  • Log in or register to post comments

Submitted by डोमकावळा on गुरुवार, 06/05/2008 - 16:09

Permalink

झकास...

"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी ! आवडलं आपल्याला.....
  • Log in or register to post comments

Submitted by विदेश on गुरुवार, 06/05/2008 - 21:16

Permalink

शाळा.....

चार भिंतींच्या वर्गांत बसतात हल्ली काही तास "शाळार्थी" आपुलकी नसलेल्या शाळात हल्ली "विद्यार्थी" दिसत नाहित ! वास्तवातील सुरेख वर्णन!
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 06/05/2008 - 21:21

Permalink

शाळेचे दिवस आठवले.

छान कविता आहे. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on गुरुवार, 06/05/2008 - 22:25

Permalink

मस्त

आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 06/05/2008 - 22:40

Permalink

छानच रे...

छान आहे रे कविता, उदय. .... ते दिवस आठवले. अरे काय सांगू, माझ्या कडे एक कडीचा डबा होता आणि 'गोल्डस्पॉट' ची वॉटरबॅग सुद्धा. सकाळची शाळा असायची. आई मस्त गरम गरम पोळी करून त्याला छान तूपसाखर लावून त्या कडीच्या डब्यात घडी घालून ठेवायची. मग 'मधल्या सुट्टीत' (आता रीसेस असते) ती थोडी वाफेचं पाणी होऊन 'घामेजलेली' पोळी खाताना कसंतरीच वाटायचं. वाटायचं आईने पोळ्या थोड्या थंड करून मग डब्यात टाकल्या असत्या तर काय बिघडलं असतं? :''( आता ते सगळे दिवस आठवत आहेत. त्या आठवणी परत जाग्या केल्याबद्दल धन्यवाद, मित्रा. कुमार बिपिन कार्यकर्ते, इयत्ता १ली ते ४थी, तुकडी 'अ', अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाची प्राथमिक शाळा, गोरेगाव (पूर्व), मुंबई. अवांतरः जुन्या आठवणी यायला लागल्या, वय व्हायला लागलं की काय? :D
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 06/05/2008 - 23:10

Permalink

सुरेख कविता आहे!

कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी "गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी ! "मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी ! तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं ! हे मस्तच! (इयत्ता चौथीत असताना एकदा डबा घरी विसरला तेव्हा कडकडून भूक लागून रडू यायला लागलं. बाहेर मुसळधार पाऊस असल्याने घरी जाणेही अवघड होते. सूर्यवंशी सरांनी आपुलकीने खाऊ घातलेल्या त्यांच्या डब्यातल्या चटणी-भाकरीची आणि शेजारच्या हॉटेलातून आणलेल्या गरमागरम बटाटेवडे आणि चहाची प्रेमळ चव अजूनही जिभेवर आहे! :) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by उदय सप्रे on Fri, 06/06/2008 - 09:17

In reply to सुरेख कविता आहे! by चतुरंग

Permalink

प्रेम म्हणजे शिक्षकाची माया.....

चतुरंग साहेब, आता लहान्पणी केलेली मस्ती आठवते आणि आपल्यामुळे किती गरीब बाईंना आणि सरांना त्रास झाला असेल ते कळते.पण लहान मुलांना फक्त अफाट ऊर्जा असते आणि मनाने निष्पाप असतात ती ! तरीही आमच्या शाळेतील गोरे बाई आठवतात , पट्टी हातात घेऊन मारु का,मारु का? असे विचारत रहायच्या पण अगदीच नाइलाज झाला तरच त्यांचा हात उठायचा.....आता आठवले तरी (खरे तर हे लिहिताना पण) डोळे भरून येतात्....कुठे आहात हो तुम्ही बाई?मी शाळा सोडून पण आता २८ वर्षे झाली.....तुमच्या ह्या लाडक्या मस्तीखोर मुलाला माफ कराल ना? (मी डोक्यानी तल्लख आणि हुशार आहे अशी त्या माऊलीची खात्री होती.....आज त्या असत्या तर त्यांना याचे समाधानच वाटले असते.....) ओरडणारे सगळे सर-बाई आपले दुश्मन वाटतात लहानपणी सगळ्यांच्या ज्ञानाचा "वय" भक्षक असतो मोठेपणी सगळ्यांच्या वयाचे "ज्ञान" भक्षक होते..... तेंव्हा कळते.....वय आणि ज्ञान यांचा शिक्षक हाच खरा रक्षक असतो ! तुम्ही लिहिलेल्या आठवणींनी पण डोळे भरून आले..... तुमच्याबध्द्ल आपुलकी असल्याने आणि तुमच्या प्रतिसादात तशी ती माझ्याबध्दल पण असल्याची जाणीव झाल्याने आभार वगैरे न लिहिताच थांबतोय..... आपला, उदय सप्रेम
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 06/06/2008 - 09:21

Permalink

वावा!

झकास कविता!!!!! शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. (विद्यार्थी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 06/06/2008 - 09:28

Permalink

तरी पण

तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे ! ही ओळ फार आवडली..... खरचं शाळेत केलेला दंगा,,मस्ती याला तोड नाही... (गणिताच्या तासाला नेहमीच वैतागलेला) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

Submitted by गिरिजा on Sun, 06/08/2008 - 17:02

Permalink

तरी पण

तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !
खरय.. काही गोष्टी संपल्यावर / नसताना त्यांची किम्मत कळते.. शाळा हीसुद्धा त्यातलीच एक... नंतर कॉलेजात, नोकरीत कुठेच तशी मजा, तसा जिव्हाळा, तसे मित्र-मैत्रिणि हे काहीच मिळत नाही.. खूप सुरेख कविता आहे.. डोळ्यात पाणी नाही आल, तरच नवल.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5085 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com