शेअर्स, म्युच्युअल फंड व इतर

व्यंकट's picture
व्यंकट in काथ्याकूट
2 Oct 2007 - 12:49 am
गाभा: 

मित्रहो,
येथे शेअर्स व म्युच्युअल फंडांबद्दल काही माहिती मिळू शकेल काय?
म्युच्युअल फंड चे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते काय आहेत? कशात उत्तम रिटर्न्स मिळतात? सध्या कोणते फंडस गुंतवणुकीस चांगले आहेत? पगारातून खर्च वजा जाता, वर्षाला शिल्लक पडणार्‍या रकमे पैकी किती टक्के गुंतवणूक स्थावर जमिन, घर, सोने, स्टॉक्स, म्युच्युअल फंड, इंश्युरंस, सरकारी बाँड वैगेरे मध्ये प्रत्येकी करावी?

व्यंकट

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 Oct 2007 - 7:52 am | विसोबा खेचर

येथे शेअर्स व म्युच्युअल फंडांबद्दल काही माहिती मिळू शकेल काय?

येथे आम्ही जमेल तसे (सवडीनुसार) शेअर्सवर माहिती देण्याचा प्रयत्न करू..तो आमचा धंदाच आहे! :)

तात्या.

तात्या,

सध्या कोणते शेअर्स विकत घेणे फायद्याचे आहे?
जेणेकरुन पुढील २-३ महिन्यांत ते विकून फायदा मिळवता येईल
तसेच कोणते शेअर्स घेऊन १-२ वर्षांनी विकले तर दुपटीपेक्षा जास्त नफा देतील?

चेन्नईच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने २०० कोटी रुपये कमावले त्यातील ६८ कोटी शिर्डीला दान केले अशी बातमी अलिकडेच ऐकली. त्यामुळे मलाही या उद्योगात उडी घ्यावी असे वाटू लागले आहे :)

(फाश्ट मनी फॅन) सागर

विसोबा खेचर's picture

8 Oct 2007 - 8:35 am | विसोबा खेचर

सध्या मला तरी नव्याने कुठले समभाग खरेदी करावेत असं वाटत नाही. त्यातल्या त्यात दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता १४० च्या आसपास SRF व ८०-८५ च्या आसपास Visaka Industries घेऊन ठेवायला हरकत नाही असे वाटते...

तात्या.

विसोबा खेचर's picture

8 Oct 2007 - 12:33 pm | विसोबा खेचर

First Leasing ४५-४६ च्या आसपास, Omax Auto ६४-६५ च्या आसपास, Oriental Bank of Commerce २२२-२२३ च्या आसपास घेऊन ठेवायला हरकत नाही. वर्षभराच्या कालावधीत ३०/४० टक्के परतावा मिळायला हरकत नाही..

आपला,
(फण्डामेन्टल एनालिष्ट!) तात्या.

विसोबा खेचर's picture

10 Oct 2007 - 11:04 am | विसोबा खेचर

Oriental Bank of Commerce २२२-२२३ च्या आसपास घेऊन ठेवायला हरकत नाही.

OBC घेतले असल्यास आज विकायला हरकत नाही.. २३९ चा भाव सुरू आहे. दोन दिवसात ७/८ टक्के परतावा काही वाईट नाही! :)

आम्ही २२२ च्या भावाला घेतले होते, काल २१७ च्या भावालाही घेतले होते ते सर्व आज विकले. च्यामारी पैशे भेटले! आजचा बुधवार मजेत जाईल! :))

अर्थात, OBC ही कुणा टिपर अथवा खबरीलाल तिवारीची टीप नसून आमची स्वतःचीच टीप होती. जे समभाग आम्हाला फंडामेन्टली मजबूत आणि खरेदी करण्याच्या भावाचे वाटतात तेच आम्ही घेतो आणि लोकांनाही घ्यायला सांगतो.

'फलाना लेलो, सौ रुअया बढेगा', 'फलाना लेलो, डबल हो जाएगा' असं सांगणारे पुष्कळ टीपर आम्ही बघितले. त्यांच्या टीपा त्यांनाच मुबारक..!

आता 'अभी सेन्सेक्स २०००० जाएगा, २२००० जाएगा' अश्या बातम्या येत आहेत! चांगलं आहे! २२ काय ३०००० सुद्धा जाऊ देत. आम्हाला आनंदच आहे. आम्ही मात्र अशी घातक तेजी जेव्हा संपते तेव्हा लोकांना १५व्या मजल्यावरून उड्या मारताना बघितले आहे!

आपला,
(अनुभवी) तात्या.

Oriental Bank of Commerce २२२-२२३ च्या आसपास घेऊन ठेवायला हरकत नाही.

मनापासून धन्यवाद तात्या,

आजच घेतलेत हे शेअर्स. ३०-४० टक्के म्हणजे मोठी कमाई
वाट पहायची तयारी आहे माझी

(फाश्ट कमाईभक्त) सागर

मनिष's picture

5 Oct 2007 - 6:13 pm | मनिष

सध्या तरी हातातील पैसे जपावे, संधी पुन्हा येतीलच...

मनीष,

एकदम सहमत आहे तुमच्या मताशी.

आत्ताच इंटरनेटवर पाहीले
सेन्सेक्स लुढकला आहे

१८७६६ वरुन थेट १८३४६ पर्यंत कोसळला. एकदम ४२० अंकांनी

मला तरी असे वाटतेय की सेन्सेक्सचा एवढा आकडा मुद्दाम फुगवलेला आहे.
लवकरच सेन्सेक्स १५ ते १६ हजारापर्यंत कोसळेल असे वाटत आहे.
बहुतेक दिवाळीपर्यंत ही तेजी राहील. नंतर फुगवलेला फुगवटा फुटेल असे वाटते.

मला शेअर बाजारातले फारसे (जवळ जवळ काहीच ) कळत नाही. पण उगाचच मला असे वाटत आहे की असे होईल.
कदाचित सिक्स्थ सेन्स का काय म्हणतात ना ते असेल.
जाणकारांनी त्यांचे मत दिले तर खूप आनंद होईल

कारण माझ्याबरोबर इतर अज्ञानींच्या ज्ञानात भर पडेल :)

(शेअरबाजार कोसळायची वाट पाहणारा... ) सागर (...खरेदी करायची आहे ना....)

जुना अभिजित's picture

8 Oct 2007 - 1:33 pm | जुना अभिजित

हा लेख पहा http://moneytoday.digitaltoday.in/7-blunders-of-the-mf-world-7.html

सातही गोष्टींशी सहमत.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

व्यंकट's picture

9 Oct 2007 - 1:13 am | व्यंकट

येत्या काही दिवसात करेक्शन अपेक्षीत आहे का? असल्यास किती? मार्केट पडल्यास कोणते शेअर्स घ्यावेत?
सरकार पडल्यास नवी लोकसभा अस्तित्वात येस्तोवर मधल्या काळात अजून मार्केट पडेल काय? तेव्हा गुंतवणूक करावी का ? अश्या काळात म्युच्युअल फंडांच्या स्ट्रॅटजी काय असतात?

म्युच्युअल फंड ही काय भानगड आहे हे कोणी सांगेल का?
आणि गॅरंटीड नफा देणारे म्युच्युअल फंड कोणते हे कसे ओळखावे?

ते टेम्पल्टन का काय ते फंड मला बोगस फार्सच वाटतात.
(म्युच्युअल फंडचा अज्ञानी) सागर

मनिष's picture

11 Oct 2007 - 9:11 pm | मनिष

http://easymf.com

पहिल्या ३ नंबरातले म्युच्युअल फंडात गुंतवणुक करायला हरकत नाही.

मनिष,

आत्ताच ही माहीती पाहीली. मनापासून धन्यवाद.
मी नक्कीच या ३ पैकी एका फंडात गुंतवणूक करेन.

पण म्युचुअल फंड ही काय भानगड आहे हे फारसे कळाले नाही.
मी याबाबतीत १००% अज्ञानी आहे.
एकदम थोडक्यात कल्पना दिलीत तरी चालेल.

मनापासून धन्यवाद,
- सागर

वाटाड्या...'s picture

11 Oct 2007 - 9:09 pm | वाटाड्या...

icicidirect ला जाम वैतागलोय्...दुसरि एखादी साइट आहे का?

धन्यवाद...

व्यंकट's picture

11 Oct 2007 - 10:40 pm | व्यंकट

आय सी आय सी आय ला कंटाळलोय.

सागर's picture

12 Oct 2007 - 3:39 pm | सागर

तात्या,

आजकाल तशा बर्‍याच ब्रोकर्सच्या वेबसाईट्स आहेत
जसे.
http://www.hdfcsec.com/ बँकेची असली तरी पण चांगली आहे. खरेदी विक्री करण्यासाठी
तसेच
http://www.moneycontrol.com/ ही साईट पण चांगली आहे
आणि http://www.sharekhan.com/ ही पण मला बरी साईट वाटते

याव्यतिरिक्त अजून कोणाला माहीत असेल तर मला पण माहिती करुन घेण्यात रस आहे
(मायाजालावरच्या शेअर्सखरेदीच्या मोहात अडकलेला) सागर

सृष्टीलावण्या's picture

24 Mar 2008 - 9:55 pm | सृष्टीलावण्या

शहाणे असाल तर कोटकच्या वाटेला पण जाऊ नका. त्यापेक्षा सुरीने स्वत:चे नाक कापून घेणे सुद्धा
परवडले... त्यावरचा आंतरजालीय व्यापार तर भीषणच. ती साईट एक दिवसही धड-भली चालत नाही.

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

धोंडोपंत's picture

15 Oct 2007 - 10:35 am | धोंडोपंत

युनिटेक, जी एम आर इन्फ्रा, पुंज लॉईड या तीन कंपन्यांचे समभाग आता घ्या.

हो आत्ताच. याच इंडेक्सला.

आणि दिड पावणेदोन वर्षात दुप्पट पैसे झाले की आम्हाला स्कॉचने अभिषेक करा.

जोक्स अपार्ट. पण युनिटेक, जी एम आर इन्फ्रा आणि पुंज लॉईड यातील गुंतवणूक किमान ५० ते ७५ % परतावा एका वर्षात करेल.

आपला,
(माहितगार) धोंडोपंत

आम्हीही त्या सॉफ्टवेअर इंजिनीयर सारखे पैसे कमावले असते पण काय सांगणार??????

इश्क़ ने निकम्मा कर दिया 'ग़ालिब'
वर्ना हम भी आदमी थे कुछ कामके ||

आपला,
(छंदीफंदी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सदानंद ठाकूर's picture

27 Oct 2009 - 7:27 pm | सदानंद ठाकूर

म्युच्युअल फंडावरील मराठी संकेतस्थळ पहा
www.mutualfundmarathi.com

सदानंद
आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करा.
मला अन्यत्र भेटण्याची जागा