सतीश राव लय मस्त लिवल हाय तुम्ही..काय पन बोला पण ही अमेरिकेतील लोक हाय मात्र फारच मोकळी...कोणाच्या बायको बरोबर कोणाचा नवरा !!!!! (बहुतेक ह्यालाच 'आमेरिकन बिवटी ' म्हणत असणार)
व्वा र गड्या बाकी ह्या इंग्लिस पिक्चरचा परीक्शन तु लई झ्याक लिवल हायस..आणि ते म्या अगदी शेवट्च्या ओली पर्यंन्त वाचल्,,,नाही म्हणजे पोचलो तिथपर्यंन्त........
(बिवटी बिवटी म्हणतात ती अशी हाय काय) या इचारामंदी हरिवलेला..
मदनबाण.....
गावडे यांनी आपल्याला परिचित अशा भाषेत चित्रपटाची कथा सांगितली. एका हॉलीवूडपटाची कथा लोकभाषेमधे ऐकण्यात जी मजा असते ती आणि तितकी या लेखामधे आहे खरी. परंतु "गावकर्याच्या" दृष्टिकोनातून अत्याधुनिक अमेरिकन मूल्यांवर भाष्य करताना त्यातून काहीतरी चमकदार , चटकदार , खुसखुशीत लिहीण्याची संधी त्यानी गमावली असे वाटले. भाषिक नमुन्याचे प्रदर्शन इतपतच परिणाम त्यानी साधला ; "साध्याभोळ्या नजरेतून अमेरिकन गुंतागुंत" असे काहीतरी केले असते तर त्याचा परिणाम कितीतरी जास्त मनोरंजक झाला असतासे वाटले.
रायगड भागातल्या भाषेच्या लडिवाळपणाकरता मात्र हे लिखाण जरूर वाचावे !
असली कथा ,आणी ह्याला सिनेमा म्हणतात व्हय?
एक विनंती....नुसत्या कथेवर जाऊ नका साहेब... (तेसुद्धा अशा स्टाईलने सांगितलेल्या...)
आपण स्वतः सिनेमा पहा आणि मग ठरवा...
या सिनेमाला १९९९ सालची ( लेखन, दिग्दर्शन, छायालेखन, अभिनेता, आणि बेस्ट फिल्म ) अशी ऑस्कर आहेत...
त्याची पटकथा, संवादही वाचून पहा...
...
तुम्ही सिनेमा पाहून नंतरही तुमचे असेच मत झाले तर मात्र आमचे काही म्हणणे नाही...
तुमच्या मताचा आदर करतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
काय राव गावडेराव ... गोळी घालणारा म्हणजे रिकीचा बाप असतो अन तो का गोळी घालतो ते सांगितलेच नाही राव .. शेवटचे नाट्य अजुन नीट उलगडुन मांडायला हवे होते असे वाटले .. असो चांगला प्रयत्न.
स्पॉइलर... अटेन्शन...
तो गोळी घालणारा रिकीचा बाप होमोफोबिक असतो....
त्याचा गैरसमज असा होतो की आपल्या चांगल्या (!!) मुलाकडून हा शेजारचा लेस्टर काही अनैतिक वगैरे काम करवून घेतो आहे त्यामुळे {जुना ( बहुतेक जर्मन ) सैनिक असणारा }तो तिरीमिरीत जाऊन लेस्टरला गोळी घालतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आमाला वाचायचा लय याड .. त्यात तुमि लिवलाय म्हटल्यावर मंग काय इचारायचा.. काय ष्टोरि लिवलिय .. काय ती जेन , तिची आईस , अन काय त्या आईशिचा घो (नवरा).. आमेरिकेत हाव ना तुमि संभालुन रा रे पुता (मुला).. वयाचा विचार करुन सगला कर नाय तर तुजि ष्टोरि (इंडियन गाय).. मला ल्यावि लागण.. बाकि सगला मामला बेस जमलाय
आपला मयुर
शिन्माची ष्टोरी लै आवडाली.
अझून सांग इंग्लीश पीच्चरच्या ष्टो-या.
कथा म्हणुन काही ध्येनात नै आलं, म्हंजी गोष्ट अर्धीच सांगली की काय कनु आस्स वाट्लं, हळू हळू उमजन म्हणा तेबी.
सतीश,
गोष्ट छान सागितली आहेस... मजा आली वाचून... तेव्हा २००० सालामध्ये दोन वेळा थिएटरला पाहिला होता... यावर पुन्हा कधीतरी लिहावे असे मनात होते, तेव्हा फारच आवडला होता हा सिनेमा ...
या सिनेमाला मिळालेली ऑस्कर्स...Oscars for Best Actor (Kevin Spacey),
Best Director (Sam Mendes),
Best Picture (Bruce Cohen and Dan Jinks),
Best Original Screenplay (Alan Ball), and
Best Cinematography (Conrad L. Hall)
त्यातले काही फोटो आणि कलाकारांची नावे देतो इथे...
लेस्टरबाबा... केव्हिन स्पेसी...आणि कॅरोलिन बाई ..ऍनेट बेनिन्ग
रिकी ( वेस बेन्टली) जेन ( थोरा बिर्च ) आणि ऍन्जेला ( मेना सुवारी)
केव्हिन स्पेसीने या सिनेमात खरंच अप्रतिम काम केले आहे...मिडलाईफ क्रायसिसमधला वैतागलेला बाप, कंटाळलेला नवरा, ज्याचा त्याची मुलगी प्रचंड तिरस्कार करते, नंतर अँजेला भेटल्यानंतर त्याच्यात झालेले बदल ( तो म्हणतो, " जणू २० वर्षे मी कोमात होतो आणि आत्ताच जागा झालो"..)त्याने फारच छान दाखवलेले आहेत... आयुष्य तो नव्या उत्साहाने आणि आनंदाने जगायला लागतो...
केव्हिन स्पेसी ऒस्कर स्वीकारताना (अशा अर्थाचं काही ) म्हणाला होता, " ही व्यक्तीरेखा करताना मला खूप छान वाटलं कारण त्याचं वाईट वागणं,त्याचे सगळे दुर्गुण समजूनसुद्धा लेस्टर एकदम लव्हेबल वाटतो"...
... कॆरोलीनची व्यक्तिरेखा त्यापेक्षा अधिक अवघड होतं साकारणं... , खरं सांगायचं तर लेस्टर आणि कॆरोलीन एकाच वाटेवरचे प्रवासी आहेत पण गोष्ट लेस्टरची असल्याने लेखनात तिला सहानुभूती नाही , तरीही ऎनेट बेनिन्गने फ़ार छान केलं आहे काम...
यातले काही आवडते सीन...
१.लेस्टर बॉसला ब्लॅकमेल करून जास्ती बेनेफिट्स घेतो ते दृश्य
२. लेस्टर करोलिन दोघे प्रेमात आल्यानंतर लेस्टरच्या हातातली बीअर महागड्या सोफ्यावर सांडेल म्हणून कॅरोलीन लेस्टरला दूर ढकलते आणि त्याच्या मूडचा विचका होऊन तो थयथयाट करतो...
३. ( साक्षात्कारानंतर) घरात डिनरच्या वेळेला " आय रूल" असं हात उंचावून तो ( पूर्वी त्याला काडीची किंमत न देणार्या) दोघींना बजावून सांगतो ..
याच्या दिग्दर्शकाविषयी थोडेसे...
स्पीलबर्ग ने सॅम मेंडेस या लंडनमध्ये ब्रिटिश रंगभूमीवर दिग्दर्शन करणार्या ( नाटकवाल्या!! बहुतेक ब्लू रूम नावाचे निकोल किडमन अभिनीत नाटक त्याचे होते) दिग्दर्शकाकडे ही कामगिरी सोपवली त्यावेळी बर्याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या...
पण त्याचे या माणसाने चीज केले, आणि ऑस्कर मिळवले......
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
या सिनेमाचा हा एक दुवा..
http://www.dreamworks.com/ab/
या सिनेमाची संपूर्ण पटकथा संवादासहित वाचा इथे...
http://www.script-o-rama.com/movie_scripts/a/american-beauty-screenplay-script-final.html
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
येक पिक्चर.....
प्रतिक्रिया
वाचलां हां
मस्त! :)
च्या
असली कथा
लै भारी
छान / अपुर्ण
स्पॉइलर...
झकास
काय पन
एकदम बेस...
झक्कास ष्टोरी
माल नेमका कोणता?
सतीश,
या