✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे ०१ - भाग -०२

५
५० फक्त यांनी
गुरुवार, 12/09/2010 - 12:27  ·  लेख
लेख
सदर्न स्पाइस मागच्या वेळी सदर्न स्पाईस मधील जेवणा बद्दल बोललो होतो, तर आज नाष्ट्याविषयी. येथे इतर उडुपी हॊटेल प्रमाणे मुख्यत: दक्षिण भारतीय पदार्थच मिळतात, पण त्यात ही वेगळेपणा आहे. इथे विशेष आहे ते चटण्यांचं. वेगवेगळ्या आणि मुबलक. उडिदाची चटणी तर वेगळी वाढतच नाहीत, एका वाडग्यात भरुन टेबलवर ठेवलेली असते,घ्या हवी तेवढी. अजुन एक खास पदार्थ म्हणजे लाल तिखट किंवा मसाला न घालता केलेलं सांबार. याच्या पिवळ्या रंगावर जाउ नका, चव घेउन पहा. ही खास चव बहुधा फक्त हळद, हिंग, कडिपाला आणि मोहरी /मेथि दाणे एवढयाचीच असते. बाकी इडली,मेदुवडे,डोसे असतातच, पण त्या बरोबरच बॊम्बे उत्तप्पा हा प्रकार थोडासा पिझ्झाच्या जवळ जाणारा असतो. मस्त कांदा उत्तप्पा खरपुस भाजलेला,त्यावर लावलेली दाळ्य़ांची चटणी व बटाट्याची भाजी. हे सगळे लावुन त्यावर भरपुर लोणि लावुन हा उत्तप्पा दोन्हि बाजुनी पुन्हा खरपुस भाजला जातो आणि मग तुमच्या समोर येतो तो सांबार व चटणी सोबत. पण या उत्तप्प्याचीच चव एवढी सुंदर असते की त्या बरोबर काहि नसेल तरी चालेल. साधा उत्तप्पा किंवा डोसा घेतला तर आल्याची चटणी जरुर मागुन घ्या, या झणझणीत चटणी बरोबर शिळा ब्रेड पण छान लागेल इतकी ही चटणी चांगली असते. अजुन एक खास बात म्हणजे की, दक्षिण भारतीय स्वयंपाकाच्या पद्धती प्रमाणे प्रत्येक पदार्थावर बाहेरुन घातलेली फोडणी, ती पण उड्दाच्या दाळिची. ह्या फोडणीत केलेलं उप्पीट, ज्याला इकडे उपमा म्हणतात व बटाट्याची भाजी ह्या पण चवीला पुण्यातील इतर तथाकथित उडुपी हॊटेल पेक्षा कितितरी छान लागतात. रविवारी थोडंसं निवांतच उठावं, आवरुन इथं यावं आणि भरपुर नाष्टा करुन सरळ अलका किंवा मंगलाला जाउन एक पिक्चर पाहावा किंवा बाल्गंधर्व नाहीतर यशवंतराव चव्हाणला एखादं नाटक पहावं आणि पुन्हा दुपारी इथेच जेवायला यावं हा कार्यक्रम दोन महिन्यांत एकदा तरी होतोच. तर मग मंडळी केंव्हा जातांय वॆशाली व रुपाली सोडुन एकदा वेगळं पण खरंखुरं साउथ इंडियन खायला. हर्षद. पुर्व प्रकाशित - http://harshad-gaaanikha.blogspot.com/ पहिल्या भागाचा दुवा - http://misalpav.com/node/15710

Book traversal links for जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे ०१ - भाग -०२

  • ‹ जगणे म्हणजे खाणे - मु. पुणे. - ०१
  • Up
  • जगणं म्हणजे खाणं - मु. पुणे - भाग -०३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3957 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

तु बोलविशील तेंव्हा.

चिंतामणी
गुरुवार, 12/09/2010 - 12:43 नवीन
तर मग मंडळी केंव्हा जातांय वॆशाली व रुपाली सोडुन एकदा वेगळं पण खरंखुरं साउथ इंडियन खायला. तु बोलविशील तेंव्हा. एकदा जायला हवे हे नक्कीच. यावेळेस पदार्थांचे दर नाही दिलेस.
  • Log in or register to post comments

कुठे आहे नक्कि?

स्वैर परी
गुरुवार, 12/09/2010 - 16:04 नवीन
महिती दिल्याबद्दल धन्यवाद! पण हॉटेल नक्कि कुठे आहे ते सान्गता का?
  • Log in or register to post comments

स्वॅर परी

५० फक्त
गुरुवार, 12/09/2010 - 16:19 नवीन
डेक्कन कडुन नळस्टॉप कडे येताना, नळस्टॉपच्या आधिचा शेवटचा डाविकडचा बोळ. याच्या सुरवातीला आनंद व्हेज नावाचं हॉटेल आहे. हा बोळ शेवटी शारदा सेंटरच्या मागच्या गेटकडे जातो. याच बोळांत डाविकडे हे हॉटेल आहे. याचं गेट खुप छोटं आहे त्यामुळे गडबडीत चुकण्याची शक्यता आहे. एका बंगल्याच्या कम्पाउंड मध्ये असलेले हे हॉटेल आहे. नक्की जा. हर्षद.
  • Log in or register to post comments

"अजूबा"

चिंतामणी
Fri, 12/10/2010 - 00:25 नवीन
पत्ता - होटल आनंद कर्वे रोड च्या लेन मध्ये - म्हणजे अजूबाच्या समोर ना? होटल आनंद म्हणल्यावर पटकन लक्षात येणार नाही. "अजूबा" म्हणल्यावर लगेचच समजेल सगळ्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

धन्यवाद, नळ स्टॉप ला कायम्च

गणेशा
गुरुवार, 12/09/2010 - 17:58 नवीन
धन्यवाद, नळ स्टॉप ला कायम्च जातो .. नक्कीच भेट देइन येथे ..
  • Log in or register to post comments

दुसर्‍या भागातल्या पदार्थांचे

रेवती
Fri, 12/10/2010 - 00:53 नवीन
दुसर्‍या भागातल्या पदार्थांचे वर्णन चांगले झाले आहे.;)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा