मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खोल खोल खोली !

स्वैर परी · · काथ्याकूट
सहज एके दिवशी माझ्या कार्यलयातिल सहकार्र्याशी त्याच्या नवीन घराबद्दल बोलत असताना मी त्याला म्हटले, "आतल्या खोलीत कोण राहणार मग?".. तर माझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजि तो जोरात केकाटलाच! "ई..ई.. खोली काय?" मला समजेचना कि हा का ओरडला ते! मी त्याला कारण विचारले असता तो मला म्हणाला , " खोली हा शब्द मराठित फक्त पाण्याची खोली किंवा तत्सम संदर्भात वापरतात. घराच्या संदर्भात नाहि वापरत! " मग नक्कि खरे काय किंवा खोटे काय हे कळेच ना! म्हणुनच यावर जाणकरांची कय मते आहेत, हे जाणुन घेण्यासाठी हा धागा सुरु केला आहे! तरी आपण त्यावर थोडा प्रकाश फेकुन मारावा हि विनंती . ;)

वाचन 6497 प्रतिक्रिया 28