Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पारुबाई on Wed, 11/10/2010 - 03:07
काही पार्टी गेम्स ....तुम्हा सर्वांसाठी. हे खेळ प्रामुख्याने जोडप्यांसाठी आहेत. १.खेळ पहिला=बायकोला दागिने घालणे. पार्टीला यायच्या आधीच यजमानांनी बायकांना जास्तीत जास्त दागिने घालून यायला सांगावे. खेळ सुरु करण्यापूर्वी बायकांनी हे सगळे दागिने एखाद्या ताटलीत घेवून खुर्चीवर बसावे. आणि मग नवर्यानी हे सर्वं दागिने बायकोच्या अंगावर परत घालावेत. जो सगळ्यात आधी सर्वं दागिने बायकोला घालेल तो जिंकला.यात बायकांनी कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. बोलून किंवा एक एक दागिना हातात देवून वगैरे.गुपचूप बसून राहायचे. (अवघड आहे नाही ? आणि नवर्याला सूचना नाही द्यायच्या तर कोणाला द्यायच्या ? ) २. खेळ दुसरा=बायकोला पायघड्या घालणे वर्तमान पत्राचे फुलस्केप आकाराचे २ तुकडे नवरे मंडळी कडे देवून ठेवा.एक ठराविक अंतर पार करून जायचे आहे. बायका एका रेषेच्या मागे उभ्या राहतील आणि वेळ सुरु होताच नवर्याने बायकोला ती वर्तमान पत्रे एका पुढे एक ठेवत बायकोला एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचवायचे आहे.(फोटो काढायला विसरू नका हो ! ) बायकोचा पाय जमिनीवर पडता उपयोगी नाही.अर्थातच जी जोडी आधी पोचेल ती जिंकली. ३.खेळ तिसरा=घरातले सामान कमी करणे. का ssss य ? ऐका तर खर ...... या मध्ये नवरा आणि बायको ह्या दोघानाही काही लिहायचे आहे. घरातली एखादी वस्तू अशी असते की ती वापरलीही जात नाही आणि टाकून ही देववत नाही.स्वताच्या घरातील अश्या एक वस्तूचे नाव प्रत्येकाने कागदाच्या सुरुवातीला लिहायचे. आणि मग त्याखाली ती वस्तू का टाकून द्यायची आहे त्याची ५ कारणे लिहायची.शेवटी स्वताचे नाव लिहायचे. आता हे लिहून झाले कि सगळे कागद सुत्राधाराकडे द्यायचे.या खेळाला वेळेचे बंधन नाही.कितीही वेळ घ्या लिहायला. आता सूत्रधार एकेक कागद वाचून दाखवेल. फक्त तो वाचून दाखवताना एक बदल करेल की जे वस्तूचे नाव लिहिले असेल त्याच्या ऐवजी खाली ज्या व्यक्तीचे नाव आहे त्या व्यक्तीच्या जोडीदाराचे नाव वाचेल. उदा. सायकल टाकून द्याची असेल असे जर श्री.क्ष यांनी लिहिले असेल तर वाचताना तो म्हणेल सौ.क्ष यांना टाकून द्यायचे आहे. ही घ्या कारणे ५. धमाल ना .....
  • Log in or register to post comments
  • 4019 views

प्रतिक्रिया

Submitted by शुचि on Wed, 11/10/2010 - 03:28

Permalink

पारुबाई मस्त गेम आहे

पारुबाई मस्त गेम आहे शेवटचा. मी एक लापीझ दगडी रॉबीन एग आणलं आहे मला टाकवत नाही कारण पुढे आहेत फक्त तिथे नवर्‍याचं नाव घतलय इतकं मजेशीर होतय - (१) माझा नवरा निरुपयोगी पण देखणा आहे (२) माझा नवरा कै च्या कै महाग होता (३)माझा नवरा विकत घेतलच आहे तर ठेवेन म्हणते (४) माझा नवरा घराची शोभा बर्‍यापैकी वाढवतो (५) माझ्या नवर्‍याला टाकायला मला माज आलेला नाही ..... अजून तरी ;). हा हा मस्त!!!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 11/10/2010 - 03:47

Permalink

या गेम्स वरून एक चावट गेम

या गेम्स वरून एक चावट गेम आठवला. बहुतेक जणांना माहीत असेल बहुतेक. चायनीज रेस्टॉरंट्समधे जेवण झाल्यावर फॉर्चुन कूकीज मिळतात ज्यांमध्ये कागद सापडतो. कागदावर तुमचं भविष्य अर्थात इंग्रजीमध्ये लिहीलेलं असतं. उदाहरणार्थ (1) You display wonderful traits of charm & cortesy (2) You are surrounded by fortune hunters. (3) Your talents will be recognized & suitably rewarded (4) your secret admirer will soon appear (5) you are about to embark on a most delightful journey वगैरे वगैरे. जर आम्ही मैत्रिणी - मैत्रीणी गेलो तर आम्ही प्रत्येकजण हे फॉर्चुन मोठ्ठ्याने वाचून पुढे "in bed" हा शब्द जोडायचो. वरील उदाहरणे - (http://cbio.mskcc.org/~bader/fortunes/fortunes.html) या साईट वरून घेतली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 11/10/2010 - 04:03

In reply to या गेम्स वरून एक चावट गेम by शुचि

Permalink

"in bed" वरून आठवलं

कुठल्याही मराठी नाटकाचे नाव उच्चारायचे आणि त्यानंतर 'पलंगावर' हा एकच शब्द जोडायचा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 11/10/2010 - 04:10

In reply to "in bed" वरून आठवलं by संदीप चित्रे

Permalink

आईशप्पत क-ह-र (१) रंगले

आईशप्पत क-ह-र (१) रंगले रंगराव (२) तरूण तुर्क म्हातारे अर्क (३) मोरूची मावशी (४) दुरीतांचे तीमीर जावो (५) संशयकल्लोळ =)) =)) ह ह पु वा
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 11/10/2010 - 04:01

Permalink

व्हाय.. बिकॉज / का... कारण

१) पार्टीत हजर असलेल्या प्रत्येकाला सूत्रधाराने कागदाचे दोन तुकडे आणि पेन / पेन्सिल ह्या वस्तू द्यायच्या २) प्रत्येकाने कागदाच्या एका तुकड्यावर इंग्रजीतल्या 'व्हाय' ने सुरू होणारे ५ प्रश्न लिहायचे (उ.दा. व्हाय इज ग्लोबल वॉर्मिंग सो इंपॉर्टंट?, व्हाय अ‍ॅम आय हिअर टुडे? .. अशा प्रकारचे काहीही प्रश्न !) एका प्रश्नाचा दुसर्‍या प्रश्नाशी काहीही संबंध नसावा ३) प्रत्येकाने कागदाच्या दुसर्‍या तुकड्यावर 'बिकॉज'ने सुरू होणारी ५ वाक्ये लिहायची. ही वाक्ये म्हणजे तुम्ही लिहिलेल्या प्रश्नांनी उत्तरे नसावीत आणि त्या पाच वाक्यांचा एकमेकांशीही काही संबंध नसावा ! ४) आता सूत्रधाराने सगळे 'व्हाय'वाले कागद एकत्र करावे आणि दुसरा गठ्ठा सगळ्या 'बिकॉज'वाल्या कागदांचा करावा ५) सगळे 'व्हाय्'चे कागद एकमेकांत मिसळावे ६) सगळे 'बिकॉज'चे कागद एकमेकांत मिसळावे ७) आता हाताला येईल तो एक 'व्हाय'चा कागद आणि हाताला येईल तो एक 'बिकॉजचा' कागद उचलायचा ८) 'व्हाय' कागदातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून 'बिकॉज' कागदावरील पहिले वाक्यं वाचायचे ८.१) 'व्हाय' कागदातील दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर म्हणून 'बिकॉज' कागदावरील दुसरे वाक्यं वाचायचे ह्या असंबद्धपणामुळे जी प्रश्नोत्तरे तयार होतात ती खल्लास असतात ! (टीपः पार्टीत बच्चाकंपनी नसेल तर मग जी प्रश्न आणि उत्तरे लिहिली जातात ते वाचताना हसून पुरेवाट होते ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 11/10/2010 - 04:37

Permalink

मजेशीर गेम्स! वाचतिये.

मजेशीर गेम्स! वाचतिये.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 11/10/2010 - 07:22

Permalink

खरच मजेशीर. एकदा स्ट्रॉ न

खरच मजेशीर. एकदा स्ट्रॉ न आपापल्या बायकोचा केश संभार करायचा होता एका पार्टीत. आम्ही हरलो, पण नवर्‍याला साडी नेसवण्यात मात्र मी त्याला नऊ वारी नेसवुन ( होती सहा वारीच आणी वर हा ढाम्गुळा!) फर्स्ट प्राइझ कमवल. त्यावेळी साडी नेसलेले आमचे नवरे केटवॉक करुन आले काय दिसत होते चालताना. लोळलो आम्ही सार्‍याजणी. वर पारुबाईंनी दिलेले गेम पण मजेशीर, शेवटचा तर लय भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by पंख on Wed, 11/10/2010 - 12:46

Permalink

स्वगत..

स्वगत : हा आपला प्रांत नाही... सटका ईथून..
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 11/10/2010 - 13:04

Permalink

आणि मग नवर्यानी हे सर्वं

आणि मग नवर्यानी हे सर्वं दागिने बायकोच्या अंगावर परत घालावेत.
आपापल्याच की इतरांच्या बायकोच्या अंगावर? :) म्युचुअल अंडरस्टँगमध्ये हे स्वॅपिंग केल्यास अधिक मजा येईल.. आपली बायको सोडून अन्य एखाद्याच्या बायकोच्या दंडात वाकी चढवताना वा तिच्या नाकात नथ घालतांना मौज येईल.. ;) (अविवाहीत) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 11/10/2010 - 13:07

Permalink

राजा महाराजांच्या काळात असाच

राजा महाराजांच्या काळात असाच एक सर्वांग सुंदर खेळ खेळला जायचा म्हणे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 11/10/2010 - 13:09

In reply to राजा महाराजांच्या काळात असाच by परिकथेतील राजकुमार

Permalink

राजा महाराजांच्या काळात असाच

राजा महाराजांच्या काळात असाच एक सर्वांग सुंदर खेळ खेळला जायचा म्हणे
सर्वांग सुंदर? म्हणजे कुठकुठल्या अंगाचा? की सर्वांगाचाच? ;) (अंग अंग जळलेला) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Fri, 01/07/2011 - 01:53

Permalink

खेळ तिसरा=घरातले सामान कमी करणे

आम्ही ३१ डिसेंबरच्या पार्टीत खेळलो . सॉल्लिड धमाल आली :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com