माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , डाव्या शेपटीचा मारुती आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या शेपटीच्या आणि उजव्या शेपटीच्या मारुतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की डाव्या शेपटीच्या मारुतीचे सोवळे कडक असते. हे खरे आहे काय?


प्रतिक्रिया
तेच विचारण्याकता हा धागा काढला आहे की नक्की काय कडक असते म्हणजे? पूजेमध्ये फरक आहे की अन्य काही?
सोवळे हे एक रेशमी वस्त्र असते ते नेसावयाचे असले तर ते मऊ असण्याची आवश्यकता आहे. मारुती चे सोवळे म्हणजे काय? पूजा करणार्याने जर हे काही असे सोवळे नेसणे अपेक्षित असेल तर ते कडक कसे असू शकेल? यात पूजेमधल्या फरकाचा काय संबंध असू शकतो? काहीतरी कुठेतरी गोंधळ होतो आहे.
राजशेखर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1088109
या लेखात सोवळे हा शब्द वस्त्र या संदर्भात वापरलेला नसून मी वपरला आहे त्या अर्थी वापरला आहे. लेखात खालील वाक्य आहे -
" डाव्या शेवटीच्या मारुतीचे सोवळे कडक असते व ते मूर्तीकारालाही पाळावे लागते."
तुम्ही काय अर्थाने हा शब्द वापरला आहे ते सांगाना म्हणजे प्रश्नच मिटला.
राजशेखर
"सोवळे" हा शब्द येथे बर्याच अर्थांनी वापरला गेला आहे मुख्य म्हणजे - त्या त्या देवतेची नित्योपासना, तदनुषंगीक विधी, पावित्र्य, कर्मकांडं , पंचोपचारी पूजा, मूर्ती पूर्वाभिमुख, दक्षीणाभिमुख वगैरे असावी काय आदि गोष्टींकडे लक्ष देणे , स्तोत्राची आवर्तने आदि माझ्या लक्षात येतील तितके मुद्दे.
मला आतापर्यंत सोवळे, सोवळी शब्दाचे दोनच अर्थ माहित होते. एक म्हणजे नेसण्याचे रेशमी वस्त्र व दुसरा म्हणजे केशवपन केलेली विधवा स्त्री. पराभाऊंनी आता या शब्दाचा तिसरा अर्थ सांगितला आहे. या अर्थाचे स्वरूप तर प्रचंड व सर्वव्यापक दिसते आहे. मात्र या अर्थाने हा शब्दप्रयोग कसा करावा हे समजले नाही. असो. धन्यवाद.
सोवळे नेसून पूजा करणे याबद्दल पूजेच्या पथ्यांमध्ये थोडी चर्चा झाली होती.
राजशेखर
आभारी आहे. :)
परा च्या प्रश्नाचे नक्की उत्तर काय मिळाले ते उमजेल का?
थ्री चिअर्स फॉर परिकथेतील राजकुमार व राजेश घासकडबी. हा धागा फार आवडला. उजव्या सोंडेचा गणपती काय आणि डाव्या सोंडेचा मारुती काय? दोन्ही एकच. मला शुचिताईंच्या लेखनाला प्रतिसाद देऊन जे खरे सांगायचे होते ते तुम्ही दोघांनी अत्यंत परिणामकारक रित्या सांगितलेत. आवडले.
बाय द वे ही पूजा कोण आहे?
>>बाय द वे ही पूजा कोण आहे?
अहो ती एक व्यक्ती नसून क्रिया आहे.
(चुकून पुजा करणे ऐवजी पुजेस करणे असं वाचलं की काय?)
तुम्ही काय अर्थाने पूजा हा शब्द वापरला आहे ते ही सांगा ना!
पूजा या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात हे मला माहीत नव्हतं. काही लघुपूजा असतात, काही षोडशोपचारे पूजा असतात.. पण पूजा या शब्दाचा अर्थ बदलत नाही.
हो अन काही उत्तर पुजा पण असतात
काही पुजा घालतात काही पुजा करतात.
आणि मग या पूजांची पथ्य काय असतात? त्यांचं सोवळंही कडक असतं काय?
ज्याची होते आय मीन ज्याची करायची त्याच्यावर अन जो करणारा आहे अशी या दोघांवर ते अवलंबुन असते.
शेवटी काय आप्पापल्या मनातला भाव अन जो करुन घेतो तो द्याव !!!!!
ज्याची होते आय मीन ज्याची करायची त्याच्यावर अन जो करणारा आहे अशी या दोघांवर ते अवलंबुन असते.हा भाग मी लक्षात घेतलाच नव्हता! शेवटी प्रत्येक माणूस स्वतःपुरताच विचार करतो हेच खरं!
पूजा घालणे व पूजा करणे हे दोन वेगळे शब्दप्रयोग झाले. कर्मकांडाच्या दृष्टीने त्यात काही तांत्रिक फरक असू शकतील.
अदिती, सोवळं कडक असणं हा पुन्हा कर्मकांडाचाच भाग झाला. पण मुळात भक्तिभाव (तोच शब्द वापरायचा झाला तर)कडक असायला लागतो.
पूजा घालणे व पूजा करणे यावरुन मला शाळेत असताना वापरलेले काशी घालणे आणि काशी करणे हे वाक्प्रचार आठवले.
सोवळं कडक असणं हा पुन्हा कर्मकांडाचाच भाग झाला. पण मुळात भक्तिभाव (तोच शब्द वापरायचा झाला तर)कडक असायला लागतो.म्हणजे प्रश्न असा आहे की भक्तीभाव कितीही कडक असला तरीही सोवळं कडक असावंच लागतं का?
वर लिहिल्याप्रमाणे सोवळं हे झुळझुळीत वस्त्र असतं. मुळात भक्तिभाव कणखर असला तर मग त्यावरचं कर्मकांडाचं आवरण जितकं पातळ तितकं चांगलं असावं असं वाटतं.
गुर्जी _/\_
पण गुर्जी, मुळात सोवळं झुळझुळीत वस्त्र असेल तर कडक होतंच कसं?
जागृतावस्थेतुन स्वप्नावस्थेकडे जाण्याची सवय असल्यास होऊ शकते. याबाबत शंकराचार्यांनी दिलेला दाखला आहे जिज्ञासुंनी मुळातुन वाचावा :)
बरेच वर्षात धुतल नसेल. त्यामुळे धूळ खाऊन खाऊन कडक झालं असेल.
न धुता अशी सोवळी वस्त्रे चालतात? पुजेमध्ये स्वच्छतेचे महत्व खुप असते असे म्हणतात.
रेशीम धुतलं नाही तरी चालतं असं ऐकलंय... अर्थातच आमच्या घरात 'सोवळं' नावाची वस्तूच नाही...
आधी रेशीम सोवळ्याला का चालत असावे? रेशमाच्या किड्यांना उकळवून मारतात ना रेशीम काढण्यासाठी. :(
अरेरे! पूजेआधीच पापाचे धनी.
बाकी, इतर सर्व देव धोतर नेसत असताना मारूती शॉर्टस का घालतो?
असेनाका शॉर्टस, पारंपारीक असली की भागतं. मॉडर्न पुजा 'पापिलवार' व्हायला वेळ आहे अजुन.
पारंपरिक शॉर्टस म्हणजे काय बॉ?
घ्या! आख्खे रामायण वाचले अन. ;-)
अहो हणमंताने घातली आहे यापेक्षा अजुन काय पावती हवी पारंपारीकपणाची? तुम्हा मॉडर्न हुशार लोकांना संस्कृतीचं मेलं भानंच नाही!
प्रियाली हुशार आहे असं उगाच वाटत होतं तर! (पळा, नाहीतर घालत्ये ही दोन दणके मलाही!)
मी हुशार आहे आणि बरीचही काही आहे. नायल्याकडे यादी आहे. ;)
रामायणात येणार्या हनुमानाच्या कपड्यांचे वर्णन अशी चर्चा व्हायला हवी.
नायल्या सर्वद्वेष्टा असल्यामुळे ती यादी मला मिळणार नाही याची खात्री आहेच. पण तूच का नाही अशी चर्चा सुरू करत? तू इतिहासप्रेमी आहेस, तुला एकूणच या विषयात जास्त गती आहे, तू हुशार आहेस, इ.इ.इ.
अंधश्रद्धा वाढल्या तर मला पाप लागेल. ;)
लागलं पाप तर लागु दे की. मग लगेच्च एक धागा काढा, कुठलातरी एक धार्मिक ग्रंथ घ्या त्यातील पापाबद्दल दोन ओळी लिहा अन करा चर्चा करा! हाय काय अन नाय काय!
-(सुचना)सुचि
हुशार
हायटेक
मॉडर्न
आणि रामसे चान.
रामायणात येणार्या हनुमानाच्या कपड्यांचे वर्णन अशी चर्चा व्हायला हवी.तुम्हा पाशवी बायांना चर्चा करायला (आमचा) ब्रह्मचारी हणम्याच सापडला का? आँ? अरे हो वरच्या यादीत पाशवी राहिलंच!
त्याच्याकडे यादी तय्यार आहे असं म्हटलं नव्हतं मी. ;)
काय फरक पडतो रे नायल्या पाशवी लोकांनी हणमाबद्दल चर्चा केली तर?
हणमंताला थंडी वाजते! आधीच बिचारा उघडा अन शॉर्ट्स मध्ये आहे!
तो काय हनुमान चालिसा म्हणू शकत नाही पाशवी शक्तीना पळवून लावायला...
उघडा आणि शॉर्ट्समधे असलेला जॉनमात्र फारच हॉट दिसतो ब्वॉ!
जॉन हॉट दिसेल नाय तर काय दिसेल, त्याची छाती अन पोट इतकं सपाट आहे की तीन डोशे करता येतील एकावेळी!
नाईलसेठ, सुधरा वेळेत आणि भलत्या फिगर्स बघत बसू नका.
ते "हॉट" आम्ही का म्हणतोय आणि हे बेणं हॉट्प्लेटवर डोशे टाकण्याची तयारी करतंय.
असे सपाट तवे मिळत नाहीत हो सहजी! ;-)
आता आयटीतल्या बायकांच्या पाशवीपणा बद्दल ऐकुन असल्याने 'चार गोष्टी युक्तीच्या' माहित असलेले बरे नाही का भविष्यात?
हो पण म्हणून असं जॉनच्या पोटावर उठायचं? कुठे फेडशील हे पाप?
सैपाकघरात डोशे करुन फेडेन हो!
म्हणजे काय?