स्वानुभवावर आधारित निर्लज्जपणा वाचून आनंद झाला! पण या वेळेस निर्लज्जपणा कमी पडल्यासारखा वाटतो आहे.
====================================
नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा?
बायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस? येवढ्या उशीरा घरी आल्यानंतर बसल्या जागी खायला मिळतंय हे काय कमी आहे का?
नवरा - अगं भाजीत मीठ किती जास्त आहे? वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का?
बायको - मी काय तुझ्यासाठी एवढ्या उशीरापर्यंत थांबू काय? मला एवढं मीठ लागतंच भाजीत.
नवरा - .... साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे.
बायको - कमाल काय त्यात? मी काय खाणावळ चालवते?
नवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल.
बायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन.
नवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं?
बायको - नाही रे...
नवरा - मग?
बायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे...
नवरा - ते आहेच गं. पण...
बायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची.
नवरा - हे कुणी सांगितलं तुला?
बायको - अरे परवा तुला तिसर्यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास?
नवरा - अगं ते वेगळं
बायको - वेगळं बगरे काही नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला...
नवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.)
बायको - काहीही गरज नाहिये... जमेल
नवरा - कशासाठी अगं...
बायको - नाही तर अजून आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ५,००० घेतात
नवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ५,०००? त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ५,०००)
बायको - पण मला शिकायला फार वेळ लागतो. तू किती हुशार आहेस, तुला जर सकाळी नऊ वाजता गर्दीतून गाडी चालवून ऑफिसला जाता येतं तर स्वयंपाक किस झाड की पत्ती! उद्यापासून भाजी आणण्यापासून करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी तुझी!
नवरा - ... खुद के सांथ बातां: ठेवशील पुन्हा आयत्या हातात मिळालेल्या गोष्टींना नावं, ठेवशील??
====================================
पुन्हा एकदा, स्वानुभवावर आधारित.
माझा नवरा फार्फार हुशार आहे त्यामुळे असल्या भानगडीत तो कधीच पडला नाही...अगदी पापड पोळ्या, खारट अन जळलेली भाजी वगैरे प्रकारातून गेलेला आहे तरी..
जे देईल ते खातो...आणि नाही दिलं तर स्वतः करतो आणि मला देतो.
आता लग्न जुनं झाल्याने अन रोज रोज केल्याने मी स्वयंपाक खूप चवदार करते हे नमुद करु इछीते.
अॅड्या, मस्त लिहले आहेस रे.
छानच लेखमाला !
मात्र ह्यानंतर अॅड्याला घरात रहायला जागा मिळेल ह्याची शक्यता कमी वाटतेय, फ्लॅट बघु का रे एखादा तुझ्यासाठी ? ;)
- छोटा डॉन
हम्म्म !!
आत्ता वेळ गेल्यावर लिहिल तुम्ही . पण काय हरकत नाही, माझ्या मुलीला गुरु मंत्र देइन मी खासा !
__/\__ रे आदीजोशी !! सगळ्या आदीं प्रमाणे संसाराचे पुनर्र्र्र्र्रीजीवन तुमच्या मुळे होउ शकते.
नवरा - आणि मला खाकरे आवडतात हे बरोबर आहे, पण ते चहाशी. जेवायला नव्हे.
यावर माझं उत्तर असं असतं, "तुला पोळ्या आयत्या खायला मिळाल्यायत त्या काय आकाशातून पडल्यायत का तुझ्या आईने पोस्टाने पाठवल्यायत?"
बाकी बरंचंस बरोबर! तुमच्या लग्नाला एक वर्षच झालंय म्हणजे आताशी कुठे तुम्ही कॉलेजात प्रवेश घेतलाय. पण तुम्ही स्कॉलर दिसताय, आणखी काही वर्षात डॉक्टरेट कराल यात काही शंका नाही! माझ्या मुलीला लग्नाआधी तुमच्या घरी शिकवणीला पाठवीन म्हणते, म्हणजे तिला दोन चांगले गुरु भेटतील. (आधीचे भाग तुमच्या बायकोने लिहून दिले होते ना? म्हणजे एकसे भले दो!)
२. नवर्यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही.
३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये.
४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये.
५. नवर्यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे.
६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्यांना अजिबात त्रास होत नाही.
७. नवर्यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं.
१०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे.
एकदम सहमत. याचा अनुभव घेतोय पदोपदी.
एकदम झकास लेख. आणि सल्ले तर एकदम सहीच आहेत.........
फक्त अजुन (निर्लज्ज) Councer होण्यास हरकत नसावी. (ह.घ्या)
१. "कल्पवॄक्ष कन्येसाठी" ह्या पि. सावळाराम ह्यांच्या गाण्यातला कल्पवॄक्ष म्हणजे नवरा नव्हे हे कॄपया ध्यान्यात घ्यावे.
२. नवर्यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही.
३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये.
४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये.
५. नवर्यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे.
६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्यांना अजिबात त्रास होत नाही.
७. नवर्यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं.
८. आई पेक्षा चांगला स्वयंपाक जगात कुणालाही येत नाही. आईचा ३०-३५ वर्षांचा अनुभव आणि बायकोचे नवर्यावर चालणारे प्रयोग ह्यांची तुलना होऊ शकतच नाही.
९. आईशी तुलना करायची असेल तर आधी किमान आईने जसं लाडाऊन ठेवलंय ते कंटिन्यू करण्यापासून सुरुवात करावी.
१०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे.
ह्या काही गोष्टी बायकांनी लक्षात ठेवल्या तर जगातले यच्चयावत नवरे आणि पर्यायाने जगातले यच्चयावत संसार सुखाचे होतील.
किती रे भाबडा आशावाद हा!
बाकी, 'आयुष्याचे नाटक' चे प्रयोग हाऊसफुल्ल चाललेले दिसतायत ;) नाही, हे असले काहीतरी सल्ले सुचतायत..म्हणून म्हणलं हों ;)
आणि संसार सुखाचा करण्यासाठी आता नवर्यांना एकमेव सल्ला:
"आपल्या देवाने दोन कान दिलेत हे कधिही विसरू नका."
हॅ हॅ हॅ!!!! ही उपजत बुध्दी असते हो..ते काय वेगळं शिकावं लागतं? :D
प्रतिक्रिया
.
स्वानुभवावर आधारित
(विषय दिलेला नाही)
माझा नवरा फार्फार हुशार आहे
अंतिम भाग म्हणजे वर्मावर बोट
मस्त...
उत्तम लेखमाला ...
मस्त
अभ्यास
.
अंदाज
उच्च
झकास अरे
मस्तच
हम्म्म !! आत्ता वेळ गेल्यावर
लै भारी रे
माझा एक निर्ल्लज मित्र म्हणायचा की
च्यायला
+१०^३६
काय हे रामदास? तुम्हीसुद्धा
छान
खरच की
क-ड-क
रा डा !!! रे अॅड्या....
भारी आहे!
फक्त आधीचे नाही
म्हणजे
हहपुवा..
बेस्ट
अंतिम भाग नको हो, आणखी येवू
लेखमाला आवडली.
__/\__
तुफ्फान!!! एकदम भारी!!
२. नवर्यांना कामाचा कंटाळा
Councer ऐवजी Counceller असा वाचावे....
Councer ऐवजी Counceller असा वाचावे....
अरेरे...