✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निवडक सुविचार संग्रह

न
निमिष सोनार यांनी
Sat, 10/16/2010 - 19:39  ·  लेख
लेख
* अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे. तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव! * लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म! * एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच! एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही. * पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल. * एखाद्या कृतीमध्ये पाप नसते. त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते. जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते. देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो. मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत. नाही का? * समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात. त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडुन जावू द्या! * स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती पूर्ण होतात. नाहीतर, निसर्गाने आपल्याला ते पाहाण्याची शक्ती कशाला बरे दिली? * काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात. * कठीण काळ कायम टिकाऊ नसतो. पण कठीण लोक असतात. * मुर्खाचे हृदय जिभेवर असते. शहाण्याची जीभ हृदयात असते. * शब्द विविध पद्धतीने योजले असता वेगेवेगळा अर्थ निघतो. आणि अर्थ वेगेवेगळ्या पद्धतीने योजल्यास वेगळा परिणाम साधता येतो. * यशासारखे प्रेरणादायी दुसरे काहिही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी आपणांस दोन्ही आवश्यक आहेत. * अपयश कायम नसते. यश सुद्धा! * लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत. ते तुमचे "उदाहरण" घेतात. * चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. * "दिलेले वचन" एखाद्या "घेतलेल्या कर्जासारखेच" आहे. * प्रशंसा - स्वीकारायला आणि करायला शिका. * वाईट मनुष्य भीती दाखवली तरच आज्ञा पाळतो. चांगला मनुष्य प्रेमाद्वारे. * मनुष्य ज्याला घाबरतो त्यावर कधीही प्रेम करू शकत नाही. * भीतीला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते. * आपण एखादी गोष्ट करू शकतो की नाही, हे ती गोष्ट करून पाहील्याशीवाय समजत नाही. * ज्याचा शेवट गोड, ते सगळेच गोड!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11415 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

चांगले आहेत !

संजयशिवाजीरावगडगे
Sat, 10/16/2010 - 21:32 नवीन
आवडले चांगले आहेत !
  • Log in or register to post comments

आवडले

पैसा
Sat, 10/16/2010 - 21:34 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments

कित्तेकदा सुविचार एकमेकांच्या

पाषाणभेद
Sat, 10/16/2010 - 21:59 नवीन
कित्तेकदा सुविचार एकमेकांच्या उलट असतात. त्यामुळे नक्की काय समजायचे हा प्रश्न उभा राहतो. वरचेच उदाहरण बघा: तुम्ही म्हणता: एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही. आता दुसरा विचार बघा: प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे दिलेले उदाहरण एकदम जुळत नसेलही पण मला आत्ता या घडीला इतर उदाहरणे आठवत नाही.
  • Log in or register to post comments

छान

निवेदिता-ताई
Sat, 10/16/2010 - 22:47 नवीन
छान ..............सुंदर............
  • Log in or register to post comments

<<एखादी समस्या सुटण्यासारखी

शिल्पा ब
Sun, 10/17/2010 - 00:31 नवीन
<<एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच! एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही. * पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल. हे काही पटत नाही..इतर सुविचार छान.
  • Log in or register to post comments

नायगावकर काकांचा सुविचार

अडगळ
Sun, 10/17/2010 - 01:40 नवीन
ढेकणासारखे चिरडून मरण्यापेक्षा डासासारखे गुणगुणत गुणगुणत मरा
  • Log in or register to post comments

उत्तर

सदाची पहुणी
Sun, 10/17/2010 - 12:19 नवीन
प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते फक्त शोधावे लागते.---सदाची पाहुणी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा