भारताच्या एकमेव राजघराण्यातील एकमेव राजपुत्र, युवराज माननीय श्री. राहुलजी गांधी यांनी असे म्हटले आहे की रा. स्व संघ आणि सिमी यात फार फरक नाही.
http://72.78.249.125/esakal/20101006/4905023441473910304.htm
हे विचार मननीय आहेत. उद्या नाहीतर परवा सध्याची जुनी खोडे हटवून नव्या रक्ताचे, सळसळत्या उत्साहाचे, गोरेपान उमदे, तरणेबांड राजपुत्र ज्यांनी मातेच्या गर्भात असल्यापासून राजकारणाचे बाळकडू प्यायले आहे असे अभिमन्यू देशाचे सुकाणू आपल्या हाती घेऊन ह्या देशाचे भरकटलेले तारू इप्सित स्थळी नेऊन पोचवणारच.
सिमी ही बेकायदा संघटना आहे. तिच्यावर कायद्याने बंदी आहे. युवराज राहुलजी रा, स्व, संघावर लगेचच बंदी घालतील का देशाचा लगाम हातात घेतल्यावर तो विचार करतील? आपणास काय वाटते? सोनियाजी आणि राहुलजी यांनी मिळून देशाला, त्यातही हिंदूंना एक अमूल्य भेट दिलेली आहे ती म्हणजे अयोध्येच्या वादग्रस्त स्थळी काही भागावर राममंदीर बांधायची अनुमती. इतकी मोलाची भेट दिल्यावर त्या बदल्यात अन्य विरोधी गटांचे समाधान करण्याकरता संघावर बंदी घातली तर काय हरकत आहे?
त्यामुळे जगभर भारताचे नाव पुरोगामी, निधर्मी म्हणून प्रसिद्ध पावेल.
आपणास काय वाटते?
ह्या बातमीच्या प्रतिक्रिया वाचून धक्का बसला. युवराजांविरुद्ध जे गरळ ओकले गेले आहे ते बघता सकाळच्या संपादकांनी अशा प्रकारच्या बातम्यांवर प्रतिक्रिया लिहायला बंदी घालावी अस वाटते.
राहुलजी हे लवकरच पंतप्रधानपदावर आरूढ होणार आहेत एवढेही ह्या लोकांना कळत कसे नाही? असो.
प्रतिक्रिया
6 Oct 2010 - 6:03 pm | विजुभाऊ
काय फरक आहे ते सांगा ना? नुस्ते चारोळी धागा का काढताय
सिमी ही विद्यार्थी म्हणे चळवळ आहे असे ऐकून आहे.
6 Oct 2010 - 7:21 pm | धमाल मुलगा
माननीय विजुभाऊ ह्यांस नम्र विनंती, की त्यांनी आम्हा अज्ञ पामरांस रा.स्व.सं. आणि सिमी हे दोन्ही सारखेच कसे ते समजावुन सांगावे जेणेकरुन आमच्या अज्ञानतिमीरात ज्ञानदीप प्रज्वलीत होईल.
धन्यवाद.
6 Oct 2010 - 10:30 pm | शेखर
सहमत.
7 Oct 2010 - 12:59 pm | llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ.. धमालराव कोणाकडे काय मागता आहात? आँ? त्यांना सवय आहे का ?
6 Oct 2010 - 6:07 pm | अवलिया
खरे आहे. राहुलजी यांचे म्हणणे बरोबर असावे म्हणजे असे की रास्वसंघ किंवा सिम्मी किंवा तत्सम कोणतीही संघटना एकाच पद्धतीने काम करते. जिज्ञासुंनी सोसायटीज अॅक्ट, ट्रस्ट अॅक्ट, किंवा कंपनी कायद्याखाली असलेल्या निधी कंपन्या (सेक्शन २५) चा अभ्यास करावा.
फरक असलाच तर त्यांच्या मेमोरेंड्म नुसार असलेल्या विचारधारेत.. त्याचा विचार राहुलबाबा करु शकत असेल असे मला वाटत नाही. असो.
9 Oct 2010 - 2:52 am | अविनाश कदम
म्हणजे संघ अगती तंतोतंत सिमी सारखा नसेल, पण सिमी सारखं होण्याकडे चाटचाल सुरू आहे असं राहुलजींना म्हणायचं असाव.
आपणही काही कमी आहोत की काय? शेवटी जशास तसे उत्तर द्यायला नको का?
.आपल्याला समता प्रस्थापीत करायची आहे नाही मित्रांनो ?
6 Oct 2010 - 6:11 pm | गांधीवादी
भारताच्या एकमेव राजघराण्यातील एकमेव राजपुत्र,
सहमत
युवराज माननीय श्री. राहुलजी गांधी
सहमत
यांनी असे म्हटले आहे की रा. स्व संघ आणि सिमी यात फार फरक नाही.
माहित नाही.
http://72.78.249.125/esakal/20101006/4905023441473910304.htm
हे विचार मननीय आहेत.
सहमत
उद्या नाहीतर परवा सध्याची जुनी खोडे हटवून नव्या रक्ताचे
सहमत
सळसळत्या उत्साहाचे,
सहमत
गोरेपान उमदे,
सहमत
तरणेबांड राजपुत्र
सहमत
ज्यांनी मातेच्या गर्भात असल्यापासून राजकारणाचे बाळकडू प्यायले आहे
सहमत
असे अभिमन्यू
असहमत अर्जुन म्हणा.
देशाचे सुकाणू आपल्या हाती घेऊन ह्या देशाचे भरकटलेले तारू इप्सित स्थळी नेऊन पोचवणारच.
सहमत
सिमी ही बेकायदा संघटना आहे.
माहित नाही.
तिच्यावर कायद्याने बंदी आहे.
माहित नाही.
युवराज राहुलजी
सहमत
रा, स्व, संघावर लगेचच बंदी घालतील का देशाचा लगाम हातात घेतल्यावर तो विचार करतील?
माहित नाही.
आपणास काय वाटते?
^&^%*&% *^%*र्*&%* %%^) (&_(&_( &^$^%$^&
सोनियाजी आणि राहुलजी यांनी मिळून देशाला, त्यातही हिंदूंना एक अमूल्य भेट दिलेली आहे ती म्हणजे अयोध्येच्या वादग्रस्त स्थळी काही भागावर राममंदीर बांधायची अनुमती.
सहमत
इतकी मोलाची भेट दिल्यावर त्या बदल्यात अन्य विरोधी गटांचे समाधान करण्याकरता संघावर बंदी घातली तर काय हरकत आहे?
माहित नाही.
त्यामुळे जगभर भारताचे नाव पुरोगामी, निधर्मी म्हणून प्रसिद्ध पावेल.
माहित नाही.
आपणास काय वाटते?
पुन्हा ^&^%*&% *^%*र्*&%* %%^) (&_(&_( &^$^%$^&
ह्या बातमीच्या प्रतिक्रिया वाचून धक्का बसला.
युवराजांविरुद्ध जे गरळ ओकले गेले आहे ते बघता सकाळच्या संपादकांनी अशा प्रकारच्या बातम्यांवर प्रतिक्रिया लिहायला बंदी घालावी अस वाटते.
हॅ हॅ हॅ हॅ हॅ
राहुलजी हे लवकरच पंतप्रधानपदावर आरूढ होणार आहेत एवढेही ह्या लोकांना कळत कसे नाही? असो.
सहमत
6 Oct 2010 - 6:30 pm | मूकवाचक
हे युवराज राहुल आणि राहुल महाजन सारखेच.
(तशा सोनियाजी (केवढा तो त्याग!) आणि मदर टेरेसा सारख्याच)
6 Oct 2010 - 6:17 pm | चिरोटा
आता सुमार केतकरांनाचा सांगा एखादा अग्रलेख लिहायला राहुल बाबाच्या विधानांवर.
काहीही करणार नाहीत्.काँग्रेस पुढारी आणि संघ पुढारी ह्यांचे संबंध ते(म्हणजे दोन्ही साइडसचे लोक) दाखवतात तेवढे वाईट कधीही नव्हते व अजूनही नाहीत.
6 Oct 2010 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ सध्यातरी गांधी घराण्यातील कोणी आपला जीव धोक्यात घालेल असे वाटत नाही :) ह्या घराण्यात कोणालाही 'नैसर्गीक मरण नाही' असा शाप आहे ना ;)
6 Oct 2010 - 7:12 pm | यशवंतकुलकर्णी
प्र.का.टा.आ.
संपादक मंडळ
6 Oct 2010 - 7:26 pm | विसोबा खेचर
कोण राहूल गांधी??
धन्यवाद..
(स्वयंसेवक) तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
6 Oct 2010 - 10:41 pm | शुचि
=)) =))
तात्या म्हणजे ना :)
7 Oct 2010 - 11:11 am | विसोबा खेचर
अगं खरंच..!
मी नाही ओळखत कुणा राहूल गांधीला! कोण हा???
तात्या.
6 Oct 2010 - 7:45 pm | विकास
नागरीकशास्त्रात कधी तरी शिकल्याचे आठवते की भारतात जी काही सात का अशीच काही स्वातंत्र्ये आहेत त्यात एक भाषण स्वातंत्र्य आहे म्हणून. :-)
आता सुब्रम्हण्यम स्वामी त्याच स्वातंत्र्याचा अगदी त्यांच्या राजकीय पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर वापर करत सोनीया बाईंना इटालीयन म्हणतात तसेच त्यांच्या देशविघातक कृत्याची चर्चा करतात, तसेच राहूल-प्रियांकाच्या इटालीयन आहेत. राहूल गांधींकडे व्हेनेझुएलन पासपोर्ट पण आहे असे म्हणतात.
थोडक्यात राहूलजींकडे कितीही देशांचे पासपोर्ट असले तरी त्यांना भारतात भाषणस्वातंत्र्य आहे ;)
6 Oct 2010 - 8:03 pm | प्रदीप
अरे वा, हे खरे असले तर मग व्हेनेझुएला, इराण, चीन, भारत व उ. कोरिया असा नवा 'अॅक्सिस' निर्माण होण्याची शक्यता आहे तर!
6 Oct 2010 - 8:25 pm | विकास
अॅक्सिस ऑफ गांधीज? ;) का कॉन्स्पिरसी थिअरीज? :)
6 Oct 2010 - 8:21 pm | अनामिका
आता सुमार केतकरांनाचा सांगा एखादा अग्रलेख लिहायला राहुल बाबाच्या विधानांवर
राहुलबाबाचे थोर विचार प्रकटन झाल्यावर लगेचच केतकरांचा लेख प्रसवून झाला देखिल असेल आत्तापर्यंत ............प्रकाशित करण्यासाठी दिवसभर थांबावे लागल्याने अत्यंत व्यथित असावेत बहुदा.....
फरक असलाच तर त्यांच्या मेमोरेंड्म नुसार असलेल्या विचारधारेत.. त्याचा विचार राहुलबाबा करु शकत असेल असे मला वाटत नाही.
सहमत
ह्या घराण्यात कोणालाही 'नैसर्गीक मरण नाही' असा शाप आहे ना !
सहमत...............
6 Oct 2010 - 8:24 pm | विकास
या घराण्यात सत्तेला मरण नाही इतकेच वाटते! :-)
6 Oct 2010 - 9:27 pm | ईन्टरफेल
<सोनियाजी आणि राहुलजी यांनी मिळून देशाला, त्यातही हिंदूंना एक अमूल्य भेट दिलेली आहे ती म्हणजे अयोध्येच्या वादग्रस्त
स्थळी काही भागावर राममंदीर बांधायची अनुमती. >
च्यामारि आमि समझत व्हतो तो? निकाल कोर्टान दिला हाय!
तवा आमि गप.......बसलो
आमाला काय ? माहित हे दोघ माय पुत
आमच्या देवाच्या जागा बि आमाला.
हे (............) देनार हाय..
तर आमि दुसर्या एकाला भि निवडुन दिल ..
नसत ना..हो. :party:
7 Oct 2010 - 5:16 am | हुप्प्या
>>च्यामारि आमि समझत व्हतो तो? निकाल कोर्टान दिला हाय!
आवं कोरट, संसद, पंतप्रधान ही समदी कठपुतळी हायत. त्या समद्यांचा बोलविता धनी, आपलं बोलविती धनीण एकच आहे ती म्हंजी आप्ल्या देशाची राजमाता.
एकदा का राजेशाही आपलीशी केली की मंग समदे निर्णय थितंच घेतले जात्यात. बाकीच्या सौंस्था फकस्त त्यांचा निरुप आपल्याला ऐकिवत्यात. म्हंजी ऐकनार्यालाबी बरं वाटतंय. समदं एकीच्याच तोंडून ऐकत र्हायल तर लई बोर होतंय.
जै राजमाता! जै जै युवराज!
6 Oct 2010 - 9:26 pm | हुप्प्या
युवराजांचे हेही बोल वाचा.
http://72.78.249.125/esakal/20101006/5121758385095168637.htm
सध्याचे पंतप्रधान माझ्यापेक्षा जास्त सक्षम आहेत असे राहुलजी म्हणाले. इतक्या लहान वयात इतकी समज दुर्मिळच आहे. जिथे जाऊ तिथे लोक पाया पडत आहेत, राजकुमार, प्रिन्स, शाह्जादा वगैरे नावाने बोलावत आहेत. तरीही इतका विनम्रपणा कसा येतो या विभूतींमधे? अर्थात शेवटी ही पुस्ती जोडली आहे की भविष्यात काय होईल ते सांगता येणार नाही. म्हणजे बघा कशी समज आहे. विनम्रपणाबरोबरच हा मुत्सद्दीपणाही! इतका मुरब्बी राजकारणी! कित्येकांना सगळी हयात राजकारणात काढल्यावरही इतकी प्रगल्भता येत नाही ती राहुलजींनी इतक्या अल्पवयातच हासिल केली.
मला तर इतके भरून आले आहे की वाटते त्या म्हातार्या पंतप्रधानाची गचांडी धरून उचलबांगडी करावी आणि तात्काळ त्या गादीवर युवराजांचा राज्याभिषेक करावा! असो. थोडा धीर धरावा. म्हटलेच आहे सब्र का फल मीठा होता है
6 Oct 2010 - 9:29 pm | नितिन थत्ते
चालू द्या.
बहुधा १००+ (एकतर्फी प्रतिसाद येऊनही).
6 Oct 2010 - 9:55 pm | यशवंतकुलकर्णी
सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं, अंतरिक्ष भी नही, आकाश भी नहीं था,
छिपा था क्या, कहां, किसने ढका था, उसपल तो, अगम अटल जल भी कहां था
(डिस्कव्हरी ऑफ इंडिया टायटल थीम)
वरील चालीवर हे म्हणा:
सृष्टी से पहले पक्ष नहीं था, कॉंग्रेस भी नहीं, भाजप भी नहीं, संघ भी नहीं था
छिपा था क्या, कहां किसने ढका था, उसपल तो अटल तो क्या, राहूल भी कहां था..
6 Oct 2010 - 10:49 pm | मिसळभोक्ता
हे राहुल ह्यांचेच मत नाही, तर समाजशास्त्रज्ञ आणि भारताच्या अभ्यासक मार्था नसबॉम ह्यांचेदेखील मत आहे. त्यांच्यामते, सॅम्युअल हंटिंगटनची क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन थियरी "मुस्लिम आणि पाश्चिमात्य" ह्यांच्याबद्दल नाही, तर शुद्धतेचा (प्युरिटी) आग्रह धरणारे, आणि प्राग्माटिक (प्रतिशब्द) लोक ह्यांच्याबद्दल आहे.
संघ/विहिंप/बजरंगदल आणि सिमी/लष्कर/अलकैदा दोन्ही शुद्धतेचा आग्रह धरणारे आहे.
(मसंचेच उदाहरण द्यायचे झाले, तर उपक्रम/मनोगत आणि मिसळपाव ह्यांच्यात क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे. कडवे उपक्रमी/मनोगती, आणि चलता है म्हणणारे मिसळप्रेमी ह्यांच्या विचारसरणीत शुद्ध आर्य संस्कृतीवाला हिटलर आणि मेल्टिंग पॉट वाले अॅलाईज ह्यांचे प्रतिबिंब दिसते.)
(सदर लेख/काथ्याकूट १०० वरून २०० कडे जावा ही तो श्रींची इच्छा.)
6 Oct 2010 - 10:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
eyy?
6 Oct 2010 - 11:03 pm | नितिन थत्ते
अवांतर : मार्था नसबॉम इटालियन तर नाहीत?
7 Oct 2010 - 12:53 am | मिसळभोक्ता
http://en.wikipedia.org/wiki/Martha_Nussbaum
त्यांचे २००७ सालचे पुस्तक वाचावे, ही नम्र विनंती.
6 Oct 2010 - 11:10 pm | पुष्करिणी
एकंदरीत फारच क्लेश आहे सध्या सगळीकडे !
6 Oct 2010 - 11:15 pm | विकास
...ह्यांच्यात क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे.
आपल्याला मिंग्लीश मधे "क्लेश ऑफ सिव्हिलायझेशन आहे" असे म्हणायचे असावे.
7 Oct 2010 - 12:54 am | मिसळभोक्ता
माझ्या अहिंसावादी मनाला ह्या क्लॅशमुळे क्लेश होतात.
6 Oct 2010 - 11:21 pm | शुचि
पण सिमी चा अतिरेक्यांशी संबंध असल्याचा संशय आहे तसा संघाचा अतिरेक्यांशी संबंध असल्याचा संशय कुठे आहे? संघाच्या काही अतिरेकी कारवाया देखील नाही आहेत.
हा मोठ्ठा फरक नाही का?
7 Oct 2010 - 12:57 am | मिसळभोक्ता
तत्त्वज्ञान एकच असले तरी त्यातून उद्भवणारी कृती वेगळी.
संबंध असल्याचा संशय, हा संशय घेणार्यावर अवलंबून आहे.
अनेकांना, माझा माझ्या कुटुंबाशी संबंध असल्याचा संशय आहे. पण ते तसे व्यक्त करत नाहीत.
7 Oct 2010 - 12:57 am | मिसळभोक्ता
तत्त्वज्ञान एकच असले तरी त्यातून उद्भवणारी कृती वेगळी.
संबंध असल्याचा संशय, हा संशय घेणार्यावर अवलंबून आहे.
अनेकांना, माझा माझ्या कुटुंबाशी संबंध असल्याचा संशय आहे. पण ते तसे व्यक्त करत नाहीत.
7 Oct 2010 - 2:46 am | हुप्प्या
ते म्हणाले आपल्या भारताला किनई सग्ग्ग्ग्गळ्यात जास्त धोका कुठला आहे? तर तो म्हणजे भगव्या दहशतवादाचा. तो भगवा दहशतवाद म्हणजे सिमी, तोयबा लोकांचा नाही काही. तो तर हिरवा दहशतवाद. मग भगवा कुठला बरे? त्यात रा स्व संघ येते बरं का. त्यांचा झेंडा किनई भगवा असतो आणि ते जे काही करतात त्यालाच दहशतवाद म्हणतात.
२६/११ चा हल्ला, संसदेवरील हल्ला, शेकडो बॉम्बस्फोट हे काही दहशतवाद नव्हे. तो नुस्ताच खट्याळपणा.
7 Oct 2010 - 12:41 pm | विजुभाऊ
सिमी चा अतिरेक्यांशी संबंध असल्याचा संशय आहे तसा संघाचा अतिरेक्यांशी संबंध असल्याचा संशय कुठे आहे? संघाच्या काही अतिरेकी कारवाया देखील नाही आहेत.
संघाचा संबन्ध कशाशीच नसतो. तो भाजपशी नसतो , बजरंगदलाशी नसतो , विहिंप शी नसतो , अभाविप शी नसतो.
एक फरक आहे. संघ परीवारातील काही संघटना राज्यकर्ते आहेत.
7 Oct 2010 - 1:32 am | राजेश घासकडवी
हे वर्गीकरण योग्य वाटतं. आमचं जे पूर्वापारपासून चालू आहे ते खरं मानणारे सनातनवादी, विरुद्ध नवीन सत्य काय निपजतं आहे ते स्वीकारू म्हणणाऱ्या सुधारकांचा वाद कायमच चालू आहे.
मिभोंना सूचना - तुम्ही एक वर्गीकरण करून कोण कुठच्या बाजूला येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मोठी डिटेलवार यादी का नाही करत? म्हणजे अनेक विभूती (उदाहरणार्थ शिवाजी वगैरे) कुठच्या टीममध्ये आहेत ते कळेल व लोकांना आपली टीम निवडणं सोपं पडेल.
अवांतर: आजकाल मिभो धाग्यांच्या लांबींकडे बारीक लक्ष ठेवून असतात असं दिसतंय :) 'आमचे येथे लांबी वाढवून मिळेल' हे वाक्य सहीत कसं वाटतं? (मिभोंनी भलतेच अर्थ काढू नयेत. काढल्यास हलक्यानेच घ्यावेत. आम्हाला विरजणाची भीती वाटते)
7 Oct 2010 - 2:05 am | मिसळभोक्ता
गुर्जी, एकंदरीत तुम्हाला त्रिशतकी लेख हवाय असे दिसते ;-)
असो, आपल्या सूचनेला नम्रपणे नकार देतो सध्या.
7 Oct 2010 - 12:47 am | कापूसकोन्ड्या
नेहरू -गांधी घराण्याचे उपकार विसरण्याचा कृतघ्नपणा
भारतासारख्या देशात सर्वसामान्य माणसावर नेहरू आणि गांधी घराण्याचा असलेला पगडा अगदी योग्य आहे.
परमेश्वरावर विश्वास ठेवणारे प्रत्यक्ष दिसत असलेल्या परमेश्वर स्वरूप माणसावर विश्वास का ठेवत नाहीत हे तो एक परमेश्वरच जाणे.
इतिहासाची पाने डोळसपणे वाचली तर या घराण्याने भारतावर केलेल्या उपकाराची यादीच डोळ्यापुढे येते. फक्त वाचण्याची इच्छा पाहीजे.
मोतीलाल नेहरू पासून आताच्या राहूल पर्यंत हे घराणेच देशासाठी आपले सर्वस्व बहाल करणारे आहेत. काही नतद्र्ष्ट लोक त्यांच्यावर टीका करतात. सुशिक्षित लोकामध्ये या घराण्याला नावे ठेवण्याची फॅशन तशी जुनीच आहे
यथा यथा ही धर्मस्य ... हा श्लोक आठवावा. तो सध्या प्रत्यक्षात येत आहे. .
राजपुत्राच्या पगल्भतेचे एकच उदाहरण बोलके आहे.
मध्यंतरी त्यांची मुंबैची भेट आठवा. सन्माननीय गृहराज्यमंत्र्यांनी त्यांच्या पादुका जीवापलीकडे जपल्या. तो एक प्रतिकात्मक स्वरूपाचा एकनिष्ठ असलेले दाखविण्याचा प्रकार होता, पण तथाकथित सुशिक्षितांनी त्याच्यावर टीका केली. खरं म्हणजे त्याना (राहूलना) पण तो प्रकार आवडला नव्हता. पण लोकांमधून निवडून आलेल्या एका नेत्याच्या मताला मान देउन त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. अवघ्या वयाच्या चाळीशी मध्ये किती मनाचा मोठेपणा? पण आमच्या विचारवंताना फक्त काळी बाजूच पहायची संवय त्याचे काय करणार?
असा हा प्रगल्भ आणि धोरणी राजकारणी, गरीबांच्या घरी जाणारा, त्यांना मुक्त हस्ताने सरकारी पैसे देणारा, सामान्यांप्रमाणे मुंबई च्या लोकल मधून जीवाची बाजी लावून फिरणारा,रा.स्व.सं. ची विचारसरणी मान्य नसूनही त्यावर उदार पणे बंदी न घालणारा असा थोर नेता काही थोड्याच दिवसात आपला पंतप्रधान होणार या परते भाग्य ते कोणते.
त्या च्याहाती देशाचे सुकाणू देउन आपण सुखाने चार दिवस राहू शकू. त्यांचे पोटभर राज्य करून झाले की, तो पर्यंत त्यानाही पुत्र किंवा पुत्री होईलच ना? मग निर्धास्त रहा.
त्याना राजपुत्र म्हणून हिणवण्यार्या तथाकथित विचारवंताच्या बडबडीकडे दुर्लक्ष करणे हाच यावर शहाणपणाचा उपाय आहे. त्या विचारवंताचा निषेध करणे सुद्धा त्यांना महत्व देण्यासारखे नाही का?
7 Oct 2010 - 1:04 am | विकास
आपण यथा यथाही म्हणत राहूलजींचा धर्म यथातथाच आहे असे तर चुकूनसुद्धा अधोरेखीत करायचा हा प्रयत्न नाही ना? ;)
7 Oct 2010 - 3:39 pm | प्रशु
अहो लग्न कुठं झालय अजुन...
7 Oct 2010 - 4:24 am | अर्धवटराव
रा. स्व. संघाच्या बर्याच निती/कृती वादग्रस्त आहेत. त्यांचे तत्वज्ञान पटणारे, अजीबात न पटणारे, थोडेफार पटणारे, असे सर्व कॅटॅगरीचे लोक आढळतील. पण त्यांना सीमीच्या मापाने मोजणे म्हणजे खरच बालीशपणा/अपरीपक्वता/लांगुनचालन.. काहिही म्हणा..
दोघांमध्ये मूळ फरक हा कि एक (रा. स्व. सं) भारताला आपलं घर मानते आणि आपल्या घराची संस्कृती एका विशिष्ट पद्धतीची (अनेकांना पटो वा ना पटो) असावी या साठी प्रयत्न करते. सीमी भारताला शत्रुभूमी मानते (म्हणुनच केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी आणली) आणि परकीय संगनमताने या भूमीवर आक्रमण करण्याचे मनोरथ रचते.
इतर फरक म्हणाल तर संघाचे सामाजीक कार्य वादातीत आहेत. भारतीय मजरूर संघ (बी एम एस) संघटना मी फार जवळून बघितली आहे आणि तिचं महत्व आर्थीक/उद्योग क्षेत्रातले लोकं नक्कीच जाणत असतील. (दत्तोपंत ठेंगडी इ. व्यक्तींना तर पद्मश्री देण्याचा केंद्राचा विचार होता म्हणतात... खरे खोटे देव जाणे) संघाचे उत्तर्-पुर्व राज्यातील व इतर आदिवासी क्षेत्रातील कार्य तर इतकं मोठं आहे कि ते प्रदेश आज जे काहि थोडंफार भारताशी नातं ठेउन आहेत ते संघामुळेच ( अशी अतिशयोक्ती संघवाले फार करतात... पण त्यात तथ्य आहेच). आणि सर्वात मुख्य... संघ हि भा.ज.प. ची मातृसंस्था आहे. विरोध असला तरी एका तुल्यबळ (??) राष्ट्रीय पक्षाच्या मातृस्थानाची सीमी शी तुलना करणे म्हणाजे त्यांना आईचि शिवी देण्या सारखं आहे... अत्यंत चुकीचे आणि असंस्कृत.
राहुल गांधीं कडुन फार अपेक्षा आहेत. एकतर गांधी घराण्याशिवाय काँग्रेस ऑपरेट करु शकत नाहि, आणि कॉग्रेस शिवाय भारताच्या राजकीय संस्थेचा विचार देखील कोणि करु शकत नाहि. राहुलजी हि जवाबदारी ओळखत असतील. राहुलजींच्या रुपाने कॉग्रेस नेत्रुत्वाची नवी पिढी तयार होते आहे (ज्याचा भा.ज.पा. मध्ये प्रचंड अभाव आहे). त्यांच्याकरता स्वतंत्र भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय ट्रेनींग प्रोग्राम राबवीला जात आहे. राहुलजींचि मातोश्री डोळ्यात तेल घालुन आपल्या मुलाला या देशाची कमान सांभाळायला तयार करते आहे. राहुल गांधी एक दिवस (ते ही लवकरच) या देशाचे प्रधानमंत्री होतील यात शंका नाहि. इतक्या सगळ्या जबाबदारीच्या, जोखमीच्या आणि कर्तुत्वाचा कस बघणार्या पोझीशनचा दावेदार व्यक्ती तेव्हढाच खोल, सावध आणि दुरदृष्टीचा असावा अशी एक भारतीय म्हणुन इच्छा - अपेक्षा आहे. सध्या तरी राहुलबाबांना अजुन तयारीची गरज आहे असं वाटतं.
(भारतीय) अर्धवटराव
7 Oct 2010 - 12:56 pm | विजुभाऊ
अर्धवटरावांशी सहमत.
सर्वात मुख्य... संघ हि भा.ज.प. ची मातृसंस्था आहे संघ भाजपची जबाबदारी घेत नाही.
(रा. स्व. सं) भारताला आपलं घर मानते आणि आपल्या घराची संस्कृती एका विशिष्ट पद्धतीची (अनेकांना पटो वा ना पटो) असावी या साठी प्रयत्न करते. १००% सहमत.
भाजप मध्ये प्रमोद महाजनांच्या नन्तर प्रचंड पोकळी आहे. ते वाजपेयींप्रमाणेच सरमान्य होते. मोदींक्डे तो करीष्मा अजून तरी दिसला नाही.
सिमी बरोबर संघाची तूलना आणखी एका गोष्टीमुळे होऊ शकणार नाही कारण सिमी कडे असलेला कडवा, अशिक्षीत वर्ग.
हिंदू पैकी असा वर्ग कधीच संघाच्या सोबत नव्हता.
पोट भरण्याची चिन्ता असणारा हिंदू आधी पोटोबा मग विठोबा या स्पष्ट भूमिकेत वावरत आलेला आहे.
नोकरी धन्दा सोडून समाज कार्य करायला जाणारे किती टक्के हिन्दू तरून दिसतात. या उलट अनेक मुस्लीम तरूण त्यांचे उद्योग धन्दे बंद करून ४० दिवस "जमात" मधे शामील होताना दिसतात. मदरशांत रहाणार्या या तरुणाना ते कितीही शिक्षीत असले तरी ही घरात रहाणार्या उद्योग धन्धा सम्भाळणार्या हिंदू तरुणांच्या तुलनेत भडकवणे सोपे असते.
हा असा वर्ग रास्वसंघाच्या कडे फारच मर्यादीत स्वरुपात आहे.
सिमी जितक्या प्रमाणात तरूणाना आकर्षीत करून घेते तितक्या प्रमाणात संघ तरुणाना आकर्षीत करून घेण्यास यशस्वी होत नाही
7 Oct 2010 - 11:34 pm | चित्रा
पोट भरण्याची चिन्ता असणारा हिंदू आधी पोटोबा मग विठोबा या स्पष्ट भूमिकेत वावरत आलेला आहे.
म्हणजे हिंदू असल्याने ते असे वागतात असे म्हणायचे का?!
याचे उलट म्हणजे मुसलमान आधी पोटोबा मग अल्लाह असे करत नाहीत असे म्हणायचे का? हे असे फरक धर्मामुळे पडतात का? असो.
त्यापेक्षा संघाने अशा हिंदूंना मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, असे म्हणणे लॉजिकल होईल असे वाटते.
हा असा वर्ग रास्वसंघाच्या कडे फारच मर्यादीत स्वरुपात आहे.
सिमी जितक्या प्रमाणात तरूणाना आकर्षीत करून घेते तितक्या प्रमाणात संघ तरुणाना आकर्षीत करून घेण्यास यशस्वी होत नाही
हे बाकी खरे.
मागे एकदा सेवादलाबद्दल तिथे तरुणांची लग्ने जुळत असे ऐकले होते. 'सिमी' काय करते माहिती नाही. पण संघाने तरुणींनाही नेहमीच्या शाखांमध्ये प्रवेश दिला तर बहुतेक तरुणांची भरती होईल असे वाटते. ;)
आता मिळतो आहे मार - दोन्हीकडून, तेव्हा पळते.
7 Oct 2010 - 11:58 pm | चतुरंग
लग्ने जुळत असतील तर त्याला 'मेवादल' असे का म्हणू नये? असा एक विचार चाटून गेला! ;) (ह.घ्या.)
(मेवाप्रेमी)रंगा
8 Oct 2010 - 12:02 am | मिसळभोक्ता
त्यामुळेच ते संघिष्ठांचे "हेवादल" आहे, असा एक विचार चाटून गेला.
(ह घेऊ नका. एक एक्स-संघिष्ठ, ओटीसी केलेल्या माणसाचे (?) स्वानुभव आहेत हे.)
(ओटीसीत दर सकाळी रुमाल कडक झालेले असतात.)
8 Oct 2010 - 12:17 am | चित्रा
सध्या सेवादलाचा हेवा करणारे लोक आहेत असे म्हणायचे आहे?
8 Oct 2010 - 12:25 am | मिसळभोक्ता
सध्या सेवादल सरकारात आहे. त्यामुळे हेवा हा चालूच आहे.
(भाजपचे सरकार आले, तेव्हा बरेच स्वयंसेवक मलिद्याच्या आशेने तिकडे गेले. उरलेल्या संघिष्ठांनी हेवाच केला. संघाचे सर्वाधिक नुकसान भाजप सत्तेत आल्याने झाले, असे संघिष्ठांकडूनच ऐकले आहे.)
8 Oct 2010 - 12:40 am | चित्रा
हेवा.
हे वाचा. कोण कोणाला उत्तर देते आहे?
http://indiatoday.intoday.in/site/Story/104320/India/cadrebased-seva-dal...
8 Oct 2010 - 1:32 am | मिसळभोक्ता
वत्सले मातृभूमे, पोटात घे ह्या अज्ञ बालकाला.
काटकुळे पाय दाखवणार्या खाकी चड्ड्यांचा हेवा करणारी एक संघटना पुनरोदित होते आहे, ह्याची मला काहीच कल्पना नव्हती.
8 Oct 2010 - 3:00 am | चित्रा
वत्सले मातृभूमे, पोटात घे ह्या अज्ञ बालकाला.
नको, पृथ्वीच्या पोटात विरजण कोणाला हवे असणार?
8 Oct 2010 - 10:17 am | श्रावण मोडक
हाण्ण तिच्या... मला वाटलं सेवा दल म्हणजे समाजवादी सेवादलाची चर्चा चालू आहे. इथं दुवा तर कॉंग्रेस सेवादलाविषयी बोलतोय काही तरी. आता या कॉग्रेस सेवा दलाचा तिरकस उल्लेख सेवा या शब्दावरून कॉंग्रेस वर्तुळातील खाशा स्वाऱ्यांमध्ये कसा होतो हेही सांगावं लागणार की काय? छ्या... ;)
8 Oct 2010 - 4:56 pm | चित्रा
तशीच सुरू होती, तिला फाटे फुटले! मूळ सेवादलाला जसे फाटे फुटले तसेच हे.
माझी अशी समजूत आहे की कॉंग्रेसमधून समाजवादी जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी राष्ट्र सेवादल सुरु केले.
राष्ट्रसेवादल हे काँग्रेस सेवादल जसे काँग्रेसचा भाग आहे तसा समाजवादी पार्टीचा भाग नाहीत, पण त्यांचे कार्यकर्ते हे समाजवादींच्या निवडणुकीत मदत करतात असे ऐकले आहे.
8 Oct 2010 - 12:24 am | श्रावण मोडक
आमचे एक मित्र 'स्वयंसेवक' या शब्दाचा तिरकस वापर करायचे त्याची आठवण झाली. ;)
या मित्राचा या दोन्ही संघटनांशी काहीही संबंध नव्हता - असेलच तर तो फक्त अशा संघटनांतील तथाकथित आग्रहांच्या फोलपणाचे टीकाकार म्हणूनच होता.
8 Oct 2010 - 12:36 am | चित्रा
गांधी टोपीचाही तिरकस उल्लेख होतो.
अवांतर - गांधी टोपी हे नाव कसे पडले? कोणी दिले असेल?
8 Oct 2010 - 10:15 am | श्रावण मोडक
छ्या... टोपीपर्यंत जाण्याची गरज नाही. गांधी या शब्दाचाच तिरकस वापर होतोच की. :)
8 Oct 2010 - 4:57 pm | चित्रा
तेही खरेच.
9 Oct 2010 - 3:07 am | विकास
गांधी या शब्दाचाच तिरकस वापर होतोच की.
इंदिरा गांधी .... ते.... राहूल गांधी? ह्यातील वापर का? ;)
9 Oct 2010 - 5:34 am | गांधीवादी
राहूल का राउल ?
9 Oct 2010 - 11:54 am | श्रावण मोडक
तोही घेता येईलच की. आमची त्याला काहीही हरकत नाही.
7 Oct 2010 - 11:59 pm | मिसळभोक्ता
पण संघाने तरुणींनाही नेहमीच्या शाखांमध्ये प्रवेश दिला तर बहुतेक तरुणांची भरती होईल असे वाटते.
ही ऐड्या आम्ही "संघाची आणि समितीची जाईंट ओटीसी भरवावी" ह्या शब्दांत दिली होती, त्यावेळी हिंदुत्त्वाला कसा धोका निर्माण होईल, हे बौद्धिक घेण्यात आले होते.
एक वेळ मार परवडला, चित्राताई. पण संघाचे बौद्धिक नको.
इतिहासाचे ट्विस्टीकरण (काय शब्द आहे, वा !) करण्याची अधिकृत ठिकाणे, ह्यात संघाचे बौद्धिक येते.
8 Oct 2010 - 12:19 am | चित्रा
मग लिहा की.
भूतकाळाचे ट्विस्टींग जाऊ दे.
वर्तमानाचे ट्विस्टींग अजूनही चाललेच आहे तिकडे दुर्लक्ष झालेले दिसते आहे.
8 Oct 2010 - 12:24 am | विकास
इतिहासाचे ट्विस्टीकरण (काय शब्द आहे, वा !) करण्याची अधिकृत ठिकाणे, ह्यात संघाचे बौद्धिक येते.
अरेच्चा संघ डाव्या विचारांचा आहे, ही बातमी माझ्यासाठी नवीनच आहे! बरे झाले सांगितलेत ते! :-)
8 Oct 2010 - 12:28 am | मिसळभोक्ता
अधिकृत ठिकाणे, ठिकाण नव्हे.
आणि हो, ह्या ठिकाणांत जे एन यू देखील येते.
ट्विस्ट करून डावीकडे नेला काय, किंवा उजवीकडे, शेवटी ट्विस्ट केला हे महत्त्वाचे.
शेवटी काय, हिंद देश के निवासी, सभी जन एक है.
8 Oct 2010 - 11:38 am | बिपिन कार्यकर्ते
8 Oct 2010 - 12:52 am | चिंतामणी
खरी आहे ही गोष्ट.
आज युक्रांदचे (काहीजण फुक्रांद म्हणायचे. ) त्याकाळ्चे धडाडीचे नेते कुठे आहेत?
(एखादा नेता कोणाच्यातरी वळचणीला बसल्याने एखाद्या सत्कार समारंभात दिसतो अधेमधे कधीतरी.)
[जाताजाता-फुक्रांद ही संज्ञा प्रथम यासंघटनेच्या तत्कालीन नेत्याच्या बायकोनेच दिली होती.]
7 Oct 2010 - 5:09 am | गुंडोपंत
फालतू वाक्यांना प्रसिद्धी का देता? मिपा सदस्यांनी या माणसा विषयी लिहावे इतकी व्हॅल्यू नाहीये याची!
7 Oct 2010 - 5:51 am | मिसळभोक्ता
मला वाटते, की भारताच्या भावी पंतप्रधानाच्या वक्तव्यांना महत्त्व दिले जावे.
7 Oct 2010 - 6:06 am | गुंडोपंत
उद्या भावी संपादक म्हणतील, मिसळभोक्ता आणि गुंडोपंत सारखेच!
7 Oct 2010 - 6:23 am | मिसळभोक्ता
असे असल्यास त्यांना महत्त्व द्यावेच लागेल. त्यांना तसे का वाटते, ह्याचा सखोल विचार करायला हवा. नुसते फालतू म्हणून चालणार नाही.
7 Oct 2010 - 12:59 pm | विजुभाऊ
उद्या भावी संपादक म्हणतील, मिसळभोक्ता आणि गुंडोपंत सारखेच!
ते तसे म्हणणे अवघड आहे. मिभो अभ्यासू आहेत. मिभोना लिहिण्याची जाण आहे ;)
7 Oct 2010 - 6:46 am | विकास
सध्या भारताला केवळ "भावी" पंतप्रधानच आहेत. बाकी देश "अभावी" पंतप्रधानावर चालतोय असे वाटते. (असे म्हणताना मनमोहनसिंग यांच्या कार्यक्षमतेबद्दल तिळमात्र शंका नाही. फक्त जे पंतप्रधान म्हणतात की पक्षश्रेष्ठी/सोनीयाजी म्हणतील तेंव्हा पद मोकळे सोडेन तेंव्हा ते नक्की किती पंतप्रधान आहेत यावर शंका निश्चित येते).
7 Oct 2010 - 12:17 pm | मी ऋचा
एक नंबर!!
7 Oct 2010 - 6:59 am | आंसमा शख्स
माननीय श्री. राहुलजी गांधी जीसाहेब बरोबर बोलले आहेत.
एक वेळ सिमी चालेल पण आरएसएस नको असला पाहिजे. लक्षात घ्या सिमी मूलता: जवान लोकांना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेली संघटना होती. पण पुढे सगळे चुकत गेले. आणि आता आरएसएस व सिमी यात फार फरक नाही हे सत्यच आहे.
आरएसएसला इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास कितीही प्रयत्न केला तरी पुसता येणार नाही आणि सिमीला किती प्रयत्न केला तरी आजचा भारत बदलता येणार नाही हे सत्य आहे!
फक्त राहुलजीसाहेब च ही बात समजले आहेत.
ते जे बोलले ते बरोबर आहे.
7 Oct 2010 - 7:26 am | गुंडोपंत
एक वेळ सिमी चालेल? काय बोलताय काय? काय यडे झाले तूम्ही?
7 Oct 2010 - 7:29 am | आंसमा शख्स
एक वेळ चालेल असे म्हंटले मी. आधी वाचा काय लिहिले ते.
खुदा करम करे दिल का मैल धुलाये!
7 Oct 2010 - 7:33 am | गुंडोपंत
संघाचे काय कार्य आहे, ते तरी माहिती आहे का रे तुम्हाला?
उगाच कशाला काहीही बरळता?
मैल म्हणे! कोणता मैल रे? तुमचा देशद्रोही मैल काढा म्हणा आधी मग बोला.
7 Oct 2010 - 7:36 am | आंसमा शख्स
रास एस एस चे काम कोणाला माहिती नाही?
चुकिचा इतिहास लिहायचा. तो खरा म्हणून खपवायचा. एका मोठ्या शांततावादी समुदायाला शत्रु म्हणून दाखवण्याचे चांगले काम केले ना?
त्याच्या इतकी दुफळी माजवायचे काम कुणी केले आहे का भारतात?
7 Oct 2010 - 7:41 am | गुंडोपंत
माझ्या कडून हा विषय संपला!
7 Oct 2010 - 7:44 am | आंसमा शख्स
जैसी मर्जी.
खरे बोल आल्यावर त्रास होतो हेच खरे.
7 Oct 2010 - 2:22 pm | मृत्युन्जय
खरे बोल आल्यावर त्रास होतो हेच खरे.
तुम्ही लक्ष देउ नका हो आसमा तै. भारत हा दहशतवादी देश आहे असे पाकिस्तान नावाचा एक शांतताप्रिय देश म्हणतो तेव्हा त्यांना अश्याच मिरच्या झोंबतात. हे असले दुटप्पी लोक संघात भरपुर भरले आहेत आणि. लहान लहान मुलांना मैदानावर बोलावुन संस्कृती, धर्म, आचरण अश्या गोष्टी शिकवतात हे नालायके संघी लोक. आणी केवढे हिंसक तरी लाठ्यांचा पुरस्कार करतात. सगळे साले एकजात दहशतवादी. आणी तोंड वर करुन सिमीला नावे ठेवतात.
आणि संघापेक्षा सिमी खरोखर चांगले. लोक याहुन वेगळा विचार करत असतील तर मुर्ख आहेत देशद्रोही आहेत. संघी साले देशाच्या जीवावर उठले, सार्वभौमत्वावर हल्ल करु पाहत आहेत. सिमीवाले गरीब बिचारे कोलेजिअन्स आहेत. देशासाठी काहितरी करु पाहणारे सळसळणारे रक्त आहि. निरपराध, सोज्ज्वळ, सज्जन, निरागस लोक आहेत ते.
संपादक मंडळ उगाच अश्या साध्या सरळ संघटनेवर टीकेची राळ उडवणार्या लोकांवर कारवाई करेल अशी आशा आहे
7 Oct 2010 - 3:15 pm | हंस
+१
7 Oct 2010 - 11:57 am | भारतीय
मुस्लीम हा शांततावादी समुदाय असू शकतो, पण सिमी नाही.. बाकी मनुष्यावर जसे संस्कार होतात तशीच त्याची मते बनतात हे तुमचे प्रतिसाद पाहिल्यास लक्षात येते.. दोष तुमचा नाही.. बाकी चालू द्या..
7 Oct 2010 - 1:15 pm | llपुण्याचे पेशवेll
एका मोठ्या शांततावादी समुदायाला
कोणता समुदाय बरे हा?
7 Oct 2010 - 2:25 pm | अनामिका
एका मोठ्या शांततावादी समुदायाला शत्रु म्हणून दाखवण्याचे चांगले काम केले ना?
या सारखा मोठा विनोद दुसरा असुच शकत नाहि......मिपा धन्य झाली म्हणा!
8 Oct 2010 - 12:56 am | चिंतामणी
नाही मन निर्मळ काय करील साबण.
(हे असे सांगायला आमच्या देवाला यायची गरज नाही. )
:x
7 Oct 2010 - 12:37 pm | चिंतामणराव
आरएसएस ने गेल्या ६० वर्षांत भारतासाठी काय केलं किंवा नाही हा मुद्दा बाजुला ठेवुन तुम्ही सांगा ना कि सिमी ने काय दिवे लावलेत.
7 Oct 2010 - 1:46 pm | सविता
>इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास
ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..
7 Oct 2010 - 3:45 pm | प्रशु
इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास
मिपा वर सर्वोत्क्रूष्ट विनाओदाचे पारितोषीक असेल तर देऊन टाका ह्यांना...
7 Oct 2010 - 4:33 pm | योगी९००
आरएसएसला इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास कितीही प्रयत्न केला तरी पुसता येणार नाही आणि सिमीला किती प्रयत्न केला तरी आजचा भारत बदलता येणार नाही हे सत्य आहे!
खुप हसलो..इस्लामी भारत वाचून डोळे पाणावले (हसण्याचा अतिरेक)..
7 Oct 2010 - 9:34 pm | अर्धवटराव
तुमच्या सारख्या मुस्लीमांचे आणि मिपावरच्या बराचश्या हिंदुंचे अविवेकी विचार ऐकुन/वाचुन खेद वाटतो. हा धार्मीक संघर्ष खरच अटळ आहे का? सध्या तरी परिस्थिती फार आशादायक नाहिये... काँग्रेसने मुस्लीमांना अनेक दशके केवळ वापरुन घेतले... पण अजुन देखील त्यांचा कावा ओळखायला मुस्लीम लोक तयार नाहित.
खैर... बघु...
(आशावादी) अर्धवटराव
7 Oct 2010 - 12:09 pm | कापूसकोन्ड्या
अहो यदा यदा ही गीतेतील श्लोक झाला. मी कुठे
म्हणले आहे की हा गीतेतील श्लोक आहे म्हणून?
आणि शेवटी आम्ही एका सुजाण राजकारण्या बद्दल बोलत असताना शुध्द लेखन कडे कसले लक्ष देता?
7 Oct 2010 - 12:33 pm | हंस
आंसमा शख्स, आहो बाई की बापू, आपले अकलेचे तारे तोडू नका. तुम्ही कधी आरएसएस च्या शाखेवर गेला आहात का. जा आणि तासाभराच्या शाखेतच आपल्याला कळून येईल की सिमि आणि आरएसएस मधे काय फरक आहे तो.
8 Oct 2010 - 5:16 am | आंसमा शख्स
माझ्या लेखनाने गैरसमज झाला आहे.
सिमि ही संघटना वाईट आहेच. मला त्या देशद्रोही लोकांची भलामण करायची नाहीच!
जे कुणी माझ्या भारताच्या विरुद्ध ते माझेही दुष्मन आहेत. त्यात टेररिस्ट तर सर्वात वाईट जमात आहे. या जमातीने कोणत्याही कौमचा आव आण्ला तरी ते शेवट वाईटच - कारण ते सामन्य माणसाच्या जीवावर उठले आहेत. मग हा अतिरेकीवाद छुपा किंवा उघड कसाही असला तरी अर्थ तोच असतो. छुपा दहशतवाद कधी तरी गुजरात मध्ये उघड होतो. आणि उघड टेररिस्म सी एसटीवर. कसाबला कसला धर्म आहे? तो फक्त कसाई आहे. त्याने सीएसटीवर जे केले त्याचे समर्थन होऊ शकत नाही. त्यात सर्व धर्मांचे लोक मरण पावले आहेत.
मुस्लीम भारत हा गौरवशाली होताच. नाकारता का?
या प्रदेशावर कुणी हमला करायची हिम्मतही करू शकत नव्ह्ता.
इतका मोठा प्रदेश एका अंमलाखाली होता, त्याला एक प्रकारची शासन व्यवस्था होती. यामुळे सामान्य लोकांनाच हे हवे होते. जर ही व्यवस्था चालत नसती तर भारत इतका काळ कशाला यात राहता? सगळ्या भारतातून मुघल सल्तनतीला बळ मिळत होते म्हणून तर हे शासन टिकले.
जेंव्हा शासक मुजोर झाले रयतेच्या विरुद्ध गेले तेव्हा राज्य संपले.
8 Oct 2010 - 7:17 am | मिसळभोक्ता
आंसमा तै/दादा/काका/मौशी (काय जे काही असेल ते)
मुस्लीम भारत हा गौरवशाली होताच. नाकारता का?
या प्रदेशावर कुणी हमला करायची हिम्मतही करू शकत नव्ह्ता.
इतका मोठा प्रदेश एका अंमलाखाली होता, त्याला एक प्रकारची शासन व्यवस्था होती. यामुळे सामान्य लोकांनाच हे हवे होते. जर ही व्यवस्था चालत नसती तर भारत इतका काळ कशाला यात राहता? सगळ्या भारतातून मुघल सल्तनतीला बळ मिळत होते म्हणून तर हे शासन टिकले.
आपला वरील परिच्छेद अंमळ चुकीचा आहे. (बरेचसे / काहीसे बरोबर आले तरी.)
भारत (किंवा कोणताही देश) नेहमीच गौरवशाली होता/आहे. गौरव करणारे नेहमीच असतात.
दुसरे वाक्य चुकीचेच. मुसलमानी अंमलात भारतावर अनेक हमले झाले, आतून आणि बाहेरून. म्हणजेच, हिम्मत अनेकांनी केली, शक्य झाले नाही, हे निराळे.
पूर्ण प्रदेश एका अंमलाखाली नव्हता. एका महाराष्ट्रातच ३-४ वेगवेगळे अंमल होते.
मुघल सुल्तानीचे बळ मिळाले, पण वेगळ्या कारणासाठी. सरकार हे लोकांपेक्षा वेगळे राहू शकते, हे लोकांना कळले.
8 Oct 2010 - 1:32 pm | अनामिका
एकटे मुघल शासक समृद्ध हिंदुस्थानवर शासन होते तर मग कुतुबशहा,आदिलशहा,निजामशहा हे मोगलांची धुणी धुत होते का आंसमाजी?
7 Oct 2010 - 1:38 pm | अविनाशकुलकर्णी
आम्हि तर नरेन भाई मोदी पंत प्रधान व्हावे म्हणुन देव पाण्यात घालुन बसलो आहोत.
7 Oct 2010 - 1:47 pm | सविता
नॉय बा.... सुरेश जी कलमाडी च पाहिजेत आम्हाला पंतप्रधान म्हणून....
7 Oct 2010 - 2:30 pm | मृत्युन्जय
आम्हाला तर अबु आझमीच हवा (आयेशा टकियाचा सासरा). गेला बाजार सैय्यद गिलानी तरी हवा
7 Oct 2010 - 6:18 pm | तिमा
संघ आणि अतिरेकी ? आम्ही तर लहानपणापासून एकच घोषवाक्य ऐकून आहोत,
'संघ दक्ष भलतीकडे लक्ष!
7 Oct 2010 - 9:52 pm | सुनील
'संघ दक्ष भलतीकडे लक्ष!
फारच मोघम बॉ तुम्ही!
आम्ही, 'संघ दक्ष पोरींकडे लक्ष!, असे वाक्य ऐकले होते!
बाकी चालू द्या!
(पुन्हा झाडावर) सुनील
9 Oct 2010 - 7:23 am | प्रदीप
७०-८० च्या दशकात केव्हातरी एकदा, स्वातंत्र्याच्या २५/३०/३५ वर्षांच्या निमीत्ताने पु. लंनी एक लेख लिहीला होता, त्यात स्वातंत्रपूर्व काळ, गांधीजींची 'चले जाव' चळचळ, त्यावेळचे भारून गेलेले वातावरण ह्यांविषयी त्यांच्या स्वतःच्या आठवणी त्यांनी लिहील्या होत्या. त्यातील एक मला लख्खपणे आठवते, ती इथे लिहीत आहे (आठवणींतून, लेख आता माझ्या समोर नाही).
४२ साली मुंबईत हिंदू-मुस्लिमांचे दंगे होत होते, ते खरे तर दक्षिण मुंबईत, उपनगरात नव्हे. पण संघाची दक्ष ब्रिगेड सगळीकडे कामाला लागली. पु. ल. रहायचे पूर्व पार्ल्यात. एका रात्री काँग्रेसने पार्ले- पश्चिम येथे आयोजित केलेल्या सभेस हजर राहून ते आपल्या मित्रांसकट घरी परतत होते. पूर्वेस मुख्य रस्ता सोडून ते आपल्या गल्लीत वळले, तेव्हा पहिल्याच छोट्या बंगल्याच्या गच्चीवरून, अंधारातून लाठ्या आपटण्याचा आवाज आला, नंतर कुणीतरी अंधारातच विचारले "कोण आहे? शत्रू की मित्र?" हे कोण असावे हे पु.लंनी तात्काळ ओळखले, आणी इथे थोडी गंमत करायची त्यांना हुक्की आली. "शत्रू" ते उत्तरले. मग... काळोखात दोन-तीन क्षण शांतता, आणि त्यानंतर गच्चीवरून उत्तर आले " जा SSSSSSSSS" !
7 Oct 2010 - 6:45 pm | गांधीवादी
वाचत आहे, हळूहळू चर्चा गंभीर होत आहे.
7 Oct 2010 - 6:56 pm | नाना बेरके
भा.पं. राहुल आणि स्वं. इंदिराजी ह्यांच्यातच असं साम्य आहे कि ह्या दोघांनाही प्रत्येक गोष्टीत संघाचा हात आहे असंच दिसतं. संजय झाला तेव्हाही असंच काहीतरी वक्तव्य केलं होतं म्हणे बाईंनी.
7 Oct 2010 - 8:30 pm | मृत्युन्जय
संजय झाला
आता संजयच्या होण्यातही संघाचा हात होता की काय? आणि हात ही तर काँग्रेसची निशाणी. संघाच्या हाताने कशी काय अशी कामे व्हायला लागले ब्वॉ?
7 Oct 2010 - 9:23 pm | नितिन थत्ते
चर्चा संघाला साजेशा पातळीवर जाऊ लागली आहे.
7 Oct 2010 - 9:42 pm | अर्धवटराव
आपण जेष्ठ आणि अभ्यासु व्यक्ती आहात. पण या देशात आपल्या सारखे विचार करु शकणारे लोक देखील केवळ भारतीय म्हणुन पक्ष-निरपेक्ष दृष्टीकोन बाळगण्यापेक्षा रंगीत चश्मे लावुन हवे तेच आणि त्याच रंगात बघायला जाता... मग बाकी अडाण्यांनी तसं केलं तर काय चुकलं...
(अडाणी) अर्धवटराव
7 Oct 2010 - 9:44 pm | विकास
मग बाकी अडाण्यांनी तसं केलं तर काय चुकलं...
या प्रतिसादातून राहूल गांधींना अडाणी म्हणले गेले आहे. त्याचा मी निषेध करू इच्छितो. ;)
7 Oct 2010 - 9:46 pm | नितिन थत्ते
संघाच्या वर्तुळात अशा पातळीवरची चर्चा दुसर्या स्वातंत्र्याच्या आधीच्या आणीबाणीच्या आधीपासून ऐकली आहे. :(
उलट ७० प्रतिसादापर्यंत चर्चा बरीच सोबर राहिल्याने बरे वाटले होते. :)
तोपर्यंत मी काही म्हटलेही नव्हते.
7 Oct 2010 - 9:43 pm | विकास
चर्चा संघाला साजेशा पातळीवर जाऊ लागली आहे.
संघाने नक्की अशी पातळी कधी दाखवली ते माहीत नाही, पण बातमी आणि त्यातील राहूल गांधींचे वक्तव्य मात्र काँग्रेसच्या पातळीचे पहील्यापासूनच आहे, असे दिसतयं. :-)
7 Oct 2010 - 9:44 pm | प्रदीप
:(
7 Oct 2010 - 9:59 pm | हुप्प्या
संजय गांधींच्या जन्मामागे संघाचा हात असण्याचा विनोद हा काही लोकांना आवडेल तर काहींना तो अभिरुचीहीन वाटेल. इंदिरा गांधी काही काळ प्रत्येक गोष्टीकरता संघाला दोष देत होती त्यावर हा अतिरंजीत विनोद/भाष्य आहे. परंतु ह्या विनोदावरुन थेट संघावर घसरणे कितपत योग्य आहे? संघाच्या मूलभूत विचारात विरोधकांच्या संततीच्या जन्माविषयी शंका उत्पन्न करा असा काही आदेश आहे का? माझ्या माहितीत तरी तसे काही नाही.
जेम्स लेनने शिवाजीच्या जन्मावरुन एक अभिरुचीहीन विनोद केला होता. त्यावरुन ब्रिगेड वगैरे गावगुंड संघटनांनी तमाम ब्राह्मण जातीला वेठीस धरले होते. त्यात आणि वरील विधानामागे तीच वृत्ती दिसून येते. कुण्या एकाच्या वा काही मूठभर लोकांच्या विनोदामुळे सगळ्या संघटनेला जबाबदार ठरवणे.
7 Oct 2010 - 10:20 pm | नितिन थत्ते
जेव्हा संघात मूठभरच लोक होते तेव्हा मूठभर लोक असे विनोद करीत असतील तर काय समजायचे?
[एका किंवा काहींच्या कृत्याबद्दल संपूर्ण गटाला जवाबदार धरायचे नाही हे संघीय कधीपासून मानू लागले?]
असो. बाकी तुम्चे जे चालू आहे ते चालू द्या.
मी फक्त पातळीकडे निर्देश केला.
7 Oct 2010 - 10:25 pm | मिसळभोक्ता
जेव्हा संघात मूठभरच लोक होते तेव्हा मूठभर लोक असे विनोद करीत असतील तर काय समजायचे?
संघ आणि मुठीचे फार पूर्वीपासून नाते आहे, असेच समजायचे.
असो, जिला एका संघिष्ठानेच दुर्गा असे संबोधले, तिच्यावर असे हीन पातळीवरून विनोद करणे, हा हिंदु धर्माचा अपमान आहे, असे कुणाला वाटले नाही का ? की फक्त देवी/स्त्री आहे म्हणून फेअर टार्गेट ?
8 Oct 2010 - 1:37 am | हुप्प्या
केवळ कुण्या एका संघिष्टाने त्या स्त्रीला दुर्गा म्हटले म्हणून तमाम संघ स्वयंसेवकांनीही तिला दुर्गेइतकेच देवतुल्य मानावे हे तर्कट कसे बनवले?
त्याच पद्धतीने विचार केला तर, इंदिरा गांधीने १९७७ च्या सुमारास आंध्रमधे मोठे चक्रीवादळ आले होते तेव्हा संघाने केलेल्या कामाची स्तुती केली होती याचा अर्थ तमाम काँग्रेसवाले (ज्यात आजचे युवराज राहुलजीही येतात) संघाची स्तुती करतात असा होतो का?
8 Oct 2010 - 4:33 am | मिसळभोक्ता
हा "केवळ कुणी" संघिष्ठ नंतर पंतप्रधान बनला.
आणि, हो. संघवाले सारखे मोरवी-मोरवी जपत असतात, ह्याचे कारण तुम्हाला कळले तर शेवटी.
8 Oct 2010 - 5:07 am | हुप्प्या
हा माणूस पंतप्रधान झाला म्हणून काय आटोम्याटिकली याचे सगळे विचार हे संघिष्टांचे विचार झाले?
हे काय त्रांगडे आहे? म्हणजे संसदेवर हल्ला झाल्यावर षंढासारखी भाषणे देणे, विमान अपहरण केल्यावर त्याबदल्यात अतिरेकी सोडून देणे आणि त्याविरुद्ध काहीही कारवाई न करणे, हाजच्या यात्रेची सबसिडी घसघशीत रकमेने वाढवणे हे सगळे संघाचे विचार प्रदर्शित करतात का?
वाजपेयी हा पंतप्रधान बनला हे भाजपचे आणि देशाचे दुर्दैव. तो संघाची पताका खांद्यावर मिरवतो असा लोकांचा समज असेल तर ते संघाचे मोठेच दुर्दैव. मलातरी तसे वाटत नाही.
8 Oct 2010 - 7:19 am | मिसळभोक्ता
वाजपेयी हा पंतप्रधान बनला हे भाजपचे आणि देशाचे दुर्दैव. तो संघाची पताका खांद्यावर मिरवतो असा लोकांचा समज असेल तर ते संघाचे मोठेच दुर्दैव. मलातरी तसे वाटत नाही.
रेशीमबागेत बाजपेयी पंतप्रधान झाल्यावर फटाके फुटले होते. तुम्ही कदाचित संघिष्ठांना दुरून पहात असाल. मी जवळून पाहतो.
8 Oct 2010 - 12:25 am | हुप्प्या
>>[एका किंवा काहींच्या कृत्याबद्दल संपूर्ण गटाला जवाबदार धरायचे नाही हे संघीय कधीपासून मानू लागले?]
<<
संघीय लोक पूर्वी तसे मानत नव्हते आणि आताच मानू लागले असे आपण का आणि कसे ठरवले?
8 Oct 2010 - 1:02 am | चिंतामणी
जेव्हा संघात मूठभरच लोक होते तेव्हा मूठभर लोक असे विनोद करीत असतील तर काय समजायचे?
जरा विस्ताराने लिहीलेत तर बरे होईल समजायला.
(संभ्रमीत) चिंतामणी
7 Oct 2010 - 10:34 pm | सुनील
केवळ संजयच नव्हे तर, इतरही काहींच्या जन्माबद्द्लच्या अभिरुचीहीन "कुजबुजा" मी पूर्वीपासून ऐकल्या आहेत. त्यामुळे, चर्चा ह्या वळणावर आली, याचे आश्चर्य वाटत नाही!
7 Oct 2010 - 7:01 pm | पैसा
8 Oct 2010 - 1:10 am | चिंतामणी
शतक झाले आहे. आता याची जरूरी आहे.
From Drop Box" alt="" />
ज्यांना पाहीजे असेल त्यांनी ऑर्डर नोंदवा.
8 Oct 2010 - 11:28 am | वेताळ
हे त्याचे स्वःताचे असतीलच असे नाही. कारण त्याना भाषण लिहुन देणारे इतर लोक असतात.पण जी तुलना त्याने केली आहे ती खुपशी चुकीची आहे.
आंसमाबाई/बाप्या हे मगदुम साहेबाचा दुसरा आयडी वाटतो. त्याना संघशाखेत पाठवण्यापेक्षा इतर क्षेत्रातल्या तज्ञांची खुप गरज आहे.
12 Oct 2010 - 10:58 am | गांधीवादी
मुस्लिम आणि उच्चवर्णीय असे राजकीय समीकरण जुळवून उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कॉंग्रेसला शक्ती मिळवून देण्याचे राहुल गांधी यांचे प्रयत्न सुरू आहेत.
भावी पंतप्रधान सध्या बिझी आहेत.
तर मुलांनो, कॉंग्रेसला शक्ती कुठून मिळते सांगा बरे ? ज्याला माहित आहे त्याने हात वर करा.
13 Oct 2010 - 8:18 am | गांधीवादी
बालिश विधान की रणनीती?
.......""संघ आणि सिमी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील, तर केंद्र सरकारने सिमीवर बंदी घालून नऊ वर्षे झाली, तशी संघावर बंदी का घातली जात नाही,''
.......आम्हाला पोट महत्त्वाचे...
संघ आणि सिमी यांची तुलना हा राजकीय नेत्यांसाठी नवा वादाचा विषय असेल. आम्हाला मात्र त्यात काहीच रस नाही. आज सामान्यांसाठी जगणे महत्त्वाचे आहे. आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. असे वाद उकरण्यापेक्षा गरिबांचा विचार केला तर बरे.
- सुरेश देवरे, सामान्य गांधीवादी