✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोणता मानू मी विठठल ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Mon, 08/09/2010 - 19:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45878 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

नवीन माहीती

विकास
Mon, 08/09/2010 - 19:47 नवीन
लेख आवडला. बरीच नवीन माहीती त्या निमित्ताने कळली.
  • Log in or register to post comments

+१

गणपा
Mon, 08/09/2010 - 19:53 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+२

प्रभो
Mon, 08/09/2010 - 23:00 नवीन
असेच म्हणतो. माढ्याला माझ्या आत्याची कुलदेवता/ तसेच पुर्वी मावशी राहत असल्याने बर्‍याचदा जाणे झाले, पण विठोबाला जायचा चान्स नाही आला.. पण घरात बघितलेल्या जुन्या फोटोंवरून आठवतंय की माझ्या आईची मंगळागौर झाली होती माढ्यात आणी सगळ्यांचे विठ्ठलाच्या गाभार्‍यात फोटो आहेत ते.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

असेच म्हणतो

बेसनलाडू
Tue, 08/10/2010 - 01:45 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

खूप माहितीपूर्ण

धनंजय
Mon, 08/09/2010 - 19:54 नवीन
खूप माहितीपूर्ण. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

पोच ...

छोटा डॉन
Mon, 08/09/2010 - 19:56 नवीन
ह्यावर सविस्तर नंतर जराश्या सवडीने खरडतो. ही केवळ पोच समजावी ...
  • Log in or register to post comments

लेख आवडला. रा. चिं.

स्वाती२
Mon, 08/09/2010 - 20:10 नवीन
लेख आवडला. रा. चिं. ढेर्‍यांचे पुस्तक तर आवर्जून वाचावे असे.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रियाली
Mon, 08/09/2010 - 20:23 नवीन
नवीन माहिती कळली. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

अत्यंत माहितीपुर्ण लेख! आवडला

इंटरनेटस्नेही
Mon, 08/09/2010 - 21:41 नवीन
अत्यंत माहितीपुर्ण लेख! आवडला हेवेसांनल.
  • Log in or register to post comments

मूर्तींची हलवाहलव

सुनील
Mon, 08/09/2010 - 22:06 नवीन
लेख आवडला. बरीच नवी माहिती मिळाली. औरंगजेबाच्या तावडीत मूर्ती सापडण्यापूर्वी ती हलवली गेली हे ठीकच. पण तसे अफझलखान येण्यापूर्वी तुळजापूरची मूर्ती का हलवली गेली नसावी? की तो येणार, मूर्ती फोडणार हे अनपेक्षित होते? मूर्तींची अशी हलवाहलव गोव्यातदेखिल झालेली आहे. आज फोंडा परिसरात दिसणारी सगळी देवळे ही गोव्याच्या अन्य भागांतून स्थलांतर करून आणलेली आहेत. फोंडा भाग तसा डोंगराळ तेव्हा देवळे तिथे सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा असावी.
  • Log in or register to post comments

फोंड्याचे वैशिष्ट्य

धनंजय
Mon, 08/09/2010 - 22:54 नवीन
फोंडा गावात पोर्तुगिजांनी सौंद्याच्या राजाला शरण दिली होती, आणि तिथे हिंदू धर्मस्थळांना (सौंदेकरांशी तह करून) अभय दिले होते. म्हणून फोंड्याला ही देवळे आली. फोंड्याला टेकड्या-दर्‍या आहेत खर्‍या, पण तशा केपें, सांगे वगैरे ठिकाणी सुद्धा आहेत. शिवाय फोंड्याजवळची देवळे दुर्गम नसून सहज पोचण्यासारखी आहेत. ही माहिती आमच्या शालेय इतिहासाच्या पुस्तकात होती, आणि अन्यत्रही वाचलेली आहे. सौंदेकरांचे अखेरचे वंशज अगदी हल्लीहल्लीच वारले (गेल्या काही दशकांत).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मुर्तीची हालवाहलव..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/10/2010 - 18:44 नवीन
>>>>अफझलखान येण्यापूर्वी तुळजापूरची मूर्ती का हलवली गेली नसावी? की तो येणार, मूर्ती फोडणार हे अनपेक्षित होते? अफजलखानाने शिवाजी महाराजांना 'जिवंत कैद करुन घेऊन येतो' अशी प्रतिज्ञा केली आणि तो जेव्हा निघाला तो थेट तुळजापूरास मुक्कामास पोहचला. हे अनपेक्षितच घडले असे वाटत नाही. . पण महाराजांच्या कुलदेवतेवर हल्ला करायचे हे अफजलखानाने निश्चित केले असावे असे त्याच्या कृतीवरुन वाटते. [पाहा: सभासदाची बखर]- '' श्रीभवानी कुलदेवता महाराजांची, तीस फोडून, जातियांत घालून, भरडून पीठ केले. [ इथे आकाशवाणी झाली की आजपासून एकविसाव्या दिवशी तुझें शीर कापल्या जाईल...]पुढे लष्कर कूच करुन श्रीपंढरीस आले. भीमातीरीं उतरले. देवास उपद्रव देऊन वांईस आलें.'' दुसरा उल्लेख मल्हारराव चिटणीसाच्या बखरीतला पाहा- '' एकंदर तीस हजार जमावानिशी अफजलखान मोठे अहंकारे करुन, निघोन दरमजल येतां तुळजापुरी श्रीदेवीस उपद्रव केला. परंतु देव बडवे यांणी लपवून ठेविला'' यावरुन लक्षात येते की, मूर्तीस उपद्रव झाला किंवा मूर्तीस लपवून ठेवल्या गेले होते. असेही म्हटल्या जाते की, अफजलखान मुर्तीची नासधुस करेल म्हणून भोप्यांनी मूळ मूर्ती लपवून ठेवून तिथे दुसरी मूर्ती ठेवली आणि त्या मूर्तीची तोडफोड अफजलखानाने केली. तो गेल्यानंतर पुन्हा मूळ मूर्तीची स्थापना केली गेली. अर्थात या गोष्टीला माझ्याकडे अनुक्रमे आता फारसे संदर्भ नाही. पण वरील संदर्भ बोलके आहे. [अर्थात बखरीतले वास्तव किती हाही शंकेचा विषय आहेच] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

तुळजापूरची श्रींची मूर्ती चल

अभ्या..
Sun, 07/21/2013 - 01:52 नवीन
तुळजापूरची श्रींची मूर्ती चल आहे. (हलवता येते) आणि माढ्याप्रमाणेच तुळजापुरातील मूर्तीसंदर्भात सुध्दा आख्यायिका आहेत. जवळच्या तीर्थ नामक गावात तशीच मूर्ती आहे आणि ती अस्सल आहे असे समजले जाते. तेथील गावकरी सुध्दा तसेच सांगतात की अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी तुळजापुरातील मूर्ती येथे आणली गेली. बाकी माढ्याच्या मंदिरात कैकदा गेलो आहे. तिथे देवी रुक्मिणीची सुध्दा मूर्ती आहे. ही कहाणी माहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माढ्याच्या विठ्ठलाबद्दल नवीनच माहिती कळली

चिन्मना
Mon, 08/09/2010 - 22:23 नवीन
धन्यवाद डॉक्टरसाहेब.. माढ्याच्या विठ्ठलाबद्दल ही नवीनच माहिती कळली. एकदा जाऊन आले पाहिजे. रा. चिं. ढेर्‍यांचे पुस्तकही वाचले पाहिजे. >> पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते. मी लहानपणी पंढरपूरला राहात होतो तेव्हाही मला पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्या शिळेत बराच फरक वाटत असे. अजिबात गर्दी नसण्याच्या त्या काळात पांडुरंगाची महापूजा बर्‍याच वेळा अनुभवली आहे. पांडुरंगाची शिळा (तुलनेने) खडबडीत आहे. दर्शनामुळे किंवा नारळ ठेवल्यामुळे पाय खडबडीत होतील, पण संपूर्ण अंग का खडबडीत असेल का हा प्रश्नच आहे खरा.. आमची अर्थात पांडुरंगावर भक्ती! मग पाषाणमूर्ती पंढरपूरला असो नाहीतर माढ्याला नाहीतर अजून कुठे. हृदयस्थ विठोबा सगळ्यात खरा!! अवांतरः माढ्याला एकटाच विठोबा आहे का? का तिथे रुक्मिणीची वेगळीच मूर्ती आहे?
  • Log in or register to post comments

छान माहिती.

राजेश घासकडवी
Mon, 08/09/2010 - 22:56 नवीन
छान माहिती. ही मूर्ती हलवण्याच्या प्रकारावरून एक गमतीदार वचन आठवलं. 'विलियम शेक्सपिअरची नाटकं त्याने लिहिली नाहीच मुळी. ती त्याच नावाच्या दुसऱ्याच एकाने लिहिली.' खरा शेक्सपिअर कुठचा तर तो नाटकं लिहिणारा, तसंच खरी विठ्ठलाची मूर्ती कुठची तर पंढरपूरच्या मंदिराच्या गाभ्यात असलेली. त्या स्थळाला भक्तांच्या श्रद्धेमुळे महात्म्य आहे. एरवी 'खरा विठ्ठल' हा खऱ्या भक्ताच्या हृदयातच असतो. अमुक मूर्तीत, किंवा माठात जर त्याचा आत्मा ठेवता आला असता तर आणखीन काय हवं होतं?
  • Log in or register to post comments

सुंदर

चित्रा
Mon, 08/09/2010 - 22:39 नवीन
माहितीपूर्ण लेख. फोटो दिल्यामुळे खूपच बहार आली. विठ्ठलाच्या चेहर्‍याचा फोटो मोठा लावता येईल का? हा चेहरा जरा जास्त निमुळता आहे का? आपल्याकडे दिसणार्‍या बर्‍याचशा मूर्तींमध्ये चेहरे गोलसर असतात असे वाटते.
  • Log in or register to post comments

निमुळता चेहरा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/10/2010 - 19:10 नवीन
Image removed. चेहरा गोल नाही. निमुळता आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अजुन एक माहिती.

अनिरुद्ध प
Mon, 07/22/2013 - 16:51 नवीन
श्री विट्ठलाच्या मस्तकावरिल शिवलिन्गाचे छायाचित्र सुद्धा डकवायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली

क्रेमर
Mon, 08/09/2010 - 22:42 नवीन
चांगली माहिती.
  • Log in or register to post comments

उत्तम माहिती... राजेशचा

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/09/2010 - 22:48 नवीन
उत्तम माहिती... राजेशचा प्रतिसाद पण आवडला.
  • Log in or register to post comments

एकदम भारी!!

ऋषिकेश
Mon, 08/09/2010 - 23:05 नवीन
प्रा डॉ, एकदम भारी लेख!! बरीच नवी माहिती मिळाली
  • Log in or register to post comments

छान माहितीपूर्ण लेख, बरीच

पुष्करिणी
Tue, 08/10/2010 - 01:58 नवीन
छान माहितीपूर्ण लेख, बरीच नविन माहिती कळाली
  • Log in or register to post comments

मस्त

खालिद
Tue, 08/10/2010 - 05:36 नवीन
खूप माहितीदायक लेख. सवडीने लेख आणि संदर्भ वाचावे लागतील.
  • Log in or register to post comments

छान लेख

सहज
Tue, 08/10/2010 - 06:42 नवीन
विठ्ठलमूर्ती खरी कोणती हे मी पहिल्यांदाच ऐकले. त्यावर काही शास्त्रीय संशोधन, पुरावे सरकारने काही चौकशी काम केले आहे का? माहीतीपूर्ण लेख आवडला.
  • Log in or register to post comments

>>>त्यावर काही शास्त्रीय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/10/2010 - 19:03 नवीन
>>>त्यावर काही शास्त्रीय संशोधन, पुरावे सरकारने काही चौकशी काम केले आहे का? श्री. रा.चि.ढेर्‍यांनीच त्यावर काम केले आहे असे वाटते. संशोधनातील निष्कर्षे काही अंतिम असत नाही. त्यामुळे अजूनही संशोधनाला वाव आहेच. श्री रा.चि.ढेर्‍यांच्या या संशोधनावर 'सवंग लेखन' म्हणूनही खूप टीका झाली होती. सरकार असे काही काम करेल असे वाटत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

कोणता मानू मी विठठल ?

पारुबाई
Tue, 08/10/2010 - 07:24 नवीन
अभ्यासपूर्ण लेख. पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने ...................या वाक्याचा अर्थ सान्गाल का ?
  • Log in or register to post comments

देवत्त्वाची गोष्ट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/10/2010 - 18:59 नवीन
>>>पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने ...................या वाक्याचा अर्थ सान्गाल का ? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी सानेगुरुजींनी प्राणांतिक उपोषण सुरु केले होते. मंदिर प्रवेशामुळे मोठा गदारोळ माजला होता. पुजार्‍यांनी दलितांना प्रवेश देऊ नये म्हणून प्रकरण न्यायालयात नेले. तिथे त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. शासकीय आदेशानुसार विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले झाले. पण कट्टर पुजार्‍यांना ती गोष्ट काही मान्य झाली नाही. मंदिरात दलितांनी प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीची महापूजा करुन मूर्तीतील देवत्त्व काढून एका घागरीत ठेवले. पुढे ती घागर एका वाड्यात ठेवण्यात आली. एकादशीला कर्मठ लोक त्या माठाची पूजा करत असायचे. अर्थात दर्शनार्थी प्रचलित मूर्तीचीच पूजा करीत होते. पुढे कर्मठ लोकांना पश्चाताप झाला ती गोष्ट वेगळी. असो, असा आहे त्या वाक्याचा अर्थ. आणि ही गोष्ट फक्त त्रेसष्ठ वर्षापूर्वीची आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारुबाई

ही गोष्ट बहुतेक यशवंत

बॅटमॅन
Fri, 05/11/2012 - 13:49 नवीन
ही गोष्ट बहुतेक यशवंत पाठकांच्या आत्मचरित्रात्मक अथवा दुसर्‍या कुठल्यातरी पुस्तकात वाचली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला

नीलकांत
Tue, 08/10/2010 - 08:59 नवीन
सर, खूप माहितीपुर्ण लेख आहे. या विषयावर अधीक वाचायला हवे. - नीलकांत
  • Log in or register to post comments

बाकी आत्मा माठात वगैरे काढता

llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/10/2010 - 09:52 नवीन
बाकी आत्मा माठात वगैरे काढता येण्याइतका काही पांडुरंग काही छोटा वाटत नाही. रा चिं ढेरे यांचे लेखन विद्वत्तापूर्ण असते. या पांडुरंगाबद्द्ल वाचलेले आहे. त्यावेळेला बराच मोठा वादंग यावरून झाला होता हे ही ऐकले आहे. पांडुरंगाची मूर्ती शाळिग्रामाची असूदे नाहीतर POPची त्यामुळे माझी श्रद्धा कमी होईलसे वाटत नाही. सरांनीही चांगला लेख लिहीला आहे.
  • Log in or register to post comments

<><पण कोणता मानू मी विठ्ठल;

भारतीय
Tue, 08/10/2010 - 11:50 नवीन
<><पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ? हा प्रश्न मात्र मनात रेंगाळत राहिला. विठ्ठल आचरणात येऊ द्या.. पंढरपूर काय किंवा माढ्याचा काय.. विठ्ठल तो विठ्ठलच! आचरणात येईल तो खरा! बाकी माहीती आवडली..
  • Log in or register to post comments

वा ! छान पाहितीपूर्ण

लिखाळ
Tue, 08/10/2010 - 12:06 नवीन
वा ! छान पाहितीपूर्ण लेख. फोटो उत्तम- चित्रा यांच्या नीरिक्षणाशी सहमत. (ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर हे वेगळे आहेत अशी एक चर्चा उपक्रम किंवा मिपावर पूर्वी वाचली होती, तीची आठवण झाली. )
  • Log in or register to post comments

>>> पण कोणता मानू मी विठ्ठल;

अवलिया
Tue, 08/10/2010 - 12:19 नवीन
>>> पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ? शांतपणे डोळे मिटुन "स्वतःला" पहा. तोच खरा विठ्ठल ! बाकी केवळ रुपाचे डोलारे.. असले काय नसले काय !!
अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुज ध्यान, कळो आले तुझा तूंची देव, तुझा तूंची भाव फिटला संदेह अन्य तत्वी मुरडुनिया मन उपजलासी चित्ते कोठे तुज रिते न दिसे रया दीपकी दीपक मावळल्या ज्योती घरभरी वाती शून्य झाल्या वृत्तीची निवृत्ती आपणां सकट अवघेंची वैकुंठ चतुर्भूज निवृत्ती परम अनुभव नेमा शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो
विठ्ठल विठ्ठल .. जय हरी विठ्ठल !!
  • Log in or register to post comments

प्रा डॉ- सुंदर आणि

भाऊ पाटील
Tue, 08/10/2010 - 13:05 नवीन
प्रा डॉ- सुंदर आणि माहीतीपूर्ण लेख. अवलिया--शांतपणे डोळे मिटुन "स्वतःला" पहा. तोच खरा विठ्ठल ! वा वा! विठ्ठल विठ्ठल .. जय हरी विठ्ठल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

माहितीपूर्ण लेख

दत्ता काळे
Tue, 08/10/2010 - 12:57 नवीन
लेख फार आवडला. बरीचशी माहीती मला नविनच होती.
  • Log in or register to post comments

.

सहज
Tue, 08/10/2010 - 13:00 नवीन
.
  • Log in or register to post comments

नवीन माहिती!

स्वाती दिनेश
Tue, 08/10/2010 - 14:28 नवीन
माहितीपूर्ण लेख आवडला, बरीच नवीन माहिती समजली. धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

आभार..........!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/10/2010 - 19:12 नवीन
आवर्जून प्रतिसाद लिहिणा-या मित्रमंडळींचे आणि वाचकांचेही मन:पूर्वक आभार.........! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

इतक्या सुंदर माहितीपर धाग्यात

विजुभाऊ
Tue, 08/10/2010 - 19:25 नवीन
इतक्या सुंदर माहितीपर धाग्यात उगाचच कोणीतरी पिंक टाकल्यासारखा गरज नसतानाही बादरायण धुणी धुण्याचा अवांतर पिंक प्रतिसाद टाकला आहे. तसा प्रतिसाद अवलिया अथवा इतर कोणी टाकला असता तर तात्काळ संपादीत झाला असता. असो. जॉर्ज ऑरवेल म्हणतो तेच खरे. ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख आणि अनमोल माहिती...

मदनबाण
Wed, 08/11/2010 - 06:51 नवीन
सुंदर लेख आणि अनमोल माहिती... :)
  • Log in or register to post comments

अरे वा. उत्तम माहिती.

प्रचेतस
Fri, 07/19/2013 - 19:53 नवीन
अरे वा. उत्तम माहिती. हा लेख नजरेतून कसा काय सुटला होता कुणास ठाऊक.
  • Log in or register to post comments

+१

यशोधरा
Sat, 07/20/2013 - 15:10 नवीन
हेच म्ह्णते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अतिश्य माहितीपूर्ण लेख ....

रुमानी
Sat, 07/20/2013 - 11:57 नवीन
धन्यवाद वल्ली.. :) महीती व फोटो दोन्हि आवडले. पाडुरंगाचि मुर्ती मात्र मनास अतिशय भावली...
  • Log in or register to post comments

खूप माहितीपूर्ण. लेख आवडला.

Gawade Jawahar…
Sat, 07/20/2013 - 12:27 नवीन
खूप माहितीपूर्ण. लेख आवडला. जवाहरलाल
  • Log in or register to post comments

माहितीपुर्ण !!

ब़जरबट्टू
Sat, 07/20/2013 - 13:09 नवीन
छान माहिती दिलीये.. ले़ख आवडला !!
  • Log in or register to post comments

सुरेख लेख!

पैसा
Sat, 07/20/2013 - 15:20 नवीन
रा. चिं. ढेरेंचा मूळ लेख वाचला होता. त्या मूर्तीचे फोटो पाहून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

सुधीर
Sat, 07/20/2013 - 16:31 नवीन
लेख आणि मूर्तीचे फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

तुमच्यामुळे मुळ विठोबाचे दर्शन झाले.

अनन्न्या
Sat, 07/20/2013 - 16:39 नवीन
नविन माहितीपूर्ण लेख!
  • Log in or register to post comments

रा.चि. ढेरे

राही
Sat, 07/20/2013 - 17:55 नवीन
श्री विट्ठल एक महासमन्वय हे ढेरे यांचे पुस्तक अत्यंत वाचनीय आहेच पण त्यांची बाकीची सर्वच पुस्तके इतिहासाच्या आणि नाथ ,दत्त आणि शाक्त संप्रदायांच्या अभ्यासकांनी जरूर वाचावींत अशी आहेत. त्यांचे लिखाण, सहज सोपे, प्रासादिक आणि नेमक्या शब्दांत आशय व्यक्त करणारे असते. समर्पक शब्दांचा वापर हे आणखी एक वैशिष्ट्य. ते कुठल्याही रूढी/कल्पनांचे दैवीकरण अथवा उदो उदो करीत नाहीत तर उलट दैवतांच्या मूळ मानवी स्वरूपाचा वेध घेतात. कुणाच्याही भावना न दुखवता अलगद श्रद्धां-परंपरांच्याच्या मुळाशी जाऊन सत्य शोधण्याचा त्यांचा प्रयत्न अभिनव आहे. हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्यात वावरते आहे हे आपल्या पिढीचे अहोभाग्य आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख !

drsunilahirrao
Mon, 07/22/2013 - 12:41 नवीन
सुंदर लेख !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा