✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आरक्षण!

अ
अजिंक्य यांनी
Fri, 05/02/2008 - 11:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43473 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

सहमत..

विसोबा खेचर
Fri, 05/02/2008 - 11:26 नवीन
उच्च शिक्षण घेताना फक्त गुणांचाच विचार व्हावा. नाहीतर मग, आरक्षण देण्यामागचा मूळ हेतू बाजूलाच राहील आणि अजिबात गुणवत्ता नसलेले लोक जागा बळकावून बसतील. अजिंक्यराव, मी आपल्याशी सहमत आहे... आपला, (अनारक्षित) तात्या.
  • Log in or register to post comments

कमाल आहे!!

अजिंक्य
Fri, 05/02/2008 - 11:40 नवीन
तात्या, तुमची खरोखर कमाल आहे! आत्ता थोड्याश्या वेळा आधी मी आपले विचार "मांडले" होते! एवढ्यात तुम्ही उत्तरही दिलंत! असो. अनुकूल प्रतिक्रियेबाबत मनापासून धन्यवाद. मी इतरही अनेक "सो कॉल्ड" मराठी साईट्स पाहिल्या आहेत, पण मिपा ची मजा त्यात नाही! मला वाटलं होतं की मुळात माझे लेखन दिसायलाच खूप वेळ लागेल्.....मअअअअअग त्यानंतर प्रतिक्रिया! पर ह्यो मामला लईच "फाष्ट" दिसतोय की!! थँकू, थँकू!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

:)

विसोबा खेचर
Fri, 05/02/2008 - 11:49 नवीन
मला वाटलं होतं की मुळात माझे लेखन दिसायलाच खूप वेळ लागेल्.....मअअअअअग त्यानंतर प्रतिक्रिया! हा हा हा! :) आपला, (प्रशासकीय अनुमतीतला!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य

गुणांचा विचार

प्रमेय
Tue, 01/20/2009 - 04:07 नवीन
सर्वसाधारणपणे फक्त जातीवर आरक्षण मिळत नाही, त्यासाठी पात्रता (आर्थिकद्रुष्ट्या कमी :जी प्रत्येक जाती/आरक्षण प्रकारानुसार बदलते) दाखवावी लागते. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणारे, केवळ पोट-जात/वर्गप्रकार बदलून (म्हणजे ह्या ह्या उपनियमाऐवजी अ-ब-क पोटनियम/दुरुस्तीनुसार) तेच आरक्षण नव्या नियमाने मिळवतात आणि उरलेल्या इतर सर्व हुशार मुला-मुलींचे नुकसान करतात. (हेही शक्य आहे बरंका! काय हे नियम आणि पोट नियम. एकदा हे संविधान वाचलेच पाहिजे! ) हीच ती चूक आहे ज्याला सर्वजण 'बळकावून बसणे' या अर्थी वापरतात. या बाबत जेव्हा सर्वोच्य न्यायलय चौकशी करते तेव्हा राजकारण पुढे करुन याला दाबून टाकतात. गेल्यावेळी जेव्हा आरक्षणाची मुदत संपली आणी परत आरक्षण हवे की नको सर्व्हे झाले तेव्हा वेगळे काय घडले? या बाबतीत फक्त एकाची(च) चूक आहे जो म्हणजे तो विद्यार्थी वर्ग आणी त्याचे पालक जे हा सर्व प्रकार करून मोकळे होतात आणी नंतर कसे मी पप्पू/छमीला प्रवेश मिळवून दिला याचे गुणगान गातात! हा सर्व प्रकार मी स्वतः पाहिला/ऐकला आहे! असो! ज्याने त्याने कसे वागायचे/ठरवायचे स्वात्रंत्र या घटनेने दिले आहेत; आणी जो समाज नियम पाळायची शिस्त (छोटा-मोठा सर्व वर्ग!) स्वता:ला लावून घेत नाही तो जास्त काळ टिकू शकत नाही याची उदाहरणे या जगात खूप आहेत! ज्या व्यक्तीला या वागण्याचे प्राय:चित्त होईल तो इतरांना सावध करेल, बेशलाक अशा माणसांची या भारताला जास्त गरज आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सहमत

विनायक पाचलग
Wed, 01/21/2009 - 22:25 नवीन
सहमत असाच अनुभव मला एन. टी.एस या परिक्षेवेली आला होता आपला, (अनरक्षित) विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

खरंतर..

प्राजु
Fri, 05/02/2008 - 11:42 नवीन
हा जाहीरपणे वाद होईल असाच विषय आहे. पण तरीही मी तुमच्याशी सहमत आहे. तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वाद आवश्यकच!

अजिंक्य
Fri, 05/02/2008 - 11:52 नवीन
खरे म्हणजे, या विषयावर वाद व्हावा अशीच माझी इच्छा आहे. आत्तापर्यंत, माझ्या विचारांशी सहमत असणारे लोकच मला भेटले आहेत. दुसरी बाजू सुद्धा समोर येणे आवश्यक आहे. वाद जरी नाही, तरी सांगोपांग चर्चा झाली तर चांगलेच आहे. तरीही, धन्यवाद प्राजुताई! (प्राजुताई चालेल का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

पेच !!!

धमाल मुलगा
Fri, 05/02/2008 - 11:59 नवीन
अजिंक्य, सहमत आहे आपल्या मताशी. मुळात आरक्षणच नको, आणि ठेवायचेच तर ते आर्थिक निकषांवर असावे, असा माझा वैयक्तिक सुर आहे. ह्या विषयावर आजपर्यंत बराच धूराळा उडाला आहे. एक आठवलं, कोणत्याश्या न्यूज-चॅनलवर आरक्षण हवं की नको च गुर्‍हाळ चालू होतं....एका सन्मानिय महोदयांनी "अमेरिकेतसुध्दा आरक्षण आहे..काळ्या लोकांसाठी!" असं निदर्शनाला आणून दिलं...पण "ते आरक्षण गुणवत्तेशी तडजोड करत नाही...जर एक काळा आणि गोरा असे दोन जण ९०% गुण मिळवून एकाच जागेसाठी अर्ज करत असतील, तर हे आरक्षण वापरलं जातं....उगाच काळा आहे म्हणून द्या ५०% वाल्याला, असं आपल्याकडच्यासारखं नसतं" असं सांगितल्यावर हे महोदय 'पिळवणूक, जातीची उतरंड, उच्चवर्णियांची मक्तेदारी' असा टिपिकल गळेकाढूपणा करुन उत्तर द्यायचं टाळते झाले. अजिंक्यभाऊ, तुम्ही आम्ही ह्यावर बोलून फार तर फार वादावादीचे प्रसंग येतील...त्या हलकट राजकारणी माकडांच्या हाती जोपर्यंत जातींचं कोलित आहे, तोपर्यंत देशाची गुणवत्ता सर्वार्थाने सुधारणं केवळ अ...श...क्य !!!!
  • Log in or register to post comments

"...आणि ठेवायचेच तर ते आर्थिक निकषांवर असाव.." - सहमत आहे

राघव
Sat, 08/16/2008 - 16:15 नवीन
सहज मिपावर असलेले जुने लेखन बघत असतांना हा विषय आढळला. मी याच विषयावर दुसरीकडे एक चर्चा आरक्षण... एक वेगळा विचार या नावाने टाकली होती. त्याच विषयाशी निगडीत विषय येथे बघून राहवले नाही म्हणून प्रतिसाद टाकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आर्थिक निकषावरील आरक्षण

आजानुकर्ण
Fri, 05/02/2008 - 12:05 नवीन
पेमेंट सीटच्या रुपातले आरक्षण अतिशय ज्वलंत विषय!! तसं हे पैशेवाल्यांसाठीचे आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं. पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर..... माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी नाही) त्याचीही पेमेंट सीटवर ऍडमिशन झाली. बापाच्या पैशाचा मुलाच्या ऍडमिशनसाठी फायदा होणे योग्य आहे का? त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही. माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. पण, हे कितपत योग्य आहे? शैक्षणिक बाबतीत, प्रवेशाच्या वेळी, गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं. आरक्षण असायला काहीच हरकत नाही. पण त्याला काहीतरी मर्यादा असावी. आरक्षण हे मुख्य शिक्षण पूर्ण करण्यासाठी असावं. उच्च शिक्षण घेताना फक्त गुणांचाच विचार व्हावा. नाहीतर मग, आरक्षण देण्यामागचा मूळ हेतू बाजूलाच राहील आणि अजिबात गुणवत्ता नसलेले लोक जागा बळकावून बसतील. कदाचित माझा सूर थोडा वरच्या पट्टीतला असेल, पण ....... मला नाही वाटत माझा मुद्दा चुकीचा आहे. यावर इतरांची मते आणि विचार जाणून घ्यायला आवडेल आपला, (गरीब) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

अगदी माझ्यासारखे!!

अजिंक्य
Fri, 05/02/2008 - 16:22 नवीन
आजानुकर्ण, आपले विचार जवळजवळ तंतोतंत जुळतात!! (इतके, की आपल्या लेखांमधली वाक्येदेखील जुळतात!!) पेंमेंट सीट हा सुद्धा वादाचाच मुद्दा आहे. त्याबाबतही विचार होणे आवश्यक. टीप: जरी आपण मुद्दा योग्य मांडला असला, तरीही माझीच वाक्यं वापरण्याचा "प्रकार" थोडा विचित्र वाटला. थोडा वेळ मीही गोंधळलोच होतो. पर चलता है!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

पेमेंट सीटच्या रुपातले आरक्षण

सर्वसाक्षी
Mon, 01/19/2009 - 22:02 नवीन
हे आय आय टी, एन आय टी, यु. डी. सी. टी.....मध्ये नसते. पण जातीय आरक्षण मात्र असते. पेमेंट सीट हे शिक्षण सम्राटांचे चराऊ कुरण आहे. मुळात त्यांनी समाजशिक्षणासाठी संस्था उघडलेल्या नसून नोटा छापण्यासाठी उघडलेल्या आहेत आणि त्या खाजगी असल्याने ते स्वतःचे नियम लागु करू शकतात. त्यातल्या त्यात फायदा म्हणजे शे पन्नास गुणवत्ता नसलेल्या पण पैसे असलेल्या मुलांमुळे काही मुलांना गुणवत्तेवर शिक्षणासाठी प्रवेश मिळु शकतो! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

जातकारण......

मदनबाण
Fri, 05/02/2008 - 12:09 नवीन
शैक्षणिक आरक्षणावर..... पण कशाला? मग गुणवत्ता यादी काय चाटायची ????? शिक्षणामधे गुणत्ता हाच निकष हवा !!!!! अजिबात गुणवत्ता नसलेले लोक जागा बळकावून बसतील. तात्या मला तर वाटत की गुणवत्ता नसलेले लोक अगोदरच जागा बळकावून बसले आहेत..... आपल्या देशातील लोक जाती शिवाय राजकारण करु शकतील काय? बर्‍याच वेळा पेपरात किंवा बातम्यां मधे वाचायला मिळते:-- दलित स्त्रीचा बलात्कार झाला....(दलित हा महत्वाचा मुद्दा) जिथ स्त्रीच्या अब्रुला सुद्दा जात आहे आपल्या देशात..... त्या देशाचा विकास तो काय होणार? ती स्त्री आहे ते महत्वाच नाही पण ती दलित आहे हे महत्वाच !!!!! शेवटी बलात्कार होतो तिच्या मनाचा आणि शरीराचा व विचार केला जातो तो फक्त तिच्या जातीचा व्वा रे दुनिया व्वा !!!!! (हे भारतमाते तुझ्या पोटी जन्माला आलेला खरच भाग्यवान असतो काय?) या गहन विचारात पडलेला..... मदनबाण
  • Log in or register to post comments

शिक्षण आणि पदवी ; नोकरी आणि काम

व्यंकट
Fri, 05/02/2008 - 12:16 नवीन
मुक्त / विनामूल्य / समाज-प्रायोजीत-चलीत / अमर्याद / वय-लिंग-पार्श्वभूमी-निरपेक्ष शिक्षण व्यवस्था असावी अशा मताचा मी आहे. तथापी, आरक्षणाचा वा अनारक्षणाचा विरोध मी करीत नाही, कारण पदवी मिळवणे म्हणजे - ज्ञान मिळवणे नाही आणि नोकरी मिळवणे म्हणजे - काम करून दाखवणे / स्वतःच्या वा मालकांच्या उद्योगांस लाभ करून देणे नाही. प्रतिभावंतास ऍडमिशन वा पदवी थोपवू शकत नाही. व्यंकट
  • Log in or register to post comments

जातकारण......

शरुबाबा
Fri, 05/02/2008 - 14:43 नवीन
१) सकाळ बद्दल एक पुस्तिका बाजारात आली आहे.हे व्रुत्तपत्र ब्राम्ह्णणांनी कासे ताब्यात घेतले आहे,या बद्दल त्यांची मते त्यांनी मांदली आहेत्,पण हे करताना महापुरुषांची उगाचच बदनामी केली आहे,असे मला वाटते,ज्या पुणे करांनी ती वाचली असेल त्यांनी मत मांडावे.हे लिखाण अत्यंत जातीयवादी आहे. २) आरक्षण! अतिशय ज्वलंत विषय!! तसं आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं. पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर..... माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली. . . . वरिल दोन्हि विषय अतिशय ज्वलंत विषय आहेत . आपण येथे मिपावर येतो , आवडीने सर्व साहित्य वाचतो आणि त्यवर मनापासून मोकळ्या ढाकळ्या प्रतिक्रिया देतो . जर अशे जातीवाचक विषय टाळले तर चांगले होइल असे वाट्ते .
  • Log in or register to post comments

गैरसमज!

अजिंक्य
Fri, 05/02/2008 - 16:53 नवीन
शरुबाबा, काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. मला कोणत्याही जातीविरोधात बोलायचे नाही. जातिवाचक वाद उठवण्याचा तर अजिबात हेतू नाही. जर अशे जातीवाचक विषय टाळले तर चांगले होइल असे वाट्ते . मिपावर चर्चा करताना, हा विषय जातिवाचक, तो अ-जातिवाचक असे म्हणून कसे चालेल? विषय जरी जातिवाचक वाटत असला, तरी त्यामागची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. हा विषय जातीशी संबंधित आहे खरा, पण रोख जातीवर नसून, आरक्षणावर आहे, जो की पूर्णपणे वेगळा विषय आहे. आणि जर जातिवाचक विषयावर चर्चा केलीच नाही, तर तो विषय मांडलाच जाणार नाही. चर्चा आवश्यकच आहे. पण चर्चेमध्ये मन निर्मळ असणे जास्त आवश्यक आहे. हे मी तुम्हाला उद्देशून म्हणत नाही, तर हे कोणालाही लागू होते. (मी नवा सभासद आहे. चूकभूल द्यावी-घ्यावी.) आपला नम्र - अजिंक्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरुबाबा

शरुबाबा

विकि
Sun, 05/04/2008 - 13:51 नवीन
अजिंक्य पक्का जातीयवादी दिसतोय. त्याचा जाहीर निषेध करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरुबाबा

गैरसमज!

शरुबाबा
Fri, 05/02/2008 - 17:00 नवीन
हा विषय जातीशी संबंधित आहे खरा, पण रोख जातीवर नसून, आरक्षणावर आहे, जो की पूर्णपणे वेगळा विषय आहे. अजिंक्यभाऊ, तुम्ही आम्ही ह्यावर बोलून फार तर फार वादावादीचे प्रसंग येतील...त्या हलकट राजकारणी माकडांच्या हाती जोपर्यंत जातींचं कोलित आहे, तोपर्यंत देशाची गुणवत्ता सर्वार्थाने सुधारणं केवळ अ...श...क्य !!!! गैरसमज नसावा
  • Log in or register to post comments

शरुबाबा यांना ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/18/2008 - 15:18 नवीन
"... तुम्ही आम्ही ह्यावर बोलून फार तर फार वादावादीचे प्रसंग येतील..." अजिंक्यभौंनी इथे आधीच त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांनी एकाच बाजूनी लोकांचं मत असल्याचं इथे लिहिलंच आहे. आणि वादावादी होईल, असं म्हणण्यापेक्षा चर्चा होईल असा आशावाद का असू नये? काहीतरी समर्थनार्थ मुद्देही असतील ज्यांना आरक्षण हवंसं वाटतं. ते वर यावेत म्हणून हे काथ्याकूट सुरू केलेलं आहे. वैयक्तिकरित्या मलातरी यात काहीही जातीयवादी वाटत नाही आणि माझा आरक्षणाला विरोधच आहे. प्राथमिक शिक्षण, रूढार्थाने नाही, समजा १२ वी + काही व्यावसायिक कौशल्यांचं शिक्षण, प्राथमिक किंवा सक्तीचं करावं, ते सर्वांना उपलब्ध करून द्यावं, अगदी फुकटातही आणि नंतर आरक्षणाच्या कुबड्या काढाव्यात या मताची मी आहे. यमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरुबाबा

हे असच चालयचं!

गणपा
Fri, 05/02/2008 - 17:42 नवीन
अजिंक्य, तुझ्या सारखाच माझाही अनुभव आहे. माझ अस प्रामाणिक मत आहे की मुळात आरक्षण असुच नये, जर ठेवायचच असेल तर ते फक्त शिक्षणा पुरताच मर्यादीत असाव आणि शिक्षणातही आरक्षण हे विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थीती वरच अवलंबून असाव. धर्मावर आधारीत आरक्षण, मग जाती , पोट-जाती, अस करता करता ओपन ग्रुपच्या मुलांना किती जागा उरतात ? वाइट वाटत, जी मुलं वर्षभर इतकी मेहनत करुन ८० ते ९०% मार्क मिळवतात, आणि मग ऍडमिशनच्या क्षणी ४०-५०% वाली मुल जाती - धर्मावर त्यांचा हक्क हिसकावून घेतात. बरीचशी ४०-५०%वाली मुलं दुसर्‍या वर्षी नापास होऊन स्वतःच वर्ष तर वाया घालवतातच पण हुशार विद्यार्थ्यांचही त्यांना ऍडमिशनपासुन वंचीत ठेवुन अन्याय करतात. मन घट्ट करुन एकवेळ शैक्षणिक आरक्षण मान्य केल तर परत नोकरीत आणि बढतीच्या वेळी सुद्धा यांना आरक्षण आणि प्राधान्य द्या. ये बात कुछ हजम नही होती. पण जोपर्यंत आपले नालायक राज्यकर्ते जाती -धर्मावर आधारीत राजकारण सोडत नाहीत तो पर्यंत हे आसच चालणार. सामांन्यांचा कुणीही वाली नाही. (गांजलेला )गणपा. ~X(
  • Log in or register to post comments

गणपा

विकि
Sun, 05/04/2008 - 14:10 नवीन
मनूष्य स्वभावानुसार दुसरा पुढे जाताना बघून आपला जळफळात होणे स्वाभाविक आहे. तुम्हाला माहीत नसेल की या अगोदर नोकर्‍यात वरिष्ठ पदावर ठराविक जातीची मक्तेदारी होती. अजूनही आहे त्यामूळे त्या जातींचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला पण मागासलेल्या जातींची काय त्या जाती कश्या पुढे येणार. आधीच जातीयवाद्,जातीयवादी लोक मोठ्या प्रमाणावर. जर आरक्षण नसते तर मागास प्रवर्ग पुढे यायची प्रक्रीया चालू झालीच नसती. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

विकि

गणपा
Sun, 05/04/2008 - 21:08 नवीन
विकि साहेब, माझा विरोध आहे तो जातीय आणि धार्मिक आरक्षणाला. आर्थिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना द्याव आरक्षण, तेही फक्त शिक्षणापुरतच. नोकरी, बढतीत हे फाजील लाड नको. मनूष्य स्वभावानुसार दुसरा पुढे जाताना बघून आपला जळफळात होणे स्वाभाविक आहे. नक्कीच. जर एखादी व्यक्ती त्याची/तिची लायकी नसताना ही फक्त मागासवर्गीय आहे म्हणुन इतरांचा (लायक लोकांचा) हक्क डालवुन पुढे जात असेल तर जळफळाट होणारच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही हे आरक्षण काही ठराविक काळापर्यंतच असाव अस म्हंटलय. कारण एकदा का त्या आरक्षणाच्या कुबड्यांची सवय जडली तर त्यांच्या आधाराशिवाय हा समाज वर येऊ शकणार नाही हे त्या माहामानवाने ५०-६० वर्षांपुर्वीच ताडल होत. (जातीय / धार्मिक आरक्षण विरोधी) - गणपा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि

गणप्या

विकि
Sun, 05/04/2008 - 23:43 नवीन
पुढे जाण्याचा हक्क घटनेने दिलाच आहे. तुला काय वाटत आरक्षणाची अंमलबजावणी अजून पूर्णपणे झालेली आहे? तुला काय वाटत की मागास जातींच्या लोकांनी पुढे जाऊच नये. कारण यांना आरक्षण मिळाले तर हे लोक आपल्या पुढे जातील ही भीती. अजूनही जातीयवाद शिल्लक आहे. आरक्षणामूळे मागास जातींचे जीवनमान व गुणवत्ता वाढीस लागत आहे. म्हणजे कोण अन्नटंचाई आणि माहागाई वाढवतय ते कळेल त्यांना. आयला जरा आम्ही बर खायला लागलो तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागल. हे तुच लिहीले आहेस ना तसच मागास जातीतील व्यक्ती तुला म्हणाली तर. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आरक्षण निकषता..

गणपा
Wed, 05/07/2008 - 16:18 नवीन
स्पष्ट बोलतो, राग नसावा, माझा विरोध जातीय / धार्मिक आरक्षणाला आहे. मी आर्थिक निकषतेवर आधारीत आरक्षणचा पुरस्कार करतोय. हा माझ मुद्दा तुम्ही सोईस्कररीत्या विसरलात की चुकुन डोळेझाक झाली? मागास जातींचे लोक मग ते आर्थिक दृष्ट्या मागासलेले असतील तर त्यांना आपोआप आरक्षणचा लाभ मिळेलच ना. तुला काय वाटत की मागास जातींच्या लोकांनी पुढे जाऊच नये. मी अस कुठेही म्हटलेलं नाही, उगाच तुमचे विचार माझ्या नावावर खपवु नका. कारण यांना आरक्षण मिळाले तर हे लोक आपल्या पुढे जातील ही भीती. कर नाही त्याला डर कशाची. पुढे जायची ओढ आहे मग बुध्धीच्या जोरावर जाना. तुम्हाला काय अपेक्षीत आहे? इतकी वर्ष सवर्णांनी अत्याचार केले आता आमची पाळी उट्ट काढायची. आपला गणप्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि

गणप्या

विकि
गुरुवार, 05/08/2008 - 00:47 नवीन
इतका जळफळाट बरा नव्हे. तू माझ्या दूसर्‍या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस जो प्रश्न तू स्वतच लिही ला होता. विसरलास वाटते. सवर्णांनी हजारो वर्ष मागास समाजावर अत्याचार केले आहेत आजही थोड्याफार प्रमाणात चालू आहेत. ते कशाला म्हणतील आता आमची पाळी म्हणून आता कुठे मूळ प्रवाहात यायची सूरूवात झाली असताना तुम्ही ओरडू लागले आहात. त्याच काय असत आधीच तुमच्यासारख्यांच्या मनात हा खालच्या जातीचा असे भरलेले असते. आणी तो आपल्याहून पुढे गेला तर या विचाराने त्याची जात काढायला ही तुम्ही मागेपुढे पहात नाहीत. इतकी वर्षे जे शिक्षणापासून वंचित होते त्यांना कसले घेऊन बसत आहेस आर्थिक आरक्षण. मागास जातीतील मूठभर लोकांकडे पैसा आला म्हणजे संपूर्ण समाज सुधारला अशी तुझी भलतीच भावना झालेली दिसतेय. माकप नेहमीच आरक्षणाच्या बाजूने राहीलेला आहे आणि राहणार आहे. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

२७ टक्के...

प्रभाकर पेठकर
Fri, 05/02/2008 - 18:49 नवीन
काही टक्यांचे आरक्षण करण्यापेक्षा मागासवर्गियांसाठी १०० टक्के आरक्षित कॉलेजीस सरकारने सुरू करावीत. अशा कॉलेजचा प्रोफेसरवर्गही मागासवर्गीय आरक्षणातून शिकलेला असावा. त्याने आपल्या लोकांच्या उद्धारासाठी ज्ञानदानाचे कार्य करावे. तथाकथीत, उच्च वर्णीयांची कॉलेजीस वेगळी असावीत तिथला प्रोफेसरवर्ग उच्चवर्णीय किंवा आरक्षणाचा फायदा न घेता (गुणवत्तेवर) शिकलेला मागासवर्गीय असावा. इकडच्या विद्यार्थ्यांना तिकडे प्रवेश नाही आणि तिकडच्या विद्यार्थ्यांना इकडे प्रवेश नाही. आर्थिक दृष्ट्या मागासांनी शिक्षणा नंतर अर्थार्जन करून शिक्षणाचा सर्व खर्च सरकारात जमा करावा. जातीय आरक्षणातून शिक्षण घेतलेल्यांनी खेडोपाडी शाळा/कॉलेजांमधून (मागासवर्गीय) ज्ञानदान करावे. (कमीतकमी त्यांच्या शिक्षणाच्या कालावधी इतके.) नो भांडण, नो तंटा, नो मारामार्‍या.
  • Log in or register to post comments

सहमत!

ब्रिटिश टिंग्या
Fri, 05/02/2008 - 20:52 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अगदी..

रम्या
Wed, 05/07/2008 - 15:55 नवीन
..सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अरे वा !!!

नितिन थत्ते
Wed, 01/21/2009 - 14:51 नवीन
म्हणजे नोकरीसाठी अर्ज आले की 'त्यांना' इंटरव्ह्यूला बोलवायला नको. सहजपणे टाळता येईल. फार कशाला जाहिरातीतच अमुक कॉलेजातील उमेदवारांनी अर्ज करू नये असेही लिहिता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आरक्शण

हासरी
Fri, 05/02/2008 - 20:13 नवीन
आरक्षणावर सर्व मते मजेदार आहेत. स्वतहाचे इतकी शतके आरक्षण होते त्याच काय? आता का दुखतय. तुमचिच मात्रा आता तुम्च्आवर. जातिवाद बन्द स्वत्।हुन केला नाहीत, आता भोगा फळ. आणि अजुनहि मनातून 'त्यान्ना' आपले मान्लेले नाहीच.
  • Log in or register to post comments

फळे भोगणे

प्रकाश घाटपांडे
Sat, 05/03/2008 - 14:42 नवीन
आरक्षणावर सर्व मते मजेदार आहेत. स्वतहाचे इतकी शतके आरक्षण होते त्याच काय? आता का दुखतय. तुमचिच मात्रा आता तुम्च्आवर. जातिवाद बन्द स्वत्।हुन केला नाहीत, आता भोगा फळ. आणि अजुनहि मनातून 'त्यान्ना' आपले मान्लेले नाहीच.
ही मात्र प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. विवेकवादी चळवळीत तसे थेट म्हणता येत नाहि. कारण ते विवेकि नाही. सुड म्हणजे न्याय नव्हे; न्याय म्हणजे सूड नव्हे. पण खरा लढा मात्र आरक्षीत वि. अनारक्षीत असा नाहि. तो आरक्षणा अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या प्रवर्गातच आहे. खोटी जातप्रमाण पत्रे जी उघड्कीस येतात ती ' आरक्षणाचा लाभार्थी असलेला पण ज्याचा मलिदा अन्य संवर्गाने घेतल्याने वंचित झालेला' अशांमुळेच. खोटी जात प्रमाण पत्रे ही इतकी आहेत की सर्वांनाच बोगस ठरवणे म्हणजे शासन यंत्रणा अस्तित्वात आहे कि नाही असा प्रश्न उपस्थित करण्यासारखे होते. ही माहिती जातपडताळणी विभागातील आदिवासी समाजातल्या एका सुज्ञ आधिकार्‍याने मला खाजगीत दिली. पण अशा प्रकारांमुळे खर्‍या वंचितांना मात्र खेटे घालावे लागतात. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हासरी

हे घ्या एक उदाहरण....

कुंदन
Wed, 05/07/2008 - 12:44 नवीन
खोटी जात प्रमाण पत्रे ही इतकी आहेत यासंबंधी....... http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?page=article&sectid=2&contentid=200805072008050702200951015511f2
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

विशेष फरक नसतो....

अनिकेत
Fri, 05/02/2008 - 21:47 नवीन
हा चघळून चोथा झालेला विषय आत्ता सुरू करायचे प्रयोजन जर सर्वोच्च न्यायालयाचा नवीन आदेश असेल, तर मला सांगावेसे वाटते की सरकारी उच्च शिक्षणसंस्थात खुल्या-आऱक्षित वर्गातील मुलांतल्या गुणवत्तेत विशेष फरक नसतो. माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली. त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही. माझा अनेक ओबीसी मित्रांनी मागील वर्षी आरक्षण नसताना सरकारी उच्च शिक्षणसंस्थात प्रवेश मिळवले आहेत, कालच्या आयआयएम निकालातही खुल्या वर्गातून प्रवेश मिळवणारे अनेक आहेत. उच्च शिक्षणसंस्थातून बाहेर पडताना तुलना करून पहावी. जर आऱक्षणातून आलेले खुल्या वर्गातील मुलांपेक्षा चांगले गुण मिळवत असतील, तर आऱक्षण योग्य म्हणावे लागेल. धर्मावर आधारीत आरक्षण, मग जाती , पोट-जाती, अस करता करता ओपन ग्रुपच्या मुलांना किती जागा उरतात ? वाइट वाटत, जी मुलं वर्षभर इतकी मेहनत करुन ८० ते ९०% मार्क मिळवतात, आणि मग ऍडमिशनच्या क्षणी ४०-५०% वाली मुल जाती - धर्मावर त्यांचा हक्क हिसकावून घेतात. बरीचशी ४०-५०%वाली मुलं दुसर्‍या वर्षी नापास होऊन स्वतःच वर्ष तर वाया घालवतातच पण हुशार विद्यार्थ्यांचही त्यांना ऍडमिशनपासुन वंचीत ठेवुन अन्याय करतात. माझ्या बरोबर १२वी ला एक मुलगा होता, पुढे तो आरक्षणावर (एस्-टी) युडीसीटी ला गेला. पण तो २००५ चा युडीसीटी चा टॉपर होता. जातीयवादी वक्तव्यः जर स्वतःला उच्च जातीचे समजता तर स्वतःच्या हिमतीवर मिळवा प्रवेश. आहेत की ५०% जागा. (चित्तपावन ब्राम्हण) अनिकेत.
  • Log in or register to post comments

सहमत....

कुंदन
Sun, 05/04/2008 - 14:31 नवीन
आरक्षणाच्या कुबड्या न वापरता मी शिक्षण घेतले. आणि आता परदेशात फ्री लान्सिंग सल्लागार म्हणून काम करीत आहे. मात्र केवळ जातीने ओबीसी आहे म्हणून तथाकथीत उच्च जातीयांकडून अपमानेचेही बरेच प्रसंग आले. तरीही टप्प्याने जातीयवादी आरक्षणाची टक्केवारी कमी करून आर्थिक निकषांवर आरक्षण लागू करावे या मताच मी आहे..... (तथाकथीत उच्च जातीयांकडून अपमानेचेही बरेच प्रसंग पचवून तावून सुलाखून निघालेला) ....कुंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत

कुंदन साहेब

विकि
Sun, 05/04/2008 - 16:12 नवीन
तुम्ही आरक्षण नाही घेतलेत म्हणून आरक्षणाला कुबड्या संबोधू नका आज तुम्ही परदेशात असल्याकारणाने तुमच्यासारख्यांनी असे बोलणे अपेक्षीत आहे. तुम्ही इतर मागास वर्गातील आहात असे लिहीले आहे आणि आता शैक्षणिक तसेच आर्थिक दृष्ट्या पुढारलेले आहात . भारतात न राहता या विषयावर बोलणे बरे नव्हे. सामान्यतहा कनिष्ठ जाती पैसा मिळू लागल्यावर उच्च जातींचे अनुकरण करू लागतात. असा अनुभव आहे. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

गैरसमज.....

कुंदन
Sun, 05/04/2008 - 18:24 नवीन
तुम्ही इतर मागास वर्गातील आहात असे लिहीले आहे आणि आता शैक्षणिक तसेच आर्थिक दृष्ट्या पुढारलेले आहात . हे आर्थिक दृष्ट्या पुढारलेपण निव्वळ मेहेनत आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेले आहे. अगदी पालकांचीदेखील मदत न घेता. सामान्यतहा कनिष्ठ जाती पैसा मिळू लागल्यावर............ आणि योग्य मार्गाने जास्त पैसा कमावून भरपूर कर भरण्यात मला तरी अभिमान वाटतो. अवांतर : याच पैशातून मागच्या वर्षी एका गरजू होतकरू विद्यार्थ्याची इंजिनियरिंग ची फी भरायला मदत केलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि

हे महत्वाचे

प्रकाश घाटपांडे
Mon, 05/05/2008 - 14:28 नवीन
याच पैशातून मागच्या वर्षी एका गरजू होतकरू विद्यार्थ्याची इंजिनियरिंग ची फी भरायला मदत केलेली आहे.
अशा प्रकारची सामाजिक जाणीव जर वाढत गेली तर नक्कीच सामाजिक दरी अरुंद व्हायला मदत होईल. एक मदतीचा हात एखाद्याचे आयुष्य उजळून टाकू शकतो. तो दुसर्‍याला मदत करेल; दुसरा तिसर्‍याला; तिसरा चौथ्याला. अशी ही साखळी वाढली तर किती प्रश्न सुटतील! प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

तावून सुलाखून

प्रकाश घाटपांडे
Sun, 05/04/2008 - 21:17 नवीन
कुंदनचे तावून सुलाखून निघणे हे एक प्रकारचे अग्निदिव्यच असते. गुणवत्तेत कमी पडलो तर जातीचा आधार घेतला असा आक्षेप येण्याची भीती. त्यामुळे सतत प्रयत्नशील असावे लागते. मागे एकदा वृत्त पत्रात बोर्डात ( दहावी कि बारावी हे आठवत नाही) मागासवर्गीयात कु अमुक अमुक ही पहिली अशी बातमी आली. त्यानंतर तिची प्रतिक्रिया आली ती अशी की ती इतर चारचौघींसारखीच शिकली. राहणीमान आचार विचार हे पण मध्यमवर्गासारखेच. केवळ जन्माधिष्ठीत असलेली जात या निकषावरील कागदपत्रांमुळे तिला मागासवर्गीय हा शिक्का बसला होता. तिने कुठली ही सवलत नाकारली होती. तिला या कुबड्या नको होत्या. तिच्या मते मी जर इतरांसारखीच आहे तर उगीचच मी मागासवर्गीय म्हणून कशाला मिरवु ? त्याऐवजी या सवलती खरोखर मागासवर्गीय असलेल्या घटकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आरक्षणाचा लाभ मिळुन वरती आलेल्या परंतु विवेकवादी विचार करणार्‍या लोकांना विद्रोह केला नाही म्हणून भटाळला अशी दुषणे कायम मिळत असतात. कारण विद्रोह जागृत ठेवणे हे ज्यांच्या फायद्याच असत वा राजनीतीचा भाग असतो त्यांना हे लोक अडथळा वाटतात. शरणकुमार लिंबाळे यांचा "दलित ब्राह्मण" हा कथा संग्रह वाचनीय आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

धन्यवाद...

कुंदन
Mon, 05/05/2008 - 11:58 नवीन
धन्यवाद घाटपांडे काका.... कुंदनचे तावून सुलाखून निघणे हे एक प्रकारचे अग्निदिव्यच असते. एकदा त्या अग्निदिव्यातून जायची सवय लागली की त्याचेही व्यसन लागल्यासारखे होते. (गुणवत्तेत कमी पडू नये म्हणून सतत प्रयत्नशील असणारा) .. कुंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

क्या बात कही!!!

धमाल मुलगा
Mon, 05/05/2008 - 12:00 नवीन
कुंदनचे तावून सुलाखून निघणे हे एक प्रकारचे अग्निदिव्यच असते. एकदा त्या अग्निदिव्यातून जायची सवय लागली की त्याचेही व्यसन लागल्यासारखे होते. सुंदर!!! आवडलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

सापेक्ष

मन
Fri, 05/02/2008 - 21:49 नवीन
आरक्षणावर आपली भूमिका बनविणे अगदि सोप्पे आहे. आरक्षण साधारण पणे सापेक्ष मुद्दा आहे. आधी बघायचं की आपण "कुठल्या " बाजुचे आहोत. आणि मग दुसर्‍या बाजुला बिंदास""चुक " म्हणुन मोकळे. शेवटी ज्याचं जळत त्यालाच कळत. बाकीचे लोक काठावरुन उप्देश सांगायला असतातच.... मित्र हो आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments

आणखी येक बाळ्बोध शंका.........

मन
Fri, 05/02/2008 - 21:58 नवीन
आरक्षण! अतिशय ज्वलंत विषय!! तसं आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं. पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर..... माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझी मैत्रिण (जी महिला आहे) तिचीही ऍडमिशन झाली. तिला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही. माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. पण, हे कितपत योग्य आहे? शैक्षणिक बाबतीत, प्रवेशाच्या वेळी, गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं. आरक्षण असायला काहीच हरकत नाही. पण त्याला काहीतरी मर्यादा असावी. आरक्षण हे मुख्य शिक्षण पूर्ण करण्यासाठी असावं. उच्च शिक्षण घेताना फक्त गुणांचाच विचार व्हावा. नाहीतर मग, आरक्षण देण्यामागचा मूळ हेतू बाजूलाच राहील आणि अजिबात गुणवत्ता नसलेले लोक जागा बळकावून बसतील. कदाचित माझा सूर थोडा वरच्या पट्टीतला असेल, पण ....... मला नाही वाटत माझा मुद्दा चुकीचा आहे. यावर इतरांची मते आणि विचार जाणून घ्यायला आवडेल. जाति भेद संपवाल ठीक आहे. लिंग भेद संपवता येइल का? महिला आरक्षणाचे काय? आपलाच गरिब बिच्चारा अनारक्शित दोन खोल्यांच्या घरात जन्मभर राहुनही ईबीसी न मिळालेला, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments

आमचीपण बाळबोध शंका.....

ब्रिटिश टिंग्या
Sat, 05/03/2008 - 02:37 नवीन
माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझी मैत्रिण (जी महिला आहे) तिचीही ऍडमिशन झाली. अच्छा! आपली मैत्रीण "महिला" आहे तर.....:)) कृ.ह.घ्या. टिंग्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन

अगदीच की हो बाळबोध तुम्ही!!

अजिंक्य
Sat, 05/03/2008 - 18:41 नवीन
मनोबा, कॉपीच करायची होती, तर जरातरी नीट(!) करायची होतीत! माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझी मैत्रिण (जी महिला आहे).............. माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. नक्की भानगड काय आहे ते कळू शकेल का? म्हणजे मैत्रीण की मित्र? पुढच्या वेळी जेव्हा कॉपी करण्याचा प्रयत्न कराल ना, तेव्हा हा सल्ला ध्यानी असू द्या, म्हणजे झाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन

विरोध फक्त आरक्षणाच्या राजकारणाला असावा.

अभिज्ञ
Sat, 05/03/2008 - 02:04 नवीन
अनिकेत म्हणतोय त्याच्याशी मी पुर्णपणे सहमत आहे. आपण जशी आरक्षण मिळून गैरफायदा घेणारी ...उदाहरणे दिलित तशीच माझ्या पाहण्यात आरक्षण मिळाल्याने भले झालेलि अशी उदाहरणे आहेत. माझ्याच शाळेतला एक विद्यार्थी ,तो गचाळ अशा झोपडपट्टित रहात होता.बाप मजुर होता, आई ४ घरी धुणे भांडि करायचि.आता ह्याचि जात तर विचारुच नका.(चितपावन/देशस्थ वगैरे तर अजिबातच नव्हता) हा मुलगा माझ्याच वर्गात होता.तोच सकाळि माझ्या घरी पेपर व दुध टाकायचा. आम्हाला असलेल्या खाजगी शिकवण्या,पुस्तके,पी.जोग क्लासेस वगैरे सुविधा त्याला तर मुळिच नव्हत्या. तरिहि ह्या मुलाने अपार कष्ट काढले. दहावि -बारावीत हा बोर्डात वगैरे आला नाहि,पण उत्तम गुण मिळवून पास झाला. आरक्षण असल्यानेच त्याला मेडिकल ला प्रवेश मिळाला. आज तो एक प्रख्यात डोक्टर आहे. आणि माझ्याच बरोबरच्या बाकिच्या उच्चवर्णीय मुलांनि त्याच्या एवढे देखील मार्कस न मिळवता फक्त बापाकडे पैसा आहे म्हणून पे सीट वर अभियांत्रिकी आणि मेडिकल ला प्रवेश घेतला होता. आता ह्या उदाहरणात पहिल्याला आरक्षण का असु नये? आरक्षण असायला हवे का नको असे प्रश्न आम्हाला तरी पडत नाहित. सामजिक असमतोल दुर करण्यासाठि आरक्षण असावेच. विरोध फक्त आरक्षणाच्या राजकारणाला असावा. अबब (दे.ॠ.ब्रा.)
  • Log in or register to post comments

सामजिक

भडकमकर मास्तर
Mon, 05/05/2008 - 03:09 नवीन
सामजिक असमतोल दुर करण्यासाठि आरक्षण असावेच. १.योग्य...सहमत. २. तुम्ही दिलेल्या उदाहरणासारखेच एक उदाहरण मी अनुभवले आहे. माझ्याच हॉस्टेलमध्ये राहणारा ( वंचित वर्गातला गरीब) बारावीत माझ्याबरोबर शिकलेला , बाकीचे बरेचसे सारखेच... कमी मार्क असूनही तो बी जे मधून एम बी बी एस झाला... आम्हाला त्याबद्दल आनंदच वाटला, आणि वाटत राहील.... मला खुल्या वर्गात आवश्यक असणार्‍या गुणांपेक्षा कमी गुण मिळाले, ही त्याची चूक मानणे आणि त्याच्याबद्दल मनात अढी बाळगणे मला पटत नाही...( असं मानणारे काही मित्र माझ्यासमोर तसे बोलू लागले की मी लगेच त्यांना टोकत असे आणि म्हणत असे, " मग तुला ग्रुपला ९७ % पाडायला कोणी मनाई केली होती की काय?") मला ऍडमिशन मिळाली नाही कारण मला मार्क्स कमी मिळाले आणि माझी मेहनत कमी पडली , हे मान्य नसणारे लोक कारणे शोधत राहतात, अशा विद्यार्थ्यांचे पालकही असे मानण्यात पाल्यांना प्रोत्साहन देत राहतात.... हे सर्वस्वी चूक आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

+१ सहमत

नितिन थत्ते
Wed, 01/21/2009 - 15:23 नवीन
आरक्षण हवेच. आजही मनातून जात गेलेली नाहीच. जेथे रिक्रूटमेंट नेटवर्कींग मधून होते तेथे तर जात पाहूनच नेमणूका होतात. माझ्या माहितीत एकजण तर ऑफीसमध्ये प्यूनसुद्धा शक्यतो ब्राह्मण ठेवतो. मी इंजिनिअर होताना गेट च्या परीक्षेला बसलो होतो. त्यावेळी मला ७५ व माझ्या मित्राला ५० स्कोअर आला होता. माझ्या मित्राला मागास वर्गीय असल्याने एम टेक ला प्रवेश मिळाला. तेव्हा मी ही काही काळ रागावलो होतो. नंतर आरक्षणाच्या प्रश्नाचा अधिकाधिक विचार करताना मला साक्षात्कार झला की जरी आरक्षण आजिबातच नसते तरी ७६ स्कोअर वर मला प्रवेश मिळालाच नसता. म्हणजे आरक्षणामुळे मला प्रवेश मिळाला नाही ही माझी मूळ समजूतच चुकिची होती. मला ऍडमिशन मिळाली नाही कारण मला मार्क्स कमी मिळाले आणि माझी मेहनत कमी पडली , हे मान्य नसणारे लोक कारणे शोधत राहतात, अशा विद्यार्थ्यांचे पालकही असे मानण्यात पाल्यांना प्रोत्साहन देत राहतात.... एकदम मान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

पण मग...

मन
Sat, 05/03/2008 - 02:17 नवीन
महिला आरक्षणाचे काय साहेब? का ईथे तो विषयच नकोय? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments

जात आरक्षणाबाबत बरच काही...

प्रकाश घाटपांडे
Sat, 05/03/2008 - 10:19 नवीन
आरक्षणाचे तत्व सामाजिक न्यायावर आधारले आहे. संमिश्र समाजात सब घोडे बारा टक्के ( हा वाक्यप्रचार कसा आला ते मात्र माहित नाही) हा न्याय होउ शकत नाही. पळण्याच्या स्पर्धेत सामान्य व खेळाडू यांना समान् संधी , समान नियम लाउन जो पहिला येईल तो सिलेक्ट असे केले तर खेळाडूच पहिला येणार. दोहोंच्या स्टार्टिंग पॉईंट मध्ये फरक केला व बाकी नियम सारखे ठेवले तर न्याय् मिळेल्. तो स्टार्टींग पॉईंट कुठला हाच तर कळीचा मुद्दा आहे. बरेचसे मतभेद हे अंमलबजावणी बाबत आहेत. तत्वाबद्द्ल नाहीत. जातीव्यवस्था निर्मूलनाच्या दिशेने जाताना या डॉ.यशवंत सुमंत यांच्या २८ एप्रिल २००७ च्या अंकात इथे पूर्वार्ध ९ नं पानावर वाचा व उत्तरार्ध १२ मे २००७ च्या अंकात इथे पान नं ५ वर वाचा. १२ मेच्याच अंकात हरी नरके यांचा "ओबीसी खतरे में" हा लेख पान नं ११ वर वाचा http://mr.upakram.org/node/1208 येथे या विषयावरील चर्चा पहा. http://ajachasudharak.blogspot.com/ येथे जात आरक्षण विशेषांकाबाबत माहिती . प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

हम्म , आरक्षण ...

छोटा डॉन
Sat, 05/03/2008 - 10:50 नवीन
एक तर हा मुद्दा खुप वेळा चघळला गेला आहे व त्यातून काहीही निष्पन झालेले नाही, तरीपण पुन्हा आपण ही चर्चा सुरु केली आहे त्यामाग आपली तळमळ दिसते. असो. एकंदर चर्चेचा सुर अस्सा आहे की आरक्षण हे जातीच्या आधारे नसावे पण ते आर्थीक दर्जाच्या आधार दिले जावे ... जेव्हा आरक्षणाची सुरवात झाली तेव्हा ते जातीच्या आधारे देणे योग्य होते कारण त्या लोकांच्या पिढ्याच्या पिढ्या शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आल्या होत्या व देश स्वतंत्र झाल्यावर त्यांना अचानक ह्या "करियर" च्या जिवघेण्या स्पेर्धेत उतरावे लागले. पिढ्यानं पिढ्या शिक्षणावाचून पंगू असणार्‍या ह्या समाजाला हे आव्हान पेलणे अशक्य होते म्हणून आरक्षणाची तरतूद झाली व ती योग्यच होती. काहे समजूतदार लोकांनी ह्याचा खरच फायदा घेऊन स्वताचा व देशाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी ही आपल्या "बापजाद्यांची देणगी" मानून स्वताला "सरकारचे पाहूणे"समजण्यास सुरवात केली. मग जातीचे राजकारण करणारे पक्ष आले, मताची पोळी भाजण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा "जतीयवादाची होळी" पेटवली व स्वताची पोळी भाजून घेतलीव सत्तेचा मलिदा चखला. येवढे सगळे हो सुद्धा ज्यांच्यासाठी हे आरक्षण दिले गेले त्या खेड्यातल्या, तळागाळातल्या जनतेकडे कुनीच लक्ष दिले नाही. त्यांना कुठल्याच सुवीधा मिळाल्या नाहीत, त्यांचा वापर फक्त मोठ्यामोठ्या सभा व मोर्चे काढण्यासाठी झाला. त्यांचा शिक्षण, विकास हा मागासलेलाच राहीला व हे सर्व त्यांना आरक्षण असताना. आता तर आरक्षण रद्द करा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे मग त्यांनी करायचे काय ? त्यांना काही संधी नाहीच का ? त्यांच्यात आजच्या पुढरलेल्या समाजाबरोबर स्पर्धा करण्याची ताकद आहे का याचा विचार कुणी केला आहे का ? का पुन्हा एकदा त्यांनी दारिद्र्याच्या अंधःकारात खितपत पडायचे ? त्यांचा ह्या असंतोषाचा स्पोट होऊन एक दिवस देशात जातीय दंगली झाल्या तर जबाबदार कोण ? त्यांना असे दूर सारून आपण आपला देह्स पुढे न्हेऊ शकू काय ? मिशन २०-०२ मध्ये त्यांचा काहीच रोल नाही काय ? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचा विचार कुनी केला आहे काय ? आता पुढचा मुद्दा असा की आरक्षण हे "आर्थीक निकषावर" दिले जावे. कोण ठरवणार हे निकष ? आजच्या घडीला जेथे तलाठ्याला / तहसीलदाराला ५० रुपये दिले की १२००० रुपये वार्षीक उत्पन्न असल्याचा दाखला मिळतो तेथे आपण कसे ठरवणार की कोन आर्थीकदॄष्ट्या मागास आणि प्रगत ? एक वेळ जतीचा दाखला मिळणे अवघड पण हा "उत्पनाचा दाखला" म्हणजे सर्व झूट. बर हे सर्व पडताळून पाहणारी "यंत्रणा " कशी असणार ? तिच्या प्रामाणिकपणाची खात्री कोण देणार ? का या सर्व प्रश्नांचा विचार न करताच आपण अशा आरक्षणाचे पाऊल उचलणार ? जनरली अशा प्रश्नांचे उत्तर एवढे लगेच मिळत नाही. त्यासाठी गरज आहे त्या समाजाला विश्वासात घेऊन चर्चा करून काहीतरी तोडग काढण्याची. ज्यांनी आरक्षणाचा गैरफायदा घेतला अशी १०० उदाहरणे दाखवता येतील पण त्यासाठी आपण एका "लायक व्यक्तीवर अन्याय " करणार का ? आपला कायदाच सांगतो की " १०० दोषी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होउ नये " देशस्थ ॠग्वेदी ब्राम्हण छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा