हे म्हणजे कै च्या कैच
तुम्ही लोकांनी पार वैताग आणला आहे राव. हो तुम्हीच! अरे इथे मिसळपाववर छळता ते पुरे नाही का? सुखाने जगु द्या की एखाद्याला...
असे दचकु नका, आज सकाळी उठल्या उठल्या माझ्या मनात आलेले प्रामाणिक विचार वर लिहले आहेत. खरं तर सकाळी उठण्याचे कारणच वरील विचार आहेत, अन तुम्ही दचकला तसेच मला दचकवुन उठवण्यास कारणीभुतही हेच विचार.
तर झाले आहे काय, तुम्ही लोक (जसे कोणाही एका मिपा कराला इथे सतत छळता तसेच) मला ही छळत आहात, पण माझ्या स्वप्नात. हसु नका! प्रकरण गंभीर आहे. अहो झोपेचं पार खोबरं झालंय हो. आजचच उदाहरण घ्यायचं तर मला चक्क संपादक मंडळाचा व्यनी आला हो! ( मध्यमवर्गीय माणसाला जशी पोलीसांची भीती तशीच आम्हाला संपादक मंडळाची) व्यनीत चक्क "अवांतर धागे काढु नयेत" असा दम भरला होता. खडबडुन जागा झालो अन निश्वास सोडला, पण मग नंतर मागील अनेक प्रसंग धडाधड नजरेसमोरुन गेले. म्हणलं तुम्हा दोषी लोकांना थोडे गिल्टी वगैरे वाटायलाच हवे अन लेखन करा वर टीचकी मारली...
हॉलीवुड नगरी! नंदन, पिडां काका, देवदत्त अन मी असे पिडां काकांच्या घरात. साहित्यावर काही तरी गहन चर्चा सुरु आहे. नंदनच्या हातात कुठलेसे भले मोठे पुस्तक आहे.नंदनने चष्मा का घातलाय कुणास ठावुक! समोर शिंडीचा फोटु टांगलेला आहे, तिच्या कडे बघताना पिडांकाका माझ्याकडेच बघताहेत असे का वाटतेय! तिच्या खाली सोनिया गांधीचा फोटु आहे की काय? समोर टेबलावर ग्लेनफिडीशची बाटली आहे तिच्या शेजारी शिवास रीगल आहे, चौथा ग्लास दिसत नसल्याने मी व्याकुळ झालेलो आहे. अश्या सगळ्या भेदरलेल्या वातावरणात अचानक नंदन मला काही तरी प्रश्न विचारतो, मला फक्त दोस्तोव्हस्की वगैरेच ऐकु येते.फे फे का काय म्हणतात तशी अवस्था...
पुण्यनगरी. टिळकरोडवरुन सारसबागेत मैत्रिणीला भेटायला चाललोय (दिसुन दिसुन सारसबाग!) खरं तर टिळकरोड नेहमीचाच पण इथे सगळ्या दुकानांवर, पाट्यांवर व इतरत्रही युयुत्सु का लिहले आहे काही कळत नाही! कुठल्यातरी पुस्तकाच्या दुकानात भांडण चालु आहे.कुठल्यातरी घरावरुन जाताना पाणी कपात अन वीज कपातीवर तावातावाने चाललेली चर्चा ऐकु येते आहे. कुणीतरी सिग्नल तोडुन चालले आहे. तेवढ्यात कोणीतरी हाका मारतेय असं वाटलं, आवाज ओळखीचा, हळु हळु मोठा होतोय, धोक्याची जाणिव येते तसा. "ए चोच्या!" जोरदार स्पष्ट हाक. दोन वेण्या, भिंगाचा चष्मा इतकेच दिसतेय. "हरे रामा हरे कृष्णा" असे काहीतरी सगळीकडे का दिसते आहे कुणास ठावुक! ह्या वेण्या म्हणजे जोजोकाकुच! काहीतरी अखंड बडबड चालु आहे मला काहीही कळत नाहीए. माझे सारखे लक्ष घडाळ्याकडे, काकु काही थांबायचं नावच घेत नाहीएत. कशी सुटका होते माहीत नाही, एकदम एसी लावल्यासारखं थंडगार वाटतं. बागेच पोहोचुन पाहतोत तर काय परा (एकटाच) बागेत कोण काय करतंय बघत हिंडतोय. ती मला पाहते, मी पराकडे पाहतो, ती हाक मारते, परा मला बघतो आणि एक छद्म्मी हास्य ...
मागे जेव्हा भुमिती शिकायला सुरुवात केली होती तेव्हा फार विचित्र स्वप्नं पडायची, रोजच दरदरुन घामेघाम उठायचो. वरती शुभ्र आकाश आहे अन त्यावर आडव्या तिडव्या काळ्या रेघा आहेत. त्या रेघा एकमेकांना छेदत नाहीत, कुठे सुरु होत आहेत कुठे संपताहेत हे दिसत नाही. मी वेड्यासारखा आकाशाखाली रेघांचा अंत, छेदनबिंदु शोधत पळतो आहे, पळतोच आहे. असे ते स्वप्न होते. तसेच काहीसे आता पडते. धनंजयांचा कुठलातरी प्रतिसाद वाचतो आहे, वरुन खाली-खालुन वर काहीही उजेड पडत नाहीए, प्रतिसाद संपतही नाहीए, मी कळेल म्हणुन वाचतोय, वाचतोच आहे. थोडासे विपरीत पडणारे म्हणजे मुसुंचा प्रतिसाद वाचतोय असे. प्रतिसाद केव्हा सुरु झाला अन केव्हा संपला कळतच नाही, पण एक अक्षर कळेल तर शपथ! मध्येच एखादा आख्खी ओळ लांबीचा शब्दच काय येतो. पनास वेळा मी प्रतिसाद वाचतो पण शब्दच कळत नाहीत. हे अनुभव वाटतात किरकोळ हो, पण आख्ख्या निर्जिव जगात एकट्या सजीवाला कसे वाटेल तसे वाटते.
मोडकगुर्जी तर आठवड्यातुन एकदा तरी येउन "मोठे व्हा" असे सांगुन जातातच. एकदा तर आमचे बंधुराज रुसुन बसले होते, का तर म्हणे श्रामो "मोठे व्हा" म्हणाले म्हणुन. त्यालाही इथे आणला पाहिजे म्हणजे सवय होईल त्यालाही. घासुगुर्जी येउन कविता लिहा म्हणुन गृहपाठ घालुन जातात. त्यापाठोपाठ, कविता अन साहित्य आयुष्यात कीती महत्त्वाचे आहे हे बिका सांगुन जातात! खरं तर काय सांगतात काहीही कळत नाही, पण खरं आहे शिवाय काही म्हणायची छातीच होत नाही तेव्हा. एकदा तर जी मेलावर "टपकवला तिच्यायला" असा विषय असलेला इमेल आला. छोटा डॉन ने पाठवला होता. हे भला मोठा इमेल, पण काय लिहले आहे हे कळेनाच म्हणुन मग बिकांना फॉरवर्ड केला. त्यांनी शुद्धलेखनाच्या चुकांची खाली हे भली मोठी यादी जोडुन पुन्हा पाठवला. एक ओळ सोडुन बाकीचे काहीही कळले नाही. ती ओळ होती, "गल्लत होते आहे काय?"बाकी काही ताजी ताजी स्वप्ने पण पडतात म्हणा, कालच मी कुठेतरी 'स्थळ' बघायला गेलेलो, कुणासाठी काही आठवेना, मी मुलीला "स्वैपाक येतो का" असे विचारता सगळे खो खो का हसले कुणास ठावुक!
तर हा असा लेख जसा च्या तसा स्वप्नातच सुचला, त्यावर दोन तीन भन्नाट प्रतिक्रीया आलेल्या पाहुन घाबरुन लेख लगेच उडवावा म्हणुन माझे लेखन वर गेलो तर संपादनाचे बटनच नाही!! पुढे काय होणार याने जीव कासावीस झाला अन जाग आली, तस्मात धाग्याचा शेवट कसा करावा हे दिसलेच नाही...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
घे मेल्या... माझी मापं काढतोस
पहा तुम्हाला आनंद दिला का
केलं.
हा हा हा मस्त रे... नायल्या
हा हा हा
कधी नव्हे तो लेख लिहला तो
च्यायला उद्या भलतच कायतरी
नायल्या स्वप्नात काय पाहीलं
काय झालं हे ही लिहलं आहे, ते
असे कसे म्हणता?
आता एक संधर्भ द्यायचा
हॅहॅहॅ
हे हे हे , मस्त रे
खरोखर हे म्हणजे कै च्या कैच!
नायल्या, झोपायच्या आधी तसले
सगळं निट होईल. निट की नीट हो
प्रॉब्लेम बराबर वळकला पण उपाय
स्वप्नदोष
बेस
गुर्मीत नायल्या स्वप्न पाहतो
एकदम बराबर. पण बिकाशेट इथे
का रे नायल्या, गर्मीत आं?
गर्मी म्हणजे उकाडा गं. बाकी
एक सणसणीत उपाय!
...आधीच माफी मागुन मग तोंड उचटणार आहे..
हॅहॅहॅ!!! असो. जाओ माफ किया,
पण काही काढलेली मापे,काही
हॅहॅहॅहॅ..... नाईल, मोठा
ए भाउ...
एकदम
नायल्याच्या बाबतीत हे थोडं
हा.. हा .. भारी .
खरं तर सकाळी उठण्याचे कारणच
मिपावर मिपाकरांविषयी
परा मला बघतो आणि एक छद्म्मी हास्य ...
हॉलीवूड नगरी बडी बांका!!!